बीट सोया चंकस मिक्स व्हेज कटलेट

Submitted by MSL on 7 August, 2021 - 13:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

2 बीट, 2 बटाटे
1 वाटी सोया chunks
1 कांदा
10.लसूण पाकळ्या,
आल्याचा तुकडा,
5 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर थोडी,
1वाटी पोहे
1वाटी रवा
चवीनुसार तिखट हळद हिंग मीठ,
,तेल

क्रमवार पाककृती: 

1. सोया चंक पाण्यात 10 मिनिट भिजत ठेवावे..
2. बीट , बटाटा. आणि हे सोया चंक कूकर मध्ये शिजवून घ्या..नंतर बटाटे नी बीट किसून घेणे..सोय chunks चे. पिळुन पाणी काढून टाकावे..
3. मिक्सर मधून पोहयचा चुरा करून घ्यावा..
4. आले.लसूण मिरची ची पेस्ट करून घ्यावी..
5. त्यानंतर बटाटा बीट आले.लसूण पेस्ट , बारीक चिरलेला कांदा, सोया chunks , मीठ,हळद,हिंग, तिखट हे हलक्या हाताने मिक्स करून घ्यावे..
6. थोडा थोडा पोह्यांचा चुरा घालायचं...पुन्हा मिक्स करून कटलेट करावे..
7. एका डिश मध्ये रवा + चवीपुरते तिखट मीठ घालून मिक्स करावे..कटलेट त्यात ठेवून, 2नी साईड ना रवा लावून शॅलो फ्राय करावेत..
8 टोमॅटो सॉस किंवा चटणी सोबत खावी

वाढणी/प्रमाण: 
4 ते 5
अधिक टिपा: 

..अधिक.भाज्या असल्यास घालू शकतो..
बीट मुळे रंग आणि चवही खूप छान लागते

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट आणि माझे बदल
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान दिसतायत हे कटलेट्स. बीटामुळे जीवनसत्त्वे, बटाट्यामुळे पिष्टमय पदार्थ अन सोया मुळे प्रथिनंपण मिळतील.