हलका फुलका झटपट नाश्ता ...सुशीला ...

Submitted by MSL on 19 June, 2021 - 12:09
sushila
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

4 वाटी चुरमुरे,
2 कांदे बारीक चिरून,
2 हिरव्या मिरच्या तुकडे करून,
कडीपत्ता पाने 7,8
ओले.खोबरे अर्धी वाटी
कोथिंबीर लिंबू साखर चवीनुसार
अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे,
तेल, मीठ,हळद,जिरे ,हिंग हे फोडणीचे साहित्य
.. बारीक शेव / फरसाण / लसूण शेव हवे असल्यास ..ऑप्शनल आहेत..

क्रमवार पाककृती: 

1. चुरमुरे पाण्यात घालून , 1 मिनिटभर भिजवून ,चाळणीवर ओतून ठेवावे..
2 .
नेहमीप्रमाणे फोडणीसाठी तेल घेऊन त्यात जिरे मोहरी हिंग हळद मिरची कांदा घालावे...परतून घ्यावे...
3. त्यातच शेंगदाणे घालावे आणि कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यावे..
4. त्यावर चुरमुरे टाकावे..चांगली 3 ते 4 मिनिट वाफ काढावी..
5. गॅस बंद करून , कोथिंबीर लिंबू खोबरे घालून गरम सर्व्ह करावे..
6. हवी असल्यास शेव फरसाण घालू शकता...

वाढणी/प्रमाण: 
4 ते 5
अधिक टिपा: 

@@ असेच कायतरी बदल म्हणून वेगळे खाणे...रोजचे साहित्य असल्याने पटकन होते..

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट आणि माझे बदल
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला पण आवडतो हा पदार्थ.

ह्यात आम्ही डाळवं म्हणजे भाजलेली चणाडाळ जी बाजारात मिळते, चिवड्यात घालतो ते अर्धवट कुटून घालतो. ते मस्ट आहे ह्या रेसिपी साठी.

तो सुशीला कि ती सुशीला?

ओल्या कुरमुर्‍यांचा लगदा वा गोळा होऊ नये म्हणून काही टिप्स आहेत का? कुरमुरे भिजवा म्हटले की पहिले तेच डोळ्यासमोर येतेय. हे खात्रीने होणार नसेल तर ट्राय करायला हवे

एक दोन वेळा पोहे नव्हते तेव्हा जुगाड म्हणून कुरमुरे वापरून "कांदे पोहे" बनवले होते. पोहे जड होतात, छातीत जळजळतं म्हणणार्यानी ही परत मागून खाल्ले.
ओल्या कुरमुर्‍यांचा लगदा वा गोळा होऊ नये म्हणून काही टिप्स आहेत का? >>> अजिबात लगदा होत नाही. प्रत्येक कुरमुरा वेगळा राहतो.

खुप मस्त चव असते सुशिलाची. सोलापूर भागात हा पदार्थ केला जातो हे मी एकदा सोलापुरी स्नेह्यांच्याकडे गेल्यावर कळाले. त्यांच्याकडे पहिल्यांदाच हा पदार्थ खाल्ला होता त्यामुळे आवर्जून कसा करतात ते विचारलेलं मी. घरीही करून बघितला होता. पोह्यांच्या पेक्षा छान वाटतो खायला.

सोनाली आणि स्वस्ति ओके धन्यवाद ट्राय करतो सुशिला. केल्याशिवाय कळणार नाही.

@ च्रप्स, चहात पोहे टाकून खाल्लेत. एक्स्ट्रा दूध आणि एक्स्ट्रा साखर टाकून छान लागते. पण चुरमुरे ज्याला आमच्याकडे कुरमुरे बोलतात ते नाही कधी टाकले.
आई क्नो शरमेची गोष्ट आहे. कारण शेव, फरसाण, गाठी, पापडी, खारीचा चुरा, चकली, शंकरपाळी, अगदी करंजी वा रव्याचा केक वगैरे बरेच बुडवून वा कुस्करून खाल्लेय चहासोबत. पण नुसते कुरमुरे फिके लागतील म्हणून कधी ट्राय केले नाहीत.

नुसते कुरमुरे फिके लागतील >>
कुरमुऱ्यांना दोन भोकं करायचे सुई/टाचणीने. मग त्यात चहा जाईल आणि सप्पक नाही लागणार. इच्छा तेथे मार गं.