फॅमिली मॅन 2 (with spoilers)

Submitted by सान्वी on 7 June, 2021 - 06:07

सध्या वेबसिरीज च्या धाग्यावर या सिरीजची सुरू असलेली चर्चा लक्षात घेता यावर नवीन धागा काढते आहे. येथे स्पॉईलर सकट चर्चा करू शकता. ज्या मंडळींची अजून बघून व्हायची आहे त्यांनी पूर्ण झाल्यावरच या धाग्यावर या.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बुलेटप्रूफ वेस्ट चा मुद्दा अगदी बरोबर आहे
कसले निवांत हे अतिरेक्यांना जाऊन भिडतात

रानभुली छान पोस्ट, पटलं

मला यात एकच पॉईंट मिसिंग वाटलं ती म्हणजे मीडिया
पोलीस स्टेशन वर हल्ला होतो इतके पोलीस मारले जातात
नंतरही सोसायटीच्या आवारात गोळीबार होतो
यावर कुठेही काहीही मीडिया वर हलकल्लोळ होत नाही का ते मुद्दाम दाखवले नाहीये
कारण आताची परिस्थिती असेल तर लगेच विरोधी पक्ष त्याचे भांडवल करणार, निदर्शने, सोशल मीडियावर युद्ध अस सगळं रामायण
हा अँगल पूर्णपणे साईडला टाकला आहे असं वाटलं

हो.दुसरं म्हणजे सोसायटीत गोळीबार होत असताना पब्लिक नुसतं बघताना दाखवलंय.
हल्लीच्या ट्रेंड प्रमाणे बरेच लोक मोबाईल हातात घेऊन खिडकीतून व्हिडीओ काढताना दाखवायला हवेत
जसे आसिफ च्या स्कुटर बॉम्ब एन्ट्री ला लोक बॉम्ब डिफ्युज होत असताना सेल्फी काढताना दाखवले होते तसे Happy
मिलिंद ला नेतानाच्या सीन ला मीडिया दाखवले नाहीत हे बरे वाटले.नाहीतर तेथे मीडिया आणि तिवारी/जेके ची नक्की मारामारी झाली असती.

हो.रानभूली.. मागील पानावरच्या पोस्ट ला सहमती..
जेके सुरवातीला नाहीच म्हणतो श्रीकांतला सांगायला.. पण श्रीकांत म्हणतो..xxx.. मुझे नही बतायेगा तू...!
आणि जेकेंला ही माहित असत की श्रीकांत जे काही सांगेल त्याचा उपयोगच होईल. आणि तसच होत...!

मीडिया चा मुद्दा पण बरोबर आहे. मला वाटते की मुद्दाम बाजूला ठेवला आहे तो अँगेल..

काही लूपहोल्स सोडले तर हा पण सीजन भारी जमला आहे.
श्रीकांत, जेके आणी बाकी प्रत्येक कॅरेक्टर फिट आहे.
काही सीनमधे श्वास रोखले गेले. मिलिंद जायला नको होता. वर कुणीतरी लिहिलंय की पुढच्या सिझनमधे जेके मरेल ते तर आजिबात नको. इथे राजीने जेके वर गोळई झाडल्यापासुन जी जिवाची घालमेल झाली ती त्याला रीकवर झालेला बघुनच संपली.
आता त्या ढमीने श्रीकांतला काही सांगितलंय का नाही ते तरी दाखवून संपवायचा सिझन.
तिसर्या सिझनची वाट बघणं सुरु.

हो ना.
मीच लिहीलंय. जेके मरु नये असं मलाही वाटतं. पण या लोकांचा प्रत्येक सिझन ला एक किंवा दोन अतिशय चांगली माणसं घालवायचा रेट बघता जेके किंवा झोया ची पाठवणी व्हायची शक्यता नाकारता येत नाही. सिझ्न १ ला पाशाचं पात्र थोडं मनात बसत होतं तोवर मारुन टाकलं.

जेके मरु नये असं मलाही वाटतं. पण या लोकांचा प्रत्येक सिझन ला एक किंवा दोन अतिशय चांगली माणसं घालवायचा रेट बघता जेके किंवा झोया ची पाठवणी व्हायची शक्यता नाकारता येत नाही. सिझ्न १ ला पाशाचं पात्र थोडं मनात बसत होतं तोवर मारुन टाकलं. >>> बघा. हे वाचून पात्रं जिवंत ठेवली कि एव्हढा गोळीबार होऊनही कुणीच कसं मरत नाही. अ आणि अ म्हणून पण माबोकर ओरडणार, आणि ते ऐकून पात्रं मारली तरी ओरडणार.

