साजिश या जावेद अख्तर यांच्या कवितेच्या भाषांतराचा प्रयत्न

Submitted by व्यत्यय on 1 August, 2021 - 09:04

कुणाल कामरा यांच्या Shut up ya Kunal या कार्यक्रमात जावेद अख्तर आणि योगेन्द्र यादव आलेले असताना, त्या कार्यक्रमाच्या शेवटी जावेद अख्तर यांनी साजिश ही कविता सादर केली. सद्यपरीस्थितीवर घणाघाती प्रहार करणारी ही कविता माझ्या ऑल टाईम फेवरेट मधे आहे. ही कविता तुम्ही युट्युब वर इथे बघु शकता. पुढे वाचायच्या आधी हे दोनच मिनीटांचं अत्यंत सुंदर सादरीकरण आवर्जुन बघा.

काल मी उगाचच "य"व्यांदा ही कविता बघत असताना तिचं मराठी भाषांतर मनात घोळु लागलं आणि आज थोडा वेळ मिळताच इथे ते टायपुन काढलं. एरवी मी हे भाषांतर माझ्या खाजगी डायरीत लिहुन ठेवलं असतं पण मला मधल्या एक-दोन कडव्यांच मनाजोगतं भाषांतर नाही जमलं.
इथे साहित्याची जाण असलेले आणि मराठीवर प्रभुत्व असलेले बरेच दिग्गज आहेत. त्यांच्याकडुन या भाषांतरात काही सुधारणा करता आली तर बरं या विचाराने हा धागा काढत आहे. हे भाषांतर अधिक चांगलं बनवण्यासाठी ज्या काही सुचना करता येतील त्या नक्की करा.

मुळ कविता
मुझे तो ये लगता है जैसे किसी ने यह साज़िश रची है
के लफ़्ज़ और माने में जो रिश्ता है
उसको जितना भी मुमकिन हो कमज़ोर कर दो

के हर लफ़्ज़ बन जाए बेमानी आवाज़
फिर सारी आवाज़ों को ऐसे घट मठ करो, ऐसे गूँदो
के एक शोर कर दो

ये शोर एक ऐसा अँधेरा बुनेगा
के जिसमें भटक जाएँगे अपने लफ़्ज़ों से बिछड़े हुए
सारे गूँगे मानी

भटकते हुए रास्ता ढूँढते वक्त की खाई में गिर के मर जाएँगे
और फिर आ के बाज़ार में खोखले लफ़्ज़
बेबस ग़ुलामों के मनिंद बिक जाएँगे

ये ग़ुलाम अपने आकाओं के एक इशारे पे
इस तरह यूरिश करेंगे
के सारे ख़यालात की सब इमारत
सारे जज़्बात के शीशाघर
मुनादिम हो के रह जाएँगे

हर तरफ़ ज़हन की बस्तियों में यही देखने को मिलेगा
के एक अफ़रा-तफ़री मची है
मुझे तो ये लगता है जैसे किसी ने यह साज़िश रची है

मगर कोई है जो कहता है मुझसे के हैं आज भी
लफ़्ज़मानी के ऐसे परीश्तारो शहादा
जो मानी को यूँ बेज़बान
लफ़्ज़ को ऐसे नीलाम होने न देंगे

अभी ऐसे दीवाने हैं जो
ख़यालात का, सारे जज़्बात का, दिल की हर बात का
ऐसे अंजाम होने न देंगे

अगर ऐसे कुछ लोग हैं तो कहाँ हैं
वो दुनिया के जिस कोने में हैं जहाँ हैं
उन्हें यह बता दो
के लफ़्ज़ और मानी
बचाने की ख़ातिर ज़रा सी ही मोहलत बची है
मुझे तो ये लगता है जैसे किसी ने यह साज़िश रची है

भाषांतराचा लंगडा प्रयत्न

मला तर वाटतं की कोणी तरी हा कट रचलाय
की शब्द आणि अर्थ यातला जो दुवा आहे
त्याला शक्य तेव्हढं कमकुवत करुया

