मायबोलीवर लेखन करण्यासाठी वेगवेगळ्या विषयांशी संबंधीत अनेक ग्रूप आहेत. या ग्रूपमध्ये, तुमचे लेखन तुम्ही स्वत:च प्रकाशीत करू शकता. मायबोलीवर गुलमोहर विभागात केवळ स्वतः लिहिलेले साहित्यच प्रकाशित करावे.
१. मायबोलीवरच्या ग्रूपमधून योग्य तो ग्रूप निवडा.
२. तुम्ही त्या ग्रूपचे सभासद नसाल तर सभासद व्हा. सभासद झाल्यावरच ग्रूपमधे लेखन करण्याची सुविधा तुम्हाला दिसायला लागेल.
३. ग्रूपच्या मेनू मधून योग्य तो पर्याय निवडून लेखन करा. ते साठवल्या वर (सेव्ह केल्यावर) लगेच प्रकाशीत होईल.
उदाहरणः
मायबोलीमध्ये प्रवेश केल्यानंतर सदस्य नामाखाली 'नवीन लेखन करा' असा पर्याय दिसेल.
त्यावर टिचकी मारली असता नवीन लेखनाचे पान येईल
यातील योग्य तो पर्याय निवडा आणि त्यावर टिचकी मारा. आता तुम्ही त्या ग्रुपच्या पानावर जाल.
तुम्ही ग्रूपचे सभासद नसाल तर आधी सभासद व्हा. सभासद झाल्यावर तुम्हाला लेखनाचे पर्याय दिसू लागतील.
येथे नवीन लेखनाचा धागा हा पर्याय निवडून त्यावर टिचकी मारा की नवीन लेखनाचे पान समोर येईल.
नवीन लेखनाचा धागा, गप्पांचे पान, कार्यक्रम, पाककृती या पर्यायांविषयी अधिक माहिती मदतपुस्तिकेतल्या या धाग्यावर उपलब्ध आहे.
तुमच्या लेखनाला योग्य ते शीर्षक दिल्यावर "गुलमोहर"च्या पर्यायांमधून आपल्या लेखनाला पूरक व योग्य तो साहित्यप्रकार निवडा. (उदा. कथा, कविता, मराठी गझल इत्यादी).
हितगुज विभागात विविध ग्रुपमध्ये त्या त्या विषयानुसार लेखन करता येते.
रंगीबेरंगी ह्या विभागात लिहीण्यासाठी तेथील सभासदत्व विकत घेणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी मदतपुस्तिकेतला हा धागा बघा.
कृपया लक्षात ठेवा: मायबोलीवर गुलमोहर विभागात केवळ स्वतः लिहिलेले साहित्यच प्रकाशित करावे.
मला माझे
मला माझे रंगिबेरंगी पान कसे मिळेल ?
मी अवांतर
मी अवांतर लिखाण कस करू?
दीपू द ग्रेट
"वक्त रूकता नहीं कहीं टिककर
इसकी आदत भी आदमीसी है"
कुलदीप, अवा
कुलदीप,
अवांतर लिखाण म्हणजे नेमक काय म्हणायचय तुम्हाला? स्वतःचे साहित्य लिहीण्यासाठी गुलमोहोर हा विभाग आहे आणि दुसर्या एखाद्या विषयावर लिहायचे असेल तर हितगुज मध्ये योग्य अश्या बा.फ. (बातमी फलक) वर लिहीता येईल.
सिंड्रेला,
सिंड्रेला,
हा खरेदी मधला दुवा बघा
http://kharedi.maayboli.com/shop/home.php?cat=253
तसेच तुम्ही या बाबत ऍडमिन ना मेल करु शकता.
हो पण
हो पण हितगूज वरील विषयानुसार लिखाण नसेल तर?
दुसर्या एखाद्या विषयावर लिहायचे असेल तर हितगुज मध्ये योग्य अश्या बा.फ. (बातमी फलक) वर लिहीता येईल.
>> हो पण नवीन लिखाण कस चालू करता येईल?? जस की पेपर म ध ल्या बात मी संबंधीत काही माहिती इ. इ.
