हँडी चॉपर

Submitted by लालू on 24 November, 2009 - 16:09

ही वस्तू घेऊन ठेवा. उपयोगी पडते.

हँडी चॉपर

दुकानात बहुतेक $९.९९ ला मिळेल. साल्सा, भरड चटण्या, बटाटेवड्यासाठी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर वाटण चांगले होते.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलींनो, तुमच्या रिस्पेक्टीव्ह चॉपर्समधे खमंग काकडीसाठी काकडी कशी चोचवल्या जाते ते सांगा. पाणी न सुटता छान एकसारखी चोचवून निघत असेल तर आजच हे यंत्र विकत घेते.

मिक्सर चे छोटे भांडे असाताना पण हा चॉपर घ्यावा का? जास्त सुटसुटीत आहे का? मला भाज्या आणि कांदे कापायला अश्या प्रकारचे काहितरी घ्यायचे आहे.

हे खूप सुटसुटीत आहे. साफ करायलाही सोपे. पण लहान आहे. भाज्या वगैरे चिरता येणार नाहीत. वर लिहिल्याप्रमाणे चटण्या, साल्सा, वाटण यासाठी उपयोगी. फास्ट होते. कान्द्याचे ४ माग करुन टाकले तर चॉप होतो.
भाज्यांसाठी फूड प्रोसेसर. त्यात पल्स वापरुन काकडी होते. पण थोडे पाणी सुटेलच.
हे इलेक्ट्रिक उपकरण आहे. भारतातल्यासाठी मिळेल का माहीत नाही.

माझ्या लिंकमधलं इलेक्ट्रिक नाही. कांदा भरपूर प्रमाणावर हव असेल तर पटापट होतो. एकदम सुटसुटीत आहे स्टोअर करयलाही. भाज्याही चॉप होतात.

माझ्याकडे पण आहे हा चॉपर. गाजर हलव्यासाठी गाजरं पण एकदम मस्त नि पटकन चॉप होतात. किसायची गरज नाही.

माझ्याकडे हाच आहे चॉपर. मी वॉलमार्ट मधुन ६ वर्षापुर्वी घेतलेला.
स्वर ,मी आई साठी नेलाय हा चॉपर. भारतात इलेक्ट्रिक वस्तु दुरुस्त करणार्‍या दुकानात कन्व्हर्टर मिळतो तो आणायचा. १५ रुपयांपासुन मिळतो.

thanks सीमा. साबां ना डायबेटिस आहे. त्यांना उपयोगी आहे.
भारतात इलेक्ट्रिक वस्तु दुरुस्त करणार्‍या दुकानात कन्व्हर्टर मिळतो तो आणायचा. १५ रुपयांपासुन मिळतो.
>> हो हो. आहेत हे कन्व्हर्टर पुण्यात माझ्याकडे.

लालू तू मागच्यावेळी मैत्रेयीकडे दाखवला ना आम्हाला तेव्हाच घेतला मी टार्गेट मध्ये, मला ६.९९ ला मिळाला.

माझ्याकडे पण होता हा चॉपर, उपयोगी आहेच, होता म्हणायचे कारण वरच झाकण तुटल आणी झाकण लॉक झाल्याशिवाय चालत नाही हा चॉपर..मी टारगेट मधुन घेतला होता २ वर्षापुर्वी $९.९९ लाच.

हा चॉपर मी पण खूप वापरला आहे.

भारतात ही सहज मिळतो. मी माझ्या तीन मैत्रिणिंना इथूनच घेऊन गिफ्ट केलाय. १५०० - ३००० रु. च्या रेंज मधे मिळतो. इथूनच घेतला तर कंव्हर्टर ची भानगड नसते.

मी हा हाताने दाबायचा वापरते.. फक्त भाज्या कापायला (वाटण वगैरे होत नाही), पण उत्तम आहे. २ प्रकारे कापता येते. बारीक आणि जाडसर.

http://www.bedbathandbeyond.com/product.asp?order_num=-1&SKU=14556052&RN...

कांदा वगैरे कापुन तेलात टाकल्यावर विचित्र वास पण येत नाही जो मला फुड प्रोसेसर मधे केल्यावर येत असे.

नवर्‍याकडे कापायचे काम असते म्हणुन तो भाज्या कापताना 'one of the best investments' असे मधुनच जोरात ओरडुन सांगतो स्वतःला. Happy

>>मी अजून एक उपयोग करते ह्याचा..पुरणयंत्रासारखा..छान निघते पुरण ह्याच्यातून.>>खरे कि काय्...मी नक्की ट्राय करेन आता.
बाकी चॉपर मस्तच आहे.मी costco मधुन घेतला होता ५ वर्षापुर्वी. अजुन चालतोय.

