झी-मराठी : येऊ कशी तशी मी नांदायला

Submitted by DJ...... on 5 February, 2021 - 01:08

झी मराठी वर नुकतीच येऊ कशी तशी मी नांदायला ही नवी मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ८ च्या टाईम स्लॉटवर सुरू झाली. मालिकेचं टायटल साँग सुद्धा बरंच बरं जमलंय कि बघताना मिसेस मुख्यमंत्रीच्या ठसकेदार टायटल साँगची आठवण आल्याशिवाय रहात नाही इतकं ते कॉपी झालंय..! Proud

मालिकेतील लिड स्टारकास्ट अगदीच नवीन परंतु चॅलेंजिंग आहे. स्वीटु (अन्विता फलटणकर) आणि ओंकार (शाल्व किंजवडेकर) हे दोघे या मालिकेचे लिड आहेत तर त्यांना साथ द्यायला खंबीर आधारस्तंभ म्हणुन स्वीटुची आई नलू साळवी (दिप्ती केतकर), ओमची आई शकुंतला खानविलकर (शुभांगी गोखले), ओमची बहीण मालविका खानविलकर (आदिती सारंगधर) आहेत. त्याच सोबत स्विटुचे बाबा, काका, काकू, चुलत भाऊ चिन्या हे सर्व साळवी कुटुंबीय दहा बाय बाराच्या हॉल अन सहा बाय सहाच्या किचन या वन आरके मधे रहात आहेत(हेच घर झीमच्या बर्‍याच सिरियल मधे या आधिही पहायला मिळालेलं आहे..!)

तिकडे खानविलकरांच्या घरात ओमसोबत त्याचे आई-बाबा-बहीण, त्याची होऊ घातलेली इंडो-अमेरिकन बायको, बहिणीचा होऊ घातलेला नवरा (याला या आधी कुठे बघितला आहे हेच आठवत नाही.. Uhoh ) अन बहिणीचा ऑफिस कम घरातील चमचा/नोकर असे कलाकार आहेत. खानविलकरांचा व्हिला जबरदस्त आहे. त्यांच्या घराची, अंतर्गत सजावटीची अन समस्त खानविलकर कुटुंबियांच्या ड्रेपरीची रंगसंगती ही फिकट रंगससंगतीत आहे ज्यातुन त्यांच्या रहाणीमानावर गडगंज संपत्तीचा अन हाय क्लास जीवनशैलीचा प्रभाव जाणवतो.

सो मिडलक्लास साळवी कुटुंबीय अंबरनाथ मधे रहात आहेत. कर्मदरिद्री स्वभावामुळे आठराविश्व दारिद्र्य हे त्यांच्या पाचवीला पुजलेले असते (कसे ते कालच्या भागात कळाले.. पुढे सांगतोच..!). या कर्मदरिद्री कुटुंबात सर्वांचे खायचे वांधे झालेले असतात पण दोन्ही साळवी जोड्यांची मुले - स्विटू अन चिन्या हे मात्र खात्या-पित्या घरातले ओव्हरवेट वाटावेत असे कसे हे मात्र न सुटलेलं कोडंच आहे. सगळे साळवी स्वभावाने चांगले असतात त्यामुळे त्यांना कशातच वाईटपणा दिसत नसतो. अगदी बिनकामाचे आयुष्य कंठण्यात देखील त्यांना काहीच वाईट वाटत नसतं. स्वीटूच्या बाबांची नोकरी अगदी पहिल्याच भागातच जाते अन ते हताश होऊन दुसर्‍या नोकरीसाठी कसलेही प्रयत्न न करता नुसते सुतकी चेहर्‍याने घरी बसुन असतात. त्यांना साथ देणारी नलू ही अंबरनाथमधे चपात्या बनवून विकत असते. स्विटु कुठेतरी थातूर-मातूर नोकरी करत असते अन या दोघींच्या पैशांवर हे सगळे साळवी आयते गिळत असतात. स्विटूचा काका हा एक नंबरचा आळशी अन फाल्तू कामं करणारा इसम असतो (जो कुठल्याही अँगलने अंबरनाथमधे रहणारा मराठी माणुस वाटत नाही - ठार गुज्जु वाटतो..!) ज्याची बायको दम्याचा रोग घेऊन उसउसत जगत असते अन जावेला (नलुला) पडेल ती मदत करण्याची कसरत करत असते. अशा या माठ काका-काकुचा मुलगा चिन्या हा महामाठ असतो अन गुंडांकडून २ लाख रुपये हारलेला असतो. घरात खरेतर हार्पिकची देखील गरज लागु नये अशी गांजलेली परिस्थिती असताना चिन्याच्या उद्योगाला वैतागून घरात सगळे चिंतेत असतात. हाता-तोंडाची गाठ पडण्याचे वांधे झालेल्या साळवींना खानविलकरांच्या कृपेने देव तारायला बघत असतो.

