झी मराठी वर नुकतीच येऊ कशी तशी मी नांदायला ही नवी मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ८ च्या टाईम स्लॉटवर सुरू झाली. मालिकेचं टायटल साँग सुद्धा बरंच बरं जमलंय कि बघताना मिसेस मुख्यमंत्रीच्या ठसकेदार टायटल साँगची आठवण आल्याशिवाय रहात नाही इतकं ते कॉपी झालंय..!
मालिकेतील लिड स्टारकास्ट अगदीच नवीन परंतु चॅलेंजिंग आहे. स्वीटु (अन्विता फलटणकर) आणि ओंकार (शाल्व किंजवडेकर) हे दोघे या मालिकेचे लिड आहेत तर त्यांना साथ द्यायला खंबीर आधारस्तंभ म्हणुन स्वीटुची आई नलू साळवी (दिप्ती केतकर), ओमची आई शकुंतला खानविलकर (शुभांगी गोखले), ओमची बहीण मालविका खानविलकर (आदिती सारंगधर) आहेत. त्याच सोबत स्विटुचे बाबा, काका, काकू, चुलत भाऊ चिन्या हे सर्व साळवी कुटुंबीय दहा बाय बाराच्या हॉल अन सहा बाय सहाच्या किचन या वन आरके मधे रहात आहेत(हेच घर झीमच्या बर्याच सिरियल मधे या आधिही पहायला मिळालेलं आहे..!)
तिकडे खानविलकरांच्या घरात ओमसोबत त्याचे आई-बाबा-बहीण, त्याची होऊ घातलेली इंडो-अमेरिकन बायको, बहिणीचा होऊ घातलेला नवरा (याला या आधी कुठे बघितला आहे हेच आठवत नाही.. ) अन बहिणीचा ऑफिस कम घरातील चमचा/नोकर असे कलाकार आहेत. खानविलकरांचा व्हिला जबरदस्त आहे. त्यांच्या घराची, अंतर्गत सजावटीची अन समस्त खानविलकर कुटुंबियांच्या ड्रेपरीची रंगसंगती ही फिकट रंगससंगतीत आहे ज्यातुन त्यांच्या रहाणीमानावर गडगंज संपत्तीचा अन हाय क्लास जीवनशैलीचा प्रभाव जाणवतो.
सो मिडलक्लास साळवी कुटुंबीय अंबरनाथ मधे रहात आहेत. कर्मदरिद्री स्वभावामुळे आठराविश्व दारिद्र्य हे त्यांच्या पाचवीला पुजलेले असते (कसे ते कालच्या भागात कळाले.. पुढे सांगतोच..!). या कर्मदरिद्री कुटुंबात सर्वांचे खायचे वांधे झालेले असतात पण दोन्ही साळवी जोड्यांची मुले - स्विटू अन चिन्या हे मात्र खात्या-पित्या घरातले ओव्हरवेट वाटावेत असे कसे हे मात्र न सुटलेलं कोडंच आहे. सगळे साळवी स्वभावाने चांगले असतात त्यामुळे त्यांना कशातच वाईटपणा दिसत नसतो. अगदी बिनकामाचे आयुष्य कंठण्यात देखील त्यांना काहीच वाईट वाटत नसतं. स्वीटूच्या बाबांची नोकरी अगदी पहिल्याच भागातच जाते अन ते हताश होऊन दुसर्या नोकरीसाठी कसलेही प्रयत्न न करता नुसते सुतकी चेहर्याने घरी बसुन असतात. त्यांना साथ देणारी नलू ही अंबरनाथमधे चपात्या बनवून विकत असते. स्विटु कुठेतरी थातूर-मातूर नोकरी करत असते अन या दोघींच्या पैशांवर हे सगळे साळवी आयते गिळत असतात. स्विटूचा काका हा एक नंबरचा आळशी अन फाल्तू कामं करणारा इसम असतो (जो कुठल्याही अँगलने अंबरनाथमधे रहणारा मराठी माणुस वाटत नाही - ठार गुज्जु वाटतो..!) ज्याची बायको दम्याचा रोग घेऊन उसउसत जगत असते अन जावेला (नलुला) पडेल ती मदत करण्याची कसरत करत असते. अशा या माठ काका-काकुचा मुलगा चिन्या हा महामाठ असतो अन गुंडांकडून २ लाख रुपये हारलेला असतो. घरात खरेतर हार्पिकची देखील गरज लागु नये अशी गांजलेली परिस्थिती असताना चिन्याच्या उद्योगाला वैतागून घरात सगळे चिंतेत असतात. हाता-तोंडाची गाठ पडण्याचे वांधे झालेल्या साळवींना खानविलकरांच्या कृपेने देव तारायला बघत असतो.