शर्मिलाने फारच जाहिरात केल्यामुळे कालच घरी जाताना घेतला आणि संध्याकाळी कांदा त्यात चॉप केला. अगदी उपयुक्त! आणि मुख्य म्हणजे भांडं/ब्लेड डिशवॉशर सेफ आहे. (मिक्सरचं लहान - चटणीचं - भांडं एकदा डिशवॉशरमधे टाकलं तर जॅम होवून बसलं होतं! Sad )

स्वाती, मी पण तो काही वर्षांपूर्वी शुक्रवारीच घेतला होता $५ ला. Happy

अक्षरी, भारतात कुठे मिळेल, ब्रॅन्ड वगैरे माहिती लिही ना.

ह्या चॉपर मधे कोबी, गाजर , बटाटे वगैरे चॉप होतात की पार लगदा ?
सुनिधी तुम्ही सागितलेलं Vidalia Chop Wizard गाजर कापण्यासाठी मजबुत आहे का ?

जरा मोठे घेतले तर होतील. पल्स अ‍ॅक्शन असलेल्या फूड प्रोसेसरमध्ये लगदा न होता भाज्या कापल्या जातात. मी लिहिल्याप्रमाणे याचा आकार लहान आहे. दीड कप. पण फास्ट होतात गोष्टी. फक्त झालेले काढा, पुन्हा दुसरे घाला असे करावे लागेल. कोशिंबीरीसाठी बेबी कॅरट्स होतील.

श्री, हो, गाजर कापता येते. व्यवस्थीत एकाच आकाराचे तुकडे होतात ते छान दिसतात. मी ह्यात कांदा, टोमॅटो, गाजर, काकडी, ढबु मीरची, कोबी, फ्लॉवर, दूधी, बटाटा अशा सर्व फळभाज्या कापुन भाज्या करते. एकाचवेळेस भरपुर मावते त्याच्या भांड्यात.

माझ्याकडे सुद्धा हा चॉपर होता. पण प्राजक्तानी लिहिलय तसचं माझ्याही चॉपरचं झाकण तुटल्याने तो टाकुन द्यावा लागला.
सध्या मी हा http://www.bedbathandbeyond.com/product.asp?order_num=-1&SKU=13485062&RN...
वापरते. मस्त आहे. रोजच्या वापरासाठी बेस्ट. भाजी, कांदा, मिरच्या चिरणे, आलं लसुण बारीक करणे, ताक करणे सगळं एकाच वेळी करता येतं.

माझ्या एका मैत्रिणीने भारतात आणला होता हा चॉपर अमेरिके हुन पण तिला अडाप्टर घ्यायला लागलं...कारण बहुधा तिथले आणि इथले विजेचे सॉकेट्स वेगळे असतात म्हणे..(ही माझी वरवरची माहीति Proud )

इथे भारतात कुठे मिळेल?? कुणि सांगु शकेल काय?

माझ्याकडे ब्राऊन चा हँड ब्लेंडर आहे -मेसीज मधनं घेतला होता बारा -तेरा वर्षांपूर्वी. कांदा टॉमेटो चिरणे, गाजरं चिरणे, दाण्याचं कूट, वाटली डाळ, कढी गोळ्याची डाळ वाटणे, आलं लसूण भरड वाटणे इत्यादी साठी एकदम बेस्ट. त्याचंच एक इमर्शन अटॅचमेंट आहे - त्याने लस्सी, मिल्क शेक, पालका किंवा टोमेटॉ प्युरे करता येतात. शिवाय अजून दोन अटॅचमेंट आहेत त्याने केक, बनाना ब्रेड वगैरेचे पीठ मिसळता येते. साध्या ब्रेडचे पीठ सुद्धा मळता येते असे लिहिले होते - ते मात्र मी कधी करून पाहिले नाही.

इथल्या भारतीय दुकानात अन २२०व्होल्ट्स्.कॉम वगैरे ठिकाणी भारतात चालणारे ब्लेंडर्स मिळतात. मी बर्‍याच जणांना घेऊन पाठवलेत .
बेस्ट $५० आय स्पेंट !

भारतात मी लोकल इकेक्ट्रिकल दुकानातून हे चॉपर घेतलं होतं २५०० रु. ला. मी केनवूड चे ३ चॉपर घेतले होते. भारतात चायनीझ मेक चे अनब्रॅण्डेड मिनी चॉपर १५०० ला पण मिळतात. साधारण १५००-३००० च्या रेंज मधे हे चॉपर भारतात सहज उपलब्ध आहेत.

इतक्या छोट्या वस्तु साठी कंव्हरटर ची भानगड नकोशी वाटते. विशेषतः कुणाला गिफ्ट करायचे असेल तर ते नकोच.

Pages