नमस्कार, मायबोली २४ तास मध्ये आपले स्वागत आहे.
आजच्या ठळक बातम्या अशा आहेत.
१. येऊ अशी कशी मी नाचायला चा लग्नाचा महाएपिसोड बघितल्यानंतर जपानमध्ये लग्नासाठी संगीत खुर्ची ठेवण्याची प्रथा सुरु झालीय. जो शेवटाला खुर्चीवर बसेल तो नवरदेव.
२. या मालिकेबाबत अजून जाणून घेण्यासाठी आमची संवाददाता कु. कुमारिका आजन्म राहणे या सेट वर गेल्या असता नलूयंती मावशीने तीचेसुद्धा तिथेच लग्न लावून दिले.
३.
.
.
.
१०. जगभरात स्त्रियांचा एवढा संताप होतो आहे कि वेधशाळेतील तापमापक रोज फुटतोय, त्यामुळे हि मालिका चालू असे पर्यंत तरी आम्ही रोजचे तापमान सांगू शकणार नाही. क्षमस्व.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
समस्त मायबोलीकरांनो, टी. व्ही. वरील मालिका आणि सिनेमातील अतिरंजित, न पटणारे, तर्क नसणारे विषय हे माबोकरांची नेहमीच करमणूक करत आलेले आहेत.
या वेळी आम्ही घेऊन आलो आहोत मायबोली २४ तास हा विनोदी लेखन उपक्रम. यात मालिका आणि सिनेमांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या अतर्क गोष्टींमुळे जगभरात झालेल्या घटना आपल्याला बातम्या सांगतो तश्या विनोदी ढंगाने सांगायच्या आहेत. वर उदाहरण दिलेले आहे. कमीत कमी दहा बातम्या असाव्या. जास्तीत जास्त कितीही चालतील. धाग्याचे शीर्षक विनोदी लेखन उपक्रम - मायबोली २४ तास - (मायबोली आयडीचे नाव) असे असावे. हा उपक्रम आहे , स्पर्धा नाही. प्रत्येक प्रवेशिकेला "मायबोली गणेशोत्सव २०२१" अशी शब्दखूण द्यावी
तर मग आपल्या कल्पनाशक्तीला चौफेर उधळू द्या आणि बातम्या सांगणे सुरु करा.
!!! गणपती बाप्पा मोरया !!!
वाह! कल्पनेचं वारु मोकाट
वाह! कल्पनेचं वारु मोकाट मोकलु द्या.
धमाल आहे.
पण प्रत्येकी कमीत कमी १०???
पण प्रत्येकी कमीत कमी १०??? फार नाही वाटत का? ३ ठेवा.
एवढ्या १० सुचणार कशा?
---------------------------
--------------------------- वानगी --------------------------
आजच्या ताज्या बातम्या -
नमस्कार मंडळींनो आजच आलेल्या गरमागरम व खात्रीशीर खबरीनुसार, बाप्पांच्या उंदीरमामाने, माबो संयोजकांना कॉन्टॅक्ट केलेला आहे अशी बातमी अमा यांनी वर्षा यांना कानात सांगताना, मानव यांनी प्रत्यक्ष पाहील्याचे वृत्त अस्मिता यांनी, मृणाल यांना व्यनितून लिहीलेले, एका उडालेल्या आय डीने चोरुन वाचले. परंतु तो उडालेला आय डी 'चोरुन वाचणे' या सदर कारणाकरताच उडालेला असल्याने त्याचे नाव जाहीर करण्यात येत नाही.
तरी या बातमीचा शहानिशा संयोजक करतील काय? नेशन वॉन्ट्स टु नो.
मायबोलीवर २४ वर गेला काही काळ
मायबोलीवर २४ वर गेला काही काळ काहीच प्रसारण होत नसल्याने हताश होऊन काही अपेक्षाभंग झालेल्या आयड्यांनी 'हे कसं शक्य आहे?' असे म्हणून खात्री करून घेण्याकरिता परस्परांच्या कळफलकास चिमटे काढून बघितले. तथापि असे केले असताही त्या फलकांतून कळ येईना. एरवी गुदगुल्यांच्या प्रतिसादातही खौचटपणा हुंगणार्या संगणकपडद्यांनाही कसलाच गंध जाणवत नव्हता. हा प्रकार पाहून आयड्यांचे धाबे दणाणले. आता आपले कसे व्हायचे? या विचारांनी त्यांचा माबोदाब वाढू लागला. माऊस गरगरू लागला. पाने रिफ्रेश करु करु माऊसाने मान टाकली. अखेर तपासाअंती सदर आयड्यांच्या इंटरनेट पुरवठादाराचे कडून काही अडचणींमुळे कनेक्शनचा घोळ असल्याने सदर अडचण दूर होईपर्यंत जुनीच पाने सदर आयड्यांना दाखवण्यात आली असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, माबोगणेशोत्सवात सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे भरते आलेले असून 'अखिल आंतरजाल समाजात' मायबोलीचा गणेशोत्सव क्षणोक्षणी सर्वांचे लक्ष वेधून घेत असल्याचे सूत्रांकडून समजते.
धन्यवाद.
विनोदी लिखाण उस्फूर्त असते.
विनोदी लिखाण उस्फूर्त असते. रूपरेषा देण्याइतपत समजू शकते. पण बंदीस्त स्कीट मधे विनोदी लिखाणाच्या कल्पनाशक्तीला आवाहन हे समजले नाही.