Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02
आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!
सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!
मराठी बिग बॉस
आज ७.३० वा.
सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बरं झालं धागा काढलात. मी वाट
बरं झालं धागा काढलात. मी वाट पहातेय आज संध्याकाळची
कोण कोण आहे बिग्ग बॉस मध्ये?
कोण कोण आहे बिग्ग बॉस मध्ये?
मूर्तिमंत विकृत शो
मूर्तिमंत विकृत शो
आणि बघणारे तर त्याहुन रिकामभोट विकृत
मांजरेकर खयच आजारी आणि थकलेले
मांजरेकर खयच आजारी आणि थकलेले दिसून येतायत.. लवकर बरं वाटो त्यांना.
Follow करेन की नाही माहिती नाही.. स्पर्धक बघायची उत्सुकता आहे.
आयुष्यात/ जगात वेळ हा सर्वात
आयुष्यात/ जगात वेळ हा सर्वात माैल्यवान असताना, असले शो बघणे आणि त्यावर चर्चा करणे, कितपत उपयोगी आहे हे ज्याचे त्याने ठरवायचे
एक असते प्रोडक्शन आणि एक असते कंझंपशन, याने आपण कंझंपशन एंड ला येतो, वेळ फुकट आयुष्य फुकट.
सावरा वेळीच
मस्त टायमिंग.. कालच बिग बॉस
मस्त टायमिंग.. कालच बिग बॉस ott संपले.. सलमान चा बिग बॉस यायला वेळ आहे म्हणून आता आयुष्यात एक void आला असे वाटले आणि मराठी बिग बॉस सुरू...
मस्त मजा...
मला माहीत असलेले
मला हिंदी बिबाॅ मधे रस वाटत नाही. मराठी आवडतं.
तृप्ती देसाई
सुरेखा कुडची
अविष्कार दारव्हेकर
गायत्री दातार
विकास पाटील.
आदर्श शिंदेचा भाऊ
जोतिबा मधला हिरो
स्विटूच्या सिरिअलमधली मोमो
एक महिला किर्तनकार
जय दुधाने
सोनाली पाटील
फत्तेशिकस्त फेम वाघमारे
आठवले तेवढे लिहीले. मजा येणार आहे.
Splitsvilla विनर जय दुधाणे
Splitsvilla विनर जय दुधाणे आहे काय?
स्नेहा वाघ आहे.
स्नेहा वाघ आहे.
आविष्कार दारव्हेकरला बघून
आविष्कार दारव्हेकरला बघून कसंतरीच वाटलं.
लहानपणीच्या जवळजवळ सगळ्याच मालिकांमध्ये त्याला पाहिलेलं आठवतंय. एकदम फिट अँड हिरो मटेरियल वाटायचा तेव्हा.
स्वप्नील जोशी हिरो असलेली एक मालिका लागायची झी मराठीवर, नीना कुळकर्णी पण होती.नाव आठवत नाही पण
आविष्कार आणि स्नेहा त्या मालिकेत होते बहुतेक.
हो.
हो. जय दुधाने विनर आहे तिथला.
OMG स्पिल्ट्सविलाचा जय दुधाने
OMG स्पिल्ट्सविलाचा जय दुधाने ??????
विनर फॉर मी ऑलरेडी , आयॅम एक्सायटेड !
फिनाले मधे नक्की असणार तो, माझा आवडता आहे आणि प्र चं ड फॅन फॉलॉइंग आहे त्याला, लुकिंग फॉरवर्ड फॉर हिज टास्क्स , सुपर्ब आहे टास्क्स मधे !
बहुदा या वेळचा शिव ठाकरे !
मस्त टायमिंग.. कालच बिग बॉस
मस्त टायमिंग.. कालच बिग बॉस ott संपले.. सलमान चा बिग बॉस यायला वेळ आहे म्हणून आता आयुष्यात एक void आला असे वाटले आणि मराठी बिग बॉस सुरू...
<<<
अरेवा इथे कोणीतरी पाहिलं तर, छान होता पहिलाच सिझन , आपला मराठी मुलगा कोरिओग्राफर निशान्त भट सर्वात आवडला आणि दिव्या सुद्धा.
डिझर्विंग टॉप २
निशान्तने मराठी बिबी मधे यावं असं फार वाटत होतं , त्याला बहुतेक मेन हिन्दी सिझनमधे जायचय !
दारव्हेकर चॉकलेट बॉय होता खरा
दारव्हेकर चॉकलेट बॉय होता खरा ,पण मेन्टेन नाही राहिला. आविष्कार आणि स्नेहा excouple आहेत.
