कुमारी मातृत्व आणि पुढील अवघड वाटा - कोणाशी तरी बोलायचंय

Submitted by शूजिता on 27 August, 2021 - 06:10

नमस्कार,
दीड महिन्यापुर्वी माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीचा एक फोन आला आणि ती जी हुंदके देत देत मला सांगत होती ते ऐकून मी एकदम स्तंभित झाले. तिची मुलगी फक्त २० वर्षाची. आता पदवीच्या शेवटच्या वर्षाला. दिसायला सावळी पण फारचं गोड कुणाच्याही नजरेत भरणारी. कमालीची शांत आणि अगदी निरागस वाटणारी. तिची आई म्हणजे माझी मैत्रिण तिला एकुलती एकचं कन्या. त्या मुलीला दिवस गेलेत आणि ती घरुन पळून गेली. साडेसहा महिन्याची गरोदर मुलगी आणि माझ्या मैत्रिणीच्या हे लक्षात आले नाही. मुलगी वाढत्या वयानुसार शारिरिक बदल तिच्यात होत आहेत असेचं तिला वाटले. त्यामुळे गरोदर पणात स्त्रिला जी गोलाई येते त्याकडे तिने कानाडोळा केले. कुठल्याचं आईला आपल्या अविवाहित मुलीच्या अंगावरचे वाढलेले मास पाहून असे वाटणार नाही की ती गरोदर आहे. तिथे माझी मैत्रिण फसली बिचारी.

पाच दिवसानंतर खूप प्रयत्नानंतर शेवटी पोलिस जागे झाले आणि त्यांनी मदत केली. मुलगी परत मिळाली. एका छोट्याशा झोपडीत एका मुलाबरोबर होती. तो तिचा प्रियकर. एकदम सडकछाप मवाली मुलगी. चवथा वर्ग नापास. वय २२ वर्ष. मुली पटवायला एक नंबर आणि लफडेखोर. ह्या मुलाच्या तावडीत इतक्या चांगल्या घरची मुलगी फसली. तिचे त्याच्यावर प्रेम जडले पण त्याने फक्त तिचे शारिरिक शोषण केले.

संसार तसाचं सोडून माझी मैत्रिण दुसर्‍या शहरात गेली. तिथे एक बी एच के शोधले. गर्भपात व्हावा म्हणून वणवण भटकली पण इतक्या उशिरा आता ते शक्यचं नव्हते. आता तिची मुलगी ९ व्या महिन्यात प्रदार्पण करेल. इतक्या शांत मुलीच्या मनात केवढे काय काय साचून होते हे ती आता व्यक्त करते आहे. मी आत्ता तिच्याकडे एक दोन दिवस राहायला आले आहे. तिला आधार मिळावा म्हणून आणि काही मदत करता यावी म्हणून.

मुलीला हे मुल दत्तक द्यायचे नाही. किंबहूना मुल जन्माला घालून आपले आईवडील नाईलाजाने आपले लग्न ह्या मुलीशी लावून देतील ही तिची योजना होती. पण तिला माहिती नाही हे प्रकरण किती दाहक आहे.

मी इथे येऊन विचारणा केली. जिथे तिची प्रसूती ठरली आहे त्या डॉक्टरांना आमची फारचं किव आली आणि त्यांनी हमी दिली की त्या एका एन. जी. ओ. कडून हे मुल दत्तक देण्याची सोय करतील आणि ह्यात जिचे मुल आहे तिची सही लागणार नाही. तसेही अशी मुले बेवारस सापडतात. कचर्‍यात, गटार्‍यात, नदीच्या वाहत्या पाण्यात, देवळात, अनाथालयाच्या दारात, कुण्याच्या ओट्यावर, कुणाच्या अंगणात!! कुंतीनेही कर्णाला वाहत्या पाण्यात सोडलं होतं. आपण तर साधी माणसे. ह्या भावना जाऊ देत.. पण मुल दत्तक दिल्यावर ही मुलगी किती आकांत मांडेल? ती जगू देईल का तिच्या पालकांना? तिचे पुढील शिक्षण पुर्ण करु शकेल का? परत तिचे लग्न होईल का? वय फक्त २० आहे मुलीचे तर अजून १० वर्ष वेळ आहे तिला तोवर ही घटना पुसली जाईल. तिचे भले होऊ शकेल. पण मुलीने परत असेचं थेर केलेते? परत ती तेथून पळून परत त्या मुलाकडे गेली तर? मुलगा लग्न करायला तयार आहे म्हणाला पण नक्कीचं लायक पात्र नाही. मग अशा मुलाशी लग्न करुन काय उपयोग. शिवाय, अशी हार पत्करुन आपण समाजाला काय शिकवण देत आहोत? जर आपण हे मुल तिला दिले आणि तिला त्या मुलाशी लग्न करु नाही दिले तर चालेल का? असे एक नाही अनेक विचार आम्हि दोघीनी बोलताना मांडले.

