ख्रिस्तियानो रोनाल्डोने १२ सेकंदात आणि दोन शब्दात दिला कोकाकोलाला ३० हजार कोटींचा फटका!
जगप्रसिद्ध फुटबॉलपटू आणि पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो आज सामना संपल्यावर पत्रकार परिषदेसाठी आला. तेव्हा त्याच्यासमोरच्या टेबलावर कोकाकोलाच्या दोन बाटल्या ठेवल्या होत्या. कारण कोकाकोला त्या स्पर्धेचे प्रायोजक आहेत. त्याने त्या कोल्ड्रिंकच्या बाटल्या बाजूला सारल्या. पाण्याची जवळ घेतली आणि दोनच शब्द उच्चारले,
पाण्याची बॉटल हातात ऊंचावत म्हणाला, वॉटर !
आणि त्यानंतर उपहासाने म्हणाला, कोकाकोला ...
गेम ओवर !
त्याच्या या साध्याश्या कृतीने कोकाकोला वा तत्सम फसफसणारी शीतपेये कशी आरोग्याला हानीकारक आहे असा जगभरात संदेश गेला आणि कोका कोला कंपनीचे शेअर्स १.६ टक्क्यांनी खाली घसरले . कोका कोला कंपनीला ४ बिलिअन डॉलर्सचं म्हणजेच जवळपास ३० हजार कोटींचे नुकसान झाले.
सविस्तर बातमी ईथे वाचू शकता - https://www.bbc.com/marathi/international-57499305
विडिओ ईथे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=KQVuV0l8TZ8
मला या त्याच्या कृतीचा ईतका आनंद का झाला जे धागा काढून साजरा करावा?
कारण एकेकाळी मी स्वत: रोज पाण्यासारखी अशी फसफसणारी पेय प्यायचो. त्याचे परीणामही भोगले. त्यानंतर आज गेले कित्येक वर्षे एक घोटही घेतला नाहीये. घरच्यांनाही हे टाळायला सांगतो. आणि मुलांनाही हि वाह्यात पेय असतात असेच सांगतो. घरचे माझे ऐकून क्वचितच पितात. पण तरीही पितात. मुलांना अजून दूरच ठेवले आहे. पण मोठी झाल्यावर कदाचित ते आता वडिलांचे काय ऐकायचे म्हणत याबाबत आपला स्वतःचा (आणि चुकीचा) निर्णय घेऊन मित्रांसोबत ही शीतपेये पिण्याची शक्यता आहेच. आणि हे चित्र माझ्याच नाही तर बरेच घरात असेल जिथली मुले वडिलांचे न ऐकता अश्या शीतपेयांच्या नादी लागली असतील. त्या सर्व बापांना आज छान वाटले असेल, कारण त्यांच्या मुलांना आज जाणवले असेल की आपले वडीलच येडे नाहीयेत जे या पेयाला विरोध करतात. एक अजून आहे. आणि तो सुद्धा एक जगभरातला लोकप्रिय आणि आदर्श खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो आहे.
प्रायोजक कंपनीचे प्रॉडक्ट असे बाजूला सारायला नक्कीच फार हिंमत लागत असेल. अशी हिंमत तत्वे पाळणारा एखादा सच्चा माणूसच दाखवू शकतो. जे सेलेब्रेटी पैश्यासाठी मद्य, सिगार, शीतपेये यांच्या जाहीराती करत असतील त्यांना दोष द्यायचा बिलकुल हेतू नाही. कारण हे धाडसाचे काम आहे, सर्वांना जमायलाच हवे अशी अपेक्षा नाही करू शकत. कदाचित त्या जागी मलाही हे नाही जमणार. पण जे हे धाडस दाखवू शकतात, दाखवतात त्यांचे कौतुक करायलाच हवे. कारण तुम्ही तुमच्या या कृतीतून आमच्यासमोर तर आदर्श ठेवतातच, पण आमच्या मुलांवरही योग्य संस्कार करायला हातभार लावता.
