आधुनिक शास्त्र सांगतं की घरात प्रवेश करणार्या पृथ्वी, सौर व चांद्र ऊर्जेचं संतुलन उंबरठा राखतो.
लक्ष्मी दारातून आत येते किंवा दारातून माघारी जाते. म्हणून वास्तुशास्त्रात दरवाजा अतिशय महत्त्वाचा मानला गेलाय. फक्त दरवाजा जरी वास्तुशास्त्राप्रमाणं असेल तरी अनेक सुपरिणाम मिळतात. संपूर्ण घर रेक्टिफाय करत बसण्यापेक्षा फक्त दरवाजा रेक्टिफाय करणं सोपं, कमी श्रमाचं आणि कमी खर्चाचं आहे. शिवाय इतंकच केलं तरी भाग्योदय होतो. म्हणून दरवाजाचं वास्तुशास्त्र जाणून घेणे गरजेचं आहे.
ऊर्जा दोन प्रकारची असते. चांगली आणि वाईट. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. कधी " काय अवदसा घरात आलीय !" असं आपण सहजच म्हणून जातो. मायबोलीतील ही 'अवदसा' म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी. आणि पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे अर्थात लक्ष्मी होय. लक्ष्मी म्हणजे चांगल्या वैश्र्विक ऊर्जेचं घरात आगमन व्हांव म्हणून ज्या मुख्य दरवाजातून लक्ष्मी येते, त्या मुख्य दरावाजाकडे विशेष लक्ष पुरवावं लागतं.
घराचा मुख्य दरवाजा वास्तुशास्त्राच्या नियमानुसार असेल तर लक्ष्मी घरात येते. म्हणजेच योग, क्षेम, आयु, कल्याण, मांगल्य या पंचपरमेष्ठीची प्राप्ती होते, भाग्यकल्प होतो, असं वास्तुशास्त्रा मानतं. पण मुख्य दरवाजा वस्तुशास्त्राच्या नियमांच्या विपरित असेल तर तो वाईट ऊर्जेला निमंत्रण देतो. घरात 'अवदसा' आल्याची प्रचीती येते. विपरित फळं मिळू लागतात. मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं मुख आहे. जर मुखच अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त, जंतुसंसर्ग झालेलं असेल तर तेथून पोटात जाणार्या अन्नाची अवस्था काय होईल? जंतू घेऊन आलेलं अन्न आपल्या शरीराचं भरणपोषण करु शकेल का? दूषित ऊर्जा आपल्या घराचं स्वास्थ टिकवू शकेल का?
या साठी दरवाजाला उंबरठा असणं अतिशय आवश्यक आहे. हिंदू परंपरेत त्याला मर्यादेचं प्रतीक मानलंय. आयुष्य म्हणजे स्वैराचार नव्हे हेच जणू तो सांगत असतो. फ्लॅट सिस्टिममध्ये उंबरठा गायब झाला. कारण आजकालचं बांधकाम बिल्डरचं हित सांभाळत त्याची पै न पै वाचवत केलं जातं. उंबरठा नसेल तर दरवाजाची चौकट ही चौकट न राहता त्रिकाट होते हे लक्षात घ्या. शिवाय हळूहळू या फ्रेमचा काटकोन कमी होत जातो. उंबरठा नसेल तर घराची सीमारेषाही पूर्ण होते नाही. अर्थात वास्तुपुरुष डिफाइन होत नाही. त्यामुळे घराबाहेरील दोषांचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. दरवाजा चौकोनीच असावा. अर्धवर्तुळाकार नको. अशा घरात कन्याजन्माचं प्रमाण जास्त असतं, दरवाजा त्रिकोणी असेल तर स्त्रीपीडा उद्दभवते. दरवाजाची चौकट पूर्ण असावी. म्हणजेचं लाकडी उंबरठा असावा. हल्ली फ्लॅटमध्ये उंबरठा गायब झालेला असतो. त्यामुळे दरवाजाची
आधुनिक शास्त्र सांगतं की घरात प्रवेश करणार्या पृथ्वी, सौर व चांद्र ऊर्जेचं संतुलन उंबरठा राखतो. चौकटीसह पूर्ण दरवाजा एकाच प्रकारच्या लाकडाचा असावा. लाकूड पुल्लिंगी झाडाचं वापरावं, दारासाठी दोन कवाड असतील तर डांव कवाड मोठं ठेवावं. त्याला मातृ कवाड तर उजव्या कवाडाला पुत्रिका कवाड अशी संज्ञा आहे. मातृ कवाड पुत्रिका कवाडा॑पेक्षा मोठं असावं.
दरवाजा प्रमाणबध्दच असावा. आवाज करणारे, उघडताना अडकणारे, बुटके किंवा अतिउंच, फुगलेले, पातळ, कललेले, तिरके, डाग पडलेले, भेग पडलेले, रंग उडालेले दरवाजे असू नयेत. बृहत्संहिता ग्रंथात म्हटलंय की दरवाजा प्रमाणापेक्षा उंच असेल तर शासनभय आणि प्रमाणापेक्षा कमी असेल तर चोरभय व दु:ख देतो. मध्यभागी विस्तुत असेल ( ओव्हल आकाराचा ) तर हाव वाढवतो. कुब्ज ( उघडण्यास कठीण ) असेल तर कुलनाशक होतो. अतिपीडित ( उंबर्यास टेकणारा ) असेल तर गृह्स्वामीस पीडा करतो. घराच्या दिशेनं त्याचा तोल गेलेला असेल तर मृत्यूसारख्या घटना घडतात. बाहेरच्या दिशेनं कललेला असेल तर गृहस्वामीला अकारण प्रवास करावा लावतो.
