आधुनिक शास्त्र सांगतं की घरात प्रवेश करणार्या पृथ्वी, सौर व चांद्र ऊर्जेचं संतुलन उंबरठा राखतो.
लक्ष्मी दारातून आत येते किंवा दारातून माघारी जाते. म्हणून वास्तुशास्त्रात दरवाजा अतिशय महत्त्वाचा मानला गेलाय. फक्त दरवाजा जरी वास्तुशास्त्राप्रमाणं असेल तरी अनेक सुपरिणाम मिळतात. संपूर्ण घर रेक्टिफाय करत बसण्यापेक्षा फक्त दरवाजा रेक्टिफाय करणं सोपं, कमी श्रमाचं आणि कमी खर्चाचं आहे. शिवाय इतंकच केलं तरी भाग्योदय होतो. म्हणून दरवाजाचं वास्तुशास्त्र जाणून घेणे गरजेचं आहे.
ऊर्जा दोन प्रकारची असते. चांगली आणि वाईट. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. कधी " काय अवदसा घरात आलीय !" असं आपण सहजच म्हणून जातो. मायबोलीतील ही 'अवदसा' म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी. आणि पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे अर्थात लक्ष्मी होय. लक्ष्मी म्हणजे चांगल्या वैश्र्विक ऊर्जेचं घरात आगमन व्हांव म्हणून ज्या मुख्य दरवाजातून लक्ष्मी येते, त्या मुख्य दरावाजाकडे विशेष लक्ष पुरवावं लागतं.
घराचा मुख्य दरवाजा वास्तुशास्त्राच्या नियमानुसार असेल तर लक्ष्मी घरात येते. म्हणजेच योग, क्षेम, आयु, कल्याण, मांगल्य या पंचपरमेष्ठीची प्राप्ती होते, भाग्यकल्प होतो, असं वास्तुशास्त्रा मानतं. पण मुख्य दरवाजा वस्तुशास्त्राच्या नियमांच्या विपरित असेल तर तो वाईट ऊर्जेला निमंत्रण देतो. घरात 'अवदसा' आल्याची प्रचीती येते. विपरित फळं मिळू लागतात. मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं मुख आहे. जर मुखच अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त, जंतुसंसर्ग झालेलं असेल तर तेथून पोटात जाणार्या अन्नाची अवस्था काय होईल? जंतू घेऊन आलेलं अन्न आपल्या शरीराचं भरणपोषण करु शकेल का? दूषित ऊर्जा आपल्या घराचं स्वास्थ टिकवू शकेल का?
या साठी दरवाजाला उंबरठा असणं अतिशय आवश्यक आहे. हिंदू परंपरेत त्याला मर्यादेचं प्रतीक मानलंय. आयुष्य म्हणजे स्वैराचार नव्हे हेच जणू तो सांगत असतो. फ्लॅट सिस्टिममध्ये उंबरठा गायब झाला. कारण आजकालचं बांधकाम बिल्डरचं हित सांभाळत त्याची पै न पै वाचवत केलं जातं. उंबरठा नसेल तर दरवाजाची चौकट ही चौकट न राहता त्रिकाट होते हे लक्षात घ्या. शिवाय हळूहळू या फ्रेमचा काटकोन कमी होत जातो. उंबरठा नसेल तर घराची सीमारेषाही पूर्ण होते नाही. अर्थात वास्तुपुरुष डिफाइन होत नाही. त्यामुळे घराबाहेरील दोषांचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. दरवाजा चौकोनीच असावा. अर्धवर्तुळाकार नको. अशा घरात कन्याजन्माचं प्रमाण जास्त असतं, दरवाजा त्रिकोणी असेल तर स्त्रीपीडा उद्दभवते. दरवाजाची चौकट पूर्ण असावी. म्हणजेचं लाकडी उंबरठा असावा. हल्ली फ्लॅटमध्ये उंबरठा गायब झालेला असतो. त्यामुळे दरवाजाची
आधुनिक शास्त्र सांगतं की घरात प्रवेश करणार्या पृथ्वी, सौर व चांद्र ऊर्जेचं संतुलन उंबरठा राखतो. चौकटीसह पूर्ण दरवाजा एकाच प्रकारच्या लाकडाचा असावा. लाकूड पुल्लिंगी झाडाचं वापरावं, दारासाठी दोन कवाड असतील तर डांव कवाड मोठं ठेवावं. त्याला मातृ कवाड तर उजव्या कवाडाला पुत्रिका कवाड अशी संज्ञा आहे. मातृ कवाड पुत्रिका कवाडा॑पेक्षा मोठं असावं.
