Submitted by Mohini kale on 11 July, 2021 - 04:57
मी ४वर्षापूर्वी प्रेमविवाह केलेला आहे मला लग्न प्रमाणपत्र काढायचे आहे परंतु माझ्याकडे लग्नाचा फोटो v इतर कोणताही पुरावा नाही तरी मी लग्न प्रमाणपत्र कसे काढू कृपया योग्य मार्गदर्शन करा
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
एक मोठा धागा होऊन गेला आहे
एक मोठा धागा जन्मदाखल्यावर होऊन गेला आहे
https://www.maayboli.com/node/76757
महाराष्ट्रात आजपासून 'राईट टू
महाराष्ट्रात आजपासून 'राईट टू सर्व्हिस अॅक्ट' म्हणजेच सेवा हमी कायदा लागू झालाय. यामुळे, आता तुम्हाला जन्म दाखला, लग्नाचा दाखला, लायसन्स अशा तब्बल 43 सरकारी सेवा मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज लागणार नाही.
तब्बल 43 सरकारी सेवा तुम्हाला आता घरबसल्या एका क्लिकवर मिळू शकणार आहेत. यासाठी तुम्हाला सरकारी वेबसाईटवर अप्लाय करावा लागेल... आणि ठराविक कालावधीत तुम्हाला हवे असलेल्या सेवा मिळू शकतील.
महाराष्ट्र सरकारची वेबसाईट
www.aaplesarkar.maharashtra.gov.in
वर ऑनलाईन अप्लाय तुम्हाला करावं लागेल... निर्धारित कालावधीत सरकारी अधिकाऱ्यांना या सेवा नागरिकांना द्याव्या लागणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे हाऊसिंग राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी दिलीय.
या विभागांच्या सेवांचा आहे समावेश...
महसूल विभाग, नोंदणी व मुद्रांक विभाग, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, कामगार विभाग, जलसंपदा विभाग, शासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, वन विभाग आणि नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सेवा तुम्हाला आता ऑनलाईन मिळू शकतील.
या सेवांचा आहे समावेश....
• वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र
• मिळकतीचे प्रमाणपत्र
• तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र
• ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र
• पत दाखला
• सांस्कृतिक कार्यक्रम परवाना
• प्रमाणित नक्कल मिळणे बाबत अर्ज
• अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रतिज्ञापत्र
• भूमिहीन प्रमाणपत्र
• शेतकरी असल्याचा दाखला
• सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र
• डोंगर/ दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र
• जन्म नोंद दाखला
• मृत्यु नोंद दाखला
• विवाह नोंदणी दाखला
• रहिवाशी प्रमाणपत्र
• दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला
• हयातीचा दाखला
• ग्रामपंचायत येणे बाकी दाखला
• निराधार असल्याचा दाखला
• शौचालयाचा दाखला
• विधवा असल्याचा दाखला
• दुकाने आणि अस्थापना नोंदणी
• दुकाने आणि अस्थापना नुतनीकरण
• कंत्राटी कामगार मुख्य मालक नोंदणी
• कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नोंदणी
• कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नुतनीकरण
• नोकरी उत्सुक उमेदवारांची नोंदणी
• सेवानियोजकाची नोंदणी
• शोध उपलब्ध करणे
• मुद्रांक शुल्क भरण्याचे प्रयोजनार्थ मुल्यांकन अहवाल देणे
• दस्त नोंदणी न केलेल्या प्रकरणांमध्ये, ई-पेमेंट पद्धतीने भरलेल्या नोंदणी फीचा परतावा
...तर सरकारी बाबूंना भरावा लागेल दंड
'राईट टू सर्व्हिस अॅक्ट'मध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना दंड लावण्याची तरतूद राज्य शासनानं केलीय. निर्धारित वेळत तुम्हाला सेवा मिळाली नाही तर जबाबदार अधिकाऱ्याला 500 ते 5000 रुपयांपर्यंत दंड बसेल.
सध्या सेवा हमी कायद्यात केवळ 43 सेवांचा समावेश असला तरी येत्या वर्षी मार्चपर्यंत या सेवांचा आकडा 135 वर जाण्याची शक्यता आहे.
*कृपया जास्तीत जास्त शेअर करा*
हे व्हॅटसप आले
खरे खोटे माहीत नाहीत
लग्नाचा काहीतरी पुरावा हवा.
लग्नाचा काहीतरी पुरावा हवा. दोन साक्षीदार हवे.
काहीच नसेल तर परत रजिस्टर्ड मॅरेज करावे दोन साक्षीदार घेऊन, त्यात लग्नाची तेव्हाची तारीख नोंदवल्या जाईल, जुनी नाही.