कोणत्याही प्लॉट किंवा भवनाला ३२ प्रकारे दरवाजा काढता येतो. यातील ८ दरवाजे शुभ असतात तर उर्वरित २४ दरवाजे कमी-अधिक अशुभ असतात. या २४ दरवाजांचं अशुभत्व कस कमी करायचं ते आता पाहणार आहोत. प्रथम मुख्य दरवाजे पाहू.
कोणत्याही मुख्य दिशेत चुकीच्या पदात दरवाजा असेल तर वाईट फळं देणारच. मग भलेही ती दिशा उत्तर किंवा पूर्व असो. पण असे चुकीच्या पदातील दरवाजे रंग, पिरॅमिड, स्वस्तिक, धातू, दगड आदींचा खुबीनं वापर करीत रेक्टिफाय करता येतात.
संजीव
http:\\vastuclass.blogspot.com
वास्तुची व जातकाचे सामर्थ
वास्तुची व जातकाचे सामर्थ वाढवणारे देवाचे "देवघर \ देव्हारा "
आपल्या पुर्वजांनी व भारत देशातील ग्रंथात उलेख केल्या प्रमाणे भारतीय वास्तुशास्त्रात घरातील देवघर किंवा शहरातील (नवनिर्माण) घरातील देवघर / देव्हारा हा सुध्दा आपल्या जीवनात / वास्तुत पॉझिटिव्ह् किंवा निगेटिव्ह उर्जा ( घन, ॠण ) प्रसारीत करीत असतो. वास्तुशास्त्र व ज्योतिषशास्त्र दृष्ट्या घरातील देव्हारा हा नेहमी ईशान्य कोनात असला पाहिजे. ( होकायत्राच्या ४५ अंशा मघ्ये ).
ज्योतिषशास्त्रा नुसार
प्रथम आपण ज्योतिषशास्त्राच्या नियमा नुसार विचार करुया. कालपुरुषाच्या कुडंली प्रमाणे पूर्व-ईशान्य म्हणजे द्वितीय स्थान. या स्थानाची रास वृषभ तीचा अधिपती शुक्र ग्रह, नक्षत्र मृगर्शीषचे पहिले व दुसरे चरण, वृषभेचा पहिला नवमांश, सिंहचा रवि सर्वतोभद्र चक्राचा १७ वा राज्यांश ( राज्यांश= मृग नक्षत्र हे अतिशय शुभ व कर्तव्यदक्ष नक्षत्र असल्याने बुध्दिमान आहे. सत्ता, जबाबदारी, सत्ता मिळाल्यावर त्याचे पालन करणे, कर्तबगारी दाखवणे आणि राजनैतिक जबाबदार्याय पार पाडणे राजसमान वागणूक ठेवणे आणि यशस्वीरीत्या आपले अधिकार पद संभाळणे. मानसन्मान या राज्यांशात प्राप्त होतात. हा अतिशय चांगला सुक्ष्मांश असल्याने जातक यशस्वी होतो.) व वृषभेचा दुसरा नवमांश कन्याराशीचा बुधग्रह सर्वतोभद्र चक्राचा १८ वा चंडांश ( चंडांश= मृग नक्षत्राच्या दुसर्याळ चरणाचे नाव चंडांश आहे. हा कन्या नवमांशह असला तरी बुध चांगली फळे देत नाही. कारण चंडांश हा अतिशय कोपी व रागीट आहे. ह्या ठिकाणी कोणतेही ग्रह चांगली फळे देत नाही. ) मृगर्शीष नक्षत्राचा तिसरा चरण म्हणजे मिथुन राशीचा पहिला नवमांश तुलेचा शुक्र व सर्वतोभद्र चक्राचा १९ वा अभयांश ( अभयांश- मिथुन राशीचा पहिला नवमांश व मृग नक्षत्रातील तुळराशीचा नवमांश याचे नाव अभयांश म्हणजे सर्व संकटातुन सहीसलामत बाहेर पडणे. मिथुन राशीचा पहिला सुक्ष्मांश असल्याने शनि उच्च नवमांशात आल्यास कायद्याच्या बाजुने नेहमी अभय मिळण्याची शक्यता. इथे नेहमी चंद्र भ्रमणाच्या वेळी मनासारखी कामे व पुजा अर्चणा होईल. चंद्र, शुक्र, बुध, राहु यांची नेहमी चांगली फळे प्राप्त होतात.) ह्या स्थानातुन नेहमी सांपतिक स्थिती, पूर्वर्तित, द्रव्यलाभ, सोने चांदी इत्यादिची प्राप्ती, कौटुबिक सुख, धन, विद्धता व वकृत्व, वाक्-सिध्दि, वाणी, देवाण्-घेवाणातील नफा-नुकसान, लेखन कला, व्यापार आप्तवर्ग, मान, गळा. कंठ, उजवाडोळा ह्या गोष्टीचा प्रामुखाने विचार होतो.