मी इथे फार लिहित वा वाचत नाही. पण अचानक मला मायबोली आठवली आणि वाटलं इथे आपण मत मांडून बघावे.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब्लॅककॅट, मुलगा जबाबदारी घेणारा असेल तर परराज्यात भेटायला येणे काही कठीण नाही. फोनवर तर बोलणे होतच असणार त्या मुलाशी तिचे. बोलबच्चन असणे वेगळे आणि प्रत्यक्ष जबाबदारी घेणे वेगळे.
शूजिता, आपल्या आईवडीलांनी प्रेमापोटी आणि काळजीपोटी घातलेल्या बंधनांना धाक मानणे आणि त्याच वेळी त्यांनी दिलेल्या मोकळीकीचा आणि आर्थिक स्वातंत्र्याचा गैरफायदा घेणे अशा चुका त्या मुलीने केल्या आहेत. कालांतराने या गोष्टीची जाणीव त्या मुलीला नक्कीच होईल. The parents also need to learn their lessons and toughen up. We love you and will always support you. But we can't support anything and everything you do असा ठाम स्टँड बाळ जन्माला आले की घेता येईल. जरी सध्या सुसरबाई तुझी पाठ मऊ म्हणावे लागत असले तरी.

मी बोलले मुलीशी तर ती म्हणाली मावशी मी नवीन काहीतरी केले न घाबरता. माझ्यासारख्या अनेक मुली जीव देतात. बाळाला टाकून देतात. ते तरी निदान होणार नाही माझी केस बघून .शिवाय आईवडील मुलांना इतके धाकात ठेवतात ते किती अयोग्य आहे हे त्यांनाही कळेल>> मला पूर्ण खात्री आहे ही मुलगी पुढे मोठी समाज सुधारक म्हणून ओळखली जाईल...!!

शूजिता मावशी, हे वर कोट केलेलं वाक्य तुम्ही लेखात लिहायला हवं होतं. मी माझ्या सर्व प्रतिक्रिया मागे घेतल्या असत्या परंतु आता वेळ निघून गेली आहे म्हणून काढणार नाही.

((तो भेटायला येऊ नये म्हणूनच तर तसे केले. ))...

शुजिता, आता ती त्याच्या संपर्कात आहे का ? फोन किंवा सोशल मीडिया द्वारे?

असे असेल तर त्यांचे भेटणे टाळता येणार नाही..

असे नसेल तर होणाऱ्या मुलाबाबत प्रियकराची आता काय भूमिका आहे..किंवा त्याच्याकडे पुढील आयुष्याची काय तयारी आहे याबाबतच्या कल्पना ती कशाच्या आधारे करते आहे?

(((म्हणाली मावशी मी नवीन काहीतरी केले न घाबरता.))).....
प्रियकराने आक्षेपार्ह स्थितीत चित्रीकरण करणे , ते सोशल मीडियावर प्रसारित करणे, वेश्येकडे तिची राहायची व्यवस्था करणे यातही *नाविन्याचे थ्रिल* नाही ना वाटत आहे तिला??

प्रकरण फारच गंभीर वाटतेय. तिच्या आईवडिलांसाठी खरच जीव कळवळला. इतके विचित्र वळणावर घेऊन येणारे निर्णय घेण्याची व त्यावर ठाम राहण्याची भूमिका पचनी पडणे कठीण आहे .

शुजिता, यातून वैध आणि योग्य मार्ग काढण्याच्या तुमच्या प्रयत्नांना यश येवो.

@ जिद्दू, खरंय तुमचं...या धाग्याने रोमातून बाहेर पडायला भाग पाडले !