मानव सर तुमचं म्हणणं योग्य
मानव सर तुमचं म्हणणं योग्य आहे पण मला २०१९madhe मुलगा झाला त्याच्या बर्थ certificate var २०१९ वर्ष आहे आणि परत रजिस्टर merrige केल्यास त्यावर चालू वर्षाची तारीख येईल पुढं मुलाला भविष्यात काही प्रोब्लेम यायला नको म्हनून तास काही अजून केलं नाही
तांत्रिकदृष्ट्या मुलाला काही
तांत्रिकदृष्ट्या मुलाला काही प्रॉब्लेम येईल असे वाटत नाही.
तरी तुम्ही रजिस्ट्रेशन ऑफिस जवळ affidavit, सात बारा, इतर कागदपत्रे वगैरे काम करणारे एजंट्स असतात त्यांना प्रत्यक्ष भेटून बघा ते यातून योग्य मार्ग सांगु शकतील.
अन्यथा वकील गाठा.
शुभेच्छा.
आताही ऑनलाइन ऍप्लीकेशन किंवा
आताही ऑनलाइन ऍप्लीकेशन किंवा न.पा./ग्रापं ज्या क्षेत्रात असाल तिकडे फॉर्म भरून मागील तारखेची नोंदणी नक्कीच होऊ शकते. फोटोचं कसले एवढे टेंशन मंदिर + भटजी बॅकराउंड घेत एक फोटो काढला की झालं ना ! आणि फॉर्मवर सहीसाठी भटजी मॅनेज करणे का इतके कठीण असेल ? थोडक्यात धाग्याच्या विषयाचे ह्या उपायांनी निराकरण होत असेल तर नक्की टेंशन काय आहे.
अहो अनंतनी, त्यांच्या लग्नाला
अहो अनंतनी, त्यांच्या लग्नाला 4 वर्ष होऊन त्यांना एक मुलगा आहे.
माझ्या लग्नाला 3 वर्षे व 1 मुलगा आहे एवढ्यात मी ढोल ते वीणा होऊन पुन्हा आता ढोल झाले आहे. आता लग्नाचा फोटो काढला तर त्यात आणि actual लग्नाच्या फोटोत किती फरक असेल सांगा बरं. त्यांचं पण तसं असेल तर.....
धागा आलाच आहे तर पटकन विचारून
धागा आलाच आहे तर पटकन विचारून घेते
माझं लग्न US मध्ये झालं, त्याचं registration पण तिकडेच आहे तर मला भारतात काही प्रॉब्लेम्स येऊ शकतील का ? लग्न हिंदू पद्धतीने रीतसर झालेले आहे, त्याचे फोटो देखील आहेत. भारतात वेगळं काही करून घ्यावं लागेल का ?
लग्नाच्या प्रमाण पत्रावर फक्त
लग्नाच्या प्रमाण पत्रावर फक्त चेहरा दिसतो आधार कार्ड सारखा. वकिलाकडून काम करुन घ्या. थोडा खर्च होतो पण त्यानाच नियम जास्त चांगले माहित असतात(स्वानुभव)
माझ्या आई वडिलांचे लग्न झाले तेव्हाची पत्रिका आणि फोटो नव्हते. वकिला कडून affidavit करुन त्यांच्या बाकी कागद पत्रावरुन रजिस्टर लग्नाचे प्रमाणपत्र बनवले. माझ्या आईला वृत्तपत्रात जाहिरात विभागात तीचे पूर्वीचे नाव हे होते आणि आताचे नाव हे आहे व नवा घराचा पत्ता असे जाहीर करावे लागले. हे सगळे वकील सांगतात तसे करुन घ्यावे लागते.
इथे या विषयावर कोणी तज्ज्ञ असेल तर जास्त चांगली माहिती देऊ शकेल.
तांत्रिकदृष्ट्या मुलाला काही
तांत्रिकदृष्ट्या मुलाला काही प्रॉब्लेम येईल असे वाटत नाही.>>>+१
आता लग्नाचा फोटो काढला तर त्यात आणि actual लग्नाच्या फोटोत किती फरक असेल सांगा बरं. >>>> actual लग्नाचे फोटोच नाहीत ना. त्यामुळे त्या म्हणू शकतात मी तेव्हा अशीच दिसत होते.
एफीडवीटला पुरावा लागत नाही
एफीडवीटला पुरावा लागत नाही
पुरावा नसतो म्हणून तर एफीडवीट करतात
ब्लैक कैट तुम्ही म्हणता ते
ब्लैक कैट तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. बाकी कागद पत्रे म्हणजे रहिवासी पुरावा,शाळा सोडल्याचा दाखला(कारण जन्मदाखला नव्हता) इ.