दीपू द ग्रेट
"वक्त रूकता नहीं कहीं टिककर
इसकी आदत भी आदमीसी है"
कुलदीप, हित
कुलदीप,
हितगुज वर इथे जा http://www.maayboli.com/node/2200
त्यानंतर तुमचे लिखाण कुठल्या गृप मध्ये येवु शकेल हे ठरवा. ज्या गृपमध्ये ते येतय त्या गृप मध्ये जा, त्या गृपचे सदस्य नसाल तर आधी सदस्य व्हा, डावीकडे सामील व्हा असा दुवा असेल तो वापरुन सदस्य होता येईल. सदस्य झाल्यानंतरच तुम्हाला डावीकडे लेखनाचा नविन धागा सुरु करण्याचा दुवा दिसेल. तो वापरुन तुम्ही तुम्हाला हवे असलेले लिखाण त्या गृप मध्ये करु शकाल.
मदत
मदत समिती,
मी 'गुलमोहोर'च्या 'ललित' विभागासाठी 'नवनिर्माणाचा मार्ग तरी काय?' नावाचा एक लेख लिहिलाय. तो लिहून पूर्ण झाल्यावर त्याची स्थिती 'संपूर्ण (प्रकाशन करण्यायोग्य)' अशी केली. पण अजून तो 'ललित'च्या पानावर दिसत नाही. तो 'अपूर्ण' असताना मला 'हे पण पहा' मध्ये दिसायचा, फक्त तिथेच दिसतो आहे. तो प्रकाशित करायला अजून काही करायला हवं आहे का?
मदत
मदत समिती,
माझा प्रश्न सुटलाय असं वाटतंय. लेख प्रकाशित झाला असावा, कारण त्यावरची प्रतिक्रिया मिळालीय.. पण मला तो अजूनही 'ललित' किंवा 'गेल्या २४ तासातील नवीन लेखन' वगैरे कुठेच दिसत नाहीये..
दिलेला
दिलेला प्रतिसाद Delete कसा करायचा Please Help
Hello my friends, I am
Hello my friends,
I am visiting Maayboli after a very long time and hope old members remember me still. I have translated Bhagavadgeeta (complete)in verse form in marathi using easy-to-understand modern marathi words. I would like to publish it in Maayboli. The writing is done using 'Shivaji01' fonts. Can I post it chapterwise or as a full book as was my 'Mukundgaan' done in the past?
I shall appreciate receiving a response.
Kind Regards,
Mukund Karnik
@
@ मुकुंद
मायबोलीवर आपले पुस्तक ठेवायला नक्कीच आवडेल पण मायबोली आता युनिकोड सोडून इतर फाँट्मधे काही प्रकाशित करत नाही. त्यामुळे जर आपण युनिकोडमधे रुपांतरीत करू शकत असाल तर काही विचार करता येईल. खालील ठिकाणी अशी सुविधा आहे पण तिच्यात काही तृटी आहेत त्यामुळे मधेच काही अक्षरे नीट रुपांतरीत होत नाही. आपल्याला एक्-दोन पाने असे हळूहळू टाकता येईल. कमीत कमी या सुविधेमुळे परत टाईप करायची गरज नाही. नुसते संपादित करावे लागेल.
१. सुविधा वापरण्यासाठी खालील दुव्यावर जा
२. वर खिडकीत शिवाजी फाँटमधला मजकूर लिहा
३. convert to unicode बटनावर टिचली मारा.
४. खालच्या खिडकीत युनिकोडमधला मजकूर दिसेल तो मायबोलीवर Cut+Paste करा.
५. साठवण्याअगोदर पडताळून पहा. योग्य नसेल तिथे संपादित करा.
http://technical-hindi.googlegroups.com/web/shivaji+to+unicode+converter...
सुहास
सुहास शिन्दे
मी कविता लिहन्यास सुरुवात केली अनि अपुर्न लिखान म्हनुन साठवुन थेवलि अनि पुन्हा पहता येत नाहि तर काय करु.......अनि 'ठ', 'ट', साथि कोन्ति एन्ग्लिश वर्द्स वापरावेत?
धन्यवाद
सुहास
गुलमोहर
गुलमोहर मधील लेखन सार्वजनीक कसे करावे ?
विप्र तुम्
विप्र
तुम्ही गुलमोहोर मध्ये केलेले लिखाण 'प्रकाशित' केले असेल तर ते सार्वजनिकच असते. लिखाण जर आधी लिहुन ठेवुन 'अप्रकाशित' स्वरुपात ठेवले असेल तर त्या लेखनाच्या संपादन मध्ये जावुन 'प्रकाशित' करायचे म्हणजे ते वाचकांना वाचायला उपलब्ध होते.
mala group tayar karayacha
mala group tayar karayacha ahe kasa karu?