शूजिता, तुझ्याशी बोलली ही जमेची बाजू. मुलाने वेश्येच्या घरी ठेवले त्यावर मुलीची प्रतिक्रिया काय होती? घर/एखादी खोली भाड्याने घेऊन तिथे ठेवली नाही, सिनेमातल्या सारखं देवळात लग्न केलं नाही याबद्दल तिला काय वाटतं?? तिने तो पाच दिवसाचा काळ खूप सहजपणे झटकून टाकलेला आहे. त्यातील अनुभव - त्याने तिला काय खाऊ-पिऊ घातले, काय प्लॅन्स झाले इ इ डिटेल्स मध्ये कुणीतरी तिला जरा कुरेदायला हवे. तिची तिला जाणीव हवी की खूप अस्थिर व रिस्की परिस्थितीतून ती सुटलेली आहे.
सीमंतीनी हो विचारले. तर ती म्हणाली रोज तो मुलगा तिचे पाय चेपून द्यायचा. तिच्यासाठी मॅगी बनवायचा. खूप खूष होती ती त्याच्यासोबत. तिने जे ऐ टी एम कार्डे नेले होते सोबत. ते वापरुन तिने पैसे काढले. त्यामुळे ती सापडली. कारण आईवडीलांनी बॅकेत जाऊन आधी मुलीचे खाते चेक केले आणि पुर्ण रीपोर्ट मागितला. त्यावरुन मुलगी कुठे आहे हे कळले. पण नक्की पत्ता तेंव्हाच लागला जेव्हा फोनचा IMEI नंबर वापरुन पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. पण त्या बॅकेवाल्यानी खूप मदत केली. सी सी टीवी फुटेजही दिले.

मुल जन्माला घालून आपले आईवडील नाईलाजाने आपले लग्न ह्या मुलीलाशी लावून देतील ही तिची योजना होती.>>>
खरेच अशीच योजना होती का ? की बाळाला जन्म दिल्यामुळे तो मुलगा नाईलाजाने तिच्याशी लग्न करेल अशी योजना होती/आहे ?
ही दुसरी बाजूही असू शकते ना ?

दोन्ही बाजू आहेत. मुलाने तिच्याशी लग्न करावे आणि आईवडीलांनी लावून द्यावे अशा दोन्हीचा विचार करुन तिने हे पाऊल उचलले. तिला हे मुल फक्त त्याच कारणासाठी वापरायचे होते आणि आहे.

ब्लॅककॅट, मुलगा जबाबदारी घेणारा असेल तर परराज्यात भेटायला येणे काही कठीण नाही. फोनवर तर बोलणे होतच असणार त्या मुलाशी तिचे. बोलबच्चन असणे वेगळे आणि प्रत्यक्ष जबाबदारी घेणे वेगळे.
शूजिता, आपल्या आईवडीलांनी प्रेमापोटी आणि काळजीपोटी घातलेल्या बंधनांना धाक मानणे आणि त्याच वेळी त्यांनी दिलेल्या मोकळीकीचा आणि आर्थिक स्वातंत्र्याचा गैरफायदा घेणे अशा चुका त्या मुलीने केल्या आहेत. कालांतराने या गोष्टीची जाणीव त्या मुलीला नक्कीच होईल. The parents also need to learn their lessons and toughen up. We love you and will always support you. But we can't support anything and everything you do असा ठाम स्टँड बाळ जन्माला आले की घेता येईल. जरी सध्या सुसरबाई तुझी पाठ मऊ म्हणावे लागत असले तरी.

जिज्ञासा, तिला आता फोनपासून अलिप्त ठेवले आहे. तिला फोनचा अ‍ॅक्सेस नाही. ती खूप तडफड करते आहे पण तिला तिचे आईवडील फोन देत नाही. शिवाय आता ९ वा महिना लागणार आहे म्हणून तिला तिचे झेपत नाही आहे. म्हणून थोडी मंदावली आहे. सातव्या आठव्या महिन्यात प्रचंड त्रास दिला तिने. पण आता जसे दिवस भरत आले आहेत तसे तिचे त्रास देणे कमी झाले आहे. आईला मुलीच्या पोटाकडे बघून खूप वाईट वाटते.

((तो भेटायला येऊ नये म्हणूनच तर तसे केले. ))...

शुजिता, आता ती त्याच्या संपर्कात आहे का ? फोन किंवा सोशल मीडिया द्वारे?

असे असेल तर त्यांचे भेटणे टाळता येणार नाही..

>>>>

स्वांन्तसुखाय, फोन बंद केले आहेत तिच्यासाठे. फक्त ऑनलाईन वर्ग असले की तिची आई नेट उघडते. तिच्याजवळ तीन तास बसते. मुलीला हातही लावू देत नाही लॅपटॉपला. आई कडक आहे पण प्रेमळही तितकीचं आहे.

असे नसेल तर होणाऱ्या मुलाबाबत प्रियकराची आता काय भूमिका आहे..किंवा त्याच्याकडे पुढील आयुष्याची काय तयारी आहे याबाबतच्या कल्पना ती कशाच्या आधारे करते आहे?