धन्यवाद मित्रा ! ❤️
- ऋन्मेष
एनर्जी ड्रिंक बद्दल काय मत
एनर्जी ड्रिंक बद्दल काय मत आहे ? मी कॉलेजची चार वर्षे आठवड्याला डझनभर रेडबुल रिचवायचो. जवळपास व्यसनच म्हणा. नंतर हळुहळू कमी करत बंद केले पुर्ण. मलातरी काही दुष्परिणाम नाही जाणवला पण रातच्या जागरणांसाठी (आणि त्याबरोबरच्या बाकी गोष्टींना)फायदाच व्हायचा. होलसेलने बॉक्सचा आणायचो त्यामुळे स्वस्त पडायचे.
कंपनीचे स्टॉक मार्केट
कंपनीचे स्टॉक मार्केट कॅपिटलायझेशन ४ बिलियन डॉलरने कमी झाले तर त्यात इतकी आनंदाची बातमी काय आहे? त्याने कंपनीला काहीही फरक पडत नाही कारण ती सेकंडरी मार्केटची कंपनीची किंमत आहे, त्याने कंपनीचा फायदा कमी होत नाही.
मी कोकाकोलाचा शेअरहोल्डर नाही, पण 5 cent मध्ये प्रॉडक्ट बनवून 50 cent मध्ये विकण्याचा अतिशय फायदेशीर व्यवसाय आहे हा. शेअरहोल्डर्ससाठी सुंदर. शिवाय कोक प्यायलाच हवा, अशी कुठलीच जबरदस्ती कुणी केलेली नसते कधी.
एनर्जी ड्रिंक बद्दल काय मत
एनर्जी ड्रिंक बद्दल काय मत आहे ? मी कॉलेजची चार वर्षे आठवड्याला डझनभर रेडबुल रिचवायचो.
>>>>
मला याबद्दल काही माहीत नाही. दुकानात कधी दिसले की कुतुहलाने बाटली ऊचलायचो. किंमत बघायचो. बहुधा हे कोल्ड्रींकपेक्षा महाग असावे. त्यामुळे सरबताला काय एवढे पैसे घालवायचे म्हणत बाटली पुन्हा ठेउन जे त्या दुकानात विकत घ्यायला आलोय तेवढेच घेऊन निघून जायचो
कंपनीचे स्टॉक मार्केट
कंपनीचे स्टॉक मार्केट कॅपिटलायझेशन ४ बिलियन डॉलरने कमी झाले तर त्यात इतकी आनंदाची बातमी काय आहे?
>>>
मी सुद्धा कुठेही याला आनंदाची बातमी म्हटलेले नाहीये
जे काही झाले त्याने हा विषय चर्चेत आला याचा मात्र आनंद झाला
त्याने कंपनीला काहीही फरक पडत नाही कारण ती सेकंडरी मार्केटची कंपनीची किंमत आहे, त्याने कंपनीचा फायदा कमी होत नाही.
>>>>>>>
हे छान झाले. कोणाचे नुकसान व्हायला नको.
5 cent मध्ये प्रॉडक्ट बनवून 50 cent मध्ये विकण्याचा अतिशय फायदेशीर व्यवसाय आहे हा. शेअरहोल्डर्ससाठी सुंदर.
>>>>>>>
कसिनो चालवणे हा सुद्धा छान व्यवसाय आहे. उध्वस्त होतात ते तिथे जाऊन जुगार खेळणारे.
मुद्दा लक्षात घ्या. मला या व्यवसायातल्या ग्राहकांची चिंता आहे.
शिवाय कोक प्यायलाच हवा, अशी कुठलीच जबरदस्ती कुणी केलेली नसते कधी.
>>>>>>>
मी देखील कोणाच्या हातातून जबरदस्ती कोकाकोलाची बाटली खेचून घेत नाहीये
शिवाय कोक प्यायलाच हवा, अशी
शिवाय कोक प्यायलाच हवा, अशी कुठलीच जबरदस्ती कुणी केलेली नसते कधी.
>> कॅरेकट... पेप्सी पण ट्राय करा कधी कधी...
पेप्सी ट्राय करायचीच असेल तर
पेप्सी ट्राय करायचीच असेल तर दुधाची करा, ती छान असते. हल्ली मिळते का कल्पना नाही.
Thats unhealthy... हे म्हणजे
Thats unhealthy... हे म्हणजे स्कॉच नको पण देशी प्या झाले...
त्यापेक्षा ताक प्या.
त्यापेक्षा ताक प्या.
Pages