Submitted by नानबा on 10 August, 2010 - 09:52
ईलेक्ट्रिसिटी बॅकअप साठी इन्व्हर्टर विकत घ्यायचा आहे - कुठल्या कंपनीचा/किती कपॅसिटीचा घ्यावा?
हा इन्व्हर्टर एका छोट्या गावातल्या घरात बसवायचा आहे, जिथे उन्हाळ्यात मेजर लोड शेडिंग असतं..
ह्या विषयावर कुठलीही माहिती असेल तर प्लीज द्या!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सव्वाशे ते दीडशे असायचे
शंभर ते सव्वाशे असायचे पूर्वी. मला तर शभर च्या वर गेलेलं सुद्धा फार कमी आठवतेय. आणि हे आता मागच्या वर्षातला ग्राफ बघा. दीडशे च्या खाली नाही. मागच्या दोन तीन महिन्यात तर दोनशेच्यासुद्धा वर गेलंय. डोके फिरायचे काम झाले आहे हे.
बॅटरी फुल चार्ज झाल्यावर
बॅटरी फुल चार्ज झाल्यावर इन्वर्टरचा इनपुट सप्लाय बंद ठेवला तर विज बिल नियंत्रित होईल का ? विज गेल्यावर ऑटोमेटिक लाइट्स सुरु होणार नाहीत पण बॅटरी सुस्थितित असेल तर पॉवर बॅक अप अपेक्षित असलेला मिळेलच ना ! थोडक्यात आपण चार्जिंग टॉर्च वापरतो त्याप्रमाणे केले तर चालेल का ? म्हणजे अतिरिक्त अनियंत्रित विज बिल येण्याची शक्यता बहुधा आवाक्यात राहील.
सध्या इन्वर्टर काढून ठेवलाय.
सध्या इन्वर्टर काढून ठेवलाय. पण इमर्जन्सीमध्ये तसाच वापरावा लागेल. थोडा वेळ चार्ज करून ठेवायचा, वीज गेली तर पुन्हा वापरायचा. असे. ते तितके सोयीचे नाही कि एक बटन दाबून होईल. दोन दोन पिना काढ घाल करावे लागतात. पण ठीक आहे. प्रयोग म्हणून ते करून पाहणार आहे. पण आधी इन्वर्टर काढून ठेऊन पाहतो. तरीही असे बिल असेल तर फ्रीज / वॉशिंग मशीन कडे मोर्चा वळवावा लागेल. जुने झालेत दोन्ही. पैकी फ्रीज शक्यता अधिक. पण तरीही इतके कंझ्युम नाही करणार (कि करेल?)
पूर्ण माहिती नसेल तर टाळलेले
पूर्ण माहिती नसेल तर टाळलेले बरे.>>+७८६. सविस्तर उत्तरासाठी धन्यवाद.
Pages