Submitted by सान्वी on 7 June, 2021 - 06:07
सध्या वेबसिरीज च्या धाग्यावर या सिरीजची सुरू असलेली चर्चा लक्षात घेता यावर नवीन धागा काढते आहे. येथे स्पॉईलर सकट चर्चा करू शकता. ज्या मंडळींची अजून बघून व्हायची आहे त्यांनी पूर्ण झाल्यावरच या धाग्यावर या.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मला एकच कळत नाही, इतके हल्ले
मला एकच कळत नाही, इतके हल्ले होतात, इतकी माणसं मरतात तरी यांना एक बुलेटप्रूफ वेस्ट का दिले जात नाही?>>>एग्झॅक्ट्ली. मला हजार दा हा विचार येऊन गेला मनात.
मेंटलिस्ट मध्ये त्या नव्या
मेंटलिस्ट मध्ये त्या नव्या मुलीला पण उगीच निपटवलं बिना बुलेट प्रूफ.
खूप चांगला रोल होता तिचा.
मिलिन्द जाण्याच्या सीन ला आणि
मिलिन्द जाण्याच्या सीन ला आणि त्याला ट्रिब्युट देतात त्या सीन ला डोळे पाणावल्या शिवाय राहत नाहित. किती स्मार्ट आणि तडफदार दाखवलाय तो
राजी सर्व अॅटॅक च्या सीन ला जी काही अभिनय दाखवते त्याल तोड नाही.. पण साजिद शी नाळ जुळलेली असताना,
तो मेला हे कळल्यावर थोड्या भावना दाखवायला हव्या होत्या फेसवर, त्या मिस्सीन्ग आहेत.
मवा ची अभिअनय क्षमता अफाट आहे.. मुलाशी बोलताना मिश्किल, जेके शी बोलताना शिव्या, बॉस चा पकाऊपणा सहन करताना आणि उफाळुन आल्यावर त्याला थोबाडताना काय अॅक्टिन्ग केली राव..भारी जबरा
त्या बॉस वाल्या सीन ला किति
त्या बॉस वाल्या सीन ला किति जणांना मनातून गुदगुल्या झाल्या असतील गणतीच नाही.
मवा मस्तच आहे.
राजी साजिद च्या सीन ला एकदम फ्रोझन झालेली वाटली. नंतर ती ज्या त्वेषाने बकाबक भात खाऊन संपवते त्यातून तिचा 'साजिद पण गेला. आता तर काही केल्या हे मिशन यशस्वी करणारच' असा अविर्भाव दिसला.
मला ट्रिब्युट च्या सीन ला वाईट वाटलं खूप.मिलिंद सगळीकडे लोकांना कोणत्यातरी संकटातून सोडवतो. पाशा मेला तिथे पण मिलिंद नसता तर बिलाल ने जेके ला पण एखादी गोळी मारलीच असती.
जेके त्या मानाने सावधपण अगदीच हरवलेला वाटतो. मुळात पात्र तसंच लिहीलं असेल.
ओरायन च्या सिझन १ अडचणीत मिलिंद ने एखादा फोन जेके ला का केला नाही? जेके चा फोन डेस्कवर नव्हता.त्याच्या बरोबर होता.
राजी साजिद च्या सीन ला एकदम
राजी साजिद च्या सीन ला एकदम फ्रोझन झालेली वाटली. नंतर ती ज्या त्वेषाने बकाबक भात खाऊन संपवते त्यातून तिचा 'साजिद पण गेला. आता तर काही केल्या हे मिशन यशस्वी करणारच' असा अविर्भाव दिसला.>> हो बरोबर. बहुधा डायरेक्टर ला हेच दाखवणे अभिप्रेत असावे, जास्त भावना शो न दाखवता..
एक प्रश्न :
एक प्रश्न :
समीर लंडन मध्ये एका अधिकर्र्याला मारतो.. त्याला कुणीच पकडत नाही?
अगदी मोकळा फिरतो..रस्त्यांवर...!
त्याने १० मिनीट सीसीटिव्ही ऑफ
त्याने १० मिनीट सीसीटिव्ही ऑफ केलेले दाखवले आहेत.