फ़ोन वर कुठे बोलणार आई वडिलांनी मुली चा फ़ोन घेतला असेल.
>> आईवडीलांनी तिचा फोन दुसरीकडे ठेवला आहे आणि तो नंबरही स्थगित केला आहे. तसेचं त्यांच्या फोनचे पासवर्ड बदलले. थंब आहेचं. नेटचाही पासवर्ड तिला माहिती नाही. आईवडील शक्य तेवढे सतर्क झाले आहेत. मुलीने स्वतचे इंस्टा आणि फेसबुक अजूनही शेअर केले नाही. त्यात खूप काही लपलेले आहे. कारण कोविडच्या काळात भेटी शक्य नव्हत्या तेंव्हा फेसबुक आणि इन्टावरुन सगळे बेत ठरले. मुलगी म्हणाली तिच्याकडे मुलाचे खूप काही असे पुरावे आहेत की त्याने जर तिला नकार दिला वा तो बदलला तर तो रातोरात गजाआड होईल. किती प्रचंड आंधळ प्रेम आहे तिच!! . तिने तिचे वर्जिन शरिर त्याला दिले. तिचे पैसे त्याला दिले. त्याच्या रोज शिव्या खायची. तो तिला मारायचाही. त्याच प्रेम तो शिवी देऊन आणि मारुन व्यक्त करायचा तेही तिला आवडायच.

मुलगी म्हणाली तिच्याकडे मुलाचे खूप काही असे पुरावे आहेत की त्याने जर तिला नकार दिला वा तो बदलला तर तो रातोरात गजाआड होईल.
>> बापरे म्हणजे तिला माहिती च आहे तो मुलगा वाईट आहे ते.
खरोखर खुप आंधळे प्रेम आहे. आई वडिलांचे आणी होणार्या बाळाचे खुप कठिण आहे या मुलीच्या स्वभावा मुळे.
आता गप्प आहे 9 वा महिना आहे म्हणून पण आणी 2 3 महिन्यांनी गप्प नाही बसणार. बिचारे आई वडिल.
आता पर्यंत सगळे धिराने केले घर बदलणे वगैरे.

मुलगी म्हणाली तिच्याकडे मुलाचे खूप काही असे पुरावे आहेत की त्याने जर तिला नकार दिला वा तो बदलला तर तो रातोरात गजाआड होईल.
))) बापरे म्हणजे तिला माहिती च आहे तो मुलगा वाईट आहे ते.
खरोखर खुप आंधळे प्रेम आहे. आई वडिलांचे आणी होणार्या बाळाचे खुप कठिण आहे या मुलीच्या स्वभावा मुळे.

तेच तर. तो वाईट आहे हे तिला माहिती आहे पण तरीही तो तिला हवा आहे कारण त्याच्या प्रेमात ती पडली आहे. वयाच्या १५ व्या वर्षापासून तिचे प्रेम आहे. तो तिच्या घराजवळ रहायचा आणि फिल्मी स्टाईल मधे गाणी म्हणायचा ते तिला फार आवडायचं. ती त्याची फॅन झाली.

भारी आहे हे.. एकीकडे हिंदी मराठी मधील असंख्य तरुणीच्या हृदयावर राज्य करणारे परंतु डोक्यावर केस नसलेले महान गायक बिना लग्नाचे राहिले अन् सडक छाप गायकांना अशा चांगल्या घरातील मुली मिळतात... तेही बिना हुंड्याच्या. कलियुग.

ज्या ज्या मुलींसोबत मेक आउट केले त्या मुलींचे चित्रण त्याने केले
>>>

असे गुण उधळणारा मुलगा आहे हे मूळ हेडर पोस्टमध्येच द्यायला हवे होते म्हणजे मुलगी अडकलीच आहे एका मवाल्याच्या जाळ्यात हे सुरुवातीपासूनच सर्वांना क्लीअर झाले असते. काही प्रतिसाद त्यामुळे उगाच मुलाच्या बाजूने वा त्या दोघांच्या प्रेमप्रकरणाच्या बाजूने विचार करून आले ते आले नसते.
साम दाम दंड भेद. आता कोणाची कसलीही पर्वा करू नका. मुलगी वीस वर्षाची म्हणजे अल्लडच आहे, इमोशनली अडकली आहे जाळ्यात, वाचवा तिला यातून. तिला स्वत:हून अक्कल येईल याची वाट बघत बसू नका. कारण ती सध्या येणार नाही. जसे चार पाच वर्षांच्या मुलांनी किती चॉकलेट्स खायचे याचे निर्णयस्वातंत्र्य त्यांना न देता त्यांच्या भल्याचे निर्णय आपणच घेतो ना, तसेच आहे हे समजा. मुलीला अक्कल नाहीये वा अकलेवर पडदा पडलाय हे आता उघड आहे. तिने कितीही आक्रस्ताळेपणा केला तरी भोगेल आता आपल्या कर्माची फळे म्हणून तिला जाऊ देऊ नका. कठोर बना. जग दोन्ही बाजूंनी बोलणारे असते. फाट्यावर मारा. पोरीला यातून वाचवणे हेच पहिले उद्दीष्ट्य ठेवा.