वास्तुशास्त्रा नुसार
सर्वप्रकारच्या वास्तुमध्ये सर्व धर्मानुसार आपल्या देवावर व गुरुवर श्रध्दा व भक्ति असते. जागेअभावी जाणता-अजानता आपल्या आवडीनुसार किंवा जागेअभावी म्हणुन देव्हाराच्यी सोय काहीजण दिशेचा विचार न करता आपल्या आवडी नुसार सोय करतात. त्याचा परिणाम त्यांना ठराविक कालखंडा नंतर मिळतो किंवा त्यांच्या ग्रहाच्या अंतर दशेत होतो. शहरी भागात प्रामुख्याने देवाचा देव्हारा स्वयंपाक घरात किंवा आपल्या बेडरुम मध्ये करतात. बेडरुम मध्ये देव्हारा असल्यास रात्री झोपतांना त्या समोर तात्पुरते पार्टिशन किंवा पडद्याचा वापर करावा.
वास्तुशास्त्रात ईशान्य दिशेला फार महत्त्व दिले आहे. पूर्व-ईशान्य किंवा उत्तर-ईशान्य दिशेला तोंड करुन पुजा, ध्यानधारणा, पाठ, जप, अभ्यास, उपासना इत्यादि क्रिया केल्यास लवकर सिध्दिप्रद होता॑त. म्हणून ईशान्य दिशेला देवघर/ देव्हारा करावा.
कोणत्या दिशेला देवघर व देव्हारा असल्यास काय फळे प्राप्त होतात.
१. पूर्व दिशा ९० अंश देवघर किंवा देव्हारा असल्यास ऐश्वर्यलाभ, समाजात मान प्रतिष्ठाची वाढ, इंद्रदेव, मेषेचा मंगळ व रवी ( सुर्यनारायण) ची पुजा आपल्या हातुन नकळ्त होते. त्यामुळे मनाला स्फुर्ती येते.
२. आग्नेय दिशा १३५ अंश देवघर किंवा देव्हारा असल्यास केलेली पूजा जप, ध्यान धारणा अग्निमध्ये स्वाह होतात. या ठिकाणी ऐश्वर्यलाभ प्राप्तिसाठी, इंद्रदेवतेच्या आराधने साठी, धान्यलक्ष्मी, बुधग्रह, शुक्रग्रह, अग्निउपासना इत्यादिच्या प्रसन्नेसाठी केलेली होम्-हवण अनुष्ठान शुभ फले देतात.
३. दक्षिण दिशा १८० अंश देवघर किंवा देव्हारा असल्यास आदिलक्ष्मी, यमदेव, कर्करास, मंगळ ग्रह ह्याची नकळत उपासना होउन शत्रुपीडा इत्यादि गोष्टी वास्तुत घडताना दिसतात.
४. नैऋत्येला २२५ अंश देवघर किंवा देव्हारा असल्यास आदिलक्ष्मी, यमदेव, सिंहरास, मंगळ्ग्रह, धैर्यलक्ष्मी, नैॠत्तीराक्षस, कन्यारास, राहु व केतु ह्यांना नमस्कार तसेच पूतनाराक्षसीची पुजा म्हणजे भुतबाधा, शत्रुपीडा इत्यादि गोष्टी कारणीभुत होतात.
५. पश्चिम दिशा २७० अंश देवघर किंवा देव्हारा असल्यास पूर्व कडेपाठ म्हणजे ऐश्र्वर्यहानी धननाश, गजलक्ष्मी , वरुणदेव, शनिमहाराज, जम्बुक राक्षस ह्यंना नमस्कार परंतु देवस्थांन, मठ, मंदिर पूर्वाभिमुख करुन पश्चिमेस मंदिर बाधतात ह्यात देवाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्टा झालेली असते. ( उदा. माहिम मध्ये सितलादेवी मंदिर बघा आज पर्यंत र्जिणोउद्दार झालेला नाही. अशी अनेक मंदिरे आपणास माहीत असतील. )
६. वायव्य दिशा ३१५ अंश देवघर किंवा देव्हारा असल्यास गजलक्ष्मी व विजयलक्ष्मी वरुणदेव, वायुदेव धनु व वृश्चिकरास, चंद्र शनिदेव, पापराक्षसीची पुजा म्हणजे रोगाला आमंत्रण रोगबांधा.
७. उत्तर दिशा ३५९-०० अंश देवघर किंवा देव्हारा असल्यास धनलक्ष्मी, कुबेरदेवता, मकररास, बुधग्रह म्हणजे साक्षात घनाची व कुबेराची पुजा धनलाभ ऐश्वर्यलाभ.
८. ईशान्य दिशा ४५ अंश देवघर किंवा देव्हारा असल्यास धनलक्ष्मी, संतानलक्ष्मी, कुंभ व मीन रास, गुरुग्रह व बुधग्रह संसारासाठी लागणार्या४ धनाची व वंशवृध्दीसाठी पुजा, कुंभराशीचा स्वामी शनीची पुजा म्हणजे साडेसाथीत व माहादशेत स्वामीची नकळत पूजा. मीनराशीचा स्वामी गुरु म्हणजे योग्य मार्गदर्शन. ईशान्य दिशेला देव्हारा करणे हितकारक आहे. जर आपणास देव्हारा करता येत नसल्यास आपल्या गुरुचा व शिवाचा फोटो फ्रेम ह्या ठिकाणी जरुर लावा.
