ते दोघं पाऊसवेडे

Submitted by saakshi on 29 July, 2008 - 09:56

तिची बस आली. बस नं. २९९. खूप दिवस पावसानं ओढ दिल्यानंतर आज पुन्हा अंधारून आलं होतं. ती स्टॉपवर असतानाच पावसाची रिमझिम चालू झाली होती. आज तिचं नशीब जोरावर होतं, बसायला जागा मिळाली.

खिडकीबाहेर रिमझिमणारा पाऊस,त्यातून छत्री सावरत, काही छत्री विसरल्यामुळे भिजत चालणारी मणसं पहायला तिला खूप आवडायचं. पाऊस तिचा जिवलग सखा. पाऊस आला की तिचं मन थुईथुई उसळणारा कारंजा व्हायचं. खूश असायची ती पावसात भिजताना.

छोट्या छोट्या स्टॉपसवर थांबत बस मुंगीच्या गतीनं चालली होती. ती अस्वस्थ. क्लासला तर वेळेत पोहोचायला हवं होतं. पुन्हा एकदा बस थांबली, बरेचजण चढले. अचानक तिला जाणवलं, तिच्या पायावर पाणी ठिबकतय. अरे? बस कशी काय गळायला लागली? तिनं वर पाहिलं. तर तिच्या नजरेला पडला एक चेहरा. भिजलेला. त्याच्या रेनकोटवरून गळणारं पाणी तिच्या पायावर अभिषेक करत होतं.
तिनं चुळबूळ केल्यामुळे त्याला ते जाणवलं, तो थोडासा मागे सरकला. शेवटी एकदाचा तिचा स्टॉप आला, ती उतरली.
--------------------------------------------------------

आज तिला घरातून निघायलाच उशीर झाला. बस निघून गेली. आता रिक्षाने जाण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता. तिने एका शेअर रिक्षाला हात केला. रिक्षा थांबली. रिक्षात बसून तिनं सुटकेचा निश्वास टाकला. शेजारी पाहिलं तर तो रेनकोट! "अरे! यालाही उशीर झालेला दिसतोय." ती मनात म्हणाली. तिच्या स्टॉपवर तोही उतरला. तिच्या क्लासच्या building समोर एक मोठा IT park होता. त्या IT park कडे पाहून ती म्हणायची "बस, थोडेच दिवस! डिग्री complete झाल्यावर इथेच join व्हायच." तिनं पाहिलं, तो त्याच IT park मध्ये चालला होता.
---------------------------------------------------------

आताशा तिला रोजच त्याच दर्शन घडे. त्याच्या bag वरून तिला कळालं की तो एका नावाजलेल्या IT company त नोकरीला आहे. हळूहळू तिचा तो नित्यनेम झाला. त्या स्टॉपवर तिची नजर त्याला शोधायची. तो दिसला की तिला आत कुठेतरी खूप बरं वाटायचं. तो एक दोन दिवस दिसला नाही की तिला बाहेर पडणारा पाऊसही उदासवाणा वाटायचा.
--------------------------------------------------------

आज तिचा क्लासचा शेवटचा दिवस. तिनं त्याला स्टॉपवर शोधलं, पण तो काही दिसला नाही. तिचं मन खट्टू झालं. आता...... आता तो उद्यापासून दिसणार नाही. का नाही आला आज?

तिची degree complete झाली अन तिला जॉब लागला. पण तिच्या आवडत्या IT park मध्ये नाही तर एका मोठ्या IT park मध्ये. आता तिचं बस नं. २९९ शी नातं तुटलं पण तो मात्र तिच्या मनात ठाण मांडून बसला होता.

एक महिना याच धावपळीत गेला. नवीन जॉब, नवं ऑफिस, नवे सहकारी यात ती रमून गेली. एक दिवस ती घरी गरमागरम चहा, भजी खात होती. पाऊस पडायला लागला की तिची आईकडे ती खास फर्माईश असायची. तिनं दोन दिवसांची leave मोठ्या मुश्किलीनं मिळवली होती. आता दोन दिवस काय काय करायचं ह्याचे plans ती आखत होती. अन तिच्या नवीन मैत्रिणीचा फोन आला. मैत्रिणीनं तिला जेवायला बोलावलं होतं. तिनं विचारलं "घर कुठे आहे तुझं? कसं यायचं?" मैत्रिणीने पत्ता सांगितला. आणि तिची tube पेटली, अरे! म्हणजे बस नं. २९९ नं जायचं.

दुसर्या दिवशी तिनं छान आवरलं अन निघाली. पण स्टॉपवर आल्यावर तिच्या लक्षात आलं आपण छत्री विसरलोय. बस आली तेंव्हाच खचाखच भरलेली होती. कशीबशी ती बसमध्ये चढली. जागा नव्हतीच.

आणि तो स्टॉप आला. तिची नजर भिरभिरली. तो असेल?
बरेचजण उतरले. गर्दी बरीच कमी झाली. अन तिच्या लक्षात आलं एक जागा रिकामी झाली आहे. तिनं promptly ती जागा पटकावली.