पुणेरी सल्ले ऐकून पाटीत बदल करणा-या दुकानदाराची आठवण झाली.

कितीतरी पुलिसमेन मरतात की मेन कॅरेक्टर्स सोडुन.
पण जेके नको.
ढमी आणी अरविंदची स्टोरी बोर आहे. पुढच्या सिझनमधे नकोच.
नवर्याचं प्रोफेशन समजतच नाही तिला असं वाटत रहातं.
अनु, पाशाबद्दल +१

मी अनु यांच्याकडून पूर्वीसारख्या मिस्कील पोस्टी येत नाहीत. कंट्रोल सप्ताह चालू आहे का ?

एकंदर ढमी च्या स्टोरी ने परत दोघात कोल्ड वॉर चालू होतं की काय?
आता जरा किमान हग वगैरे करत होते मुलगी किडनॅप झाल्यावर.

ते कुठेही एकमेकांना compatible नाहीयेत
तिलाही मनात असा खूप काही प्रचंड गिल्ट वगैरे नाहीये
फक्त हे एकदा कधी न कधी नवऱ्याला सांगून टाकून मन मोकळे करावं इतकंच वाटत आहे
She is not ashamed and which is perfectly fine
या वयात, या टप्प्यात, या मानसिक स्थितीत असे वाटावे हे अगदी नॉर्मल आहे आणि हे तिलाही उमगले आहे
फक्त श्रीकांत या गोष्टीला कसे घेईल आणि फोन वरून जे ऐकलं त्यावरून आई वडील पण कर्मठ आणि कडक वाटले
त्यानाही कसे सामोरे जाता येईल या कात्रीत ती सापडली आहे
श्रीकांत बद्दल प्रेम आत्मीयता आणि आदर आहे पण they aren't just compatible
ना तो धड तिला नीट समजावून घेऊ शकत ना ती त्याला
दोघांची प्रचंड समांतर विश्वे आहेत

फॅमिली मॅनच्या तिस-या सीझन मधे ढमी आणि फॅमॅ यांची स्टोरी काडीमोडापर्यंत येऊन ठेपते. कारण फॅमॅ ने चांगली सिविलियन नोकरी सोडून परत ह्य रिस्क जॉब मधे एण्ट्री केली. त्यामुळेच मुलीचे अपहरण झाले. ती श्रीकांत माथुरची मुलगी असल्यानेच तिला जाळ्यात अडकवले. त्यातच डोन्ट बी मिनिमम गाय ने श्रीकांतवर केस केली आहे. त्यासाठी हजेरी लावावी लागतेय. त्याच्या या वागणुकीने ढमी त्रस्त आहे. ती अरविंदकडे आकर्षित होऊ लागली आहे. पण मुलांचे काय या प्रश्नात अडकल्याने तिची चीडचीड होतेय. तिने श्रीकांतला कोर्टाची नोटीस दिली आहे.

इकडे अरविंदच्या कंपनीच्या अ‍ॅपवरून काहीतरी गोंधळ चालू आहे. अचानक तक्रारी वाढल्याने चौकशी सुरू होते. अरविंदच्या कंपनीच्या अ‍ॅप्सचा उपयोग देशविघातक शक्तींसाठी होत असल्याचे लक्षात येते. स्वतः अरविंद हैराण आहे. त्यातच ही चौकशी फॅमॅ कडे येते. ढमीला फॅमॅ अरविंदवर सूड उगवतोय असे वाटत राहते.

फॅमॅ अरविंदच्या अ‍ॅप्सची चौकशी सुरू करतो. त्यात चायनीज हात आढळून येतो. मोठ्या प्रमाणावर डेटा चोरला गेलेला असतो. अरविंदच्या कंपनीतच कुणीतरी चायनीज एजंट असावा असे फॅमॅला वाटते. मात्र अरविंद हाच चायनीज हस्तक असल्याचा संशय जे के ला असतो. त्याला तसे पुरावे सापडतात.

एका हॉटेलमधे फॅमॅ ढमीला कन्विन्स करायचा प्रयत्न करत असतो. मात्र ती रागाने पाय आपटत जाते. ती तिथे जे के ला ही तू फॅमॅच्या कटात सहभागी असल्याचे सुनावते...

देखते रहीये फॅमॅ ३

सुचि नवर्याचं प्रोफेशन फार कॅजुअली घेतेय असं वाटतं. मवा तिला सांगतो की मला दशहतवाद्यांच्या म्हणणाप्रमाणे वागावं लागेल तेव्हा किती सहजपणे सांगते की वाग तसं मग. मातृप्रेम, मुलीविषयी प्रचंड काळजी वगैरे मान्य आहे. पण तिला नवरा काय करतोय आणि हे त्याच्यासाठीही किती भयंकर आहे हे दिसत नाही का?

