पावसाळी रानभाज्या :: भारंगी फुलाची भाजी

Submitted by MSL on 30 July, 2021 - 10:42
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

1. 1 ते 2 वाट्या भाजणी
2. 1 कांदा
3. भारांगीची फुले 1 वाटीभर
4. 1 चमचा लाल तिखट
5. चवीनुसार मीठ, आणि साखर
6. फोडणीसाठी तेल,जिरे,मोहरी,हिंग,हळद..

क्रमवार पाककृती: 

1. भारंगीची फुले तोडून घ्यावी...पावसाळ्यात ही झाडे बरेच ठिकाणी दिसतात...त्यांना फुलांचे गुच्छ येतात...त्यातली फुललेली फुले, आपण निवडून घ्यावी... कळ्या ,पाने नकोत..
2..ही फुले पाण्यात धुवून घ्यावी..आणि ही फुले आणि भाजणी असे कोरडेच मिक्स करून घ्यावे..
3. कांदा बारीक चिरून घ्यावा..
4. कढई गॅसवर ठेवून, 2 चमचे तेल घालावे..
5. जीरे मोहरी हिंग हळद घालून कांदा टाकावा..तो परतून घ्यावा..
6. त्यावर फुले आणि भाजणी चे मिश्रण टाकावे...तिखट घालावे.मीठ घालावे.. झाकण ठेवून 5.मिनिट वाफ काढावी..
7. नंतर झाकण काढून 2 ते 3 मिनिट पुन्हा चांगली परतून घ्यावी..
8. भाजी तयार...

वाढणी/प्रमाण: 
4-5
अधिक टिपा: 

1 .भाजणी एवजी बेसन देखील वापरू शकतो..
2. कोरडी होत असल्याने, पोळी / भाकरी पेक्षा पातळ भात / दहीभात यासोबत ही भाजी खावी..

माहितीचा स्रोत: 
सासर
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाजीचा फोटू पण परत केली की टाका.
नवीन माहिती कळली.
भारंगी म्हणजे गौरी का ? >> गौरी म्हणजे तेरडा ना ,लाल , गुलाबी पाहिलंय तेरडा पण निळा जांभळं कधी नाही पाहिला.