वास्तुशास्त्राच्या दुष्टी ह्या कोनातुन संतानलक्ष्मी, दिशाधिपती परमेश्वर, मीनरास, कारतत्व- ज्ञानवृध्दी, वंशवृध्दी, सुसंतान, ऐश्र्वर्य, भाग्य वास्तु पुरुषाचे डोके, वास्तु एकाशितीपद व वास्तुपद मंडळ्तील रक्तवाहीणी हिरण्या, सुव्रता व शांता यशोवती ह्याचा मेळ ह्या ठिकाणी होतो. म्हणजे सुख्य समृध्दी शांतता आरोग्य ऐश्वर्य चा लाभ. (क्रमश..)
<<< दरवाजा चौकोनीच असावा.
<<< दरवाजा चौकोनीच असावा. अर्धवर्तुळाकार नको. अशा घरात कन्याजन्माचं प्रमाण जास्त असतं, >>>
महाराष्ट्रात शनिशिंगणापुर येथेतर घरांना दरवाजेच नसतात...
मग तिथे तुमचा मुले / मुली होण्याचा फोर्म्युला कसा काम करतो..
महाराष्ट्रात शनिशिंगणापुर
महाराष्ट्रात शनिशिंगणापुर येथेतर घरांना दरवाजेच नसतात...
मग तिथे तुमचा मुले / मुली होण्याचा फोर्म्युला कसा काम करतो..
राहुलदा
दरवाजे म्हणजे दारा नसते ( आपण जे बंद करतो ते )
आपण याचा अर्थ निटसमजाऊन घ्या.
पहिल्यादा दरवाजे कशाला म्हणतात ते निट समजाऊन घ्या.
नाहीतर मद्य आणि मध ह्या घोटाळा होईल,
मी तिथे चौकट नसलेली घरे पहिली
मी तिथे चौकट नसलेली घरे पहिली आहेत..
दरवाजे म्हणजे दारा नसते ( आपण
दरवाजे म्हणजे दारा नसते ( आपण जे बंद करतो ते )
आपण याचा अर्थ निटसमजाऊन घ्या.
पहिल्यादा दरवाजे कशाला म्हणतात ते निट समजाऊन घ्या. >>>
ठीक आहे ज्यो.शा. बुवा मग तुम्हीचं समजावुन सांगा .
नाहीतर मद्य आणि मध ह्या घोटाळा होईल, >>>>
तुमच्या पोष्टीवरुन तरी वाटतयं की तुम्हाला मद्यचं लिहायचं होतं , असो .
पहिल्यादा दरवाजे कशाला
पहिल्यादा दरवाजे कशाला म्हणतात ते निट समजाऊन घ्या.
---- वाजणारे दार म्हणजे दरवाजे. माझा पहिला नंबर, गुरुजींच्या शाबासकी साठी मी दार उघडतो... उंबरठ्यातच
संजीव, दरवाजा अन देव्हारा
संजीव, दरवाजा अन देव्हारा याबद्दल खुप छान माहिती दिलीत.
आपल्या सर्वाचे आभार. आपण
आपल्या सर्वाचे आभार. आपण दिलेल्या आपल्या अभिप्राया बद्द्ल मनपुर्वक धन्यवाद....
कामाच्या गोधळात ध चा द्या कधिझाला ते समजले नाही, पंरतु आपल्या सर्वाच्या अभिप्राया बद्दल लिहतांना व वाचताना एक आपुलकी वाटली आपण सर्वजन जुणे सभासद आहात. मला आपल्या परिवारात साभाळुन घ्या की !
आपला
पोपट भविष्यवाला
संजीव
ज्यो अरे विनोद वगैरे म्हण्जे
ज्यो अरे विनोद वगैरे म्हण्जे एक अॅक्सेप्ट्न्सच आहे की. तु परत ध चा मा करू नकोस. माहिती चान्गली आहे. सर्व घराबद्दल माहिती दे.
मला आपल्या परिवारात साभाळुन
मला आपल्या परिवारात साभाळुन घ्या की !
--- परिवाराची दारे सर्वांसाठी सताड उघडी आहेत...
हो पण गोल आहेत का त्रिकोणी,
हो पण गोल आहेत का त्रिकोणी, चौकोनी, पंचकोनी ?
खास चौकोनी... सर्व
खास चौकोनी...
सर्व घराबद्दल माहिती दे.
--- घर बांधायला घेतले नसेल तर थोडा धिर धरणार कां मामीसाहेब? प्रथम मुख्य दरवाजे पाहू असे ज्योंनी लेखात म्हटलेले आहे... म्हणजे त्यांच्या कडे लिष्ट आहे, टप्प्या-टप्यात पुढची माहिती मिळेल.
