इरॉटिका, कि पॉर्न ?

Submitted by स्वेन on 9 June, 2021 - 04:23

इरॉटिका आणि पॉर्न यांच्यात फरक काय असा प्रश्न केला तर त्याचे उत्तर फार कठीण आहे असे नाही. पॉर्न (अश्लील) साहित्य, गाणी, प्रतिमा किंवा चित्रपट म्हणजे स्त्री आणि पुरूष यांच्या शारीरिक जवळीकीचा संपूर्ण देखावा. स्त्री आणि पुरुषाच्या समागमाचे मादी आणि नरात झालेल्या संभोगाचे हीन रूपांतर, ज्यात आपल्या जोडीदाराबद्दल वाटणारी आपुलकी, प्रेम, भावना किंवा अगदी खोलवर वाटणारी काळजी याचा संपूर्ण अभाव असून केवळ प्राणीजन्य मैथुनाचा तो एक भाग होऊन जातो. यात भाग घेणारे सर्व स्त्री पुरूष एका विवक्षित क्षणी अपमानित केले जातात, खास करून स्त्री पात्राला तर अगदी नेहमी तसे केले जाते. स्त्री पात्राला एक उपभोगाची वस्तू या पलीकडे अशा साहित्यात, चित्रपटात महत्त्व नसते. मानवी लैंगिक अवयवांची बर्बरता म्हणजे पॉर्न असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आंतरजालावर असे साहित्य सर्व भाषेत अगदी विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. मराठीत कामकथा, चावट कथा, किंवा प्रणय कथा आणि हिंदीत अंतरवासना, मस्तराम अशा साईटवर असणारे साहित्य स्त्रीला फशी पाडून (सेड्युस) तिचा उपभोग कसा घ्यावा याचे धडेच देतात. बहुतेक लेखक पुरुष असल्याने ( स्त्री लेखिका अगदी नगण्य ) अशा साहित्यात हळुवारपणा, भावनिक गुंतवणूक, जोडीदारा बद्दल वाटणारी आपुलकी अशा भावनांचा संपूर्ण अभाव असतो आणि "मी त्या स्त्रीचा उपभोग वेगवेगळ्या प्रकारे कसा घेतला " याची साद्यंत हकीकत असते.

पॉर्नची वरील प्रमाणे व्यापक अशी व्याख्या समजली की इरॉटिका याच्या जवळपास उलट असेल असे म्हंटले तर चुकीचे ठरणार नाही. ग्रीक इरॉस (eros) या शब्दापासून इरॉटिका (erotica) शब्द बनलेला आहे. प्राचीन ग्रीक तत्वज्ञानाची ती एक संकल्पना असून त्यात उत्कट प्रेमाचा संदर्भ आहे, (लैंगीक संबंधांचा आणि अवयवांच्या वर्णनाचा नव्हे,) ज्यामधून इरॉटिका (कामुक) हा शब्द आला आहे. इरॉस हा शब्द तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्रात बर्‍याच व्यापक अर्थाने वापरला आहे. हव्या असलेल्या कामुक गोष्टीची इच्छा, त्याचा अभाव, आणि न संपणारी तृष्णा, विरह, असे अर्थ सूचित करतानाच ग्रीक तत्ववेत्ता प्लेटोने असे म्हंटले आहे की प्रेमात वेडा होण्याइतपत जी ऊर्जा खर्च होते ती जीवन ऊर्जा शरिराकडून अध्यात्माकडे वळवली तर जीवन आदर्श होऊन जाते. अशा प्रेमाला त्याने प्लेटोनीक लव्ह असे नाव दिले. सिग्मंड फ्रॉइड या मानस शास्त्रज्ञाने पण या प्लेटोनीक तत्वज्ञानाला मान्यता दिली, ज्यात इरॉसची व्याख्या त्याने जीवन ऊर्जा अशीच केली , म्हणजे स्त्री देहाचे आकर्षण, विवाहाच्या बंधनातील संभोग आणि प्रजोत्पादन इथपर्यंतच ठीक आहे. आचार्य रजनीश यांनी देखील " संभोग से समाधी तक " या पुस्तकात हाच मुद्दा मांडला. परंतु सामान्यजन, ज्यांचा वकूब केवळ वासना कोषातच गुरफटून राहिला त्यांची जीवनऊर्जा वेगवेगळया स्त्री देहाच्या अतीव लालसे पलीकडे गेली नाही. सर्व हव्यास आहे तो फक्त कातडीचा. भारतात कातडी सजवणाऱ्या सौंदर्य प्रसाधनाची बाजार पेठेतली उलाढाल साठ हजार करोड रुपयांची आहे. एकदा कातडी सुरकुतली की त्याचे आकर्षण संपते, मग तो देह स्त्रीचा असो की पुरुषाचा. कातडीच्या खाली काय आहे हे समजलं की मग सर्व देह सारखेच. इंद्रियांवरती मनाचा ताबा असतो म्हणून ‘मन’ ताब्यात असलं पाहिजे. ही बाब प्लेटो आणि तत्सम तत्वज्ञानी यांना इसवी सनापूर्वी तीन चारशे वर्ष समजली. ही बाब मग पंधराव्या सोळाव्या शतकात जेंव्हा भारतात संत महात्म्यांचा उदय झाला तेंव्हा त्यांनी आपल्या सारख्या संसारी माणसांना मन ताब्यात ठेवण्याकरीता साधासुलभ ‘भक्तिमार्ग’ दिला.

