Submitted by रानफूल on 19 June, 2021 - 15:30
माझी मेहुणी, अगदी हुशार, समंजस (आणि विवाहित). तिचा आणि माझा स्वभाव बऱ्यापैकी जुळणारा. तिला माझ्याबद्दल नितांत आदर आणि विश्वास. मलाही तिचा विचारी स्वभाव भावणारा.
पत्नी ही तर आयुष्याचा केंद्रबिंदू. पण मैत्रीचं, मैत्रिणीचं नातंही तितकंच सुंदर.
गेली कित्येक वर्षे नात्यांच्या बंधनांचं ओझं जाणवत आलंय.
त्यामुळे मनाला साद घालणारा संवाद असा नाहीच. आपली आवडती व्यक्ती समोर असूनही व्यक्त न होता येणं हे शल्य नेहमी राहील, असं वाटतंय.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पत्नीशी कदाचित मैत्रीचे नाते
पत्नीशी कदाचित मैत्रीचे नाते जुळले नसावे त्यामुळे ईतर निखळ मैत्रीच्या नात्याबद्दल निसंकोचपणे सांगता येत नसावे असे मला वाटते.
तुमच्या त्रोटक माहितीवर फार काही मत व्यक्त करू शकत नाही. सल्ला अर्थातच तुम्ही काही मागितला नाहीये. म्हणून मग या विषयाला धरून माझ्याबाबतच सांगतो.
मी माझ्या एका मैत्रीणीशीच लग्न केल्याने तेव्हाही आणि आजही कुठल्या मुलीशी माझी किती घनिष्ट मैत्री आहे हे सगळे तिला सांगणे होते. त्यापैकी बहुतांश मैत्रीणींबद्दल तिला काही आक्षेप नसतो. भले मग ती एका प्लेटमध्ये माझ्यासोबत पाणीपुरी खाणारी कलीग असो किंवा माझी झोपायची आणि फ्री टाईमची वेळ रात्रीची आहे म्हणून रात्री बाराला कॉल करणारी कॉलेजची आणि आता आमची कॉमन झालेली मैत्रीण असो, किंवा गप्पांच्या ओघात टीशर्टची बाही वर करून मला दंडाची बेटकुळी दाखवणारी ऑर्कुटवरची मैत्रीण असो, तिला काही प्रॉब्लेम नसतो. अॅण्ड व्हायसे व्हर्सा.. पण त्याचवेळी तिला वाटले की एखाद्या मुलीच्या मनात समोरून माझ्याबद्दल मैत्रीपेक्षा जास्त वा वेगळ्या फिलींग्स आहेत तर ती मला तिच्यापासून दूर राहा सांगते आणि मी फारसा वाद न घातला तिचे ऐकतो कारण तिला असुरक्षित न वाटणे गरजेचे. अश्याने सगळी नाती आपापल्या जागी निखळपणे जपली जातात.