धृतीही जरा जास्तच आगाऊ वाटतेय. आणि तिचं कथानक असं घडू शकतं वाटणारं आहे. टीनेज मुलांच्या आईबाबांसाठी नाईटमेअर.
पण ती ॲक्टर भारीच आहे.

अरविंद या सिझनमध्ये फार सुजवट दिसतोय. पण गोड आहे

एक गंमत वाटली
मुलगी कीडनॅप झाल्यावर साजिद चा श्रीकांत ला फोन येतो की तू पण मुसाच्या आईला असंच ओलीस ठेवलं होतंस वगैरे.

नंतर शिंदे वॉचमन बनून दारात जातो आणि नंतर येऊन साजिद ला पाहिलं सांगतो तेव्हा श्रीकांत 'साजिद पण सामील आहे होय अपहरणात' असे भाव चेहऱ्यावर आणून आश्चर्यचकित झालेला दाखवला आहे.(किंवा ते भाव 'अरे,चेन्नई हून मुंबई ला पोहचला पण?' चे असतील.

अनु.. Happy
आता फॅमिली मॅन सवार आहे वाटते मनावर...
कारण तसाही आश्रम च्या दुसर्‍या भागाचा अजून काही पत्ता नाही...त्यामुळे बॉबी देओल सध्या जरा खाली गेलेला दिसतो...
सध्या श्रीकांत तिवारी!!
Umiyal चे काय होते पुढे?
छान आहे दुसरा सीजन ही...! मी आजच संपविला...ban वगैरे आला तर काय घ्या!!
तिसरा भाग बहुतेक आता चीन वर आहे....अरुणाचल वगैरे.....
Happy
सूची चे बोलणे अर्धवट राहिले.....

आश्रम चा काही पत्ता नाही. मध्ये त्यावर आक्षेप पण आला होता शेड्युल्ड कास्ट चा.त्यामुळे आता तिसरा येतो नाही यतो माहित नाही.
अजूनही बॉबी देओल आहेच टॉप क्रश.

आश्रम चा काही पत्ता नाही. मध्ये त्यावर आक्षेप पण आला होता शेड्युल्ड कास्ट चा.त्यामुळे आता तिसरा येतो नाही यतो माहित नाही.
अजूनही बॉबी देओल आहेच टॉप क्रश.>> जपनाम.....:-)

सिझ्न १ ला पाशाचं पात्र थोडं मनात बसत होतं तोवर मारुन टाकलं.>>>>> होना. तो सीन चांगला जमून आलाय आणि त्यामानाने या सिझनचा थोडा कमी इफेक्टीव वाटतो.

अरे,चेन्नई हून मुंबई ला पोहचला पण?' चे असतील.>>> हम्म तसेच असेल कारण तो फोनवर बोलतो आधी तेव्हा साजिदचाच हात आहे यात हे तर माहित असतं श्रीकांतला.

ढमी आणी अरविंदची स्टोरी बोर आहे. पुढच्या सिझनमधे नकोच.
नवर्याचं प्रोफेशन समजतच नाही तिला असं वाटत रहातं>>> +११

धृतीही जरा जास्तच आगाऊ वाटतेय. आणि तिचं कथानक असं घडू शकतं वाटणारं आहे. टीनेज मुलांच्या आईबाबांसाठी नाईटमेअर.>> अगदिच सहमत !! पोरीची अ‍ॅक्तिन्ग चान्गली आहे.
मिलिन्दला फार कमी वेळासाठी आणल आणी उगाच मारल असच मनात आणल त्याला तितका स्क्रिन टाइम पण नाही मिळाला , तो जातो तेव्हाची मवाची अ‍ॅक्टिन्ग फार भारी, आपल्याही गळयात आवन्ढा येतो... "सच मेरे यार है.."
या वेळेची स्टोरी तितकी थ्रिलिन्ग वाटली नाही.

अरर! मी असंच ढमी लिहिलेलं. चिडून. Lol ढमी नको सुची ठीके Happy
ध्रिती चं काम छान झालंय.
मी पण टीनेजर मुलीची आई असल्याने तिच्या स्टोरीने अस्वस्थ व्हायला झालं. अगदी दोन्ही पेरेंटना दोष पण दिला. सुचीला जास्त.

@फिल्मी अरे देवा करण्यासारखं काय आहे त्यात?
खामोशी द म्युझिकल मधली मनिषा कोयरालाची आई अशी ओळख लिहायला हवी का?

Pages