थेट प्लेटो आणि अरिस्टोटलच्या काळापासून इरॉटिक साहित्याचे लिखाण केले गेलेले आहे. इंग्रजीत असे इरॉटिक साहित्य विपुल प्रमाणात लिहिले गेले. व्लादिमिर नोबोकोव ने लिहिलेली ' लोलिता ' ही इरॉटिका मोठ्या वादात सापडली पण त्यानंतर या कादंबरीची अभिजात साहित्यात गणना झाली. अमेरिकन दिग्दर्शक स्टॅन्ली कुब्रिकने यावर सिनेमाही बेतला. डी. एच. लॉरेन्स याची ' लेडी चॅटर्लीज लवर ' ही इरॉटिका प्रकाशित करणाऱ्या पेंग्विन या विख्यात प्रकाशन संस्थेवर ब्रिटन मध्ये १९६० साली खटला भरला गेला. नंतर पेंग्विनला निर्दोष जाहीर करण्यात आले. जेम्स जॉयस याने लिहिलेली ' युलिसिस ' ही कादंबरीही अश्लील साहित्य म्हणून वादात सापडली पण त्याचेही नंतर टीकाकारांनी भरभरून कौतुक केले.

आपल्याकडील कालिदासाच्या मेघदूत आणि कुमारसंभव या काव्यात जो इरॉटिसिजम आहे, तो फार उच्च दर्जाचा म्हणावा लागेल. मेघदूत मधील कुबेर सेवेला चुकलेला यक्ष " आषाढस्य प्रथम दिवसे " दिसलेल्या काळ्या मेघाला आपले विरह काव्य ऐकवतो आहे. जर्मन कवी गटे, रवींद्रनाथ टागोरांपासून ते कुसुमाग्रजा पर्यंत सर्वांना मेघदूतच्या या काव्याने मोहिनी घातली आहे. कुबेराने शाप देऊन त्याला एका वर्षाच्या हद्दपारीची शिक्षा केली. रामगिरीवर विरहाचे आठ महिने त्याने कसेबसे काढले. आषाढाच्या प्रथम दिवशी वर्षामेघांला पाहून आपल्या पत्नीकडे संदेश पाठविण्याची कल्पना त्याला आली. यक्ष पत्नीची मानवी मूर्ती आणि तिची बोलकी विरहव्यथा कालिदासाने संवेदनशील पद्धतीने मांडली आहे .अखेरीस " मला माझ्या पत्नीचा जसा विरह सहन करावा लागतो आहे तसा तुला तुझ्या प्रिय विद्युल्लतेचा विरह कधीही न होवो ” अशा शुभेच्छा यक्षाने शाममेघाला अंतःकरणपूर्वक दिल्या आहेत.अशा तऱ्हेने कालिदासाच्या सुसंस्कृत मनाचे मेघदूतात पडलेले प्रतिबिंब विलोभनीय आहे. कालिदासाने वर्णिलेली यक्षपत्नी रसिक वाचकाच्या मनात घर करणारी आहे.

कुमारसंभव मध्ये आठव्या सर्गात कालिदासाने शिव पार्वतीच्या मीलनाचे वर्णन केले आहे. तारकासुराच्या त्रासातून सर्वांना मुक्त करण्यासाठी ,शिवपार्वतीचा विवाह जमवून आणावा, त्यांना होणारा पुत्र तारकासुराचा वध करेल असे ब्रह्मदेवाने देवांना सांगितले. त्यानुसार शंकराच्या मनात पार्वतीविषयी प्रेम निर्माण करण्याच्या कामगिरीवर इंद्राने मदनाला पाठविले. शंकराच्या विवाहाचा प्रसंग आणि त्यानंतरच शिव पार्वतीच्या मिलनाची हकीकत अशी कथा कुमार संभव ह्या काव्यात आहे.

