Submitted by हाडळीचा आशिक on 12 September, 2021 - 07:57
फुफाटा
काहीच सुचत नाहीये. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला गेला आणि बाळाप्पाची तंद्री भंगली.
कोणीतरी तिला केसांना धरून फरफटत आणत होतं. लक्ष्मी ? तो शहारला. आरडतओरडत त्या आडदांडाला ती प्रतिकार करीत होती. ते बाळाप्पासमोर पोहोचले. अशक्त झालेला तो उठू लागला.. भेलकांडला..
आडदांडानं तिला सामोरं केलं. पदर सुटलेल्या तिनं नवऱ्यासमोर लाजेनं मान खाली घातली.
"भेन्चो* ! पैशे आण न् ह्या रां*ला ने. पिंट्या जा, सोड याला.
पिंट्या पुढे झाला.
"मालक, मालक..." दीनवाणी हवेत विरली. पिंट्यानं त्याला बाहेर काढलं होतं.
रस्त्यावरील फुफाट्यानं डोळे डबडबले. पाणीच पाणी...नुसतं पाणी ! फुफाटा...पाणी ? फुफाटा......फुफाटा........................
_हाडळीचा आशिक
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे देवा...
अरे देवा...
शीर्षक नीट दिलेले नाही.
अर्र्र्र!!! काय ही विटंबना.
अर्र्र्र!!! काय ही विटंबना. नवर्याने फुकट प्याली म्हणुन गुत्त्याच्या मालकाने बायको ओलीस धरली
शीर्षक नीट दिलेले नाही.>>>
शीर्षक नीट दिलेले नाही.>>> धन्यवाद साधनाताई.
धन्यवाद सामो.
छान, शंभर शब्दांत
छान, शंभर शब्दांत सुद्धा तीव्रता साधली गेली आहे. जमलीये.
छान जमलीए
छान जमलीए
सामो, गुत्त्यावाला नाहीये तो
सामो, गुत्त्यावाला नाहीये तो आणि बाळाप्पा प्यायलेलाही नाहीये. कथाविषय वेगळा आहे. कुणीतरी ओळखेल म्हणून थांबलो आहे.
अस्मितै, मृतै धन्यवाद.
कर्ज फेडलेले दिसत नाही
कर्ज फेडलेले दिसत नाही बाळाप्पाने.
मला ही तेच वाटले..गरीब
मला ही तेच वाटले..गरीब बाळाप्पाला कर्ज फेडता आले नाही.
हो ! पण का तेही लिहा कोणी.
हो ! पण का तेही लिहा कोणी.
पुरा मुळे?
पुरा मुळे?
पीक बुडाले.
नाही.
नाही.
आजारी होता का बाळाप्पा??
आजारी होता का बाळाप्पा??
आजारी होते पण ते कारण नाहीये.
आजारी होते पण ते कारण नाहीये.
लॉकडाऊन
लॉकडाऊन
फुफाटा दुष्काळात पडतो असे
फुफाटा दुष्काळात पडतो असे वाटते. दुष्काळात जीव जगवायला घेतलेले कर्ज ऊठवणार..
(No subject)
लॉकडाऊन>>> नाही.
लॉकडाऊन>>> नाही.
साधनाताई तुम्ही जवळपास पोहोचताय.
पाण्याचा संदर्भ येतोय म्हणजे
पाण्याचा संदर्भ येतोय म्हणजे पूरामुळे सर्वस्व गेले? ओला दुष्काळ..??
ओला दुष्काळ>>> नाही.
ओला दुष्काळ>>> नाही.
एक प्रश्नचिन्ह आहे ते कामाला येईल.
हममम
हममम
कठीण.. फुफाटा शांत करायला पाणी?? आग विझुन गेलीय, फुफाटा ऊरलाय... आग का लागली किंवा लावली...
आगीचा संबंध नाही.
आगीचा संबंध नाही.
ग्लोबल वार्मिंग, पाणी टंचाई.
ग्लोबल वार्मिंग, पाणी टंचाई.