दोन्ही बाजू आहेत. मुलाने तिच्याशी लग्न करावे आणि आईवडीलांनी लावून द्यावे अशा दोन्हीचा विचार करुन तिने हे पाऊल उचलले. तिला हे मुल फक्त त्याच कारणासाठी वापरायचे होते आणि आहे.>>> अशा सिच्युएशन मधे जन्मलेल्या बाळाशी तिची किती अ‍ॅटेचमेन्ट असेल हा प्रश्नच आहे
वयाच्या १५ व्या वर्षापासून तिचे प्रेम आहे. >> माफ करा ! इतक्ता वर्शापासुन हे सगळ चालू आहे तर तुमची मैत्रीण आणि तिच्या नवर्‍याचे मुलिकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे, सजग पॅरेन्टिन्ग मधे दोघही कमी पडलेत हे स्पश्ट आहे,आपली मुलगी कुठे जाते,काय करते,तिचे मित्र-मैत्रीणि कोण याचा आइ -वडिलाना काहीच पत्ता नाही अस दिसतय.खुप फ्रिडम किवा खुप धाक हे दोन्हीही घातकच!
या अर्थ मुलिने चुकिची पावल उचलावित असा नाहिये पण हे सगळ घडून गेल आणि आम्हाला तर कळलच नाही हे म्हणण अगदी नाइव्ह आहे. अर्थात घडून गेलेल्या गोष्टिवर भुतकाळ बदलता येणार नाही पण इतक्या समुपदेशान्तरही ती मुलगी अस का वागतेय या मागे पालकानी आत्मपरिक्षण जरुर करावे. आइ-बापाच सुखवस्तु घर सोडून झोपडपट्टितल हलाखिच जिवनही प्रिय वाटण्याइतक डोक नक्किच गन्डलेल नसेल.
माणसाला अन्न,वस्त्रनिवारा,सुखसोयी याबरोबर प्रेम,आश्वासन,मायेची उब हे सगळच हव असत ते घरात मिळत नसेल तर जिथे मिळेल तिथुन मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.
सगळ्यानी भरपुर सल्ले दिले तरी या प्रकरणाची दाहकता तुम्हालाच खोलवर माहिती असणार्,गुन्तागुतिच आहे सगळ, लवकर यातुन मार्ग निघो यासाठी शुभेच्छा!

वयाच्या १५ व्या वर्षापासून तिचे प्रेम आहे. >> माफ करा ! इतक्ता वर्शापासुन हे सगळ चालू आहे तर तुमची मैत्रीण आणि तिच्या नवर्‍याचे मुलिकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे, सजग पॅरेन्टिन्ग मधे दोघही कमी पडलेत हे स्पश्ट आहे,आपली मुलगी कुठे जाते,काय करते,तिचे मित्र-मैत्रीणि कोण याचा आइ -वडिलाना काहीच पत्ता नाही अस दिसतय.खुप फ्रिडम किवा खुप धाक हे दोन्हीही घातकच!

अगदी हेच आधी सर्वांनी आईवडीलांना विचारले. मुलीने स्वत: हे सांगितले की मी घरच्यांच्या समोर कधी त्याला फोन केला नाही आणि तिचे सर्व फोन हे ती इन्स्टा मार्फत करायची. सुरवातीला तिच्याकडे फोन नव्ह्ता पण कॉलेजमधे गेल्यावर तिला फोन दिला. आईला मुलीबद्दल संशय वाटेल असे कधी घडले नाही. कधी तिने जाणवू दिले नाही. तिने तिचे पाउले हळुवार उचललित. मुलगी कमालीची शांत आहे. वाटत नाही ही कन्या अस काही करु शकते. सगळे जण तिच्या बाह्य रुपाकडे बघून ती आजवर एक मुखवटा घालून वावरत होती असे म्हणत आहे. आईलाही आपली मुलगी कळू नये ह्याची खंत आईलाही खूप वाटते आहे.