साठ सत्तरच्या दशकात अमेरिकेत हग हेफनर याच्या प्लेबॉय मासिकाने धुमाकूळ घातला तर त्याच्या पावलावर पाऊल ठेवत इकडे डेबोनियर मासिक आंबट शौकीन लोकांची इच्छा भागवू लागले.आपल्याकडे मराठीत भाउ पाध्ये, चंद्रकांत काकोडकर, इत्यादीनी कामुक कथा, कादंबऱ्या लिहिल्या . पन्नास साठ सालात जन्मलेल्या पिढीला शाळेच्या वयात 'विवाहितांचा वाटाड्या', 'निरामय कामजीवन' अशा पुस्तकांतून लैंगीक ज्ञान मिळत असे. सिमोन द बोव्हुआचं 'सेकंड सेक्स' सारखं वैचारिक पुस्तक लैंगीक माहिती देत असल्याने वाचनात येत असे. अगदी अलीकडे इ. एल. जेम्स याने लिहीलेल्या 'फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे' या इरॉटिक पुस्तकाने बरीच खळबळ माजवली.

मराठी भाषेने या बाबतीत जी वाटचाल केली ती अगदी सावकाश. चंद्रकांत, रंभा, हैदोस आणि दिवाळीत आवाज अशी मासिकं होती जी आताच्या मानाने थोडीशी साधीच म्हणायला हवीत. मिलेनियल पिढी म्हणजे १९८० नंतर जन्मलेली, ज्यांना जागतिकीकरणानंतर भारतात बदललेले वातावरण आणि समाजात आलेला मोकळेपणा याचा अनुभव घेता आला आणि आंतरजाल सहज उपलब्ध झाला त्यांना असे साहित्य अगदी सहजगत्या वाचायला मिळाले. या वाचक वर्गात स्त्रियाही सामील झाल्या आणि पुढे जाऊन समाज माध्यमात व्यक्त होऊ लागल्या. गौरी देशपांडे, मेघना पेठे, तस्लिमा नसरीन यांच्या पुस्तकांची भाषांतरे इत्यादी वाचल्यावर लेखक आणि वाचक हे दोन्हीं वर्ग प्रगल्भ झाल्याचे आढळून आले. त्यामुळे पॉर्न आणि इरॉटिका यातील सीमारेषा त्यांना नाही कळाले तरीही काय वाचावे आणि काय बघावे याचा निर्णय घेण्याइतपत ते स्वतंत्र झाले.

१९८० च्या साधारण दीड दशकानंतर जन्मलेल्या पिढीला मात्र जो पॉर्न पाहायला किंवा असे साहित्य वाचायला मिळाले त्यात नैतिक अधःपतन झाल्याचे आणि इरॉटिका व पॉर्न यांच्या सीमारेषा धूसर झाल्याचे दिसले. यात अगदी जवळच्या नात्यातील संभोग, त्याची वर्णने यांनी हद्द ओलांडली. भाऊ-बहिण, काकू-पुतण्या, भाचा-मामी, दीर- वहिनी आणि त्यानंतर कहर म्हणजे आई आणि तरुण मुलगा, वडील आणि तरुण मुलगी यांच्या शरीर संबंधांच्या कथा अशा पॉर्न व्हिडिओत आणि साहित्यात दिसु लागल्या. अशा कथांचा कांही तरुणांच्या मनावर प्रभाव पडून त्यांचें मन तसे कृत्य करायला धजावले आणि अशा गोष्टी वृत्तपत्रात अधूनमधून वाचायला मिळू लागल्या. मुली पण धाडसी झाल्या. मुलगा लॉजमध्ये का नेतोय हे माहिती असूनही त्या लॉजमध्ये जाऊ लागल्या. कॉल सेंटर मधल्या तरुणी वन नाईट (स्टँड) ॲट कॉल सेंटर मध्ये रमू लागल्या. फेसबुक वर मैत्री करून मुलाने भेटायला बोलावले तर त्या जाऊही लागल्या. प्रेमाखातर, कोपऱ्यातला गॅरेजवाला, रिक्षावाला, पेपर टाकणारा मुलगा, गाडीचा ड्रायव्हर, गुटखा किंग, चेन स्मोकर, स्वतःपेक्षा कमी शिकलेला, अशा मुलांबरोबर मुली पळून जाऊ लागल्या. प्रतिथयश महाविद्यालयातील विद्यार्थिनी एस्कॉर्ट सर्व्हिस करू लागल्या. जिम मध्ये जाणारी मुले गिजोलो ( कॉल बॉईज) ची कामे करू लागली. शहरात शिकायला येणारी मुले आणि मुली एकाच फ्लॅट मध्ये एकत्र राहू लागली. ज्याने सर्व इंद्रिये जिंकली आहेत अशा जितेंद्र कन्येने इंद्रियांची 'गंदी बात' करायला सुरूवात केली. पोर्न पाहणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढली. त्यांना कामोन्माद, गुणित कामोन्माद (orgasm, multiple orgasm) यांची व्याख्या तोंडपाठ झाली. विवाहबाह्य संबंधांची संख्या अचानक वाढू लागली. " लव्ह ॲट फर्स्ट साईट, ब्रेकअप ॲट फर्स्ट फाईट" अशी स्थिती वारंवार दिसू लागली. घटस्फोटासाठी अर्जांची थप्पी साचू लागली. सोळाव्या सतराव्या शतकात भक्ती मार्ग दाखवणारे संत इतिहासजमा झाले आणि वर्तमानकाळात "आश्रम" बांधून राम रहीम जपणाऱ्या बाबां आणि नित्य आनंदात असणाऱ्या संतांनी आपल्या मार्गात भक्ती, करुणा, शांती, क्षमा, दया वगैरे दिसतायत का याचा शोध घेऊ लागले. बापू नामक संतांना रामात आशा दिसली. अशा बाबांची आणि संतांची संख्या वाढली. फक्त प्रौढांसाठी असणाऱ्या वेब मालिका शाळेत जाणारी मुलंही बघू लागली. वर्गातल्या मुलांना मुली डोळा मारू लागल्या.आर्ची तरुणींची आयकॉन झाली.