दरवाजा प्रमाणबध्दच असावा. आवाज करणारे, उघडताना अडकणारे, बुटके किंवा अतिउंच, फुगलेले, पातळ, कललेले, तिरके, डाग पडलेले, भेग पडलेले, रंग उडालेले दरवाजे असू नयेत. बृहत्संहिता ग्रंथात म्हटलंय की दरवाजा प्रमाणापेक्षा उंच असेल तर शासनभय आणि प्रमाणापेक्षा कमी असेल तर चोरभय व दु:ख देतो. मध्यभागी विस्तुत असेल ( ओव्हल आकाराचा ) तर हाव वाढवतो. कुब्ज ( उघडण्यास कठीण ) असेल तर कुलनाशक होतो. अतिपीडित ( उंबर्यास टेकणारा ) असेल तर गृह्स्वामीस पीडा करतो. घराच्या दिशेनं त्याचा तोल गेलेला असेल तर मृत्यूसारख्या घटना घडतात. बाहेरच्या दिशेनं कललेला असेल तर गृहस्वामीला अकारण प्रवास करावा लावतो.
कोणत्याही प्लॉट किंवा भवनाला ३२ प्रकारे दरवाजा काढता येतो. यातील ८ दरवाजे शुभ असतात तर उर्वरित २४ दरवाजे कमी-अधिक अशुभ असतात. या २४ दरवाजांचं अशुभत्व कस कमी करायचं ते आता पाहणार आहोत. प्रथम मुख्य दरवाजे पाहू.
कोणत्याही मुख्य दिशेत चुकीच्या पदात दरवाजा असेल तर वाईट फळं देणारच. मग भलेही ती दिशा उत्तर किंवा पूर्व असो. पण असे चुकीच्या पदातील दरवाजे रंग, पिरॅमिड, स्वस्तिक, धातू, दगड आदींचा खुबीनं वापर करीत रेक्टिफाय करता येतात.
संजीव
http:\\vastuclass.blogspot.com
सॉरी फोक्स, मला तुमची चर्चा
सॉरी फोक्स, मला तुमची चर्चा खूपच आवडली पण ती अस्थानी होत आहे असे वाटले.
>>
अगदी बरोबर , तेच ते मामीना आताच समज दिलीय. लोभ इथे सगळ्यानाच (सुटला) आहे.
चिन्या लेका घे. विषयान्तर
चिन्या लेका घे. विषयान्तर केल्याने कसे जोडे खावे लागतात ते. वाचनाने औचित्य येतेच असे नाही . ते आत येते वायव्येकडे खिडकी असेल तरच. तर त्यावर उपरिनिर्दिष्ट रामण्णानी ' वातायनदीपिका' नावाचा ग्रंथ लिहिला आहे. पण तो ओवीब्द्ध आहे बरं का. त्यावर जर वेळ देऊनच लिहावे लागेल .
मी विषयांतर कुठे केलं?
मी विषयांतर कुठे केलं?
ते तू माला ताई दाते याना
ते तू माला ताई दाते याना विचार.
तो तर थेट ग्रॅन्ड युनिफाईड
तो तर थेट ग्रॅन्ड युनिफाईड थिअरी शीच साधर्म्य दाखवतो. >> नवाबसाब, म्हंजीच लाइफ एन्जॉय करणे का?
