1. 1 ते 2 वाट्या भाजणी
2. 1 कांदा
3. भारांगीची फुले 1 वाटीभर
4. 1 चमचा लाल तिखट
5. चवीनुसार मीठ, आणि साखर
6. फोडणीसाठी तेल,जिरे,मोहरी,हिंग,हळद..
1. भारंगीची फुले तोडून घ्यावी...पावसाळ्यात ही झाडे बरेच ठिकाणी दिसतात...त्यांना फुलांचे गुच्छ येतात...त्यातली फुललेली फुले, आपण निवडून घ्यावी... कळ्या ,पाने नकोत..
2..ही फुले पाण्यात धुवून घ्यावी..आणि ही फुले आणि भाजणी असे कोरडेच मिक्स करून घ्यावे..
3. कांदा बारीक चिरून घ्यावा..
4. कढई गॅसवर ठेवून, 2 चमचे तेल घालावे..
5. जीरे मोहरी हिंग हळद घालून कांदा टाकावा..तो परतून घ्यावा..
6. त्यावर फुले आणि भाजणी चे मिश्रण टाकावे...तिखट घालावे.मीठ घालावे.. झाकण ठेवून 5.मिनिट वाफ काढावी..
7. नंतर झाकण काढून 2 ते 3 मिनिट पुन्हा चांगली परतून घ्यावी..
8. भाजी तयार...
1 .भाजणी एवजी बेसन देखील वापरू शकतो..
2. कोरडी होत असल्याने, पोळी / भाकरी पेक्षा पातळ भात / दहीभात यासोबत ही भाजी खावी..
वर नुसता फुलांचा फोटो टाकला
वर नुसता फुलांचा फोटो टाकला आहे...
भाजी संपली...
व्वा
व्वा
भारंगी म्हणजे गौरी का ?
भारंगी म्हणजे गौरी का ?
छान. आता फुलं मिळवायला हवीत.
छान. आता फुलं मिळवायला हवीत.
भाजीचा फोटू पण परत केली की
भाजीचा फोटू पण परत केली की टाका.
नवीन माहिती कळली.
भारंगी म्हणजे गौरी का ? >> गौरी म्हणजे तेरडा ना ,लाल , गुलाबी पाहिलंय तेरडा पण निळा जांभळं कधी नाही पाहिला.
छानच. फुलं बघितल्याचं आठवत
छानच. फुलं बघितल्याचं आठवत नाही. पानांची भाजी बऱ्याच वेळा खाल्ली आहे.
हा पानांचा फोटो
छान चविष्ट होत असेल.
छान चविष्ट होत असेल.
भारंगीची भाजी थोडी तुरट कडवट
भारंगीची भाजी थोडी तुरट कडवट लागते.
गौरी वेगळी तेरडा वेगळा
गौरी वेगळी तेरडा वेगळा
हो..भाजी चवीला कडवट लागते..वर
हो..भाजी चवीला कडवट लागते..वर पाने दिलियेत...इथे पाने काढत नाहीत...फुले खातात..
छान. आम्ही पानांची करतो.
छान.
आम्ही पानांची करतो.