उदय मी त्याला ऊत्तेजन देत आहे
उदय मी त्याला ऊत्तेजन देत आहे
आपण कोण त्यांना उत्तेजन
आपण कोण त्यांना उत्तेजन देणारे, तेच आपल्याला उत्तेजक पेय घ्यायला सांगतायत.
उदय मी त्याला ऊत्तेजन देत
उदय मी त्याला ऊत्तेजन देत आहे
--- कदाचित तुमचा उद्देश अगदीच शुद्ध असेल. पण होणार काय ज्योंनी वर लेखात सांगितल्या प्रमाणे
ऊर्जा दोन प्रकारात येते, चांगली (पॉझिटिव्ह) आणि वाईट (निगेटिव्ह). तुमच्या प्रोत्साहनामुळे, चौकोनी दरवाजातून ज्यों कडे आलेली नैसर्गिक ऊर्जा रद्द (annihilate) होण्याची शक्यता तुम्ही गृहीत धरली आहे कां?
कृपया थोडे थांबा, टप्प्या टप्यात ज्यो आपल्या समोर मुद्दे अलगद पणे उलगडतील (अशी अपेक्षा).
पोपटवाले गुरुजी, वास्तु,
पोपटवाले गुरुजी, वास्तु, पोपटाचा बिजनेस याना ग्राहक संरक्षण कायदा लागू होतो का? म्हणजे वासतुवाल्याचा सल्ला म्हणून केले, आणि गुण आला नाही किंवा अवगुण आला तर...?
पोपटवाले गुरुजी, वास्तु,
पोपटवाले गुरुजी, वास्तु, पोपटाचा बिजनेस याना ग्राहक संरक्षण कायदा लागू होतो का?
मी प्रथम याचे स्वागत करीन, ग्राहक संरक्षण कायदा ह्या गोष्टीसाठी लागु झालाच पाहिजे, नंतर आयकर, सामाजिक कर, सेवा कर
इत्यादि कर ह्या साठी लागु झाले पाहिजे,म्हणजे उठला कि लागला कामाला वास्तु व ज्योतिष तज्ञ म्हणून. ह्य गोष्टी तरी कमी होतील. व फक्त जाणकारच यांचे काम करतील. नाहीतर अवगुण आला तर नुसान कोण भरुन देणार.
वैद्यराज आपल्या गोष्टीचे स्वागत
आपला C8H9NO2 संजीव
चांगली कल्पना आहे. याने
चांगली कल्पना आहे. याने ग्राहक अन तज्ञ (भविष्य, वास्तू, वगैरे) दोघांनाही संरक्षण मिळेल. पण माझ्या माहितीत ग्राहक संरक्षण कायदा हा commodity based आहे. कसल्या तरी वस्तू/उत्पादन्/माल याची एकाने दुसर्याला विक्री वा पुरवठा करण्यापर्यंतच तो लागू आहे. भविष्य, वास्तू या मधे पत्रिका, खडे, अंगठ्या, घरातील बदल वगैरे असल्या "वस्तू" सोडता बाकी सर्व वैचारीक अन मार्गदर्शक सेवा, काउंसेलिंग आहे. असे मार्गदर्शन कुणी स्टँप पेपर वर लिहून देत नाही ज्याच्या आधारावर ठोस कायदेशीर वगैरे कारवाई करता येईल किव्व्वा ग्राहक न्यायालयात दाद मागता येईल. त्यामूळे त्याचे interepretation तितके सोपे नाही.
जाणकार अधिक माहिती देवू शकतील.
भावना गोवेकर // दरवाजा अन
भावना गोवेकर // दरवाजा अन देव्हारा याबद्दल खुप छान माहिती दिलीत.//
अधिक माहितीसाठी http://vastuclass.blogspot.com वर पाहा.
संजीव
ज्योतिषांनी केलेले भकित का
ज्योतिषांनी केलेले भकित का चुकते?
सध्याचे युग हे अंत्यत आधुनिक युग म्हणुन संबोधले जाते. या आधुनिक काळात ज्योतिषा कडे सुध्दा आधुनिक उपकरनणे पाहिजेत. जिथे प्रत्येक सेकंदची गणना ठेवली जाते, तिथे चूक करुन कशी चालेल. काहि ज्योतिषी बाजारात मिळणार्याा अनाधिकृत संगणक प्रणाली तसेच कुंडलीचा वापर करतात. तसेच बाजारात मिळणर्या पंचागावर, आपल्या हातातील घडाळ्यावर, भिंत्तीवरील किंवा भ्रमणध्वनी असणार्याो घडाळ्याच्या समय सुचना प्रणाली वर अवलबुन राहतात. कुंडलीशास्त्र हे आकाशातील ग्रह तारे व तारका समुह ह्याच्या वर आधारीत आहे. ह्याचा कालखंडा विषयी आपणा विचार न केलेला बरा. पण त्यातील काही संकेत व भाष्य आपण आताच्या आधुनिक युगात, आधुनिक शास्त्राच्या मदतीने नवनवीन प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न पाहीजे.
पुर्वी फक्त नऊ ग्रह व २७ नक्षत्रे ह्यांच्यावर ज्योतिषशास्त्र अवलंबून होते, त्यानंतर राहु,केतु,हर्षल,प्लुटो, नेपचून इत्यादि ग्रह व काही तारका व तारका समुहाचा भर त्यात पडला, अजून पर्यंत हर्षल व नेपचून ह्या विषयी या शास्त्रात योग्यते संशोधन झाले नाही. कारण त्याचा कालखंड फार मोठा आहे.