त्यासाठी दार कुठलेही असेना ते बंद असणे गरजेचे आहे. घरात पहीली ( पहिल्या बायकोची नाही) च पोरे असतील तर त्याना बाहेर लोकांकडे खेळायला पाठ्वून मग बंद करावे. मग एनर्जी कॉन्वर्ज करता येइल जातकांना. मला ३ ४- इग्लू लागतील. इग्लू/ टेपी अशाच घरात आता परेन्त राहिल्यानी मी स्त्र्रीपीडा करणे हे माझे जनमसिद्ध कर्तव्य समजते. नरसिंहालु याना एकदा मी माझ्या इग्लूच्या वरून तरंगत जाताना पाहिले व
पायावर संगमरवरी दरवाजा पड्ल्यासार्खे वाटून आश्च्यर्याने खाली बसले.
बरे मुमताज महल बाळण्तपनातच गेली व तिला एकटीला मारबलची टोम्ब मिळाली (लकी आहे ना!) याची काय उत्पत्ती ?
अरेरे मामीसाहिबा. तुमच्या या
अरेरे मामीसाहिबा. तुमच्या या थिल्लरपणा मुळे या बीबीचे गाम्भीर्य लयाला जात आहे. कुफेहेपा? आं?
मामी..............._/\_
मामी..............._/\_
नवाब साहेब, हत्तीच्या पाइ
नवाब साहेब, हत्तीच्या पाइ द्या/ भिन्तीत चिणून टाका/कड्यावरून फेकून द्या अलंग मलंग कुलंग.
आले का नेहमिचे यशस्वि ? आता
आले का नेहमिचे यशस्वि ? आता चान्गल्या बाफचा थोतान्डासारखे करणार , पण हा ३ब्या खमका आहे व माझ्या गुर्जिन्चि शपथ घेउन सान्गतो, हा बाफ हायजॅक करु देणार नाहि. सन्जिव स्वल्पविराम ह्यान्चेकडे लक्ष नका देउ. हि आधुनिक निधर्मि पुरोगामि बुप्रावादि पिलावळ जिथेतिथे जाउन हाच गोन्धळ घालते, तुम्हि अजुन माहिति देत रहा. फेन्ग शुइबद्दलहि बरेच ऐकले आहे, त्याबद्दलहि सान्गा.
माझ्या परिचितातिल एकाचि अनुभुति हे कि एकाच घरात फेन्ग शुइ व वास्तुशास्त्र असे दोन्हि वापरले तर घरि तुझे-माझे स्वरुपाचि भान्डणे होतात. मित्राचे घराणे अग्निहोत्रि असुन २४ तास घरात अग्नि पेटलेला असतो. मित्राचे पणजोबा, आजोबा, तिर्थरुप तसेच दोन्हि चुलते व जवळजवळ सर्व आजोळ वैदिकविद्येचे अभ्यासक हेत. अशा घरचे सन्स्कार झाल्यामुळे प्राचिन ग्रन्थान्च, विद्येचा, प्राचिन शास्त्रान्चा त्याचाहि मोठा अभ्यास हे. या मित्राचे वडिलोपार्जित घराचि त्याने १९६२ सालि डागडुजि केलि व त्यात वास्तुशास्त्र व फेन्ग शुइ असे दोन्हिचा त्याच्या मतिने परस्परपुरक असा वापर केला. पुढिल वर्शभर त्याच्या घरि इस्टेटिवरुन अनेक वाद अचनकच उफाळुन आले. इतके कि एक आजन्म ब्रह्मचर्याचे पालन केलेले चुलतेसुध्दा मतिभ्रश्ट झाल्यासारखे या वादात उतरले. हा वाद अचानक कसा उफाळुन आला, तेव्हाच का उफाळुन आला याला अनेक उत्तरे असतिल परन्तु माझ्या अभ्यासु व्यासन्गि मित्राने सावकाश विचार केला व अशा अभ्यासु/व्यासन्गि लोकान्ना जि सुक्ष्मातिसुक्ष्म जाणिव त्यान्च्या अभ्यास्/व्यासन्गामुळे निर्मान होते तिचा वापर