नलूची बालमैत्रीण शकुंतला खानवीलकर ही मोठ्या हेल्थ केअर प्रॉडक्ट उद्योगाची मालकीण असते. हिने देखील नलूसारखाच संसार रेटत मार्गी लावलेला असतो. तिची मुलगी - मालविका ही हाय क्लास सोसायटीची प्रतिनिधी असते अन तिचे विचार शकुला (ती स्वतःच्या आईला ''आई'' असं न म्हणता मिसेस खानविलकर म्हणत असते यावरून त्यांच्या नात्याची कल्पना येऊ शकते..!) आजिबात पटत नसतात. मालविका अजुन अविवाहित असते पण तिचा होऊ घातलेला नवरा - रॉकी कायम तिच्या आगेमागेच असतो अन पडेल ती कामे करत असतो. त्याला जिमचे खूप वेड असते.

नलू-शकु ची मैत्री या दोन कुटुंबियांना जवळ आणते. शाळेत असताना नलूच्या घरची परिस्थिती उत्तम अन शकूच्या घरी खाण्याचे वांधे असतात. काळानुसार परिस्थिती बदलली परंतू दोघींच्या घट्ट मैत्रीत त्या बदललेल्या परिस्थितीचा लवलेशही नाही हे आईसोबत एकदा साळवींच्या घरी आलेला ओम बरोब्बर हेरतो. साळवींच्या दळभद्री आयुष्याची कणव येऊन चांगल्या मनाचा ओम त्यांना चकल्या-शेव-शंकरपाळ्या अस्ल्या ऑर्डरी मिळवून देऊन ४ सुखाचे घास खाऊ घालण्याचे पुण्य पदरात पाडून घेतो. त्याला नलू मावशी अन साळवींबद्दल नितांत आदर असतो.

असा हा ओम्या मनाने अन रुपानेही खरंच खूप चांगला असतो. त्याच्या चांगुलपणावर जाडी अन मनमिळावू स्वीटु भाळते. तिचा सर्वांची काळजी घेणारा, कामसू स्वभाव शकुलाही खूप आवडतो अन ती परिस्थितीने (खरेतर कर्मदरिद्रीपणामुळे) गांजलेल्या साळवींना अजून थोडी मदत व्हावी या हेतुने स्वीटुला 'खानविलकर हेल्थ प्रॉडक्ट्स'च्या बिझनेस युनिट मधे नोकरीला बोलावते. एवढेच नव्हे तर स्वतःच्याच बंगल्यात रहायला सांगते. शकुच्या मुलीला - मालविकेला मात्र हे आवडत नाही अन ती स्विटूला भयंकर पिडू लागते. मालविकेने भावासाठी एक माठ इंडो-अमेरिकन मुलगी (मोमो) शोधलेली असते जिचे पिताश्री एक वेलनोन बिझनेस टायकून अन ६०० करोड की कायशा संपत्तीचे मालक असतात. त्यावर डोळा ठेऊन मालविका ही मोमो-ओम्याची सोयरीक जुळवण्याच्या प्रयत्नात असते अन ती मोमोला सतत सोबत घेऊन तिला काय हवं काय नको याची काळजी घेत असते. तर अशा या इंग्रजाळलेल्या कम भंजाळलेल्या अतार्कीक मोमोची अटेंडंट म्हणुन स्विटूचे वर्णी लागते.

