कन्या राशीचे लोक व विशेषतः शुक्र ६ व्या घरात पडलेले लोक हे अतिशय व्यग्र व कर्तव्यपरायण असतात. यांच्या प्रेमाची अभिव्यक्ती ही "उपयोगी पडण्याकडे" खूप असते. ते वाटतात खरे पण रुक्ष नसतात, या ज्योतिषशास्त्राच्या समजूतीवर बेतलेला हा लेख अन्यत्र पूर्वप्रकाशित आहे.
-----------------------------------------------------------------
एकदा तुझे खूप लाड करायचे आहेत. अगदी मन भरुन, तुझ्या गालांवरुन, कानांवरुन अलगद हाताची बोटे फिरवत, तुझ्याही तनामनाच्या तारा झंकारुन उठाव्यात असे. अन नंतर तुझे पाय चेपून द्यायचे आहेत, तळवे चोळून. आवडेल तुला? आणि हो हे सर्व केव्हा तुला मनसोक्त चांगलं चुंगलं करुन खायला घातल्यानंतर. तू मला अरसिक म्हणणार मला माहीत आहे. कारण तुझ्या प्रेमाची अभिव्यक्ती म्हणजे कामधाम सोडून, कविता वाचणे, सूर्यास्त अनुभवणे व अन्य .... पण ते सर्व "इम्पल्सिव्ह" अगदी मनस्वी, कलंदरपणे. मलादेखील ते सर्व अनुभवायचे आहे रे पण मी पडले "कन्या रास आणि ६ व्या घरात शुक्र" पडलेली प्रेयसी. फारशी काव्यात जगणारी नाही. 'वहावत जाणं" तर मला माहीतच नाही. मी, आपल्या प्रियतम व्यक्तीच्या "उपयोगी" पडण्याकडे कल असलेली. म्हणजे बघ - कोणी मला २ पर्याय दिले की मी तुझी सर्वात लाडकी प्रेरणा बनू शकेन अथवा तुझ्या आयुष्याच्या संध्याकाळी तुझा आधार व तुझी सहचारी बनू शकेन तर २ रा पर्यायच अतिशय आनंदाने निवडणारी.
नवरंग सिनेमातील "जमुना" याच अगदी माझ्याच पठडीतली. नॉनग्लॅमरस पण कर्तव्यदक्ष. घरात सासू-सासर्यांचे करणारी. सतत कामात, व्यापात व्यग्र आहे. इतकी कि ती नवर्याला रिझवण्यातही संकोच करणारी. खरं तर तिच्य मनात अढी आहे कि नवर्याला मोहिनी आवडते. आता हि मोहिनी कोण ते तिला कळणे शक्यच नाही कारण मोहिनी आहे,दिवाकराची, तिच्य नवारयाची प्रेरणा. काल्पनिक प्रेरणा . पण झालय काय त्यामुळे आधीच स्वभावाने संकोची असलेल्या, किंचित रुक्ष पणाकडे झुकणार्या जमुनेला नवर्याशी मानाने एकरूप होताच येत नाही.हा भावनिक अडसर कुठेही चकार शब्दाने बोलून न दाखविता, संध्याने तिच्य विभ्रमातून, त्राग्यातून तो प्रकट केलेला आहे. दिवाकर तर कवीच आहे, सदैव सरस्वतीच्या उपासनेत बुडालेल्या त्याचे जमुनावरती अतिशय प्रेम आहे. पण जमुनाला ते कळत नाही, तिचे जे मत्सरायुक्त दु:ख आहे, ते दिग्दर्शकाने खूप छान रंगविले आहे.ती फणसासारखी आहे. बाहेरुन काटेरी आतुन गोड. रुक्ष भासते पण मनात भावनांचा कोलाहल जपते. तिला नवर्याचे प्रेम हवे आहे पण कसे मिळवायचे ते कळत नाही. खरं तर आपण आपल्या कवी नवर्याला पुरेशी साथ देऊ शकू कि नाही याबद्दल ती साशंक आहे. हा न्यूनगंड, मत्सर,, भावनिक अडसर .... तिचे सगळे सर्व shadow aspects. शेवटी व्ही शांताराम यांच्यासारख्या मातब्बर दिग्दर्शकाची कलाकृती आहे ती.