खरं तर हा लगेच मेला. सुरक्षारक्षक लगेच बाहेर जाउन पाठलाग करुन पकडू शकले असते.
आणि शेवटी त्या चेक
आणि शेवटी त्या चेक नाक्यावरच्या अधिकाऱ्याला पण झोडपतो ते भारी जमलंय. खुप हसले तेव्हा
चेक नाक्यावरच्या अधिकाऱ्याला
चेक नाक्यावरच्या अधिकाऱ्याला गप्प करायला नक्की काय दिलं?(पैसे की शरीर की धमकी)
मला आधी वाटलं ती त्याला मारूनच बाहेर आली असेल.
ती चेक नाक्यावरच्या ऑफिसरला
ती चेक नाक्यावरच्या ऑफिसरला भेटून येते ते शर्ट चढवतच.
बकाबका भात खाण्यातून साजिदबद्दलच्या फीलिंगही जाणवतात. पण साजिद तिच्याकडे अट्रॅक्ट झालाय की तो तिच्याकडे फक्त जिहादमधला साथी म्हणून पाहतोय ते कळलं नाही.
उमियाळचं काय होतं?
फक्त चौकशी/तपास करायला जाताना बुलेटप्रुफ फारच ऑबविअस आणि सामान्य जनांना ॲप्रोच करायला अडथळा ठरेल. म्हणून वापरत नसतील. यातल्या बर्याचशा कारवाया अचानक झाल्यात.त्यावेळी अचानक कुठून आणणार बुलेटप्रुफ जॅकेटस्?
साजिद ला तिच्या बद्दल आदर आहे
साजिद ला तिच्या बद्दल आदर आहे.त्याला इतकी डेडिकेटेड आणि थंड डोक्याने मिशन पूर्ण करणारी सहकारी मिळाली.त्याच्या डोळ्यात 'असे तयारीचे पाहिजे रिसोर्स!! कारण मी असा आहे.मी मिशन पूर्ण करताना भावनांमुळे मागे सरत नाही.ही पण सरणार नाही.' असे भाव दिसतात.
तो गोळी लागल्यावर तिला उचलून आणतो, उपचार करतो ते पण महत्वाचा रिसोर्स बाद होतोय या भावनेने.ती व्यवस्थित झाली याचा कॉन्फिडन्स येताच तो मुंबईला निघतो श्रीकांत मुलीसाठी च्या कामाला.
उमियाळ जखमेतून रिकव्हर होतेय.
उमियाळ जखमेतून रिकव्हर होतेय.
पण शेवटी शेवटी च्या भागात एखादा संदर्भ यायला हरकत नव्हती.
मेडल्स मध्ये उमियाळ चे नाव नाही कारण तिची मदत बहुधा ऑफिशियल नसेल. मुथ्थु सुरुवातीला म्हणत असतो ना, लोकल पोलीस ला युक्त आणू शकत नाही असं.
आणि, खरच अशी मेडल्स परत
आणि, खरच अशी मेडल्स परत करतात का?
मला ध्रिती चं ते पलंग ओढून दरवाजाला लावण वगैरे जरा अतिशयोक्त वाटलं........ आणि तो कल्याण लगेच्च तिच्या हल्ल्याने मरतो तेही......!
शेवटी...सुचीला जरा हसून दोन शब्द कौतुकाचे बोलायला काय झालं श्रीकांतशी? सदा आपली घुम्म चेहेरा करुन वावरते....
मायबोली वरचा 'नवरा- बायकोच्या नात्यात ट्रांसपरंसी असावी' धागा वाच म्हणावं एकदा......
ध्रिती चं वागणं रूड आहे खरं.
ध्रिती चं वागणं रूड आहे खरं. पण आईबाबांची भांडणं असलेल्या बऱ्याच घरात टीनेजर असेच असतात.आपलं घर इतरांपेक्षा वेगळं आहे याची जाणीव आणि लाज, बाकी काही असो मी माझ्या आयुष्याची ही फेज चांगली जगणारच असा बेदरकारपणा आणि आईबाप असे का विचित्र वागतात हा संताप.
