कुमारने मला संध्याकाळी सात वाजता यायला सांगितले होते. जेव्हा मी त्याच्या घरी पोहोचलो तेव्हा सात वाजून गेलेले होते. घरांत फक्त वाहिनी होत्या. टीवी वरची कुठलीतरी सीरिअल बघत होत्या.
“या, कुमारने मला सांगीतले होते की तुम्ही येणार आहात म्हणून. पण त्याला थोडा उशीर होणार आहे, मिटिंग मध्ये बिझी आहे. आत्ता निघेलच तो . तुम्हाला थांबायला सांगितले आहे.”
“सॉरी हं. तुम्ही सीरिअल बघत होता. मी तुम्हाला डिस्टर्ब केले.” मी अपराधी भावनेने बोललो.
“ नाही हो. सीरिअल बघायला वेळ कुठे आहे? मी तो ‘गणिताचा अभ्यास’ हा कार्यक्रम बघत होते.”
मला धक्काच बसला,“ तुम्ही आता गणित शिकणार? का म्हणून?”
“ काय करणार. स्वागतला पहिल्या टेस्ट मध्ये थोडे कमी मार्क पडले ना.”
स्वागत म्हणजे कुमारचा एकुलता एक मुलगा. तो तर खूप हुशार होता.त्याला कमी गुण मिळायला काय झाले. आता तो तिसरीत शिकत असावा. ठीक आहे कमी तर कमी एवढे काळजी करण्यासारखे त्यात काय. “ कमी म्हणजे किती कमी? पास तर झाला असेलच.” मी पण मुर्खासारखे बोलून गेलो.”
“ अहो, काळजी करण्यासारखी गोष्ट आहे म्हणून काळजी करायची. स्वागतला फक्त ९९ मार्क मिळाले.” मला आयुष्यांत सगळ्यांत छान म्हणजे ६३ मार्क मिळाले होते.स्वप्नांतही ९९ मिळणे शक्य नव्हते. अगदी आत्ता जरी मी पाचवीच्या परीक्षेला बसलो असतो तरी. ह्यावेळी मात्र मी शहाणपणाने बोललो. “ एवढे कमी? ----“
“ नाहीतर काय. असे मार्क घेऊन आय आय टीत कशी ऍडमिशन मिळणार? माझी झोप उडाली पहा. मी स्वतःशी म्हटले असा धीर सोडून कसे चालेल? अॅमाझॉन वरून ही पाचवीच्या गणिताच्या अभ्यासाची सीडी मागवून घेतली. तीच बघत होते. पण मलाही जरा डिफिकल्ट जाते आहे. खूप वर्षांनी पुन्हा बघते आहे ना. आता कुमारलाच बघायला पाहिजे. तरी बरं तो आय आय टीच्या तयारीच्या तयारीच्या तयारीच्या तयारीच्या क्लासला जातो. चूक आमचीच आहे. आम्ही त्याला तो पहिलीत असतानाच आय आय टीच्या तयारीच्या तयारीच्या तयारीच्या तयारीच्या तयारीच्या तयारीच्या तयारीच्या क्लासमध्ये घालायला पाहिजे होता. आम्ही दोन वर्षे उशीर केला.मी असे ऐकले की काही आई वडील मुलाला पहिलीत ऍडमिशन घ्यायच्या आधीच आय आय टीच्या तयारीच्या तयारीच्या तयारी---------- काहीतरीच झाले हे . इतके मुलांना ताबडायचे.म्हणजे. ते वय खेळण्याचे. अरे जरा खेळूद्या मुलांना.”
आय आय टीच्या तयारीच्या कल्पनेने मला घाम फुटला. घशाला कोरड पडली. “ वहिनी जरा पाणी ---.”
“ गरमी पण वाढत चालाली आहे. थांबा मी सरबत आणते.” किचन मध्ये जाता जाता वहिनींनी फॅन चालू केला.
सरबताची टेस्ट छान होती.
स्वागतच्या आईचे आय आय टीचे स्वप्न काही वाईट नव्हते. आज देशाला ----- इत्यादी इत्यादी.” आय आय टी का. वा छान. नाहीतरी आज देशाला इंजिनिअर्स फार गरज आहे.चांगले इंजिनिअर्स मिळताहेत कुठे.”
“अहो त्याला इंजिनिअरिंग थोडच करायचे आहे. आय आय टी ह्यासाठी की मग आय आय एम सहज जाता येते म्हणे, मी त्याचे करिअर प्लॅन करून ठेवले आहे.”
बिचारा स्वागत. त्याचे काय प्लॅन आहेत त्याचा कोणी विचार केला नव्हता. इकडे वहिनी पुन्हा मूळ विषयावर आल्या.