नलूची बालमैत्रीण शकुंतला खानवीलकर ही मोठ्या हेल्थ केअर प्रॉडक्ट उद्योगाची मालकीण असते. हिने देखील नलूसारखाच संसार रेटत मार्गी लावलेला असतो. तिची मुलगी - मालविका ही हाय क्लास सोसायटीची प्रतिनिधी असते अन तिचे विचार शकुला (ती स्वतःच्या आईला ''आई'' असं न म्हणता मिसेस खानविलकर म्हणत असते यावरून त्यांच्या नात्याची कल्पना येऊ शकते..!) आजिबात पटत नसतात. मालविका अजुन अविवाहित असते पण तिचा होऊ घातलेला नवरा - रॉकी कायम तिच्या आगेमागेच असतो अन पडेल ती कामे करत असतो. त्याला जिमचे खूप वेड असते.
नलू-शकु ची मैत्री या दोन कुटुंबियांना जवळ आणते. शाळेत असताना नलूच्या घरची परिस्थिती उत्तम अन शकूच्या घरी खाण्याचे वांधे असतात. काळानुसार परिस्थिती बदलली परंतू दोघींच्या घट्ट मैत्रीत त्या बदललेल्या परिस्थितीचा लवलेशही नाही हे आईसोबत एकदा साळवींच्या घरी आलेला ओम बरोब्बर हेरतो. साळवींच्या दळभद्री आयुष्याची कणव येऊन चांगल्या मनाचा ओम त्यांना चकल्या-शेव-शंकरपाळ्या अस्ल्या ऑर्डरी मिळवून देऊन ४ सुखाचे घास खाऊ घालण्याचे पुण्य पदरात पाडून घेतो. त्याला नलू मावशी अन साळवींबद्दल नितांत आदर असतो.
असा हा ओम्या मनाने अन रुपानेही खरंच खूप चांगला असतो. त्याच्या चांगुलपणावर जाडी अन मनमिळावू स्वीटु भाळते. तिचा सर्वांची काळजी घेणारा, कामसू स्वभाव शकुलाही खूप आवडतो अन ती परिस्थितीने (खरेतर कर्मदरिद्रीपणामुळे) गांजलेल्या साळवींना अजून थोडी मदत व्हावी या हेतुने स्वीटुला 'खानविलकर हेल्थ प्रॉडक्ट्स'च्या बिझनेस युनिट मधे नोकरीला बोलावते. एवढेच नव्हे तर स्वतःच्याच बंगल्यात रहायला सांगते. शकुच्या मुलीला - मालविकेला मात्र हे आवडत नाही अन ती स्विटूला भयंकर पिडू लागते. मालविकेने भावासाठी एक माठ इंडो-अमेरिकन मुलगी (मोमो) शोधलेली असते जिचे पिताश्री एक वेलनोन बिझनेस टायकून अन ६०० करोड की कायशा संपत्तीचे मालक असतात. त्यावर डोळा ठेऊन मालविका ही मोमो-ओम्याची सोयरीक जुळवण्याच्या प्रयत्नात असते अन ती मोमोला सतत सोबत घेऊन तिला काय हवं काय नको याची काळजी घेत असते. तर अशा या इंग्रजाळलेल्या कम भंजाळलेल्या अतार्कीक मोमोची अटेंडंट म्हणुन स्विटूचे वर्णी लागते.