त्यानंतर एकेदिवशी शकू अन ओम्या साळव्यांना थोडा चेंज म्हणुन स्वतःच्या व्हिलात पाहुणचारासाठी बोलावतात. या भेटीत साळाव्यांच्या कर्मदरिद्रीपणाच्या कडक आवरणाखाली खळाळणार्‍या चांगुलपणाची झलक ओम्याला दिसते. आपल्या कुटुंबियांना शकु मावशीने अन ओम्याने चांगला पाहुणचार दिला हे बघून स्विटूही सुखावते. त्याचवेळी मालविकाला व्हिलाची धर्मशाळा झाल्याचा संताप अनावर होऊन ती साळव्यांना सळो की पळो करून सोडते. साळव्यांना त्यांची जागा दाखवायचा प्रयत्न करते परंतु साळवे इतके इतके नतद्रष्ट असतात की त्यांना त्यांची जागाच माहित नसते Proud . त्यामुळे मालविकेकडून साळवी यथेच्छ सळो-की-पळो करून घेतात Proud . शेवटी हायक्लास असलेल्या ३ मैत्रीणींना बोलावलेल्या जंगी(?) पार्टीत मालविका साळव्यांना अपमानीत करु लागते त्यावेळी लेकीचे प्रताप हताशपणे पहात उभ्या असलेल्या शकूला स्विटूची साथ मिळते अन मालविकेचा डाव तिच्यावरच उलटवत थोड्या विनोदी अंगाने तो कसनुसा प्रसंग अन साळव्यांचा खानविलकर व्हिला मधला स्टे एकदाचा संपतो अन आपणाला हुश्श वाटतं. Bw

खरं सांगायचं तर पहिले काही भाग अतिशय बाळबोध वाटत होते परंतु त्यात पुढील भागांची बिजं खुबीने पेरण्यात दिग्दर्शकाला यश आलं. जाडी स्विटु अन शेलाटा ओम्या यांचं कसं काय बुवा जमणार. कैच्या कै सिरियल दिसते असं वाटत असतानाच स्विटू अन ओम्या आपल्याला आवडू लागतात यात दिग्दर्शन, संवादलेखन अन कॅमेर्‍याचाही हात आहे.

दिप्ती केतकर यांनी नलूच्या गेटअपवर खरेच खूप कष्ट घेतले आहेत. त्या अगदी नलूच वाटतात इतकं बेअरिंग त्यांनी पकडलं आहे त्याबद्दल त्यांचं विषेश कौतुक..! शुभांगी गोखलेंची शकू देखील अगदी सफाईदार आहे. मालविकेचं कॅरेक्टर लाऊड आहे पण आदिती सारंगधरने ते बरोब्बर साधलं आहे. अन्विता फलटणकर अन शाल्व किंजवडेकरचे स्विटू-ओम्या अगदी पर्फेक्ट आहेत असं जाणवतं याचा अर्थ त्यांची केमिस्ट्री चांगलीच जुळली आहे. झी मराठीवर असं जाडं-शेलाटं प्रकरण पहिल्यांदाच आल्यामुळं काहीतरी नवीन आहे या उत्सुकतेपोटी आपण त्यात गुंतू लागतो. आपल्याप्रमाणे शकूला पण स्विटूच ओम्यासाठी योग्य वाटू लागते जेणेकरून खानविलकरांच्या घराला घरपण देण्यासाठी (डि.एस.कें.च्या घरांना डावलून Uhoh ) एक चांगली सून मिळेल हे त्यामागचं कारण असतं.