सूची च्या वागण्यात गिल्ट जाणवतो.तिला श्री शी चांगलं वागायचंय पण आता इतका दुरावा आलाय की अचानक चांगलं वागणं स्वतःलाच विचित्र वाटेल.शिवाय श्री ने लग्न जमताना काय काय थापा मारल्यात आपल्याला माहीत नाही.
सुचीला जरा हसून दोन शब्द
सुचीला जरा हसून दोन शब्द कौतुकाचे बोलायला काय झालं श्रीकांतशी? >>> ह्म्म. बहुतेक तिला गिल्ट आहे. त्याचा खुलासा होईल पुढच्या भागात.. आणि तो नेहमी तिच्याशी खोटं बोलतो याचा राग आहे तिला.. पण हे खरं की.. ती प्रेमाने बोलत नाही, त्याच्या कामा प्रती तिला काही आदर नाही किंवा तो किती जबाब्दारी चं काम करतो याची कल्पना नाही.!
मागच्या सीझन मधे आणि या
मागच्या सीझन मधे आणि या सीझनमधे खूप वेळ गेल्याने आता मागच्या सीझनमधल्या खूप गोष्टी विस्मरणात गेल्या आहेत.
त्या सीझनमधे श्रीकांतचे सतत खोटे बोलणे, खोटं सांगून कुठेतरी जाणे आणि सुचीला नंतर ते ति-हाईताकडून कळणे यामुळे वाद होत असतात. तिचे फोन तो उचलत नसतो. तिला काळजी वाटत असेल हे त्याच्या गावी आहे कि नाही ही सुचीला शंका असते.
शाळेत मुलीला सस्पेन्ड करतात. त्या वेळी तो मिशन मधे असतो. पण त्याच्या अशा कामामुळे तिला नेहमी सुट्टी घेऊन शाळेत जावे लागत असते. एकदाच तो जातो तर मुलगी सस्प्नेन्ड होते. मुलांना खोटं बोलायची सवय लागण्याचे कारण श्रीकांत आहे असे ती म्हणतानाचे प्रसंग लक्षात आहेत.
असे खूप प्रॉब्लेम्स पहिल्या सीझनमधे व्यवस्थित दाखवले होते. ते पात्र एकदा नीट रंगवले गेले असल्याने पुन्हा ते प्रसंग न दाखवल्याने सुचीचं वागणं यात आगाऊपणाचं वाटतंय.
त्यातच ती लोणावळ्याला गेलेली असते तेव्हां तिच्यात आणि अरविंद मधे काय होतं हे दाखवलेलं नाही. ते रहस्य आता तिस-या भागात उलगडणार आहेत.
तो नेहमी तिच्याशी खोटं बोलतो
तो नेहमी तिच्याशी खोटं बोलतो याचा राग आहे तिला.. पण हे खरं की.. ती प्रेमाने बोलत नाही, त्याच्या कामा प्रती तिला काही आदर नाही किंवा तो किती जबाब्दारी चं काम करतो याची कल्पना नाही>>>> येस्. हॉटेलमध्ये नेल्यावरही भांडत बसते वाढदिवसाच्या दिवशी. तेव्हाचे त्याचे जे काही डायलॉग आहेत मला सरळ सरळच गोष्टी कळतात वगैरे ते अगदीच पटले मला. असेलही तो बोअरींग पण निदान तिच्याशी एकनिष्ठ तरी आहे. तिचं काय चाललंय अरविंद सोबत, she knows only. आणि त्याला खोटं बोलावं लागतं कारण त्याचं कामच तसं आहे, खरं बोलून तिला टेंशन दिलं तर मुलांकडे दुर्लक्ष होईल असं वाटत असेल कदाचित त्याला . I personally believe , पुरुष जोपर्यंत विबासं कारणासाठी खोटं बोलत नाहीत , मग बाकी कुठलेही कारण असो , ते खोटं एवढं सिरीयसली घेऊ नये
भाग्यश्री...क्या बात!
भाग्यश्री...क्या बात!
पहिला सिझन बघितला नसेल किंवा
पहिला सिझन बघितला नसेल किंवा खरं तर पाहिलाय पण आता आठवत नसेल तर त्यांच्यासाठी ही एक युट्युब लिंक..
https://youtu.be/ZR1uxVnHoQM
अशा इतरही लिंक्स आहेत.