त्यानंतर एकेदिवशी शकू अन ओम्या साळव्यांना थोडा चेंज म्हणुन स्वतःच्या व्हिलात पाहुणचारासाठी बोलावतात. या भेटीत साळाव्यांच्या कर्मदरिद्रीपणाच्या कडक आवरणाखाली खळाळणार्या चांगुलपणाची झलक ओम्याला दिसते. आपल्या कुटुंबियांना शकु मावशीने अन ओम्याने चांगला पाहुणचार दिला हे बघून स्विटूही सुखावते. त्याचवेळी मालविकाला व्हिलाची धर्मशाळा झाल्याचा संताप अनावर होऊन ती साळव्यांना सळो की पळो करून सोडते. साळव्यांना त्यांची जागा दाखवायचा प्रयत्न करते परंतु साळवे इतके इतके नतद्रष्ट असतात की त्यांना त्यांची जागाच माहित नसते . त्यामुळे मालविकेकडून साळवी यथेच्छ सळो-की-पळो करून घेतात . शेवटी हायक्लास असलेल्या ३ मैत्रीणींना बोलावलेल्या जंगी(?) पार्टीत मालविका साळव्यांना अपमानीत करु लागते त्यावेळी लेकीचे प्रताप हताशपणे पहात उभ्या असलेल्या शकूला स्विटूची साथ मिळते अन मालविकेचा डाव तिच्यावरच उलटवत थोड्या विनोदी अंगाने तो कसनुसा प्रसंग अन साळव्यांचा खानविलकर व्हिला मधला स्टे एकदाचा संपतो अन आपणाला हुश्श वाटतं.
खरं सांगायचं तर पहिले काही भाग अतिशय बाळबोध वाटत होते परंतु त्यात पुढील भागांची बिजं खुबीने पेरण्यात दिग्दर्शकाला यश आलं. जाडी स्विटु अन शेलाटा ओम्या यांचं कसं काय बुवा जमणार. कैच्या कै सिरियल दिसते असं वाटत असतानाच स्विटू अन ओम्या आपल्याला आवडू लागतात यात दिग्दर्शन, संवादलेखन अन कॅमेर्याचाही हात आहे.
दिप्ती केतकर यांनी नलूच्या गेटअपवर खरेच खूप कष्ट घेतले आहेत. त्या अगदी नलूच वाटतात इतकं बेअरिंग त्यांनी पकडलं आहे त्याबद्दल त्यांचं विषेश कौतुक..! शुभांगी गोखलेंची शकू देखील अगदी सफाईदार आहे. मालविकेचं कॅरेक्टर लाऊड आहे पण आदिती सारंगधरने ते बरोब्बर साधलं आहे. अन्विता फलटणकर अन शाल्व किंजवडेकरचे स्विटू-ओम्या अगदी पर्फेक्ट आहेत असं जाणवतं याचा अर्थ त्यांची केमिस्ट्री चांगलीच जुळली आहे. झी मराठीवर असं जाडं-शेलाटं प्रकरण पहिल्यांदाच आल्यामुळं काहीतरी नवीन आहे या उत्सुकतेपोटी आपण त्यात गुंतू लागतो. आपल्याप्रमाणे शकूला पण स्विटूच ओम्यासाठी योग्य वाटू लागते जेणेकरून खानविलकरांच्या घराला घरपण देण्यासाठी (डि.एस.कें.च्या घरांना डावलून ) एक चांगली सून मिळेल हे त्यामागचं कारण असतं.
स्विटू अन ओम्याच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन शकु अंबरनाथच्या चपातीवाल्या साळव्यांच्या घरी मिठाईचे बॉक्स अन भेटवस्तू घेऊन पोचते. किचन ओट्याशी थांबून अगदी आनंदात शकू-नलू या घट्ट मैत्रीणी स्विटूच्या लग्नाबद्दल सेम पिंच सेम पिंच करत बोलत असतात. नलू-शकूची मैत्री त्या दोघींच्या मुलांना बांधतेय असं वाटत असतानाच कर्मदरिद्री साळव्यांची नलू बावळटासारखी शकूसमोर स्वतःचा फोन धरत त्या फोन मधे कुणा स्थळाचा फोटो दाखवत हे स्थळ स्विटूसाठी किती योग्य आहे ते दाखवते अन ते बघून आपलीही अवस्था शकूसारखी (काय ही नली दलिंदर आहे बघा.. कुबेर शकुच्या रुपाने नलीच्या पदरात आपले धन टाकू पहात आहे अन ह्या कर्मदरिद्री नलीचा पदर फाटका रे बाबा..!!) होते. शकू आवंढा गिळत नलीच्या हो ला हो-हो (हे शुभांगी गोखलेंना नेहमी छानच जमतं ) करत रहाते अन आपण मात्र दळभद्री नलीला लाखोल्या वाहत उद्या पासून नकोच बाबा ही येऊ-कशी-तशी असा विचार करतो खरा पण 'आज काय होणार?' ही उत्सुकता पुन्हा उद्या रात्री ८ वाजता आपली बोटे रिमोटवरील १२०४ हा आकडा दाबून आपला मोर्चा झी मराठीकडेच वळवणार हे माहित असुनही उद्याचा प्रीकॅप बघून झाला की आजच्या पुरतं तरी आपण चॅनेल बदलतो.