“तरीपण आमचा स्वागत क्लास मध्ये फर्स्ट आला बरका,” वाहिनी कौतुकाने सांगत होत्या, “ त्याला १०३.३३७ टक्के मार्क पडले. पण वर्गांत टफ कॉम्पेटेशन आहे. मोडकांची लतीकामनमोहिनी आहे नं ती दुसरी आली. तिला १०३.३३ टक्के मिळाले.”
मला अजून सरबत प्यावेसे वाटले. पण मागायची लाज वाटली.शंभर टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या ह्या मुला मुलींचे कौतुक करावे तितके कमीच. लतीकामनमोहिनीचे ०.००७ टक्के गुण कुठे गेले असावेत त्याचा मी विचार करत होतो. पण वहिनींना खुश करण्यासाठी बोललो, “लतीका मनमम मोमो मोहिनी--- लतीकामनमोहिनीला जरा जास्तच मार्क मिळाले नाही. काय तुम्हाला काय वाटतंय? ”
“ देसाई, आपण काही बोलायचे नाही. चूप बसायचे. नुसते पहात राहायचे. पहा तुमच्या सारख्या त्रयस्थ माणसाला जे समजले पण त्यांच्या मिसला समजत नाही का? सगळे समजते. पण करणार काय. नोकरी कारते बिच्चारी. एकदा माझ्यापाशी रडत होती. जाउद्या झाले.” हा डिट्टो माझा ऑफिस मधला अनुभव होता.
“ तरी पण -- .” मी उगाचच.
“ त्याचे काय आहे देसाई, शाळेत हल्ली एक्सट्रा करीक्युलर ऍक्टिव्हिटीजला मार्क असतात. म्हणजे डाँसिन्ग, सिंगिंग, स्पोर्ट्स ह्यांचे मार्क काउंट करतात. मला हे माहीत होते म्हणून मी स्वागतला झुम्बाचा क्लास लावला होता. तो योगा, क्रिकेट ही करतो. शिवाय रविवारी सकाळी जुडोला जातो. पण त्यांच्या मिसने डाँसिन्ग, सिंगिंगचेच मार्क घेतले. तिथेच ती स्कोर करून गेली.”
(योगा म्हणजे ज्याला आपण योग म्हणतो ते. अज्ञानी वाचकांसाठी)
“ मग स्वागतला वाचायला वेळ मिळतो का?”
“ आता काय वाचायचे राहिले.”
“ नाही म्हणजे आचार्य अत्रे, माटे,भा रा भागवत, साने गुरुजी -----“
“ साने गुरुजी ? काय शिकवतात ते. आय आय टी साठी क्लास आहे का. गाईडं लिहिली आहेत का त्यांनी ?”
“ आधी ते क्लास घेत असत. आता त्यांनी बंद केले लोकांना शिकवायचे.”
तेवढ्यात कुमारचा फोन आला. त्याला घरी यायला अजून उशीर होणार होता.
“ सॉरी देसाई, आज काही जमेल असं दिसत नाही. काय करणार हे ऑफिस म्हणजे. ”
“ अरे कुमार, छोड दो ना. आपण भेटू नंतर कधीतरी.” मी त्याला सांगितले.
आता तेथे थांबण्यात काही अर्थ नव्हता.वहिनींचा निरोप घेऊन बाहेर पडलो.
करिअर प्लॅॅनिंग
Submitted by प्रभुदेसाई on 8 July, 2020 - 11:47
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पहाhttps://www.maayboli.com
पहा
https://www.maayboli.com/node/75451
इथे ऋन्मेऽऽष ला काही माहिती पाहिजे आहे
सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशन - शालेय स्पर्धा परीक्षा
मी माझा प्रतिसाद तेथे दिलेला आहेच
आधी ऋन्मेऽऽष ची पोस्ट वाचा .तिथले प्रतिसाद वाचा
माझी जुनी पोस्ट खणून पुन्हा टाकत आहे.
छान लिहिलयं..
छान लिहिलयं..
हीही.मजेशीर आहे.यात
हीही.मजेशीर आहे.यात अतिशयोक्ती अलंकार वापरलाय.
बाकी sof ला खूप मुलं बसतात.त्यांना आवडतेही.(आणि sof ला नाही बसवले ताण नको म्हणून, तरी मुळातला शाळेच्या अभ्यासाचाच ताण भरपूर आहे.त्यामुळे फार काही फायदा होत नाही ☺️☺️.तिसरीत अनुलोम विलोम शब्द,इंग्लिश मध्ये अडजेक्टिव्ह adverb, चौथीत प्रेझेंट कँटीन्युअस टेन्स वगैरे.त्यामुळे मुलांना या 100% उंदीर धावणाऱ्या उंदीर शर्यतीत बाकी उंदरांबरोबर सोडावे, आरामात धावू द्यावे.मध्ये मध्ये पाय चेपून द्यावे नि जे जे होईल ते ते पाहावे.)