१. छानसे टिपटॉप कपडे घालुन
१. छानसे टिपटॉप कपडे घालुन गळ्यात फुलांचे हार घातलेत असा एक तुमचा जोड्याने फोटो काढा.
२. एक पानी छोटीशी लग्नपत्रिका छापा,
३. असल्यास तुमच्या आणी त्यांच्या रेशन कार्डाची फोटोकॉपी/आताशा आधार कार्डाचीही चालुन जावी.
४. जवळच्या दोन मित्रांच्या (एक वराकडचा नी एक वधुकडचा म्हणुन) रेशन कार्डाची फोटोकॉपी/आताशा आधार कार्डाचीही चालुन जावी.
५. ओळखीचा कोणी लग्न लावणारा (ब्राह्मण) मित्र त्याच्या रेशन कार्डाची फोटोकॉपी/आताशा आधार कार्डाचीही चालुन जावी.
हे बाड या वरच्या लोकांसहित विवाह निबंधक कार्यालयात घेवुन जा. वेळेपेक्षा उशिरा नोंदणी करताय तर थोडाफार दंड भरुन विवाह प्रमाणपत्र मिळुन जावे.
* रेशनकार्ड की आधार काय लागेल ते तुम्हाला तपास करावा लागेल. घोळ टाळण्यासाठी रेशन कार्ड्/आधार दोन्ही न्या.
हॅपी डबल वेडिंग
मॅरेज सर्टिफिकेट नसेल तर नवर्
मॅरेज सर्टिफिकेट नसेल तर नवर्याच्या रेशन कार्ड वर ह्याण्चे नाव असणारच नाही. माहेर कडले न्यावे लागेल, आधारही जुन्या नावानेच असेल
हे वर लिहीलेले कागदपत्र
हे वर लिहीलेले कागदपत्र विवाहापुर्वीचेच लागतात.
(No subject)
आम्ही लग्नाचा 7 वर्षांनी
आम्ही लग्नाचा 7 वर्षांनी marriage certificate काढलं. त्यासाठी agent बघितला. खरतर agent ची गरज नाही. Agent la आत घेतच नाही. आम्ही कांजूरमार्ग वॉर्ड ऑफिस मध्ये काढलं. ऑनलाईन appointment बुक करा. ते सांगतील त्या वेळेस 2 +2 साक्षीदार घेऊन जा ओळखपत्रसहित. लग्नाची पत्रिका आणि लग्ना आधीचे डॉक्युमेंट्स लागतील. फोटो आमच्याकडून नाही मागितला.
<< मी ४वर्षापूर्वी
<< मी ४वर्षापूर्वी प्रेमविवाह केलेला आहे मला लग्न प्रमाणपत्र काढायचे आहे >>
<< आम्ही लग्नाचा 7 वर्षांनी marriage certificate काढलं. >>
मला एक कळत नाही की आजच्या पिढीचे, सुशिक्षित लोक लग्नाचे प्रमाणपत्र/जन्माचा दाखला का काढत नाहीत वेळच्या वेळी? (मागील पिढीचे एकवेळ समजू शकतो).
त्यांना त्या कागदपत्राचे महत्त्व माहीत नसते का? इतर कुणी सांगत नाही का? की निव्वळ आळस हे कारण असू शकते. आणि दुसरे म्हणजे समजा नाही काढले आणि आयुष्य मजेत चालले आहे, मग अशी काय गरज येऊन पडते की बऱ्याच वर्षांनी एकाएकी जाग येऊन मग ते प्रमाणपत्र काढावे लागते?
टीप: प्रश्न प्रामाणिकपणे आणि गंभीरपणे विचारला आहे, टिंगल करायचा हेतू नाही. तसे वाटल्यास ऍडव्हान्स क्षमस्व. माझ्या मित्राने पळून जाऊन आळंदीला लग्न केले. मी कॉलेजमध्ये होतो आणि त्याच्या सोबत गेलो होतो. साक्षीदार म्हणून सही पण केली होती. फोटो, पत्रिका काहीही न्हवते, पण तेव्हा सुद्धा (साधारण ३३ वर्षांपूर्वी) माहीत होते की विवाह नोंदणी करावीच लागते, त्याशिवाय कायद्याच्या दृष्टीने लग्न वैध होत नाही (म्हणजे घटस्फोट, पोटगी, मालमत्ता हक्क वगैरे साठी).