अशा या नवीन सिरियल वर चर्चा करण्यासाठी हा धागा थोडा उशिराच उघडला असला तरी सिरियलची खरी सुरुवात तर आजच्या भागापासून होणार आहे
थँक्स dj
थँक्स dj , नेहमीप्रमाणे धम्माल अपडेट
(No subject)
कुठल्या ढाब्यावर extra दाढी
कुठल्या ढाब्यावर extra दाढी-मिशा ठेवलेल्या असतात काय माहिती. अगदी आमच्या ढाब्यावर या, दाढीमिशा लावा आणि ढाबा तुमचाच आहे असं वावरा. तुमच्या दुश्मनाला फ्रीमधे फटकवून देऊ.
एवढी आईला घाबरून मोहितशी लग्न करायला निघालेली स्विटू एवढी रात्र झाली तरी आरामात आहे, भटकतेय. आई ओरडेल वगैरे काही गावी पण नाही तिच्या.
DJ :))
DJ :))
स्वतःला सरदारजीच्या गेटप मधे
स्वतःला सरदारजीच्या गेटप मधे घालून उल्ल्लुला ओम्या बनवू लागते >>> हा हा हा....
डी़जे , मस्त लिहिलय.....
"येउ तशी कशी मी नांदायला ?"...असेच सिरीअल चे नाव असल्याने स्वीटु लग्न होउन नांदायला जाण्यासाठी बहुतेक सिरीअल चा शेवट उजाडेल..
खरतर स्वीटु ने लवकर नांदायला गेलेले बरं पडेल दिग्दर्शकाच्या दृष्टीने म्हणजे एकाच सेटवर सगळा गोंधळ घालता येइल....एकदा खान्विलकर व्हिला, एकदा चाळ , एकदा ऑफिस असा गोंधळ नको....
बाकी स्वीटु पहिल्या एपिसोड पेक्षा जरा बारीक दिसतेय असं मलाच वाटतय की अजुन कोणाला वाटतय.... ? तिचं पुर्ण मेकओव्हर वगैरे करायची महत्वकांक्षी योजना नाही ना या लोकांची ?
एवढी आईला घाबरून मोहितशी लग्न करायला निघालेली स्विटू एवढी रात्र झाली तरी आरामात आहे, भटकतेय. >>
स्वीटु चं घाबरणं खुप सिलेक्टीव्ह असतं...जेव्हा समोरच्याला भिडायचं तेव्हा मुग गिळुन गप्प बसते....आणि जेव्हा गरज नाही तेव्हा समोरच्या माणसावर डाफरत असते.....नक्की कशा स्वभावाचं तिचं कॅरॅक्टर उभ्म करयचं आहे ते लेखक आणि दिग्दर्शक दोघाना पण कळलं नाहिये..
स्वीटू चे काम करणारी अन्विता
स्वीटू चे काम करणारी अन्विता हिचे close शॉट्स घेतात ते खूप विचित्र अँगल्सने घेतात. म्हणजे तिचे तोंड उघडे असताना किंवा हसताना सर्वात वाईट कॅमेरा अँगल असतो. अजून कोणाला वाटतं का तसे ? स्क्रीन प्रेझेन्स सुधारण्यासाठी तिने तरी मेहनत केली पाहिजे किंवा कॅमेरामन तरी झोपा काढतो.
https://www.instagram.com/p
https://www.instagram.com/p/CPiqRYjhNaK/
(No subject)
(No subject)
सर्वात प्रथम उशिरा प्रतिसाद
सर्वात प्रथम उशिरा प्रतिसाद देतो आहे त्याबद्दल क्षमस्व!