बरेचदा माझं असं वागणं तुला त्रासदायक होतं याचीही मला जाणीव आहे.म्हणजे सकाळी तू लाडात यावं आणि मी तुला आंघोळ, मुखपक्षालनाकरता पिटाळावं हाच आपला नॉर्म (नेहेमीचं). रात्री तुला एखादी गाण्याची अथवा कसेही मैफिल जागवण्याची हुक्की यावी पण माझ्या कर्तव्यदक्षतेमुळे , दुसर्या दिवशीच्या रुटीनच्या विवंचनेमुळे आपण तो बेत रद्द करावा हे अनेकदा घडतं. "यु आर नेव्हर इन द मोमेंट" ही तुझी नेहमीची तक्रार आणि त्यावर माझं उत्तर ठरलेलं - "कामंधामं सोडून कोण रमणार कलेत? चल सोड मला चिक्कार पसारा पडलाय"
"काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात,
क्षितीजाच्या पलीकडे ऊभे दिवसाचे दूत"
अशा कर्तव्यपरायणताप्रधान ओळी कुसुमाग्रजांना आमच्यासारख्या लोकांकडे पाहूनच सुचल्या असाव्यात.
पण याचा अर्थ असा नाही की मला तुझ्याबरोबर सूर्यास्त अनुभवायचा नाही. मलाही एक कविता तुझ्याबरोबर अनुभवायची आहे, अगदी तुझ्याशी तादात्म्य पावून, त्या कवितेला तुझ्या डोळ्यांतून वाचत. मलाही वाटतं तुझा हात हातात घेऊन,एकदा तरी सूर्यास्त निवांतपणे अनुभवेन. कधीतरी सगळं 'परफेक्ट" असेल, आणि माझ्या लगबगीची जरुरी नसेल. येईल असा दिवस नक्की येईल.
आँ!
आँ!
का हो शरदजी? मेरा चुक्या क्या
का हो शरदजी? मेरा चुक्या क्या?
सामो,मला हे तितकसं नाही आवडलं
सामो,मला हे तितकसं नाही आवडलं.कदाचित कळलं नसेलही.पण काहीतरी गंडलय.
धन्यवाद देवकी.
धन्यवाद देवकी.
मला या लेखाशी व्यवस्थित रिलेट करता येतय. ऑब्व्हियसली म्हणुन मला तो मांडता आला. आपण स्वतः किंवा आपला आल्टर इगो त्या पात्रासारखा असेल तर लेख अधिक उत्तम वठतो असे मला वाटते. पण तुला नसेलही आले रिलेट होता. शक्य आहे. तू किंवा तुझा आल्टर इगो तसे नसेल. आसपास तू तशी व्यक्ती पाहीली नसशील.
प्रतिसादाबद्दल आणि लेख वाचल्याबद्दल खूप धन्यवाद.
@सामो, आँ! केलं ते साहित्यिक
@सामो, आँ! केलं ते साहित्यिक पद्धतीने ज्योतिष वर्णनासाठी. चुक्या नैच. मजेदार आहे.
जमुनेची रास कन्या आहे की काय?
जमुनेची रास कन्या आहे की काय? कारण कन्येचे लोक असतात कर्तव्यदक्ष पण प्रेमात जरा पप्पुच असतात. कन्येत शुक्र निचीचा झाल्याने असेल, पण रोमँटीकपणाचा अभाव असतो थोडा फार. पण एक आहे कन्येची स्त्री असो वा पुरुष, हे सत्शील असतात, चारित्र्यवान असतात. कुठे पाय घसरण्याची शक्यता २ टक्केच असते.
पण एक आहे कन्येची स्त्री असो
पण एक आहे कन्येची स्त्री असो वा पुरुष, हे सत्शील असतात, चारित्र्यवान असतात. कुठे पाय घसरण्याची शक्यता २ टक्केच असते > हे सामान्यीकरण पटले तर नाहीच पण सत्शील/चारित्र्यवान/पाय घसरणे ह्या परिस्थिती/व्यक्ती/समाज/देशसापेक्ष गोष्टी आहेत.