उपाशी बोका +१
उपाशी बोका +१
मी ४वर्षापूर्वी प्रेमविवाह
मी ४वर्षापूर्वी प्रेमविवाह केलेला आहे>>>>> म्हणजे नेमके काय झालय? शिवाय कोणताही पुरावा नाही. इतक्या त्रोटक माहितीवर लग्नाची नोंद आत्ता होईल असे वाटत नाही. प्रकरण संशयास्पद वाटेल.
माझा बाबतीत सांगायचं तर मी
माझा बाबतीत सांगायचं तर मी लग्नानंतर लगेच Gazzetta through नाव बदललं. कधी गरज पडली नाही marriage certificate ची. पुढे काही प्रोब्लेम नको म्हणुन आता काढलं.
मला योग्य मार्गदर्शन
मला योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार
काही काळ जी करू नये.
प्रतिसाद काढून टाकलाय
'प्रेमविवाह' केला म्हणजे
'प्रेमविवाह' केला म्हणजे नक्की काय केले?? विवाह एकतर धार्मिक पद्धतीने होतो किंवा साक्षिदारांसमोर. प्रेमविवाह म्हणजे एकत्र रहायला लागलात तर त्याला कॉमन लॉ रिलेशन म्हणतात, आणि ते भारतात 'विवाह' म्हणून ग्राह्य धरत नसावेत. ज्यायोगे कायदेशीर दृष्ट्या वैवाहिक फायदे मिळतील, जसे मरणोत्तर पेंशन, जमिनजुमल्यात वाटा, पोटगी इ.
पाश्चिमात्य काही देशांत कॉमनलॉला मान्यता आहे आणि त्याला कर इ. विवाहाला ज्या सुटी मिळतात त्या मिळतात.
बाकी खोटी कागदपत्रे कशी मिळवायची याची माहिती तुम्हाला हवी होती असे दिसते. ते मिळलेले आहेच.
हा टाईमपासचा धागा आहे कल्पना आहे, माझा ही टाईमपास!
प्रेमविवाह' केला म्हणजे नक्की
प्रेमविवाह' केला म्हणजे नक्की काय केले??>> ते मंदिर मे जाउन भगवान को साक्षी मानकर वगैरे असे असेल. नेमका मंदिरातला फोटो ग्राफर चहा प्यायला गेला असावा.
बेसिक मेल सिडक्षन टेक्निकला बळी पडलात ताई तुम्ही. बघा अजुन सुटकेला चन्स आहे. रजिस्टर नाही झाला प्रेम विवाह.
आणि पोराचे काय? त्याला कुठे
आणि पोराचे काय? त्याला कुठे लोटाय्चे? आई बाबा दोन्ही असणे हा त्याचा हक्क आहे हो.. दोघना राहुदे अडकुन आयुष्यभर..
बेसिक मेल सिडक्षन टेक्निकला
बेसिक मेल सिडक्षन टेक्निकला बळी पडलात ताई तुम्ही. बघा अजुन सुटकेला चन्स आहे. रजिस्टर नाही झाला प्रेम विवाह.
तुम्ही चक्क मुन्नाला सोडायला सांगताय. बब्बन आणी मंडळींनी केलेली मेहनत फुकट कां ?
नेमका मंदिरातला फोटो ग्राफर
नेमका मंदिरातला फोटो ग्राफर चहा प्यायला गेला असावा. >>> लग्नात हजारों रुपये देऊन फोटोग्राफर हायर केला तरी जवळचे लोक मोबाईलवर सतत फोटो घेत असतात. नवरानवरी सुद्धा एखादी तरी सेल्फी काढण्याचा मोह आवरू शकत नाहीत, त्यामुळे प्रेमविवाह असला तरी काही फोटो असायलाच हवेत. चार वर्षे म्हणजे अलीकडच्या काळातील लग्न. स्वतः, मित्रमंडळी, लग्न लावणारे गुरुजी मिळुन काही तरी फोटो काढले असणारच. नसेल तर हा धागा फेक.
कुणाला दुखवायचे नाही आहे.. पण
कुणाला दुखवायचे नाही आहे.. पण मला काहीसे सुचले.
घरातल्या घरात केलं असेल लग्न.. ते नाही का एखादा टीपॉय मोडून त्याला आग लावतात. आणि त्याच्या भोवती ७ फेरे घेतात, मग रक्ताने टिळा करतात.. एवढ्या इमोशनल सिन मध्ये कुठला फोटोग्राफर आणि कसले काय, फक्त डोळ्यांनीच काय ती फोटोग्राफी.. मनाच्या कप्प्यात चितारलेले चित्र..