पाककृती स्पर्धा २ - पालेभाजीपासून बनविलेला पदार्थ - केल कॅबेज वडी - आ_रती

Submitted by आ_रती on 14 September, 2021 - 13:13
Kale cabbage vadi

पूर्वतयारीचा वेळ: १5 मिनिटे
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 15 मिनिटे

लागणारे जिन्नस:
साहित्य - २ कप बारीक चिरलेली केलची पाने
दीड कप बारीक चिरलेला कोबी
चिरलेली कोथिंबीर
थालीपीठ भाजणी १ कप
१/२ कप बेसन पीठ
१ चमचा प्रत्येकी धने, जिरे पूड
२ चमचे तिखट, १ चमचा हळद, मीठ चवीनुसार,
१ चमचा गूळ पावडर (आवडत असल्यास)
तेल

कृती - केल थोडा रफ असतो त्यामुळे अर्धी जूडी केलची पाने देठ काढून फूड प्रोसेसरमध्ये एकदम बारीक चिरून घ्यावीत. कोबीही बारीक चिरून घ्यावा.
4.jpg3.jpg
सर्व साहित्य एकत्र करून थोडे थोडे पाणी टाकून कालवून घ्यावे . मिश्रण वड्या थापण्या इतपत घट्ट असावे.
1.jpg

तव्यावर थोडे तेल टाकून वड्या दोन्ही बाजूनी शॅलो फ्राय करून घ्याव्या.

टोमॅटो केचअप किंवा चटणी बरोबर किंवा नुसत्याच गरम गरम वड्या ही खायला छान लागतात.

वाढणी/प्रमाण:
या साहित्यात साधारण १८-२० वड्या होतात.

अधिक टिपा:
थालिपीठ भाजणी नसेल तर थोडे गव्हाचे, ज्वारीचे, तांदळाचे पीठ ही घालता येईल.
बेसन पीठ मोजकेच ठेवावे अथवा भजी होईल.

माहितीचा स्रोत:
माझी आई व बहीण

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त१

छान!
मी वाफवून करते. अर्थात फक्त कोबीच्या वड्या.हे n वाफवता changale आहे.

ब्लॅक कॅट,सामो , स्वाती_आंबोळे, अमितव, sonalisl, मानव पृथ्वीकर, मामी, देवकी सर्वांचे खूप खूप आभार.

या वड्या मी वाफवत नाही.अशाच छान लागतात

अभिनंदन आरती, छानच दिसत होत्या वड्या. पहिला फोटोही आवडला बाप्पांचा. तेव्हा पाहिलेल्या पण धामधूमीत प्रतिसाद द्यायचा राहिलेला.