Airport वाला सीन कायच्या काय होता! अवघी काही दिवसांपूर्वी गाडी घेतलेली असून देखील चिन्याला, स्वीटूला व्यवस्थित चालवता येते! अगदी अंबरनाथ ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (विलेपार्ले) हा हायवेवरचा प्रवास सुद्धा ते सफाईदार पणे करतात. वाटेत कुठे गाडी बंद पडते तिथून स्वीटू धावत विमानतळापर्यंत येते, पण तिला फारसा घाम येत नाही! विमानतळाच्या प्रवेशद्वारावर X-ray baggage scanner, Door Frame Metal Detector आदी काहीही नाही. नाकाबंदीमध्ये अडवणारा पोलीस, विमानतळाच्या प्रवेशद्वारावरील पोलीस यांना दाढी वाढवण्याची विशेष परवानगी पोलीस खात्याने दिलेली आहे!!! शिवाय स्वीटू विमानतळाच्या आवारात आत-आत गेली तरी बाहेर असलेल्या चिन्या आणि रॉकीला दिव्यदृष्टीने दिसत असते! स्वीटू विमानतळावर गेल्यावर थेट announcement room मध्ये जाते. (आपल्याला साधे २-४ platforms असणाऱ्या रेल्वे स्टेशनची announcement room कुठे आहे ते माहीत नसले तरीही स्वीटूला मात्र एवढ्या मोठ्या(!) विमानतळाची खडानखडा माहिती असते!) ती तिथे गेल्यावर थेट तिथला माईक घेऊन ओमशी संवाद साधते. 24x7 सुरु असणाऱ्या विमानतळावर desk mic न वापरता hand held mic वापरतात हे झी मराठीमुळेच कळले! विमानतळासारख्या क्षेत्रात घुसखोरी करणे, announcement (PA) system चा ताबा घेणे यांसारखी कृत्ये करूनही स्वीटूवर ‘शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा’ दाखल होत नाही. (आपण मात्र आपली स्कूटर tow करण्यास विरोध केला तरी आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो!!)
आणि सर्वात सर्वात महत्वाचे म्हणजे ओम, स्वीटू, चिन्या, रॉकी, नाकाबंदी-विमानतळावरील पोलीस, विमानतळावरील इतर प्रवासी, ढाब्यावरील लोक आदी सगळ्यांनाच ‘मास्क’ बंधनकारक नाही! (की खानविलकरांच्या घराच्या आवारातच विमानतळ आहे त्यांचे स्वतःचे???)
कुठल्या ढाब्यावर extra दाढी-मिशा ठेवलेल्या असतात काय माहिती. Uhoh अगदी आमच्या ढाब्यावर या, दाढीमिशा लावा आणि ढाबा तुमचाच आहे असं वावरा. तुमच्या दुश्मनाला फ्रीमधे फटकवून देऊ.>> +११११११११११११
शरद साळवींची एन्ट्री झाली हो.
शरद साळवींची एन्ट्री झाली हो.......!!!!
स्वीटूला जे पैसे मोहितने दिले
स्वीटूला जे पैसे मोहितने दिले, जेवणात काहीतरी टाकण्यासाठी ते पैसे तिने बहुतेक त्या सरदारजिना दिले, मोहितला मारण्यासाठी. ऐतिहासिक क्षण उडी मारण्याचा बघितलेला नाही, झी पाच वर बघेन. इथे वाचून काहे दिया परदेस मधला गौरीचा ऐतिहासिक डान्स (उर्फ उडी) आठवला, शिव दहीहंडी फोडतो तेव्हाचा.
शरद साळवींची एन्ट्री झाली हो.