जिद्दु मान्य आहे, पण
जिद्दु मान्य आहे, पण वस्तुथिती आहे. सामान्यतः वृषभ, तुळ, कर्केचे लोक प्रेमात चटकन पडतात, कारण मायाजाल. कन्येत मुळातच ही भावना कमी असते. एकतर हे लोक उशिरा लग्न करतात, नाहीतर झाले लवकर तर आपले कर्तव्य पार पाडतात. लिहीण्या सारखे मटेरीयल खूप आहे, पण तेव्हढा वेळ नाही.
पण एक आहे कन्येची स्त्री असो
पण एक आहे कन्येची स्त्री असो वा पुरुष, हे सत्शील असतात, चारित्र्यवान असतात. कुठे पाय घसरण्याची शक्यता २ टक्केच असते.
.
.
सामान्यीकरण पटले तर नाहीच पण सत्शील/चारित्र्यवान/पाय घसरणे ह्या परिस्थिती/व्यक्ती/समाज/देशसापेक्ष गोष्टी आहेत.
by जिद्दु.
ती दोन वेगळ्या कामांची जोडतोड आहे. कन्या रास म्हणजे हिशोबीपणा आणि नियोजन जरा अतिरेकच. बुधाची रास.
निष्ठा ( प्रेम, विलासीपणाही. )पाहायची असेल तर शुक्र तपासावा लागतो. एकमेव ग्रह. रवि,गुरू काही कामाचे नाहीत.
तर कन्येचा शुक्र यात जरा दोन्हींचे अधिक उणे करावे लागते.
छान लिहिले आहे. असेच कुंभ रास
छान लिहिले आहे. असेच कुंभ रास आणि ८ वा शनी बद्द्ल वाचायला आवडेल.
छान आहे
छान आहे
असेच वृश्चिक बद्दल वाचायला आवडेल
आसपास तू तशी व्यक्ती पाहीली
आसपास तू तशी व्यक्ती पाहीली नसशील.>>>>> आहे ग, घरातच आहे अशी व्यक्ती.
ते ६ व्या घरातील शुक्र ... हे कळले नव्हते आणि भरभर वाचायची वाईट सवय.
एक मात्र खरं, कन्या राशीवाले/ ल्या जबरदस्त हेकट असतात.पण माया किंवा नातेसंबंध अगदी निभाऊन नेतात.
रश्मी प्लीज ज्योतिषविषयक
रश्मी प्लीज ज्योतिषविषयक लिहा ना. ललित किंवा मग माहीतीपर. मला वाचायला आवडेल खूप.
सामो, तुला ज्योतिष विषयक
सामो, तुला ज्योतिष विषयक अभ्यासात बराच रस आहे असे जाणवते. माझ्याकडे वसंत दा भटांची जवळपास दहा-बारा पुस्तके आहेत या विषयावरची. तुला किंवा अजून कोणालाइंटरेस्ट असल्यास मला कळव.
अमेरिकेत मी पोस्टाने पाठवू शकेन.
धन्यवाद वंदना. अॅप्रिशिएट इट
धन्यवाद वंदना. अॅप्रिशिएट इट. वाटल्यास जरुर कळवेन.
नक्कीच सामो. Looking for a
नक्कीच सामो. Looking for a good house for those books!
आमचा कन्यावाला आमच्याकडून
आमचा कन्यावाला आमच्याकडून कर्तव्य पुर्ण करून घेण्यासाठी तत्पर असतो आणि व्यग्र असतो.
वसंत दा भटांची जवळपास दहा
वसंत दा भटांची जवळपास दहा-बारा पुस्तके आहेत
.
चांगली आहेत. 'वृष्चिक लग्न' हे पुस्तक बहुतेक त्यांचेच आहे. विशेष चांगले आहे. निरयन ज्योतिष पाहतात. व.दा. नक्की कसं फलवर्णन करतात आणि ते बरोबर कसं येतं याचं एक कोडं आहे असं ऐकलं आहे.
आमचा कन्यावाला आमच्याकडून
आमचा कन्यावाला आमच्याकडून कर्तव्य पुर्ण........
😀
लिहीण्या सारखे मटेरीयल खूप
लिहीण्या सारखे मटेरीयल खूप आहे, पण तेव्हढा वेळ नाही.
by रश्मी.
वर्षाला एखादा लेख?
