काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.....
पाण्याचा आवाज अधिक स्पष्ट ऐकु येतोय..
बाथरुममधला नळ तर परवाच बदलला. आणि बाथरुमचं दार आपोआप कसं उघडलं?
घरात कोणी शिरलंय? कसं शक्य आहे? दाराची कडी, बोल्ट्स नीट लावूनच झोपलोय.
तेवढ्यात खिडकीचा पडदा सरकल्याचा आवाज ! आपोआप! मला घाम फ़ुटतो.
खीडकीत दोन डोळे. जणु निखारेच! त्यांचा अंधुक प्रकाश चेहर्यावर, चेहरा कसला क..क... क.. कवटी आहे ती!
भ भ भ भूत!!.. खरच असतं???? डोळे माझ्यावरच रोखलेत. बोबडी वळली.
तावदानातून ते सरळ आत आलं आणि मानगूट धरुन मला अगदी चेंडु सारखं भिरकावून दिलं. मी समोरच्या भिंतीवर आपटलो मग फ़रशीवर. ते परत माझा गळा धरतंय..
"म.. म.. मारु नकोस मला!" कसे बसे शब्द बाहेर पडले.
त्याच्या डोळ्यातून अंगार बाहेर पडला. मानगूट धरुन त्यानं परत चेंडु सारखं उचललं.
त्याच्या कापर्या आवाजाने माझी सगळी हाडं थरथरली.
“आज सोडतोय. पण खबरदार परत अमानवीय धाग्यावर चेष्टा केलीस तर!”
आणि ते अंतर्धान पावलं.
छाने पण शतक ओलांडलत की
छाने![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
पण शतक ओलांडलत की
Pages