छापील साहित्याचा टप्पा ओलांडून पॉर्न साहित्य ऑडियो स्वरुपात मिळू लागले. कानात ब्ल्यू टूथ घालून मुलगा / मुलगी शास्त्रीय संगीत ऐकत आहे असे भोळ्या भाबड्या पालकांना वाटू लागले. अशा ऑडियो स्वरुपातील साहित्यात आपली सोज्वळ मराठी पण मागे राहिली नाही. 'कथा सांग' ऑडिओ ॲपवर, पेटलेलं मोरपीस, मी नावात आय घालतो, नितीन थोरात लै जोरात, कॉजल अफेअर, डेस्परेट हजबंड, अरेबियन ड्रीम, फर्स्ट लव्ह, रोल प्ले, जी स्पॉट, वन नाईट वेडिंग, अशा धाटणीच्या कथा ऐकायला तरुण वर्ग पुढे येऊ लागला. स्त्रीच्या आवाजातही अशा कथा ऐकू येऊ लागल्या आहेत.

नैतीक अधःपतनाचा कळस तेंव्हां गाठला गेला जेंव्हा हीर रांझा, लैला मजनू, शिरी फरहाद, सोहनी महिवाल अशा पारंपरिक सर्व प्रेम कथांना उभा-आडवा-तिरपा छेद देणारी घटना अमेरिकेत घडली. आपल्याच जैविक अपत्याशी आपल्याला विवाह करता यावा, यासाठी एक कायदेशीर याचिका न्यूयॉर्कच्या न्यायालयात एका पालकाने दाखल केली.

पॉर्न आणि इरॉटिका यांच्यातला फरक साध्या शब्दात सांगायचं तर सनी लियोन आणि "चोली के पीछे क्या है" या गाण्यावर नाचणारी माधुरी दिक्षित यांच्या मध्ये जो फरक आहे तो. परंतु पॉर्न माध्यमाने आता नैतीक पातळी इतक्या खालच्या दर्जाची गाठली आहे कि तरुण मुलं आपल्या आई बहिणीकडे वेगळ्या विचाराने बघत आहेत. विवाहेच्छुक तरुणांना आता, आपल्या गळ्यात माळ घालणाऱ्या माधुरीचे समाधान करायला जर आपण कमी पडलो तर ती सनी लियोनच्या मार्गावर वाटचाल करेल की काय, अशी भीती वाटू लागली आहे.

.....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आपली ती रासक्रीडा अन दुसर्‍याचं ते लफडं. जे काय असेल तो संभोग आहे, अन महत्वाचे म्हणजे सजीवांच्या बेसिक इन्स्टिंक्ट्सपैकी महत्वाचा आहे. पुनरुत्पादन.

ते कोणत्या नराने कोणत्या मादीसोबत करायचं त्याबद्दल लै अभ्यासू वगैरे लेख आहे.

नैतिक अधःपतन वगैरे बावळटपणा वाचून बोअर झालो.