करुन/अभावितपणे होउन त्याला सारखे अशि टोचणी लागलि कि याचा आपल्या वडिलोपार्जित घराच्या केलेल्या डागडुजिशि काहिएक घनिश्ठ सम्बन्ध आहे. सुदैवाने त्याने या टोचणिला केवळ एक "मनाचा खेळ" असे न मानता तिचे खरे स्वरुप थोडक्यात "अन्तर्ज्ञान" हे स्वरूप ओळखले व त्यावर तातडिने कारवाइ करण्याचे योजुन मोठा खर्च सोसुन, नातलगान्च्या, कुटुम्बियान्च्या तिव्र विरोधास न जुमानता नुकत्याच दिमाखदार झालेल्या घराचि परत दुरुस्ति सुरुवात केलि. या "पुनरुभारणित" त्याने फेन्ग शुइचे सर्व घटक काढुन टाकले. आश्चर्याचि बाब म्हणजे ति दुरुस्ति पुर्ण झालि आणी एका महिन्यात इस्टेटिवरचे सर्व वाद निवळायला सुरुवत झालि. ह्या व अशा अनेक घटना हेच दर्शवतात कि या प्राचिन गुढशास्त्रान्मधे बरेच सखोल सन्शोधन दडले आहे.
योग, मि वास्तुशास्त्राला दोष देत नाहि, उलटे मि समर्थनच करत हे.
इथली चरचा खरी तर भरकटवली
इथली चरचा खरी तर भरकटवली मामी, चिनूक्स, असूदे, माला दाते यानी. मी आपला विशयाला धरून कॉन्ट्रीब्यूशन करीत असताना यान्नीच त्याला विनोदाची फोडणी देऊन याचा फार थोतान्ड बीबी बनवून टाकला. आता नेब्युशडनेझरने हेच सांगितले आहे असे म्हटले(त्याने सांगितल्याच आहेत बर्याच गोष्टी यातल्या) तर हे भ्रमित बुप्रावाले उड्या मारत नाच्त सुटतील. म्हणजे काय सांगतोय या पेक्षा कोण सांगतोय यात या निधर्मांधाना इन्टरेस्ट.
श्री .ज्योतिषशास्त्र , लवकर येऊ द्याहो तुमची माहिती . पुन्हा ते विजय कुलकर्णी, घाटपांडे वगैरे सोनियाभक्त आले तर मूळ विषय बाजूला पडायचा...
>योग, मि वास्तुशास्त्राला दोष
>योग, मि वास्तुशास्त्राला दोष देत नाहि, उलटे मि समर्थनच करत हे.
माहिती आहे भाऊ... हलकेच घ्या
बाकी विषयांतर (करणारे) या विषयावर न बोललेलेच बरे.
आपणास सर्वान्स विनन्ती कि,
आपणास सर्वान्स विनन्ती कि, विषयास धरुन बोलावे. उगीच टिंगलटवाळी केल्याने ह्या बाफचे महत्व कमी होणार नही. आपल्या काही शेणखा अस्तील तर आयुश्या विचारा. त्यातच तुमचे सर्वांचे कल्यान आहे
करेक्ट !
करेक्ट !
जर मार्बलच्या उंबरठा असेल तर
जर मार्बलच्या उंबरठा असेल तर अपघाताचे प्रमाण १००% आढळते.
मी २००० सालापासुन ज्या घरात राहते त्याचा उंबरठा आधी पांढ-या मार्बलचा होता. नंतर गॅसचा सिलिंडर घरात घेताना आपटुन त्याला मध्ये चीर गेली म्हणुन २००५ साली मी तो बदलुन ग्रनाईटचा बसवला (अर्थात घरात इतर रचना जशी केली तसाच हाही बदलला. मुद्दामहुन काही निवडले नाही). सुदैवाने अजुन अपघात मात्र झालेला नाही. माझ्या नव-याला दोनचाकी वाहनावर याआधी तिनचारदा अपघात झालेले आहेत, पण ह्या घरात आल्यापासुन मात्र एकदाही नाही.