की प्रत्येक शब्द बनेल एक निरर्थक आवाज
मग या सगळ्या आवाजांना असं एकत्र मिसळा, असं घुसळा
की एक गोंधळ व्हावा

हा गोंधळ उडवेल असा धुरळा
की ज्यात दिशाहीन भरकटतील शब्दांपासुन निखळलेले सगळे मुक अर्थ
भरकटत रस्ता शोधत काळाच्या ओघात नष्ट होतील

आणि मग बाजारात, पोकळ शब्द, गुलामांसारखे विकले जातील
हे गुलाम आपल्या धन्यांच्या एका इशार्‍यावर असा हल्ला करतील
की सगळ्या वैचारीक चिरेबंद्या
सगळे भावनांचे कांचमहाल
चकणाचूर होउन जातील

सगळ्या सारस्वतांच्या वस्तीत
एक हलकल्लोळ उडालेला असेल

मला तर वाटतं की कोणी तरी हा कट रचलाय

पण नाही तसे होणार नाही.
अर्थवाही शब्दांचे उपासक लोक तसे होऊ देणार नाहीत हा आशावाद माझ्या मनात अजुनही तेवतो आहे.
आणि असे मनस्वी उपासक मर्मबंधातील, हृदयातून उमटणार्‍या अस्फुट भावनांना असे शब्दांच्या वेदीवरती सूळी चढू देणार नाहीत.

जर असे लोक आहेत तर ते कुठे आहेत?
ते जगाच्या ज्या कोपर्‍यात, जिथेही असतील
त्यांना हे सांगा
की शब्द आणि अर्थ
वाचवण्यासाठी थोडासाच वेळ शिल्लक आहे

मला तर वाटतं की कोणी तरी हा कट रचलाय

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

बर्‍याच ठिकाणी मी या भाषांतरावर खुश नाहीये.
उदा.
"साजिश रची है" हे जितकं सहज सोपं बोलीभाषेतलं वाटतं तसं "कट रचलाय" वाटत नाही.
" ऐसे घट मठ करो, ऐसे गूँदो" मधली मजा "एकत्र मिसळा, असं घुसळा" ला नक्कीच नाही.
"वक्त की खाई मे गिरके मर जायेंगे" चं हताशपण "काळाच्या ओघात नष्ट होतील" ला नाही

पण तसं बघायला गेलं तर प्रत्येक ओळच नकोशी वाटायला लागते.
असो इथल्या प्रतिसादांनुसार डिलीट करायचं की नाही हे ठरवीन.

मला चटकन आठवणारे वाक्य संजोपराव यांच्या ब्लॉगवरुन साभार - विद्रोही साहित्याविषयी बोलताना ते ‘सतत ओरडून बोलणारा माणूस काय बोलत आहे, हे अनेकदा समजत नाही’ असे म्हणतात.

वरील कविता या आशयाचेच विधान करते आहे. शब्दांचा गोंधळ इतका माजवा, की अर्थ हरवुन जावा, कान बहीरे व्हावे, मने मुर्दाड!! पण नाही तसे होणार नाही अजुनही अर्थवाही शब्दांचे उपासक (परीश्तारो) आणि कलंदर, मनस्वी (शहादा) लोक तसे होऊ देणार नाहीत असा (भाबडा) आशावाद माझ्या मनात अजुनही तेवतो आहे. हे उपासक, अर्थाला असे सूळी चढू देणार नाहीत.

आपण शब्दशः भाषांतर करु नका ना व्यत्यय. आपल्याला काय जाणवले ते लिहा मग सहज आणि ओघवते रुपांतरण होइल. कमी जास्त बोलले असेन तर माफ कारा. Sad
-----------------------------
पण इतकी सुंदर कविता येथे दिल्याबद्दल आभार. भाषांतर वाचताना मला तरी खूप मजा आली.
----------------------------
>>>>अभी ऐसे दीवाने हैं जो
ख़यालात का, सारे जज़्बात का, दिल की हर बात का (काही केल्या यातली लय साधता येत नाही)
ऐसे अंजाम होने न देंगे

आणि असे लोक मर्मबंधातील , हृदयातून उमटणार्‍या अस्फुट भावनांना असे शब्दांच्या वेदीवरती सूळी चढू देणार नाहीत.

