नमस्कार.
'पुस्तकगप्पा' या नव्या उपक्रमाची ओळख करून देण्यासाठी हे टिपण.
लायब्रऱ्या, कागदी पुस्तकांची दुकानं, वर्तमानपत्रातली मराठी पुस्तकांची जागा आक्रसत जात असताना, मराठीतल्या महत्त्वाच्या, लोकप्रिय, रंजक, अनवट, नव्याजुन्या पुस्तकांवर गप्पाटप्पा करण्यासाठी या कार्यक्रमाची कल्पना सुचली. प्रत्यक्ष भेटणं दुरापास्त होण्याचं एक सकारात्मक फलित म्हणजे कार्यक्रम करण्यासाठी जागा आणि तिथवर सदेह पोचण्यातल्या अडचणी हे दोन्ही प्रश्न रद्दबातल होणं. ते पथ्यावर पडल्यानं ही कल्पना ऑनलाईन राबवायची ठरवली.
काही पुस्तकांची आणि तत्संबंधी विषयाची यादी जाहीर करायची आणि दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत ऑनलाईन भेटून त्याबद्दल गप्पा मारायच्या, चर्चा करायच्या, मुलाखती ऐकायच्या... अशी ही संकल्पना. त्या-त्या पुस्तकाचे लेखक, अभ्यासक, समीक्षक, रसिक वाचक यांपैकी कुणी निमंत्रित असेल; कधी कुणी पुस्तकविक्रेता आपले सुरस अनुभव सांगेल; कधी कुणी वाचक एखाद्या अनवट पुस्तकाची ओळख करून देईल... असा बेत आहे. येत्या सहा महिन्यांची पुस्तकं आणि विषय इथे (https://docs.google.com/spreadsheets/d/1pKyMc8JHqMpLnjCCZZ6hAUkS7vQ9IfQ9...) बघता येतील. चर्चा 'झूम'वर होईल.
चर्चेतला सहभाग विनामूल्य आहे. 'यू ट्यूब'वरून चर्चेचं थेट प्रक्षेपणही केलं जाईल. त्याचा दुवा 'फेसबुक'वर प्रसिद्ध केला जाईल.
तुम्हांलाही सामील व्हायचं असेल, वा प्रश्न पाठवायचे असतील, तर आम्हांला marathi.upakram@gmail.com या पत्त्यावर एक इमेल पाठवा. सहभाग नोंदवल्यावर कार्यक्रमाच्या आठवडाभर आधी कार्यक्रमाचा दुवा पाठवण्यात येईल. आमंत्रितांचं मानधन आणि तांत्रिक बाबींचा खर्च भागवण्यासाठी ऐच्छिक देणगी स्वीकारली जाईल.
अजून काही शंका वा प्रश्न वा सूचना असतील, तरीही कळवा. बोलूच...
मेघना, सई, किरण, नंदन
पुस्तकगप्पा
Submitted by मेघना भुस्कुटे on 23 August, 2021 - 00:45
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
चांगला उपक्रम... _/\_
चांगला उपक्रम... _/\_
तुम्ही पूर्वी 'चतुरंग' मध्ये लिहायचा का ? मला आवडायचे ते लेख..! _/\_
खूप छान उपक्रम. .. शुभेच्छा.
खूप छान उपक्रम. .. शुभेच्छा.
अतिशय चांगला उपक्रम.
अतिशय चांगला उपक्रम.
छान उपक्रम. ..
छान उपक्रम. ..
खूप छान उपक्रम. .. शुभेच्छा.
खूप छान उपक्रम. .. शुभेच्छा.
सध्या वाचन बंद आहे. फक्त श्रवणानंद घेतला तर चालेल ना?
प्रतिसादाकरता आभार. नुसतं
प्रतिसादाकरता आभार. नुसतं ऐकायला अजिबात ना नाही. जरूर ऐका..
उपक्रम छानच आहे. पण रविवार
उपक्रम छानच आहे. पण रविवार दुपार तीन ते पाच!!! नंतर जमले तर ऐकू.
वा छानच उपक्रम
वा छानच उपक्रम
शुभेच्छांबद्दल आभार! नंतर
शुभेच्छांबद्दल आभार! नंतर ऐकता येईल, नुसतं ऐकता येईल...
बाकी मी चतुरंगमध्ये एकच लेख लिहिला होता. तिच्या नजरेतून तो या सदरांतर्गत.