लेखिकेच्या नवीन प्रतिसादातून नवीन माहिती कळतेय.
त्याने तिला वेश्येच्या घरी ठेवलेलं, आधीच्या संबंधांचं चित्रीकरण पोलिसांना त्याच्या मोबाईलवर मिळालं, तो रोज तिला शिव्या द्यायचा, मारायचा इत्यादी मौलिक बाबी मूळ लेखात देण्याऐवजी तिसऱ्या/चौथ्या पानावर असल्यामुळे माझ्यासारखे वाचक हा धागा आवर्जून वाचत राहणार हे नक्की.

तरी नशीब की आईच्या सहीशिवाय बाळाला दत्तक द्या म्हणून सांगणारे डॉक्टर, काऊंसेलर आणि पोलीसही किंवा मुलीच्या खात्याची पूर्ण माहिती पालकांना देणारे बँक अधिकारी अशी सगळी आऊट ऑफ द वे जाणारी भली माणसे या आई/वडलांच्या वाट्याला येताहेत ही नक्की दैवी योजना असणार.

मायबोलीवर ज्योतिषाचे जाणकार आहेत काही जण, त्यांच्याकरवी मुलीच्या कुंडलीतल्या दोषांची चिकित्सा करता येईल का?

बऱ्याच जणांना स्तोत्रांचा, नामजप करण्याचा फायदा होतो. तेही करून बघता येईल. गोवंडी (पश्चिम) येथे एक सिद्ध बाबा असायचे काही वर्षांपूर्वी. त्यांच्याकडून मंतरलेला तावीज मुलीच्या उशीखाली ठेवल्याने नक्की जर तिच्यावर काही जादूटोणा केला असेल तर उतारा मिळेल. निदान तोटा तरी नक्की होणार नाही.

दगडफेक करणाऱ्यांची बाजू घेणारे माझ्या उपायांवर नक्की टीका करतील पण प्लिज बिचाऱ्या शोषित मुलीसाठी, तिच्या हताश आई बाबांसाठी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे येणाऱ्या निरागस बाळासाठी कृपाया धागा भरकटणार नाही याची काळजी घ्या.

शूजिता:ससूनमधील सोफोश, BSSK(कोरेगाव पार्क-लेन ६) या चांगल्या संस्था आहेत. तिथे तुम्हाला योग्य मार्गदर्शन नक्की मिळेल. त्यांच्याकडून मुल चांगल्या ठिकाणी दत्तकही जाईल. खूप खूप शुभेच्छा योग्य तो निर्णय घ्यायला.

बापरे , प्रत्येक प्रतिसादात भलतीच नवनवीन माहिती मिळते आहे. मुलगी पूर्णपणे मुर्ख आहे याची खात्री झाली आहे आत्ता पर्यंत. आई वडिलांना हे सर्व सहन करायची आणि निस्तारायची शक्ती आणि योग्य मार्ग मिळो.
तुम्ही सांगताय तसल्या सज्जन घरातली साधी मुलगी असं का वागली याचा शोध घेणं खरच गरजेचं आहे.

मागे मायबोलीवर एक धागा आलेला त्यात घरात अमानवीय प्रकार घडतायेत वगैरे सांगताना लहान मुलाचा संदर्भ दिलेला आणि संपूर्ण जनता काळजीने त्यांना सल्ले देत बसलेली आणि मग कळालं की फूसsssss! तसंच आहे हे नक्की, बिचारे पोटतिडकीने उपाय वगैरे लिहिणाऱ्यांबद्दल अतिशय वाईट वाटायला लागलंय मला आता!

रिया, हे तर मी पहिल्या प्रतिसादात च सांगितले आहे.. विचारी माणसाला हा लेख वाचल्यावर नक्कीच खूप लॉजिकल प्रश्न पडतील.

सुरुवातीला लेख वाचुन धागाकर्त्या ऐकीव माहिती वर मुलाला दोषी ठरवत आहेत अशी धारणा झाली. पण पुढच्या चर्चेत समोर आलेली माहिती पाहुन सुन्न झालोय.
आईबापाच्या प्रेमाचा दुरुपयोग तरी किती करावा?
या कठीण प्रसंगाशी लढण्याचं त्या मायबापाला बळ मिळो.
शूजिताजी तुम्ही अशा कठीण प्रसंगी त्यांच्यासोबत आहात त्याबद्दल तुम्ही कौतुकास पात्र आहात. याप्रसंगातुन काहीतरी चांगला मार्ग निघो. आम्ही सर्वांच्या शुभेच्छा असतीलच तुमच्या सोबत.
सध्यातरी मुलीसमोर त्या मुलाचा विषय न काढता मुलीची काळजी घ्या, कारण हे येणाऱ्या बाळाच्या दृष्टीने योग्य राहील.