>>आपण शब्दशः भाषांतर करु नका ना व्यत्यय. आपल्याला काय जाणवले ते लिहा मग सहज आणि ओघवते रुपांतरण होइल.

अगदी बरोबर सामो. तुमचं म्हणणं पुर्ण पटतंय.
पण खरं सांगायचं तर या कवितेने मनात जे उचंबळुन येतं ते शब्दांत पकडायची कुवतच नाही माझी.

तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुमची संमती ग्राह्य धरत मुळ लेखात बदल करत आहे.

खरे आहे Happy बरेचदा मनातील भावना कागदावरती उतरवताच येत नाहीत. लॉस्ट इन ट्रान्स्लेशन होते. पण प्रयत्न करत रहा. कवितेकरता धन्यवाद. जावेद अख्तर ग्रेट्च आहेत.,

लंगडा आहे हे तुम्हीच सांगताय तर मग कशाला असा प्रयत्न केला हे समजले नाही. का वाटले लंगडा प्रयत्न करावा आणि मायबोलीवर धागा काढावा असे ?

मुझे तो ये लगता है जैसे किसी ने यह साज़िश रची है
के लफ़्ज़ और माने में जो रिश्ता है
उसको जितना भी मुमकिन हो कमज़ोर कर दो

मला तर वाटतं की कोणी तरी हा कट रचलाय
की शब्द आणि अर्थ यातला जो दुवा आहे
त्याला शक्य तेव्हढं कमकुवत करुया

खूपच सुमार दर्जाचे भाषांतर आहे हे. शब्दशः भाषांतर केलेले आहे. जावेद यांची ही कविता सुद्धा मुळात जर्नेलिजम करणारी आहे. भाष्यकर्ती आहे. ती मंचावरून सादर करण्याची कविता आहे. सरळ आहे, सादरकर्ता तितकाच प्रभावी असायला हवा. त्याची वाणी ओजस्वी असायला हवी. जर सादरकर्ता आणि कवी एकच असेल तर त्याला मंचावरून सादर करण्याच्या कवितेत शब्दांची निवड कशी असावी, लय कशी ओघवती असावी याचा अंदाज असतो. तो जावेद अख्तर असेल तर मग आपल्याला अंदाज येतो. पण ही कविता सादरीकरणाविना वाचायची म्हटली तर तितकीशी प्रभावी वाटत नाही. हे एखादं स्फुट वाटतं.

आपण कुठल्यातरी टीव्हीवरच्या कार्यक्रमात जावेद यांचे सादरीकरण पाहीले आणि लगोलग भाषांतर करून मोकळेही झालात. आधी गप्पांच्या धाग्यावर चर्चा केली असती तरी चालले असते. वाहत्या पानावरच सादर करायला हवी होती.

मुझे तो ये लगता है जैसे किसी ने यह साज़िश रची है
के लफ़्ज़ और माने में जो रिश्ता है
उसको जितना भी मुमकिन हो कमज़ोर कर दो

असं का वाटतंय की हे कुणाचे तरी कारस्थान असावे
शब्द आणि भाव यांच्या नात्याची वीण
जितकी उसवता येईल तितकी उसवण्याचे
( हे सुचलं तसं खरडलं आहे. शब्दशः भाषांतराने जे माकड झाले आहे ते टाळायचे असल्यास भावानुवाद करावा लागेल हे दर्शवण्यासाठी फक्त. भावानुवाद करण्याची इच्छा नाही. जिथे आपल्यासारखे ठोकळेबाज महानुभाव वावरत असतील तिथे तर अजिबातच नाही Happy )
एकूणातच आपला आवाका पाहता आपल्या प्रतिसादांचे कुणी वाईट वाटून घेऊ नये हे समजले.
चालू द्या.