शरद साळवींची एन्ट्री झाली हो.......!!!!>> खरंय... महामाठ काका आला एकदाचा..! यांची क्रिएटिव्ह टीम आपला धागा वाचते की काय अशी शंका येते हल्ली
काल ठरल्याप्रमाणे पुन्हा एकदा त्या ओम्या-ष्वीटुचा साळव्यांच्या घरासमोरच उबग आणणारा अंगचटी रोमान्स पहायची शिक्षा उपभोगत असताना माठ चिन्या येऊन सर्वांची शिक्षेतून मुक्तता करतो. साळव्यांच्या घरासमोर कसनुसं तोंड केलेल्या ओम्याच्या अंगचटीला येणारी गळ्याला वळ्या पडलेली ष्वीटू कुणालाच कसे दिसले नाहीत हा प्रश्न पडतोच. पण असो. माठ चिन्याने शिताफिने ओम्याला बाहेरच्या बाहेर कटवून स्वीटूला घरात नेले तेव्हा केस पिंजारलेली नली घुशीसारखी करवादत हॉलमधे इकडून तिकडे फेर्या घालत असते. दादा साळवी कॉटवर बसून नलीकडे बघत असतात अन महामाठ काकू डायलॉग्स नसल्यामुळॅ उगीच तोंडाला उपडी बोटं लावून काहीतरी अॅक्टिंग केल्याचा केवीलवाणा प्रयत्न करत असते.
माठ चिन्या अन स्वीटू घरात आल्यावर पिंजारलेल्या केसाची नली चवताळते अन दोघांच्या अंगावर धावू लागते.. ते दोघे दादा साळवीना मधे ठेऊन पळू लागतात अन नली त्यांच्या मागे. दात ओठ खात नली माठ चिन्याला पकडते अन कुठे गेले होते म्हणुन विचारते तर चिन्या तिला ते दोघे त्याच्या बाबांना (महामाठ शरद काका) आणायला स्टॅशन वर गेले होते असं सांगतो. पण त्याचे बाबा कुठं आहेत असं विचारल्यावर तो महामाठ बाबा या स्टेशनवर उतरायचं सोडून पुढच्या स्टेशन वर उतरले असं सांगतो अन नलीला ते पटतं (दळभद्रीपणाचं लक्षण.. दुसरं काय..!!). मग महामाठ काकूच चिन्याला धोपटू लागते खरं खरं सांग म्हणुन तेवढ्यात महामाठ शरद साळवी दारात दत्त म्हणुन हजर होतात.. अन मग साळव्यांच्या घरातला माहोल असा काय बदलतो की बस्स..!! नलीला एवढा आनंद होतो की स्विटू अन चिन्या तिच्याशी कधी खोटं बोलुच शकत नाहीत ही काळ्या दगडावरील रेघ ठरावी. स्वर्ग दोन अंगुळे राहिलेली नली, दादा साळावी, महामाठ काकू, महामाठ काका, माठ चिन्या अन चोरी पकडली गेली नाही म्हणुन गाल गुलाबी झालेली ष्वीटू असा सगळा आनंदी आनंद होतो.
साळव्यांच्या घरात हे नेहमी असंच होत असतं म्हणुन ते कितीही माठ असले किंवा दळभद्री असले तरी रोज काय चाल्लंय हे बघायला तिथं डोकवावंसच वाटतं.
मग स्विटू आणि ओम्याचा जागेपणी स्वप्नं पहाण्याचा (स्वप्नरंजन) कार्यक्रम सुरु होतो आणि डायरेक्टरच्या हव्यासापोटी ओम्याला उघडा बघण्याची भयंकर शिक्षा सर्वांना मिळते. सुका बोंबील ओम्याला असं उघड्याने बघावं लागतं..... तो खुशीत त्याच्या सर्व्हंट्सना २ दिवसाची पगारी सुट्टी अन या वर्षासहित पुढील वर्षांचा बोनस पण जाहीर करतो. कम्माल आहे की नाही बघा...
चिडलेली तायडा ओम्या अन स्विटूला वेगळं करण्यासाठी आता काय पावलं उचलतेय ते आज कळेल.
सगळ्याच प्रतिक्रिया
सगळ्याच प्रतिक्रिया
स्वीटू चे काम करणारी अन्विता हिचे close शॉट्स घेतात ते खूप विचित्र अँगल्सने घेतात. म्हणजे तिचे तोंड उघडे असताना किंवा हसताना सर्वात वाईट कॅमेरा अँगल असतो. अजून कोणाला वाटतं का तसे ? >>> हो, भीतीदायक किंवा चक्क वेडी दिसते ती
स्त्री पात्र साकारणा-या
स्त्री पात्र साकारणा-या पुरुषासारखी दिसते ती कधी कधी आणि ओमु बायकी एक्सप्रेशन्स देतो.