आता भवीष्य वर्तन करण्यापूर्वी ज्योतिषानी खालील काही बांबींचा विचार करावा असे माझे मत आहे. ह्याचे संशोधन मी करत आहे, संशोधन करताना चुका होतात, चुक दुरुस्त करण्यासाठी आपल्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. प्रत्येकाला आपल्या मत प्रदर्शनाचा अधिकार आहे. आपले मत चांगले असो वा वाईट मला ह्यातून नवनवीन कल्पना मिळतील यात तिळमात्र शंका नाही.
जातक कुंडली, वास्तू कुंडली, जन्मठिकाणाचा आकाशातील ग्रह आणि तारका समुहाचा जन्मवेळेचा व आजचा नकाशा, जातकाची वैज्ञानिक कुंडली, थर्मलइमेज कुंडली, इत्यादि सर्व कुंडली बनवून अभ्यासाची एक नविन पध्दत मी विकाशीत करत आहे.
१. २७/२८ नक्षत्र व त्यातील काही तारका व तारका समुहातील मंद प्रकाश तार्यालचा विचार करावा.
२. प्रत्येक तारका समुह हा आकाशात ( डोक्यावरती ), पाताळात ( विरुध्द दिशेस ), उजवीकडे तसेच डावीकडे व कोणत्या दिशेस आहे हे लक्षात घेऊन कुंडलीचा अभ्यात करावा.
३. तारका समुहातील ग्रह व त्या जवळील तारका इतर तारका समुह व धुमकेतु सुध्दा विचारात घ्यावे.
४. आकाश गंगेतील धुमकेतू व उल्काचा प्रत्येक राशीतील प्रवेश व कालखंडचा विचार करावा.
५. प्रत्येक ग्रहा जवळील धुमकेतू आणि उल्का याचा मार्ग व त्यांचा होणारा ग्रहाशी योग सुध्दा ध्यानात घ्यावा.
६. प्रत्येक ग्रह व तारका समुह आणि धुमकेतु मधील अंतर, त्या मधील होणारे योग व इतर ग्रहाचा त्यावर होणारा परिणाम सुध्दा धान्यात घावा.
७. निश्चित केलेल्या भ्रमण रेषेतीला छेदून जाणारे ग्रह, तारका, नक्षत्र, धुमकेतू उल्का व इतर तारका समुहातील नक्षत्रे याचा परिणाम.
७. जातक ज्या ठिकाणी राहात असेल त्या ठिकाणाचा भौगोलीक व आकाशातील ग्रह तारका समुहाचा नकाशा बनवून त्याचे वाचन
८. २७-२८ नक्षत्रच्या बाजुला असलेले दुसरी नक्षत्रे आणि तारका समुह.
९. जातकाची वैज्ञानीक कुंडली, वास्तुकुंडली व जन्मकुंडली ह्याचे निरीक्षण करुन त्याची पत्रीका तयार करणे व उपाय योजना सांगितल्या नतंर झालेल्या परीणामाची नोंद करुन ठेवणे.
१०. जातक राहत असलेल्या ठिकाणाची समुद्र सपाटीपासुन उंची, वास्तुतील मोकळ्या जागेतून अवकाशातुन येणार्यात किरणाची टक्केवारी.
११. वास्तुतील रेडिओ लहरीची तीव्रता, तसेच वास्तुतील विद्युत उपकरणे यातून निघणार्यात लहरी, वास्तुतील चुंबकीय क्षेत्र व त्याचे मोजमाप.
१२. वास्तुचा व जातकाचा र्थमलइमेज कुंडलीचा अभ्यास व उपाय योजना केल्यावर झालेला बदल ह्याचे निरीक्षण करणे.
ह्या सर्वगोष्टीचा विचार करुन जातकाची कुंडलीचे भाष्य करने योग्य होईल असे मला वाटते.
संजीव
पुर्वी फक्त नऊ ग्रह व २७
पुर्वी फक्त नऊ ग्रह व २७ नक्षत्रे ह्यांच्यावर ज्योतिषशास्त्र अवलंबून होते, त्यानंतर राहु,केतु,हर्षल,प्लुटो, नेपचून इत्यादि ग्रह व काही तारका व तारका समुहाचा भर त्यात पडला >>>>>>>>>>>>>>>
साफ खोटं लिवलय गुरुजी तुम्ही!!!! छ्या छ्या साफ खोटं !!!!! .... नवग्रह स्तोत्र वाचलय का कधी? शुक्र्,मंगळ्,गुरु शनि आणि बुध हे पाच ग्रह खरे ग्रह होते.... रवि आणि चंद्र हे ग्रह नव्हेत... आणि राहू केतु हे बिंदु........ त्या काळातील नऊ आकड्याची फोड अशी आहे... यात पृथ्वी नावाच्या ग्रहाचा समावेश नाही...