स्विटू अन ओम्याच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन शकु अंबरनाथच्या चपातीवाल्या साळव्यांच्या घरी मिठाईचे बॉक्स अन भेटवस्तू घेऊन पोचते. किचन ओट्याशी थांबून अगदी आनंदात शकू-नलू या घट्ट मैत्रीणी स्विटूच्या लग्नाबद्दल सेम पिंच सेम पिंच करत बोलत असतात. नलू-शकूची मैत्री त्या दोघींच्या मुलांना बांधतेय असं वाटत असतानाच कर्मदरिद्री साळव्यांची नलू बावळटासारखी शकूसमोर स्वतःचा फोन धरत त्या फोन मधे कुणा स्थळाचा फोटो दाखवत हे स्थळ स्विटूसाठी किती योग्य आहे ते दाखवते अन ते बघून आपलीही अवस्था शकूसारखी (काय ही नली दलिंदर आहे बघा.. कुबेर शकुच्या रुपाने नलीच्या पदरात आपले धन टाकू पहात आहे अन ह्या कर्मदरिद्री नलीचा पदर फाटका रे बाबा..!!) होते. शकू आवंढा गिळत नलीच्या हो ला हो-हो (हे शुभांगी गोखलेंना नेहमी छानच जमतं Biggrin ) करत रहाते अन आपण मात्र दळभद्री नलीला लाखोल्या वाहत उद्या पासून नकोच बाबा ही येऊ-कशी-तशी असा विचार करतो खरा पण 'आज काय होणार?' ही उत्सुकता पुन्हा उद्या रात्री ८ वाजता आपली बोटे रिमोटवरील १२०४ हा आकडा दाबून आपला मोर्चा झी मराठीकडेच वळवणार हे माहित असुनही उद्याचा प्रीकॅप बघून झाला की आजच्या पुरतं तरी आपण चॅनेल बदलतो. Proud

अशा या नवीन सिरियल वर चर्चा करण्यासाठी हा धागा थोडा उशिराच उघडला असला तरी सिरियलची खरी सुरुवात तर आजच्या भागापासून होणार आहे Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नलीचं तोंड ती बोलत नसते तेव्हाही नीट मिटलेलं नसतं. अर्धवट उघडंच असतं कायम. त्यामुळं अजूनच बावळट दिसते ती.

नलूमावशी चे नाक कायम लाल आणि गळके असते..आणि ते नाक पुसायला कंबरेला खोचलेला एक रुमाल. बहुतेक तिच्या डोळ्यात नेहमीच जास्त ग्लिसरीन पडत असेल..

थँक यु अमा वहिनी Biggrin

तरि तिला उद्या नवीन ड्रेस मिळेल.... खायचे वांदे झालेल्या घरात कसं काय जमतं बुवा हे रोज रोज नवनवीन ड्रेस अन कानातले...?

स्वीटू काल तो नवीन ड्रेस घालून झोपली.. आणि प्रोमोमध्ये वडापाव खाताना पण तोच ड्रेस दाखवला आहे.. ओम तिला २/४ ड्रेस का घेऊन देत नाही..

नलूमावशी चे नाक कायम लाल आणि गळके असते..>. पोळ्या विकून कोकेन घेत असेल रोज अर्धा अर्धा ग्राम. असल्या नवर्या बरोबर संसार करायचा.... मेलं नशीबच फुट्कं

काल मध्यरात्री स्वीटू पोळीचा लाडू करून खात होती.. किचन साउंड प्रूफ आहे वाटते.. कोणाला जाग येत नाही.. आणि स्वीटू पोळीवर किती तूप टाकते ? एवढे तूप पोळीवर मी विचार सुद्धा करू शकत नाही..लगेच डोळ्यासमोर फोमची गादी येते..

पोळीवर किती तूप टाकते >. म्हणूनच ती जाडी आहे. कदाचित पुढे तिचा मेक ओव्हर दाखवतील. वेट लॉस व बार क्या फ्रॉक मध्ये घरंगळताना.

इथे वाचून काहे दिया परदेस मधला गौरीचा ऐतिहासिक डान्स (उर्फ उडी) आठवला, शिव दहीहंडी फोडतो तेव्हाचा.
Submitted by चंपा on 4 June, 2021 - 16:19

>>>> लिंक द्या कि या भागाची

किंवा एपिसोड नंबर !

Ladies beauty parlour मध्ये जाणाऱ्या ओम्याला पाहिलं पोलिसात दिलं पाहिजे

Biggrin
मला तर वाटतं ज्या प्रकारे ष्वीटुला सरदार बनवलं होतं तसं याच शिरेलीत ओम्याला साडी नेसवली जाईल... आणि पुढील एखाद्या शिरेलीत त्याला लीड हिरवीणीचा रोलही मिळू शकतो.