संपूर्ण जनता काळजीने त्यांना सल्ले देत बसलेली आणि मग कळालं की फूसsssss! तसंच आहे हे नक्की, बिचारे पोटतिडकीने उपाय वगैरे लिहिणाऱ्यांबद्दल अतिशय वाईट वाटायला लागलंय मला आता!
>>>>>

धिस ईज ओके. याला काल्पनिक किस्सा म्हणून बघितले तरी विविध दृष्टीकोणातून आलेल्या प्रतिसादांतून बरीच माहिती मिळते, लोकांचे विचार कळतात, अश्या सिच्युएशन कश्या हाताळाव्यात याचे विविध पर्याय सापडतात, काही लोकं प्रतिसादात खरे अनुभव शेअर करतात. एकंदरीत चर्चा कधी फुकट जात नाही. मी तर हे खोटे असले तरी अशी एक सिच्युएशन चर्चेला घेतली याबद्दल धागाकर्त्याचे आभारच मानतो.

बापरे, फारच गुंतागुंतीचं आहे सगळं . मुलगी फारच पोचलेली दिसते आहे आणि एवढं सगळं वाचून तिच्याबद्दल काहीही सहानुभूती वाटत नाहीये , तिला नको तितके स्वातंत्र्य मिळाले आहे आणि तिने त्याचा पूर्ण गैरफायदा घेतला आहे , तरी जिज्ञासा यांचा प्रतिसाद पटला. पण आपण कसेही वागलो तरी पालक समजूनच घेतील अशा भ्रमात तिला ठेवू नये. तिची आहे ना इच्छा बाळाला सांभाळायची, मग करु द्यावे आता तिलाच आणि दोन महिन्यांत जेव्हा त्या मुलाचे (प्रियकराचे) रंग दिसतील , तेव्हा कदाचित तीला काहीतरी जाणीव होईल स्वत: एक आई झाल्यावर , की आपण आपल्या आईवडिलांना काय भोग पाठीमागे लावलेत ते.
पालकांसाठी फार वाईट वाटतंय पण, आणि त्या निष्पाप बाळासाठी सुध्दा. त्याचं आयुष्य या मुर्ख मुलीमुळे न बिघडो ही प्रार्थना. अशा मुलीला ताळ्यावर आणणं खरंच चॅलेंजिंग आहे , त्यासाठी तिच्या पालकांना शुभेच्छा.

निदान तोटा तरी नक्की होणार नाही.
>>>>
बाबा देखील शोषण करणारे असतील तर तोटाही होऊ शकतो. अश्या बाबां लोकांची काही कमी नाही समाजात.

सोशल मीडिया वर प्रसारित होणाऱ्या अशा लेखनाचे अनेक हेतू असू शकतात. खरे की खोटे सिद्ध करणे अशक्य आहे.

१. *तुमचा धागा मनोरंजनासाठी आहे ही शक्यता गृहीत धरल्यास*...

खरेच बरे वाटेल. ही दुर्दैवी आणि हतबल परिस्थिती कोणत्याच पालकांच्या वाटयाला न येवो. हे खरे नव्हते..एक दु:स्वप्न होते आणि ते संपले आहे असा सुटकेचा निश्वास टाकता येईल

*२. हा धागा आणि येथील प्रतिसाद कथालेखनासाठी रिसोर्सेस म्हणून वापरले जाणार आहेत ही शक्यता गृहीत धरल्यास*...

लगे रहो !!! लिहाच तुम्ही ही कथा...
तुम्ही दमदार सुरवात केली आहे. कथा खुलवणारे तपशील, धक्कातंत्र, अनपेक्षित कलाटणी, claymax, पात्रांचे गुंतागुंतीचे स्वभाव, भावनिक आंदोलने यांची छान योजना केली आहे. इथल्या प्रतिसादांतून कथा उत्कंठावर्धक मार्गे सुरू राहील , त्यात कच्चे दुवे राहणार नाहीत असा मालमसाला गोळा होत आहे. त्यामुळे कथेचा शेवट तुम्ही कसा कौशल्याने करता ते वाचायला आवडेल. 2 मुख्य कथानके आणि 5-6 उपकथानके समांतर चालू शकतील असे पोटॅनशीअल या कथाबीजात नक्कीच आहे. अशा घटनांसंदर्भात कोणते कायदे आहेत, वैद्यकीय, गुन्हे अन्वेषण, समुपदेशन , मानसशास्त्र , माहिती तंत्रज्ञान ह्या शाखांची पीडित व्यक्तींना कशी मदत होते याचीही माहिती वाचकांना प्रतिसादांतून मिळते आहे. त्यातून संभाव्य धोके आणि संभाव्य उपाययोजना ओळखण्यास मदत होईल.

