जुने सातबारा ८ अ व फेरफार विषयी

Submitted by गोडांबा on 12 July, 2021 - 11:01

महाराष्ट्र शासन मध्यंतरी जुने सातबारा , फेरफार online उपलब्ध करून देणार असे वाचले होते . परंतु अजून . काही पुणे, अ.नगर जिल्ह्याची जुनी माहिती दिसत नाही . कोणाला यासंदर्भात काही update असेल तर सांगा ...
मला ही माहिती पणजोबा आणि इतर पूर्वज यांच्या माहितीसाठी हवी आहे . म्हणजे आजोबांना लिहितावाचता येत नव्हते त्यामुळे एक दोत पिढ्यांपर्यंतच तोकडी माहिती त्यांच्याकडे आहे . मी जरा खोलात जाऊन कुतुहल म्हणून हे सगळं करण्याचा प्रयत्न करतोय .
( सातपाटील कुलवृत्तांत वाचलं .. आणि हा किडा वळवळला .. त्याची कथा बरीचशी आमच्या आजूबाजूला घडते त्यामुळे हा किडा काही स्वस्थ बसू देईना म्हणून हा धागाप्रपंच)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रायव्हेट कम्पन्या असतात
त्यांना सर्च रिपोर्ट काढायला दिला तर ते त्या जागेचा ( व्यक्तीचा नव्हे) रिपोर्ट देतात

सातबारा कुठे दाखवून जमीन घ्यायची असेल तर जुने काही कामाचे नसतात. चालू सातबारा लागतो.

म्हणजे ते सापडले तरी उपयोगाचे नाहीत. कंपुटर ते घेतच नाहीत.
कूळ कायद्यात जमिनीचा हक्क गेल्यावर त्या सर्वच कुळांनी आपली नावे सातबारावर चढवली नाहीत. जुन्या मालकांचीच आहेत. म्हणून ती वैध नाहीत.

तहसील कार्यालयात जाऊन तुमच्या गावाचे रेकॉर्ड काढून तिथे जेवढे आहेत तेवढे फेरफार मिळतील. पैसे देऊन त्याच्या साक्षांकित प्रतीचा गठ्ठा मिळेल तुम्हाला. यातून तुम्हाला तुमची वंशावळ जाणून घेता येईल. कोणाला किती मुले होती आणि कोणाकडे कोणत्या जमिनी कशा येत गेल्या हे असते. त्या त्या जमिनीचे गट नंबर भूमिअभिलेख साईटवर टाकले की सातबारा ऑनलाईन दिसतो. त्यावरपण फेरफार नोंदींचे नम्बर असतात. हे नंबर त्या गटातल्या जमिनीवर काय नोंदींचा बदल झाला ते दाखवतात. इ-चावडी म्हणून आहे तिथे गावचे अलीकडचे फेरफार दिसतात त्रोटक. ह्या सगळ्याचा उपयोग जमिनीचे दावे, नावे चढवणे-उतरवणे याला होत असतो. घराण्याची माहिती घ्यायची असेल तर वर सापडलेली नावे सांगून तुमच्या गावातच चौकशी करा म्हणजे भावकीत वगैरे.

जिददू
धन्यवाद माहितीबद्दल ... तहसील कार्यालये कोरोनामुळे टाळतोय . तहसील कार्यलयात एकदा जाऊन येईन तुम्ही म्हणताय तर ..

जमिनमालक नसतीलच जे लोक त्यांच्या पिढ्यांचा उद्धार ते काशी/ त्र्यंबकेश्वरास तेरावं घालायला गेले तरच होणार. तेही केलं नाही तर गडप.

टवणे सर ...
आजोबाच्या तोंडून थोडं स्थलांतर समजलय म्हणून हा पुढचा उद्योग

srd ...
फेरफार / जन्म मृत्युनोंद / वारस हक्क इतर कागदपत्रेही हवी आहेत ती सर्व bhumi abhilekh वर मिळतील वाचलेलं ... पण कधी हे माहित नाही .
सातबारावर त्या काळातली नावे असतीलच की ...

आताचे फेरफार आपली चावडी वर मिळतात पण हे आताचे असतात.
जुने हवे असतील तर तहसील कार्यालयात च जावं करणार.
जमिनी विषयी कायदे हे निर्दोष नाहीत तर अनेक उलटे sulte नियम आहेत.
खरेदी दस्त झाल्या नंतर काही लोक अनेक वर्ष ते register करत नाहीत.
हे काम चोर लोक ,,एजंट करतात.
त्या मुळे मालकी बदलेली तरी ७/१२ वर दिसत नाही.
शेतीविषयक कायदे बदलणे गरजेचे आहे सर्व पळवाटा बंद केल्या पाहिजेत..

जुने सातबारा, 8अ, फेरफार तालुक्याच्या ठिकाणी City survey office मध्ये मिळतात. किंवा तलाठी ऑफिस मध्ये पण मिळून जातील.

तलाठी ऑफिस मध्ये पण मिळून जातील. +१
पण तलाठी रोज नसतो गावात. ठराविक दिवशीच दर्शन भेटते त्याचे. काही नमुने महिन्यातून फक्त तीनेक वेळा येत असलेले बघितले आहे. आमच्या एका जमिनीचा वाद आहे आहे पुणे जिल्ह्यात. त्या लोकांनी परस्पर विक्री केली आणि त्या गटात आमचेही नाव असल्याने तलाठ्याने हरकत घेण्यासाठी मुदत असते त्यात कळवले नाही आम्हाला(अर्थातच). त्याला जाब विचारला तर आम्हालाच उर्मट उत्तरे मिळाली आणि जा काय करायचे करा म्हटला. मग त्याला पद्धतशीर अश्व लावले. उपनिबंधक कार्यालयात फार अनागोंदी चालू असते. संगनमताने गरीब लोकांच्या जमिनी लाटून नंतर कोर्टात लटकत ठेवलेली बरीच उदाहरणे समोर आहेत.

घरासमोर च्या मोकळ्या जागेचा city survey च उतारा घेण्यासाठी गेलो होतो.
प्रॉपर्टी कार्ड बघून त्यांनी तो दिला.
पण गावचे नाव ,बरोबर,माझे नाव बरोबर,नंबर बरोबर .पण तालुका भलताच.त्या तालुक्याचा आणि माझ्या गावाचा काही संबंध नाही.
आणि कित्येक वर्ष ते रेकॉर्ड तसेच आहे.
त्यांच्या चूक लक्षात आणून दिली तर त्यांचे उत्तर property कार्ड असेच आहे.
पण आमची मोठी चूक झाली आहे ती आम्ही बदलू पण अधिकार आम्हाला नाही.
मग येथून पुढे चालू. झाले विविध अधीकर्या कडे अर्ज करणे,स्वतःचा वेळ वाया घालवणे.
मनस्ताप.
असा सरकारी कारभार स्वतः गाढव चुका करतात आणि निस्तर्याच्या लोकांनी.