कालांतराने इतर ग्रह शोधले गेलेले आहेत.... आज नऊ ग्रह आहेत. उरलेले र चं रा के... हे अॅड केले तर आता ती फिगर १२ + पृ. होते.... त्याना मराठी नावे उपलब्ध आहेत, याचा अर्थ ते ग्रहही पोथ्यांमध्ये होते आणि पूर्वीच्या काळात पोपटवाल्याना आजचे नऊ ग्रह माहीत होते, असा गोड गैरसमज का करून घेताय? आजचे भुगोलातले नवग्रह आणि स्तोत्रातले नवग्रह.. आकडा एकच, पण यादी येगळी येगळी हाय गुरुजी! लबाड बोलतायसा गुरुजी असुनबी? हे काय बरुबर न्हाय!! लई वंगाळ!!!
वैद्यराज आपण म्हणता ती गोष्ट
वैद्यराज
आपण म्हणता ती गोष्ट खरी आहे.
आज नऊ ग्रह आहेत. उरलेले र चं रा के... हे अॅड केले तर आता ती फिगर १२ + पृ. होते....
पण जग सुध्दा पुढे गेल त्याच काय?
आजचे भुगोलातले नवग्रह आणि स्तोत्रातले नवग्रह.. आकडा एकच,
अहो चंद्राचा दुसरा भागचा आपण कधी विचार केला का? तो कधीही पुथ्वी वरुन दिसत नाही. त्याचे काय?
लबाड बोलतायसा गुरुजी असुनबी? हे काय बरुबर न्हाय!! लई वंगाळ!!!
लबाडी करुन C8H9NO2 फारमुला च्या बदली ज्या नव्या कंपन्या आपला फारमुला देतात तो आपण का वापरता तेव्हा का अस म्हणत नाही की साध्या PCM नी आपल्याला बरे वाटते ना! उगाच माहग फारमुले त्याच्या वर का वापरतात.
संजीव
मला ४ प्रश्ण आहेत - १. तुम्ही
मला ४ प्रश्ण आहेत -
१. तुम्ही येथे वास्तु संबंधातल्या माबोकरांच्या प्रश्णांना उपाय सुचवणार आहात काय?
२. जर होय, तर सामान्यांना कळेल अशा भाषेत लिहा.. मला बुध, इंद्र, मंगळ चतुर्थ स्थानी आहे की आणि कशाचा अधिपती आहे त्याने काही फरक पडत नाही. देव्हारा नक्की कुठे ठेवायचा ते सांगा. ईशान्येला ४५ अंश म्हणजे काय? इथे मला घराची इशान्य दिशा समजताना कष्ट आहेत, तिथे ४५ अंश कस कळणार?
३. आणि बेडरूममध्ये देव्हारा असेल तर पडदा करावा पण स्वयंपाक घरात असला तर काय करायचे?
४. इथे आंध्रप्रदेशात प्लॉट पुर्वाभिमूख असावा की दक्षिणाभिमूख हे ज्याच्या त्याच्या पत्रिकेवरून ठरवतात. आपण महाराष्ट्रात नक्की कुठची पद्धत वापरतो?
""ईशान्येला ४५ अंश म्हणजे
""ईशान्येला ४५ अंश म्हणजे काय?"" पूर्व किन्वा उत्तर दिशा
वकिलसाहेबा, आपल्या भारत देशात
वकिलसाहेबा,
आपल्या भारत देशात प्रथम "शुन्य" ( ० ) ची व्याख्या अमंलात आणली आहे. सर्वदेशात देशात एक संकेतीक ओळख असण्यासाठी एका आलेखाचा आपण उपयोग करत आहोत. त्या प्रमाणे प्रुथ्वीचे चुंबकीय गुणधर्म ओळखुन त्याला काही नावे दिली आहेत. त्याला आपण दिशादर्शक नावाने ओळखतो. त्याच्या शुन्य ला उत्तर दिशा असे म्हणतात, तसेच त्यामध्ये ४५ अंश मिळवले असता एक एक दिशा होते ती म्हणे जे ०= उत्तर, ४५ ईशान्य, ९० पुर्व, १३५ अग्येय, १८० दक्षिण, २२५ नैऋत्य, २७० पश्चिम, ३१५ वायव्य अशानावाने संबोधले जातात. त्याच प्रमाणे ० ते ४५ दिशेला उत्तर ईशान्य असे म्हणतात, ४५ ते ९० पर्यंतच्या भागाला पुर्व ईशान्य असे संबोधतात. त्याप्रमाणे इतदिशेचा विचार करावा.
घरातील देव्हारा हा ० ते ९० ह्याचे नव समान भाग करावे आणि त्यातील उत्तरे कडील ४थ्या चरणात व पुर्व कडुन ४था चरणात देव्हारा ह्या दोन ठिकाणी बसवावा.
वेळे अभावि तुकड्या तुकड्यात उत्तरे देत आहे क्षमस्व
संजीव
(क्रमश)
आत्ता कळलं! म्हणजे आमचा
आत्ता कळलं! म्हणजे आमचा देव्हारा त्या २२५ आणि २७० च्या आसपास आहे कुठेतरी.. आम्ही आपले देवाचे तोंड इशान्येला करून त्यांना बसवलयं..! जर आता देव्हारा हलवला तर चालतो की देव डिस्टर्ब होतील?