मायबोलीवर ग्रूप तयार करण्याचा
मायबोलीवर ग्रूप तयार करण्याचा अधिकार फक्त अॅडमिन यांनाच आहे. तुम्हाला चर्चेसाठी एखादा धागा तयार करायचा असेल तर तो कसा करायचा याच्या माहितीसाठी हे बघा.
अपुर्ण लिहुन ठेवलेले लिखाण
अपुर्ण लिहुन ठेवलेले लिखाण कुठे पहायचे..?
मि माझा लेख एकाचवेळी सर्व
मि माझा लेख एकाचवेळी सर्व विभागात कसे प्रकाशीत करु शकतो ?
मायबोलीवर लेख योग्य तो एकच
मायबोलीवर लेख योग्य तो एकच विभाग पाहून लिहावा. जर सर्वांनी पहावा असं वाटत असेल तर तो "सार्वजनीक" करण्याची सुविधा आहे.
किर्तन या विषयावर "नाचू
किर्तन या विषयावर "नाचू किर्तनाचे रंगी" अशा शिर्षकाचा वाहून न जाणारा धागा सुरू करायचा आहे. कोणत्या विभागात आणि कसा सुरू करता येईल ?
नवीन धागा काढण्याबद्दल
नवीन धागा काढण्याबद्दल मदतपुस्तिकेतील माहिती - http://www.maayboli.com/node/3581
मायबोलीवरच्या वेगवेगळ्या ग्रूपची यादी http://www.maayboli.com/og यातील योग्य त्या ग्रूपमध्ये आपल्याला हा धागा काढता येईल. एकही ग्रूप योग्य वाटत नसेल तर प्रशासकांकडे नवीन ग्रूपबद्दल विचारणा करावी.
माझे मायबोली वर प्रकाशित लेखन
माझे मायबोली वर प्रकाशित लेखन बघण्यासाठी, माझ्या मित्रांना (जे मायबोलीचे सदस्य नाहित) कसे आमंत्रित करावे?
रंगीबेरंगी ह्या विभागात
रंगीबेरंगी ह्या विभागात लिहीण्यासाठी तेथील सभासदत्व विकत घेणे आवश्यक आहे>>>
मदत समिती,
'कविता' या विभागात लिहिण्यासाठी असा नियम करता येणे शक्य आहे का?
समाज, सामाजिक असा काही ग्रूप
समाज, सामाजिक असा काही ग्रूप नाहीये का ?
गिरिश मायबोलीवर फेसबुक किंवा
गिरिश
मायबोलीवर फेसबुक किंवा इतर तत्सम साइटसारखी "invite friend" ही सुविधा नाही. आपल्याला ज्यांना आपले लेखन वाचायला द्यायचे आहे त्या लेखनाचा दुवा इमेलने पाठवावा लागेल.
महेश
धार्मिक ग्रूप मध्ये नाही का किर्तन बसणार? सामाजिक असाच ग्रूप हवा असेल आणि तो नसेल तर प्रशासकांना तशी विनंती करा.
बेफिकीर,
आपण याबद्दल प्रशासकांना लिहू शकता.
(No subject)
मुक्कामार १ तास, २५
मुक्कामार १ तास, २५ मिनिटे,
हे कुणासाठी आहे?? आपला प्रतिसाद??
नावाप्रमाणे
नावाप्रमाणे जगा.
बेफिकिर्जी.
अर्थात तुमच्यासाठी नाही.
फाल्तु लिखाण करणार्यांसाठी आहे ते.
उत्सुकता होती हो! बाकी काही
उत्सुकता होती हो! बाकी काही नाही. दिवसाला आय डी घेणार्यांना मी विचारलेच नसते. हा हा हा हा!
मदत समिती, माझा पण धार्मिक
मदत समिती, माझा पण धार्मिक मधे चालू करायचा विचार होता, पण पुढे त्या विषयाला अनेक उपविषय चालू करायचे असल्याने कदाचित समाज किंवा सामाजिक सारख्या ग्रूपमधे योग्य राहील असे वाटले.
असो, सद्ध्या धार्मिक कार्य करू.
Pages