कर्ज थकले म्हणून बायकोला
कर्ज थकले म्हणून बायकोला ताब्यात घेतली.कुठे जाणार आणि पैसे मिळणार्?याहीपेक्षा त्यामुळे झालेलीबायकोची विटंबना आणि काही न करण्याची खंत.
हो हेच कळलंय
हो हेच कळलंय
माळीन गावासारखं भूस्खलन झालंय
माळीन गावासारखं भूस्खलन झालंय का?
(No subject)
कूपनलिका !
कूपनलिका !
साधारणपणे अठरा साडेअठरा फूट लांबीचा ड्रिलचा एक पाईप असतो. पाच ते सात मिनिटांत तो खाली जातो. खालून हवेचा दाब दिला की खालची माती वर येते. खाली पाणी वा ओल नसेल तर नुसती कोरडी माती न् धूळ उधळते (तोच फुफाटा). पाणी सापडण्याच्या आशेने पाईपावर पाईप वाढत जातात. प्रत्येक पाईपागणिक खर्चाचा आकडा वाढत असतो आणि खाली न सापडणारं पाणी शेतकऱ्याच्या डोळ्यांतून वाहू लागतं. भरपूर खोल जाऊनही पाणी लागतच नाही आणि कूपनलिकेसाठी खाजगी सावकाराकडून अव्वाच्या सव्वा दरानं कर्ज घेतलेलं असतं.. मग ते फेडायचं कसं ?
आता कथा
बाळाप्पाला सावकारानं आधीच उचलून आणून अंधाऱ्या जागी डांबलेलं आहे. संयोजकांनी दिलेल्या वाक्यांतील पाणी, अनामिक हुरहूर हे बाळाप्पाला होणारे भास आहेत. दरवाजा उघडला गेल्यावर त्याची तंद्री भंग पावते. त्यानंतरचं वर्णन त्या कुटूंबाची सध्याची परिस्थिती विशद करतं.
बाळाप्पाला बाहेर घालवल्यानंतर तो दिशाहीन रस्त्यानं जात असताना रस्त्यावरील धूळ डोळ्यांत जाऊन डोळे वाहू लागतात आणि पुन्हा पाण्याचे भास होऊ बघतात. खरंतर तो भास आभासाच्या सिमेवर आहे म्हणून पाणी -फुफाटा, पाणी-फुफाटा.
कूपनलिका खोदतेवेळी फुफाटा आलाच नसता तर आज परिस्थिती खूप वेगळी असती म्हणून तो मनोमन आपल्या कुटुंबाच्या सद्यस्थितीसाठी फुफाट्याला जबाबदार धरत असतो.
बाप रे!!!
बाप रे!!!
>>>>पुन्हा पाण्याचे भास होऊ बघतात. खरंतर तो भास आभासाच्या सिमेवर आहे म्हणून पाणी -फुफाटा, पाणी-फुफाटा.
कूपनलिका खोदतेवेळी फुफाटा आलाच नसता तर आज परिस्थिती खूप वेगळी असती म्हणून तो मनोमन आपल्या कुटुंबाच्या सद्यस्थितीसाठी फुफाट्याला जबाबदार धरत असतो.
१०० शब्दात फार ताकदीचे वर्णन आहे.
ओहह..
ओहह..
मला कधीही हा अंदाज बांधता आला नसता कारण मी जिथे राहते तिथे पाणीच पाणी आहे. बिन पाण्याचा फुफाटा ऐकुनही माहित नाही.
शंभर शब्दांत मी वाचकांपर्यंत
शंभर शब्दांत मी वाचकांपर्यंत योग्य तऱ्हेनं विषय पोहोचवायला कमी पडलो असं वाटतंय.
बरेच जणांनी छान प्रयत्न केला.
साधनाताई, सामो, अस्मीतै, मृतै, वीरु, मानवकाका, ऋन्मेष, देवकी, मी अश्विनी, sonalisl सर्वांना मनापासून धन्यवाद.
Pages