आणि तसाही हल्ली लाकडाचा उंबरठा मुंबईत कुठे दिसत नाही. मी फक्त गावीच पाहिलेत.
<< इथली चरचा खरी तर भरकटवली
<< इथली चरचा खरी तर भरकटवली मामी, चिनूक्स, असूदे, माला दाते यानी. >> हूडा मी आणि माला दाते या दोघांपैकी कोणाची कोणती पोस्ट तूला चर्चा भरकटवणारी वाटली ?
वा वा अनेका दिअसांनंतर पन तेच
वा वा अनेका दिअसांनंतर पन तेच ते वाचाळ लोक तेच कुचाळ आयडीज आणि तेच वाफाळ बाफ बघुन अत्यानंद झाला. आनि वरल्या दोन बु मधला खरा- म्हणजे रडका लिंबु कोनता. मामिजवळ पन लिबुसरबतचा वास येत आहे. राबिन्हुड काय बोलतो नि कोन्च्या बाजुने. जरा हाजेरी घेतली पाहिजे.
या शास्त्रिबोवान्नी अजून्न काय काय लिवले.? जरा खराटा घेऊन येतो झाडायला.
जर मार्बलच्या उंबरठा असेल तर
जर मार्बलच्या उंबरठा असेल तर अपघाताचे प्रमाण १००% आढळते.
साधना
जर मार्बलच्या उंबरठ्याला चिर किंवा तडा पडला असेल तर. खात्री करण्यासाठी आपल्या आजुबाजुच्या संकुलातील उंबरठे तपासा व नंतर आपण आपला अभिप्राय कळवा. राग नसावा. हे सदर मी फक्त माझ्या अभ्यासाची उजळणी करण्यास चालु केले आहे.
जमल्यास आपण http://vastuclass.blogspot.com वर भेटद्या
संजीव
जाहिरातीचे पेज इथे आहे आपली
जाहिरातीचे पेज इथे आहे
आपली जाहिरात येथे टाका.
http://jahirati.maayboli.com/
मी आज PJ चा बा.फ. शोधतोय
मी आज PJ चा बा.फ. शोधतोय सापडत नाहिये.चुकुन इकडे आलो
मयानं वास्तुशास्त्रावर मयमतम
मयानं वास्तुशास्त्रावर मयमतम नावाचा अफलातून ग्रंथ लिहिला
हा मय म्हणजे मयासुर का? तो तर पुराणकाळात होता.. तेंव्हा कागद होता का पुस्तक लिहायला?
आमची जॉइन्ट फॅमिली आहे... वडिलाना दोन मुले... काकाना दोन मुली.... सगळे एकाच चौकोनी दरवाजातून ये जा करतात...
जामोप्या विषयान्तर करू नका.
जामोप्या विषयान्तर करू नका. यवनांच्या देशात राहून तुमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. तुमचा घराचा दरवाजा चौकोनी असेल हो पण कारचा दरवाजा वाकडा तिकडा असेल.
माझा राग वगैरे अजिबात नाही.
माझा राग वगैरे अजिबात नाही. मला सहजच आठवलं ते लिहिलं.
माझी वहिनीही वास्तुशास्त्र पाहते. पण माझ्या घरात मी जसे जमेल तसेच वास्तुचे पालन केले आहे. ते उगाच घरात पिरॅमिड्स वगैरे ठेवणे वगैरेवर माझा विश्वास नाही. वास्तु संरचनेमुळे कोणाचे स्वभाव बदलतील, घरातली भांडणॅ वगैरे कमी होतील, मुलगा/मुलगी नेमके काय होणार/कोण होणार हे ठरेल हे मला तरी पटत नाही.
माझ्याकडे कार नाही हो!....
माझ्याकडे कार नाही हो!....