कोणी बघतय का ही सिरीअल अजुनही ?
सध्या "मैने प्यार किया" चा ट्रॅक सुरु करतायत का काय असं वाटतय. ओम्या जाणार आहे १५ दिवस अंबरनाथ ला. स्वतः ला सिद्ध करयला जाणार म्हणे
नलु चा दळभद्रीपणा संपत नाहीये... ओम्या ने स्वत: येउन हात मागितला, सक्खी मैत्रीण मागे लागली आहे तरी हिच्या डोक्यात प्रकाश पडत नाही.

माय गॉड, नली अजुनही त्शीच आहे का..? तिचं सारखं सारखं लाल-गुलाबी होणारं नाक, पिंजारलेले केस आणि असह्य दळभद्रीपणा करत एक ओठ लळत सतत सुरु असलेलं भेकणं बघून मी मालिका पहाणंच सोडलं. म्हटलं थेट स्वीटू-ओम्याची गुडन्युज कळल्यावरच बघायला सुरु करेन.

म्हटलं थेट स्वीटू-ओम्याची गुडन्युज कळल्यावरच बघायला सुरु करेन.>>> मी तर तेव्हाही नाही बघणार. आधी बघितली तेच खूप झालं. शून्य नाविन्य आणि भिक्कार कल्पनाशक्ती असलेली सिरियल. या सिरियल/पिक्चरमधून हा सीन कॉपी करायचा, त्या सिरियल/ पिक्चरमधून तो सिरियल कॉपी करायचा. बरं कॉपी करताना मोराचा उंदीर करण्यात यांचा हात कुणीच धरू शकत नाही.

नलु चा दळभद्रीपणा संपत नाहीये... ओम्या ने स्वत: येउन हात मागितला, सक्खी मैत्रीण मागे लागली आहे तरी हिच्या डोक्यात प्रकाश पडत नाही. >>>>>>> अगदी अगदी. आता दादा साळवी सुद्दा तिला सामिल झालेत. बादवे, मोमोला फ्रॉड दाखवल होत त्याच काय झाल पुढे?

मोमोच फ्रॉडपण फक्त प्रेक्षकांना कळलंय... खानविलकरांना अजून शोध लागायचाय..

बादवे, मोमोला फ्रॉड दाखवल होत त्याच काय झाल पुढे?>> शुटिंग लोकेशन ठाण्यातून दादरा नगर हवेलीला हलवताना विसरले ते
~
माझ्या डोक्यात अशी भन्नाट आयडिया आलीये की एकाच वेळेस दळभद्री नली इन्क्लुडिंग साळवी कुटुंबीय अन तायडा-मोहितला जबर धक्का बसेल... ते ऐकून नलीचं लाल-गुलाबी नाक अन लळत असलेला ओठ कायमचं काळंनिळं पडेल तसेच तिला आणि तायडीला वेडाचा जबर धक्का बसून दोघींना ठाण्याच्याच वेड्याच्या इस्पितळात दाखल करावं लागेल. त्यासाठी या दोघींना ष्वीटू अन ओम्याची गुडान्युज मात्र लग्नाआधीच कळायला हवी.

एवढा आचरटपणा चाललाय सिरीयलमधे आणि ईथे कुणी शिव्या का देत लिहित का नाहीयेत?>>> देतोय हो. पण आपल्या बिचार्या शिव्या सात्विक आहेत. सिरियलवाल्यांच्या कोडगेपणावर फार परिणाम करणार नाहीत.

त्या दोघा लीड्सची झोम्बाझोम्बी आजकाल जास्त दाखवतात शिवाय HD TV मुळे त्या दोघांचे क्लोजप्स नकोशे वाटतात एकंदरीत सिरीयल बघणे कधीच सोडून दिले आहे चुकून चॅनेल चेंज करताना डोळ्यासमोरून गेली तर उगीच जेवताना तोंडात खडा आल्यासारखे वाटते .

खरंय अगदी अजनबी. मी सुरुवातीला फार मन लाऊन पाहिली ही सिरियल पण हे असं होईल असं वाटलं नव्हतं कधी. गेले दोन आठवडे गावी आलोय अन इथे नवीन घरात टि.व्हीच नाही त्यामुळे ते चॅनेल सर्फिंग करताना दळभद्री साळवीज अन बावचाळलेले खानविलकर्स दिसर नाहीत ही खूप जमेची बाजू...! सगळं कसं सुशेगाद...!!! Bw

Pages