*3. ह्या धाग्यातील आणि धागाकर्तीच्या इतर प्रतिसादातील तपशील खरा आहे असे गृहीत धरल्यास* ( जे इथे सामान्यपणे बऱ्याचजनांनी केले आहे.).....

हा प्रकार खरंच दुर्दैवी आणि मन विदीर्ण करणारा आहे. विशेषतः ह्या घटनेतील पालकांशी तादात्म्य पावून बऱ्याच वाचकांनी कळकळीने प्रतिसाद दिला आहे. अशी अशक्यप्राय वाटणारी घटना क्राईम पेट्रोल च्या एखादया भागापूरती किंवा बिहार युपी च्या एखाद्या वंचित खेड्यापुरती मर्यादित न राहता आपल्या परिचयातील सुशिक्षित, सुरक्षित आणि सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या परिवारात घडते आहे ही धोक्याची घंटा अधिक प्रकर्षाने जाणवली म्हणून हा पोष्ट प्रपंच ! इथल्या अनेक प्रतिसादांमध्ये मुलीच्या ह्या हानिकारक निर्णयाबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पण दुर्मिळ आणि आश्चर्यकारक असला तरी उपरोक्त मुलीचा असाही निर्णय आणि मानसिकता असू शकते ह्या विदारक सत्य डोळ्यात अंजन घालणारे आहे. धागाकर्तीने ह्या प्रश्नांची उचल घेऊन संभाव्य धोके आणि उपाय/मदत याविषयी चर्चा घडवून आणल्यामुळे त्या परिवाराला निर्णय घेण्यास मदत होईल . ती मदत मिळून काहीतरी मार्ग मिळावा ही मनापासूनची सदिच्छा !
Anyways धागा फॉलो करत आहे.

ही सत्यकथा, काल्पनिक कथा, सत्यकथेवर आधारित कथा, निव्वळ योगायोग.. जे काही आहे त्याचा शेवट पालकांसाठी सुसह्य आणि मुलीसाठी सुयोग्य व्हावा ह्याकरता शुभेच्छा!

मुलीला डोळे उघडे ठेउन आगीत उडी घ्यायचीच असेल तर कोणी ही म्हणजे ब्रह्मदेवाचा बापही थोपवु शकत नाही. एवढेच आता करा ते म्हणजे तिला माहेरचा मार्ग मोकळा ठेवा. काही दिवस पस्तावुन, परत येइल.

अरे वा! वेश्येकडे राहिली, गेले काही महिने परराज्यात गेले, ५ वर्षे प्रेम/ संबंध होते, तो तिला/ तिच्या आई वडिलांना शिवीगाळ करतो, मुलीला मारतो, अश्लील/ कदाचित पिडोफाईल व्हिडिओ तयार करतो, पोलिसांना याची कल्पना आहे आणि ते गप्प आहेत, मुलीला गेले दोन महिने फोनच दिलेला नाही... आणि तो मुलीचे पाय चेपायचा आणि मॅगी बनवून द्यायचा. आणि या सगळ्यांवर कडी म्हणजे मुलीकडे असे पुरावे आहेत की रातोरात गजाआड होईल!!
आता रोज काय पुरावे आहेत ते मावशीला सांगितलं की आम्हाला पण सांगत जा!
अर्थात हे सगळं असं रोज थोडं थोडं सांगताय ते एक बरं आहे. सगळं एकदम नका सांगू. आणि थोडे ग्राफिक सीन्स पण चालतील तोंडीलावायला. बघा प्रयत्न करून. नक्की जमेल तुम्हाला.

माझे प्रतिसाद सेव्हच होत नाहीयेत..... इंटरनेटचा इश्श्यु दिसतोय. थोड्या वेळाने पुन्हा ट्राय करेन.

कारण कळेल का वेमा?
नक्की कुठला भाग आक्षेपार्ह वाटतोय ते कळले तर तो भाग वगळुन इतर महत्वाच्या लिंक्स देता येतील इथे

Pages