सुंदर लिहिली आहे..... मजा आली
सुंदर लिहिली आहे..... मजा आली वाचताना.... आवडली
मजेशीर लिहिले आहे..
मजेशीर लिहिले आहे..
दाटून कंठ आला......
दाटून कंठ आला......
बिच्चारी उंदरे असा सुस्कारा टाकला ..
.
.
.
.
.
. आणि - अथर्व, वेलांटी चुकली की रे गाढx पेपरमध्ये, अर्धा मार्क गेला ना sssssssss असे माझ्या उंदराला अररररर् मुलाला ओरडले..
हाहाहा ... क्लासेस घेणारे,
हाहाहा ... क्लासेस घेणारे, गाईड लिहीणारे साने गुर्जी
(No subject)
छान
छान
करीअरच्या बाबतीत निरीक्षण छान
करीअरच्या बाबतीत निरीक्षण छान आहे आपलं प्रभूजी!
खरतर या धावपळीच्या आयुष्यात व्यक्ती कधी थांबला ते कळतच नाही! Life is a race! लहाणपणापासून बिंबवलं जातं बालमनावर! मग काय जो घोडा शर्यतीत मागे पडला तो बाद!
प्रत्यक्षात बघायला गेलं तर ही urban lifestyle आणि multinational company मध्ये काम करणारे पालक!
यांच्यामध्ये आहे चढाओढ! एकमेकांशी स्पर्धा मग त्यांच्यामध्ये अहंभाव निर्माण होतो माझा पाल्य अमुक_-अमुक, तमुक-तमुक करतो! फक्त आपला मोठेपणा सिद्ध करण्यासाठी! या रस्सीखेच मध्ये ते विसरून जातात की रस्सी जास्त खेचल्या गेली की ती तूटूही शकते!याला जबाबदार कोण तुम्हीच ठरवा!
आता हि कथा खणून काढण्याचे
आता हि कथा खणून काढण्याचे कारण हे कि सिद्धेश्वर विलास पाटणकर यांची
"अभ्यास केला पण भोकात गेला"
ही घणाघाती कविता.
https://www.maayboli.com/node/79172
लेख आवडला. रोबो बनवायचे
लेख आवडला. रोबो बनवायचे घरगुती लघु उद्योग आता सर्वत्र फोफावलेत.
“ आधी ते क्लास घेत असत. आता त्यांनी बंद केले लोकांना शिकवायचे.”>>>>>
खरतर या धावपळीच्या आयुष्यात व्यक्ती कधी थांबला ते कळतच नाही!!>>>>>>
धावपळ कितीही होत असली तरी व्याकरण चुकवून चालत नाही,मार्क जाणार. व्यक्ती हा शब्द स्त्रीलिंगी आहे. पुरुषाला उद्देशून बोलत असाल तरीही तीच व्यक्ती असा शब्दप्रयोग होतो. तो शब्दच्या जागी ती शब्द कोणी बोलले/लिहिले तर जसे खडे बोचतील तसेच तो व्यक्ती ऐकून/वाचून वाटते.
U write so well!
U write so well!
Sincere request, please dont go on deleting.
मजेशीर
मजेशीर
छान
छान
छान लिहिले आहे. प्रसन्न शैली
छान लिहिले आहे. प्रसन्न शैली आहे तुमची..!
तयारीच्या.......तयारीची तयारी पाहिली आहे.
छान लिहिलयं मजेशीर ... मस्त
छान लिहिलयं मजेशीर ... मस्त
गेल्या आठवड्यात एका
गेल्या आठवड्यात एका स्नेह्यांशी गप्पा झाल्या. त्याच्याकडुन कळलेलं करीअर प्लानिंग...
त्याचा मुलगा यंदा आठवीत गेला. त्याला होम स्कुलिंग करताहेत. म्हणजे इतिहास, भुगोल, समाजशास्त्र, हिंदी, पीटी इत्यादी निरुपयोगी विषय शिकायची गरज रहाणार नाही. शाळा/परीक्षा नसल्यामुळे बाकी विषयांचा देखिल अभ्यास आणि असाईनमेंट्/प्रोजेक्ट मर्यादीत रहाणार.
तर मुलगा बाकलीवाल नावाच्या आयआयटीच्या प्रवेशपरीक्षेची तयारी करुन घेणार्या क्लासला जातो. पुढची पाच वर्ष त्याने फक्त आयआयटीवर लक्ष केन्द्रित करणं अपेक्षित आहे. बाकीचा फाफटपसारा कमी केला गेलेल्याची मुलाला पुन्हा पुन्हा आठवण करुन दिली जातेय.
तुम्ही बाकीचे बसा दहावीचा अभ्यास घोकत, तसंही दहावीच्या मार्कांना कोण विचारतंय सध्या.