मी सहज लिहीलं इथे, पण सत्य
मी सहज लिहीलं इथे, पण सत्य लिहीलं, स्वानुभव लिहीला. मला फार काही जाणून घ्यायचंही नाहीये, आमचा कर्मयोग, कर्तव्य आम्ही जमेल तसं पार पाडतोय. हल्ली बरेच वर्ष मी काही जाणून घेणं सोडून दिलंय.
माझ्या बाबांनी लहानपणापासून सांगितलं आहे, आपल्याला दिलेलं कर्म निष्ठेने, प्रामाणिकपणे करावं आपण, फळाची आशा धरु नये. गीता अशी एका वाक्यात सांगितली बाबांनी, तेच कामी येतंय मला.
मला फार काही जाणून घ्यायचंही
मला फार काही जाणून घ्यायचंही नाहीये, आमचा कर्मयोग, कर्तव्य आम्ही जमेल तसं पार पाडतोय. >>>>> अन्जू,अज्ञानात सुख असते ग! तसेही हेच आपले जर प्रारब्ध,प्राक्तन किंवा जे काही असेल ते त्यापलीकडे आपण नाही ना जाऊ शकत.आजचा दिवस चांगला गेला,उद्याचे उद्या पाहू या बेसीसवर मीही चालत आहे.
सॉरी सामो, अवांतराबाबत!
देवकी मीही आजचा दिवस पार
देवकी मीही आजचा दिवस पार पाडला हेच अनेक वर्ष म्हणतेय.
सामो sorry माझ्याकडूनही अवांतरासाठी.
काही गोष्टी कुणाच्या हातात
काही गोष्टी कुणाच्या हातात नसतात. तर यासाठी आत्मा,परमात्मा, प्राक्तन आणि कर्म यांच्या रंगांच्या बादल्यांत भिजवणे चुकीचे आहे आणि जे यांमधून वाचलेत त्यांनी समाजातील इतरांना साथ द्यायला हवी असे ज्ञान बोधिसत्वास झाले.
यांच्या रंगांच्या बादल्यांत
यांच्या रंगांच्या बादल्यांत भिजवणे चुकीचे आहे >>>>> अरेवा! हे ग्रेटच.
अन्जू आणि देवकी सॉरी कशाला.
अन्जू आणि देवकी सॉरी कशाला. सवांतरच आहे हे.
सामो शुक्र सहावा नाहीये
सामो शुक्र सहावा नाहीये त्यामुळे फक्त कन्या रास गृहीत धरून लिहिलं, म्हणून असंही अवांतर.
नो प्रॉब्लेम अन्जू. असे
नो प्रॉब्लेम अन्जू. असे अवांतर किंवा सवांतर मोस्ट वेलकम आहे गं. कन्या सूर्य, चंद्र, शुक्र सगळे चालेल या धाग्यावरती.
माझ्या साबा डबल कन्या होत्या म्हणजे कन्या चंद्र रास +लग्नही कन्या. कसल्या कर्तव्यदक्ष होत्या ग बाई. कोणतही काम सोप्प होउन जाई त्यांच्या हाताखाली. टापटिप आणि व्यवहारातील एक चोख बुद्धीमत्ता होती. तो एक वेगळ्या प्रकारचा आय क्यु असतो.
कन्या अणी तूळ लग्न असेल तर
कन्या आणि तूळ लग्न असेल तर ढोबळमानाने काय असू शकेल्?हे आपलं उगीचच.
देवकी कन्या रास + तूळ लग्न (=
देवकी कन्या रास + तूळ लग्न (= पहीले घर) म्हणजे चं १ ल्या घराच्या मागच्या घरात असेल = १२ व्यात असेल. तुला चंद्र १२ व्या घरात असतानाचे वर्णन वाचावे लागेल. पण कधी रास अशी अर्धवट कस्प असल्यासारखी पहील्या घरात पडते म्हणजे अर्धी कन्या व अर्धी तूळ पहील्या घरात , मग तेव्हा चंद्र पहील्या घरातही असू शकतो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
निष्णात ज्योतिषीच पाहून व्यवस्थित भविष्य सांगू शकतो.
मी अर्धे कच्चे मडके आहे. ललितात फक्त भरारी घेण्यापुरता ज्योतिषी
Pages