शिमला मिरची 4 मध्यम आकाराच्या
तीळ पाव वाटी
शेंगदाणे पाव वाटी
खसखस 2 चमचे (optional )
--------------------
मसाला पुड करण्यासाठी लागणारे साहित्य:
तुप 2 चमचे
सुक्के खोबरे किसलेले पाव वाटी
हिंग 1 चमचा
दालचिनी 4 5 छोटे तुकडे
मिरी 8
लवंग 6
मेथी अर्धा चमचा
-----------------
मिठ चवी नुसार
हळद अर्धा चमचा
तिखट 1 चमचा
हिरवी मिरची 1
फोडणी साठी :
मेथी हिंग मोहरी
गुळ अर्धा वाटी
चिंच मोठ्या लिंबा इतकी
सर्वप्रथम एका कढईत 2 चमचे तुप घालुन दालचिनी , मिरी , लवंग ,मेथी क्रमाक्रमाने तळून घ्यावे.
त्यानंतर किसलेले खोबरे सोनेरी होई पर्यंत खरपुस भाजावे.
हिंग ही थोड्या तुपात भाजुन घ्यावा.
मिक्सर मध्ये वरिल सर्व तळलेले जिन्नस घालुन मसाला पुड करावी. निट वाटले जात नसेल तर 2 3 चमचे पाणी घातले तरी चालते.
शेंगदाणे कच्चे असतिल तर भाजुन भरभरीत कुट करावे. जर कुट तयार असेल तर ते वापरावे.
तीळ कोरडे भाजुन घ्यावे तीळ थोडे भाजुन झाले की त्यावरच खसखस घालुन भाजुन घ्यावी. व त्याचे कुट करावे. खसखस नसेल तरिही चालते.
शिमला मिरची बारिक चिरुन घ्यावी.
एका कढईत 3 चमचे तुप घालुन त्यात मेथी ,मोहरी, हिंग, हिरवी मिरची ची फोडणी करावी त्यावर चिरलेली शिमला मिरची घालावी. ती चांगली परतवून घ्यावी.
नंतर त्यावर हळद , तिखट,मिठ घालुन चांगले परतावे.
म 2 वाटी पाणी घालावे.
पाण्याला उकळी आली की तयार केलेली मसाला पुड , शेंगदाणा कुट, तीळाचे कुट घालवे व नीट सर्व एकजीव करुन शिजवून घ्यावे.
ते झाल्यावर गुळ आणी चिंचे चा कोळ घालावा व उकळी काढून 10 मीन शिजवावे.
घट वाटत असेल तर आणी थोडेसे पाणी घालावे.
हे थोडे दाटसर च असते.
ही कृती थोडी किचकट वाटते. खर सगळे साहित्य असेल तर पटकन होते.
जरा मुरल्या वर पंचामृत जास्त छान लगते चवीला.
म्हणजे केल्या वर 6 7 तासाने .
मस्तच! खूप दिवसांपासून ही
मस्तच! खूप दिवसांपासून ही पाककृती हवी होती. करून बघेन आणि कळवेन इथे.
छान
छान
मस्त रेसिपी. मीही बरेच दिवस
मस्त रेसिपी. मीही बरेच दिवस शोधत होते. याला सि.मि.चे पंचामृत म्हणतात हे माहित नव्हते त्यामुळे शोधता येत पण नव्हते
मस्तच रेसिपी.
मस्तच रेसिपी.
मस्त रेसीपी!
मस्त रेसीपी!
छान आहे पाकृ. करून बघणार
छान आहे पाकृ.
करून बघणार
धन्यवाद सगळ्यांना. प्राजक्ता
धन्यवाद सगळ्यांना. प्राजक्ता ,वर्णिता नक्की करून पहा.