दादुस - कोळीगीत फेम
दादुस - कोळीगीत फेम
स्नेहा कोण?
स्नेहा कोण?
जय स्प्लित्सवीला फायनलमध्ये
जय स्प्लित्सवीला फायनलमध्ये आहे, जिंकला कन्फर्म आहे का??
हो तोच जिंकलाय फायनल. कन्फर्म
हो तोच जिंकलाय फायनल. कन्फर्म आहे.
अरे इथे का फोडताय
अरे इथे का फोडताय स्प्लिट्सविला स्पॉयलर्स
स्पॉयलर काय आहे आता यात?
स्पॉयलर काय आहे आता यात? सगळ्या दुनियेला माहीत आहे जय जिंकलाय ते. त्याने स्वतः त्याच्या इंस्टावर सांगितलंय.
आदर्श शिंदेचा भाऊ - उत्कर्ष
आदर्श शिंदेचा भाऊ - उत्कर्ष
जोतिबा मधला हिरो - विशाल निकम
स्विटूच्या सिरिअलमधली मोमो -मीरा जगन्नाथ
एक महिला किर्तनकार - शिवलीला पाटील
वाघ आणि वाघमारे असे दोघेही
वाघ आणि वाघमारे असे दोघेही आहेत काय?
नवा सीझन आला फायनली...
नवा सीझन आला फायनली...
गायत्री दातार एकदम unexpected होती.
स्नेहा वाघही किती वर्षांनी दिसली.
उद्या पासून पहायला मजा येईल
मांजरेकरांची तब्येत फारच खालावलेली दिसत्ये. पण आज 2 host कसे ? की मांजरेकरांवर फार ताण पडू नये म्हणून सिद्धार्थला आणलं ?
आविष्कार आणि स्नेहा excouple
आविष्कार आणि स्नेहा excouple आहेत.
>>>> विशाल तिला डायरेक्ट बोलला, त्याला बघून तुझा चेहरा असा का झाला, डोळे वेगळेच बोलताहेत वगैरे वगैरे
डीजे - येस मी ott सिझन पाहिला
डीजे - येस मी ott सिझन पाहिला.. माझा सपोर्ट दिव्या ला होता..
वाघ आणि वाघमारे असे दोघेही
वाघ आणि वाघमारे असे दोघेही आहेत काय?
>>> हे नोटीसच नाही केल....
"मामी स्पेशल" कमेंट आहे ही.
गायत्री दातारला पाहिल्यावर
गायत्री दातारला पाहिल्यावर धक्काच बसला.झीवाल्यांनी हिला सोडल की हिने त्यांना.
पण बखकीचे कंटेस्टंट पाहिल्यावर आता काळजी वाटत आहे मुलीची की हिच कस होणार.
बाकी कुडची ताईंना किशोरी ताईंसारखे सिम्पथी वोट्स मिळू नयेत.
इथे पण शिव वीणा सारखी जोडी दिसेल का?
मला त्यातल्या त्यात अक्षय
मला त्यातल्या त्यात अक्षय वाघमारे सॉर्टेड वाटला!!
उत्कर्ष शिंदे फुल्ल पॉलिटिकल वाटतो
मुलींमध्ये सोनाली पाटील त्यातल्या त्यात जरा आवडली
आविष्कार दारव्हेकर कुठल्यातरी डीडीवरच्या सिरीयलमध्ये इंस्पेक्टरच्या रोलमधला आठवतोय..... आवडला होता तेंव्हा तो!
पण इंट्रो प्रोमोमध्ये एकदमच डोक्यात गेला तो.... भयंकर माजोरडा वाटला!
मोमो अगदी सिरियलमधल्यासारखीच आहे.... बेडरुमची मालकीण म्हणून हवा तो बेड पाहिजे म्हणे!
गायत्री दातार या सगळ्यांमध्ये एकदमच कच्चा लिंबू वाटतीय!
जय दुधाणे/ने ला बघितले नाहिये आधी..... बाकी सगळे ओकेओकेच वाटले!
रोज नाही जमले तरी वीकेंडचा वार तरी बघावा म्हणतोय!
अरे कुठे पाहताय तुम्ही?
अरे कुठे पाहताय तुम्ही?
जय भारी प्लेयर आहे.. आणि अँगर
जय भारी प्लेयर आहे.. आणि अँगर पण भरपूर आहे त्याच्यात...राडा होणार राडा..
Pages