३ लाख वर्षांचा इतिहास आहे माणसाला. या कालावधीत लैंगिक संबंध कुणी कुणाशी कसे ठेवावेत याच्या नैतिकता अनेकदा बदललेल्या आहेत तथाकथित 'धर्म' या नैतिकता डिक्टेट करण्यापाठी आहेत. ज्याचा जुन्यात जुना संदर्भ नुसता वैदिक म्हटला तरी फारतर ५-६ हजार वर्षे मागे जातो.. अन त्या वैदिक काळी यमाने यमीला अन यमीने यमाला काय सांगितले ते जरा शोधा. त्या आधी काय होते ते ही शोधा. इतिहासाचार्य राजवाडे उपयोगी ठरतील. गूगला .

छान आढावा घेतलाय.
आक्षेपाचा टोन आहे की नाही याची कल्पना नाही
पण जे आहे ते असे आहे. आणि ईटस ओके असे मला वाटते.

आणखी एक मुद्दा म्हणजे तसेही मनुष्यजातीचे फार कमी दिवस राहिलेत. लवकरच आपला खेळ समाप्त होणार आहे हे मानवाला कुठेतरी कळून चुकलेय. त्यामुळे या शेवटच्या काळात तो असेच बेलगाम जगणार आहे. आता याला अधपतन म्हणा की आणखी काही ..

स्टोरी टेल वगैरे काही ॲप आहे का?
काल एक जाहीरात पाहिली होती. दिलीप प्रभावळकर यांच्या आवाजात दोन कथा होत्या त्यावर..

- जाओ पहले उस आंबटशौकीन आदमी का लेख उडाके आओ जिसने मायबोलीपर ये लिखा था "मेरा बाप आंबटशौकीन है"
- भाई, दूसरो को आंबटशौकीन कहनेसे खुदका आंबटशौकीनपणा कम नही हो जाता. तुम्हाला लेख उडेगा.
- लेख उडेगा. वो आदमी जिसने प्लेबॉय निकाला वो तुम्हाला कौन था ? कोई नही
वो आदमी जिसने ऑडीओ अ‍ॅप निकाला , वो तुम्हार्‍आ कौन था ? कोई नही
लेकीन तुम तो खुद के थे ना ? फिर भी आंबे बेचके आये ? मुझे तुमसे ये उम्मीद नही थी विजय.

कोणते app ते सांगा की >> मला वाटलं 'कथा सांग' नावाचं अ‍ॅप असावं, त्यामुळे ते अवतरणचिन्हात आहे.

बाकी नैतिक/अनैतिक हे सगळं खूप सब्जेक्टिव्ह आहे. काळानुसार, ठिकाणानुसार, व्यक्तीनुसार त्यांची व्याख्या बदलत जाते.

वर्गातल्या मुलांना मुली डोळा मारू लागल्या.आर्ची तरुणींची आयकॉन झाली. >> ह्यात (आणि अश्याच आणखी वाक्यांमध्ये) काय नक्की सांगायचं आहे कळलं नाही. डोळा मारणे अनैतिक आहे का? की मुलांनी डोळा मारणे नैतिक आणि मुलींनी मारणे अनैतिक? की मुले आधीच अनैतिक होती पण आता मुलीही अनैतिक झाल्या? डोळा मारणं हे चांगलं/वाईट काहीच म्हणायचं नसेल तर मग त्याचा उल्लेख तरी का केला? आणि नुसताच उल्लेख करायचा असेल तर 'माणूस पक्वान्ने बनवू लागला, अन्न शिजवू लागला, सिमेंटची घरं बांधू लागला' अश्यासारखं वाटेल. त्याचा विषयाशी काय संबंध?

नुसत्या चिंचा, लिंबं आणि कै-या पाडल्यात !>> अय्या इस्श अहो ते नंतर!!!

मला रेखाचा उत्सव सिनेमातील वावर हा इरॉटिक वाटतो. पण एक शीतल नावाची नटी सत्यम शिवम सुंदरम मध्ये वावर्ते ते पो र्न वाट्ते.

मला रेखाचा उत्सव सिनेमातील वावर हा इरॉटिक वाटतो. >> मलाही ईरॉटिक म्हटले की पहिला रेखाचा उत्सवच आठवतो. पण गंमत म्हणजे ज्या वयात पहिल्यांदा पाहिलेला तेव्हा पॉर्न बघतोय याच आविर्भावात बघितलेला Happy

एक दिवसासाठी गेलो होतो.
लग्न झाल्यावर मुलगी बापाचे घर सोडून जाते ती सुद्धा सणवाराला पुन्हा माहेरी परत येत राहते. मी तर पुरुष आहे. कायमचा कसा जाईन / जाईल .