फॅमिली मॅन चा पहिला सिझन
फॅमिली मॅन चा पहिला सिझन जेवढा आवडला तेवढा काही २ रा सिझन भारी नाही वाटला. बराच अचाट आणि अतर्क्य आहे, पण एंटरटेनिंग , एंगेजिंग आहे.
मनोज वाजपेयीचा श्रीकांत तिवारी अफलातून आहे , त्याचा अभिनय, हावभाव, टायमिंग भारी!
त्याचे आणि जे. के चे , त्या आयटी मधल्या चिरकूट बॉस बरोबरचे, मुलाबरोबरचे काही सीन्स स्ट्रेस बस्टर आहेत
समंथाचे या आधी काही सिनेमे बघितलेत ( मक्खी, यु टर्न) त्यात ती ठिक वाटली, पण यात ती राजीच वाटते. त्या भूमिकेत योग्य वाटली.
मलाही तो कल्याण/सलमान थोडा ईशान खट्टर सारखा वाटला
शरद केळकरचा आवाज काय मस्त भारदस्त आहे . बाहुबली बघताना हा त्याचा आवाज आहे हे तेव्हा जाणवलं नव्हतं.
अरविंदला मात्र अगदी २,३ सीन्स आहेत, तसा किरकोळ रोल आहे या सिरीज मधे.
श्रीकांत तिवारीची लेक फार अगोचर, उद्धट दाखवली आहे. मुलगा जरा अतरंगी पण गोड आहे.
फॅमिली मॅन च्या टीमचा
फॅमिली मॅन च्या टीमचा इंटरव्ह्यू
https://www.youtube.com/watch?v=kontDLgmxdc
मला सगळ्यात आवडला शरीब हाश्मी
मला सगळ्यात आवडला शरीब हाश्मी उर्फ जे के तळपदे. मनोज वाजपेयी पेक्षा काकणभर जास्तच. मला सगळ्यात जास्त धाकधूक होती त्याला मारताहेत की काय म्हणून
व्यत्य य +१
व्यत्य य +१
शरीब हाश्मी ने मराठी लोकांचा
शरीब हाश्मी ने मराठी लोकांचा हिंदी टोन अचूक पकडला आहे. तो तळपदेच वाटलाय.
'माझं कुठाय' एकदम बेस्ट होतं
'माझं कुठाय' एकदम बेस्ट होतं पहिल्या एपिसोड मध्ये.
"आय विल हॅव अगेलीओ ओलिओ"
"ओह यु मीन ऍग्लिओ ओलिओ सर?"
येस! तळपदे बेस्ट आहे, त्याची
येस! तळपदे बेस्ट आहे, त्याची पल्स चालू आहे हे कळेस्तोवर श्री बरोबर इकडे आपणही अस्वस्थ
हम्म् . असच अस्वस्थ
हम्म् . असच अस्वस्थ इन्स्पेक्टर हाथीराम चौधरीच्या वेळी पण वाटले होते. तिसऱ्या सिझन मध्ये तो पण श्रीकांत सोबत असेल की काय अशी उडती न्युज पाहीली. मला तर आवडेल तसं वेगळेपण . Like Avengers superheroes एका ठिकाणी.
सुचीचा बॉस निखिल म्हणजे
सुचीचा बॉस निखिल म्हणजे सिरिजचा डायरेक्टर डीके आहे हे मधेच एक क्लिप बघताना बघताना त्रिव्हिया मधे वाचल.
>>सुचीचा बॉस निखिल म्हणजे
>>सुचीचा बॉस निखिल म्हणजे सिरिजचा डायरेक्टर डीके आहे हे मधेच एक क्लिप बघताना बघताना त्रिव्हिया मधे वाचल.
आणि पहिल्या भागात लॉज मध्ये मजा करायला आलेल्या कपल पैकी पुरुष हा मालिकेचा लेखक सुमन् कुमार आहे. .
ओह ओके
ओह ओके
तो प्रभाकरन च्या भावाने ओलीस धरलेला?
Pages