धन्यवाद!
जाईजुईचे ४ प्रश्न १. तुम्ही
जाईजुईचे ४ प्रश्न
१. तुम्ही येथे वास्तु संबंधातल्या माबोकरांच्या प्रश्णांना उपाय सुचवणार आहात काय?
उत्तरः- होय का नाही, जरु एक एक दरवाजा बघतो आणि उपाय सुचवितो.
२. जर होय, तर सामान्यांना कळेल अशा भाषेत लिहा.. मला बुध, इंद्र, मंगळ चतुर्थ स्थानी आहे की आणि कशाचा अधिपती आहे त्याने काही फरक पडत नाही. देव्हारा नक्की कुठे ठेवायचा ते सांगा. ईशान्येला ४५ अंश म्हणजे काय? इथे मला घराची इशान्य दिशा समजताना कष्ट आहेत, तिथे ४५ अंश कस कळणार?
उत्तर :- काही काळजी नसावी, सोप्या भाषेत लिहत जाईन, आपण सुध्दा थोडा अभ्यास करावा. नाहीतर शाळेत मास्तर आणि शिकवणी वर्गात मास्तरीन बाईना आपण कशाचे पैसे देतो. ( शिकवयाचे ना? )
३. आणि बेडरूममध्ये देव्हारा असेल तर पडदा करावा पण स्वयंपाक घरात असला तर काय करायचे?
उत्तर :- देवासमोर "अ" वर्गाचा सिनेमा नको म्हणुन पडदा करावयास सांगितले.
४. इथे आंध्रप्रदेशात प्लॉट पुर्वाभिमूख असावा की दक्षिणाभिमूख हे ज्याच्या त्याच्या पत्रिकेवरून ठरवतात. आपण महाराष्ट्रात नक्की कुठची पद्धत वापरतो?
उत्तरः- सर्वगोष्टी मी जर येथे शिकवत बसलो तर? नाही चालणार. तरी सुध्दा आपल्या माहीती साठी सांगत आहे. माझे विद्यार्थि जातकाच्य घरी न जाता फक्त पत्रिका व जातकाच्या घराचे क्षेत्रफळ ह्या गोष्टीवरुन जातकाच्या घरातील सुख दुख सागतात. या पेक्षा अधिक आपणास काय पाहीजे?
अधिक माहीती साठी माझ्या शिकवनी वर्गात प्रवेश घ्यावा. १. फी चे बंधन असणार नाही २. फी माफीसाठी माझ्या गृह संकुलातील सचिवाची परवागी आवश्यक आहे. ३. रु. ५००/- संकुलातील मुलाच्या कार्यक्रमासाठी देनगी बधंन कारक राहील. ४. वर्ग समाप्त झाल्यावर आपल्या अवकाती प्रमाणे जरुर दक्षिणा द्यावी लागेल.
संजीव
देवासमोर "अ" वर्गाचा सिनेमा
देवासमोर "अ" वर्गाचा सिनेमा नको म्हणुन पडदा करावयास सांगितले.
..... आणि त्या पडद्यात देव नसतो वाटतं? पडदा ते आपण यांच्यामधली हवा... तिथे देव नसतो का? बेड, बेडशीट... इथेही देव नसतो तर...... नुसतं माणसाच्या रुपात असलेली मूर्ती/ फोटो म्हणजे देव का? बरे झाले, अध्यात्मिक गैरसमज दूर झाले !!
संजीव माहीतीबद्दल धन्यवाद
संजीव माहीतीबद्दल धन्यवाद ,
वर रॉबीनहुडने तुम्हाला जाहिरातीची लिंक दिली होती पण तरीही आपण ह्या बी बी वर जाहिरात केलीच.
<<< अधिक माहीती साठी माझ्या शिकवनी वर्गात प्रवेश घ्यावा. १. फी चे बंधन असणार नाही २. फी माफीसाठी माझ्या गृह संकुलातील सचिवाची परवागी आवश्यक आहे. ३. रु. ५००/- संकुलातील मुलाच्या कार्यक्रमासाठी देनगी बधंन कारक राहील. ४. वर्ग समाप्त झाल्यावर आपल्या अवकाती प्रमाणे जरुर दक्षिणा द्यावी लागेल. >>>
तरी आपल्या एवढ्या प्रचंड मोठ्या जाहिराती बद्द्ल ५०० $ ( Dollars) मायबोलीजाहिरात विभागाकडे भरण्याची तसदी घ्यावी .
तरी आपल्या एवढ्या प्रचंड
तरी आपल्या एवढ्या प्रचंड मोठ्या जाहिराती बद्द्ल ५०० $ ( Dollars) मायबोलीजाहिरात विभागाकडे भरण्याची तसदी घ्यावी .
---- अनुमोदन, माझा या फुकटच्या जाहिराती प्रकाराला प्रचंड आक्षेप आहे.
लोकांमधे अंधश्रद्धा पसरवणार्या जाहिराती मायबोलीवर नको असा नियम असेल म्हणुन ज्योंच्या सुपिक डोक्यात ही पळवाट आली असावी. असल्या संधीसाधूं खिसेकापू मनोवृत्तीच्या लोकां पासुन जनतेने सावध रहावे.
Pages