आणि आमच्या जुन्या कंपनीचे जेंव्हा ऑफिस बदलले, तेंव्हा एक वास्तुवाला आणून नवीन ऑफिसची जागा, आतले डिपार्टमेंट सगळे त्याला दाखवून केले... दीड वर्षात कंपनीने मान टाकली.....
साधना, जामोप्या, तुम्ही
साधना, जामोप्या, तुम्ही निधर्मांध , बुप्रावाले असून समाजवादी असून सोनियाभक्त आहात . जामोप्या तुम्ही तर बोलून चालून अब्दुल गयूम यांच्या देशातले. तुम्हाला काय आदर असणार या शास्त्राबद्दल? हर हर!
माझी वहिनीही वास्तुशास्त्र
माझी वहिनीही वास्तुशास्त्र पाहते. पण माझ्या घरात मी जसे जमेल तसेच वास्तुचे पालन केले आहे.
आपले म्हणणे मला आवडले, सुंदर! पण जर तुमच्या घराला चांगले सुसंवाद होत असतील तर चांगली गोष्ट आहे. तरीपण रोज सकाळी मुले व आपले पतीराज घराबाहेर जाताना त्यांना एक चमचा मद्य देऊन बघा. व आपला अभिप्राय नक्की कळवा.
वास्तु तज्ञा म्हणुन हा सल्ला दिला असे वाटल्यास, मद्याचे गुणधर्म आठवून आपण तो द्या. व त्यांच्या जिवनातील प्रगती बधा.
तसेच आपल्या वहिनीला आमच्या शुभच्छा, जमल्यास संपर्क साधण्यास सांगा
संजीव
अब्दुल गयुम यांच्या देशात
अब्दुल गयुम यांच्या देशात आताच आलो आहे......... आणि ते देखील वास्तुवाल्यामुले आलो......... जुनी कंपनी त्याने पार वाटोळी केली!!!!
""रोज सकाळी मुले व आपले
""रोज सकाळी मुले व आपले पतीराज घराबाहेर जाताना त्यांना एक चमचा मद्य देऊन बघा. ""
अहो काय सान्गता काय ? आजच सायन्काळि ३बिला सान्गतो. अहो, पण एक चमचा मद्य मला आणी ३बिला वेगवेगळ्या कारणान्साठि पुरत नाहि.
एक चमचा मद्य दिले तर पती
एक चमचा मद्य दिले तर पती सुधारतो...? एकच चमचा का दिलीस म्हणून भांडला तर..?
जागोमोहनप्यारे वैद्यमाहाराज
जागोमोहनप्यारे
वैद्यमाहाराज आपण C8H9NO2 फारमुला वापरुन रुगणाचे दु:खणे कमी करण्याचे प्रयत्न करत होता. आताच्या आधुनिक काळात C8H9NO2 ह्या ऐवजी C14H11Cl2NO2 हा फारमुला वापरता. तसाच एखादा फारमुला त्या काळी अस्थितवात जरुर असणार.
क्षमस्व होत कधी कधी असे. कारण ह्या विषयाचे तज्ञ फार कमी आहेत. जे आहेत ते स्वाताल फार ग्रेट समजतात. पहील्यादा दु:ख दुरकरा व नंतर आपली फी हक्कानी घेण्यास तयार राह.
काही वैद्यकीय अधिकारी सुध्दा रुगणाला असाच समज देतात. आधि औषध घे जर फरक पडला नाहीतर तु माझ्या पेक्षा मोठ्या वैद्यकीय सल्लागारा कडेजा. माझ्यानी तुझी केस होत नाही.
श्री अश्विनीकुमाराचा भक्त
संजीव
बाकी काही असो, पण ही 'एक
बाकी काही असो, पण ही 'एक चमचा'ची आयडिया फारस झकास. लग्गेच कार्यवाही करतो. उद्यापासूनच.
योगायोग म्हणजे माझ्या घराचा दरवाजा पण कॉफी कलरचा, म्हणजे जवळ्जवळ मद्याच्या रंगाचा आहे. त्याने आणखी प्रगती होईल, की इफेक्ट नल अँड व्हॉईड होईल?
Pages