कर्रर्रर्रर्र.............. बसला करकचून ब्रेक लागला अन ती भानावर आली. बराच वेळ ती त्याचाच विचार करत होती. आणि अचानक तिला जाणवलं, की आपल्या शेजारची व्यक्ती आपल्याकडेच पहातीये. तिनं मान वळवली अन समोर पाहिलं, तर तो रेनकोट!!!!! दोन मिनिटं तिचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. नक्की काय reaction द्यावी हेच तिला कळत नव्हतं. त्याच्या डोळ्यांवरून मात्र तिला अस जाणवलं की त्याला तिच्याशी खूप बोलायचं आहे. त्याचा स्टॉप आला. अन ती दोघही उतरली.
-----------------------------------------------------

त्याच्या कंपनीसमोरची चहाची टपरी. तिथे ती दोघं चहा घेत उभी. त्याचा रेनकोट तिनं घातलेला. दोघांनाही किती बोलू अन किती नको असं झालेलं. त्याच्या डोळ्यातून आनंद ओसंडून वाहत होता. तो सांगत होता, "गेला एक महिना मी तुझी वाट पाहतोय. वाटलं आज येशील, उद्या येशील, पण तू आलीच नाहीस. वेड्यासारखी वाट पाहिली तुझी. वाटलं आता पुन्हा भेटत नाहीस की काय?
मी..........
मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय......."
तिनं त्याच्या डोळ्यात पाहिलं अन त्याच्या म्हणण्यातला खरेपणा तिला जाणवला.
आज तिच्या जिवलग मित्राच्या पावसाच्या साक्षीनं तिला तिचा जीवनसाथी मिळाला होता.

गुलमोहर: 

खूप छान वेग आहे कथेचा ... लिहिण्याची शैलीही आवडली साक्षी Happy

छान वाटलि वाचायला पण वास्तवातलि नाहि वाटत.

संदीप, आशू प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
आशू,
वास्तव पाहून मन थकतं म्हणूनच स्वप्नं पडतात, खरं ना?
म्हणून ही कथा.

मैत्रिणीनं तिला जेवायला बोलावलं होतं. >>>...
हे वाचुन वाटले नेहमीसारखच तो मैत्रीणीचा भाऊ वैगैरे असेल...
पण शेवट वाचुन छान वाटले...
IT Park असा उल्लेख आहे... म्हणजे कथा मोठ्या शहरात आकार घेतेय... त्यामुळे कथा वास्तववादी वाटायला scope आहे... Happy
पुढच्या लिखाणासाठी शुभेच्छा.... Happy

मस्तय कथा, साक्षी. वेग छानय. पण संवाद फारसे नसल्याने वाचता वाचता संपली सुद्धा. तशीच लिहायची असेल तुला.
(पण खूप लवकर संपली असं वाटलं खरं. पुरणपोळी खाताना मला अजूनही असच वाटतं Happy )

छान आहे कथा, तरल आणि भावूक. लवकर संपली हे मात्र खरं. पण आवडली.

मलाही आवडली कथा. छान लिहिले आहेस.
मेल पाहशील?

मला माहीत नाही नक्कि कशामुळे ही गोष्ट आवडली पण छोटीशी असून आवडली. मला वाटते त्याचे ते शे वटचे वाक्य. 'एक महीना वेड्यासारखी वाट पहातोय'.. एकदम romantic वाटले आणि म्हणून आवडली :))

आवडली कथा. शेवट अगदी परीकथेसारखा आहे.. Happy
लिहित रहा.

आवडली कथा. अगदी असच माझ्यासोबत झाल होत....फक्त शेवट सोडुन...ती नंतर कधी भेटलीच नाही. Sad

साक्षी,
खूप छान वेग आहे >> जरा जास्तच वेगवान आहे :)(हे म्हणजे प्रायोगिक रंगभूमी वरील दमदार नाटक वाटतय!) Biggrin

वास्तव पाहून मन थकतं म्हणूनच स्वप्नं पडतात, खरं ना?>> वॉव!! ही "पंचलाईन" म्हणून टाक गं

मै तो गधा निकला Sad

दीपू द ग्रेट
"वक्त रूकता नहीं कहीं टिककर
इसकी आदत भी आदमीसी है"

सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
daad, संवाद फारसे टाकले नाहीत कारण असं वाटलं की
"कधीकधी मौनच शब्दांपेक्षा जास्त बोलकं असतं", पटलं ना?
kuldeep,
आवडत्या punch lines खूप आहेत. त्यामुळे कोणती टाकावी ह्याचा निर्णयच होत नाहीय.

अगं मग दररोज नवीन टाक नं!

दीपू द ग्रेट
"वक्त रूकता नहीं कहीं टिककर
इसकी आदत भी आदमीसी है"

कधीकधी मौनच शब्दांपेक्षा जास्त बोलकं असतं