महा पिझ्झा- पुराण. काय तरी
महा पिझ्झा- पुराण. काय तरी बाई. आज स्विटूचं विकट हास्य बघायला मिळालं. ओम मागून हाक मारतो तेव्हा.
गाडी विकत घ्यायला गिर्हाईक रस्त्यावर बसूनच होतं बहुतेक आणि बांगड्या परत मिळाल्या, यांच्याकडे लॉकडाऊन वगैरे नाही का? इथे आम्हाला साधा बिस्किटचा पुडा मिळेना.
DJ
DJ
DJ
DJ
कालच्या भागात ओम्या स्विटूच्या जोडीने मठ्ठ काका काकीचा पण रोमान्स सुरु झाला तेव्हा दिग्दर्शक बधीर झाले असावेत अशी शंका आली होती, ती आज त्यांनी साळवी कुटुंबाला पुरणपोळी पिझ्झा खायला घालून सार्थ ठरवली.
एक तर ते आधीच्या चित्रपट किंवा मालिकेतील चोथा झालेल्या प्रसंगांची पुनरावृत्ती करतात किंवा अशी माती खातात.
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/CPNGgDAA96A/?utm_medium=copy_link
शुक्रवार - शनिवार पुन्हा एकदा
शुक्रवार - शनिवार पुन्हा एकदा नलीचा दळिंदरपणा बघण्यात गेला. ज्या तायडाने हिला अन हिच्या उभ्या साळवी परिवाराला शिरेल सुरु झाल्यापासुन दर पंधरवड्याला धू-धू धुतलंय.... यथेच्छ अपमान करून पुन्हा हंबरणाथच्या चाळीत पाठवलंय तरी त्या तायडाच्या जाळ्यात हे दळभद्री साळवी नेहमीच अडकत आलेले आहेत.. आताही वाघिणीच्या जबड्यात स्वतःहुन मान द्यायला दळिंदर नली तिच्या पती अन कन्यारत्नासहित तयार झाली याचं आजिबात आश्चर्य वाटलं नाही.
तर गेल्या आठवड्यातला गोड-गुलबट-अंगचट येणारा जाड्या-रड्याचा प्रणय बघून आपण जसे उबगलो होतो तशीच तायडा देखील. काहीही झालं तरी स्विटूचं ओझं ओम्याच्या खांद्यावरून उतरून पुन्हा हंबरणाथच्या चाळीत फेकून देणार हे आता ओघाने आलंच. त्यासाठी तायडा आधार घेते ओम्याच्या पुरणपोळी बनवण्याच्या प्रयत्नाचा. स्विटूला पुरणपोळी द्यायला निघालेल्या ओम्या अन रॉकीच्या प्रयत्नांना तायडा मदत करते असं दाखवते अन पुरणपोळी ऐवजी पुरण-पिझ्झा साळव्यांच्या दारी पोचतो. तो अनपेक्षित पिझ्झा आलेला बघून समस्त साळवी चक्रावतात गोड पिझ्झाचा एकेक तुकडा तोंडात घालतात. महामाठ काकू या तुकडा उचलू शॉटमधे देखिल ३-३ वेळा "इश्श-इश्श" करुन वात आणते (हिची बोटं पिरगाळली पाहिजेत..!) हे पिझ्झा प्रकरण संपता संपता लगेहाथ गाडी विकून आलेल्या पैशांतून नलीच्या गहाण ठेवलेल्या सोन्याच्या बांगड्या सोडवून घेऊन आलेले दादा साळवी त्या नलीला परत करतात अन फुटेज खायला नली त्या सोन्यांच्या २ बांगड्यांपैकी एक महामाठ काकूच्या हाती घालते.. वाह..! काय ते प्रेम..!! या प्रेमात आंधळॅ होऊनच यांचा दळभद्रीपणा खपून जातो. नशिब महामाठ काका काहीही फुटेज खात नाही अन्यथा त्यावर २-४ वाक्यं लिहावी लागली असती
दुसर्या दिवशी सकाळी २९७... २९८... २९९... सुरू असतं तेंव्हाच नलीचा फोन वाजतो अन पलिकडे तायडा असते. तिचा आवाज ऐकुन नली चेमटते पण लगेच उसनं अवसान आणुन "अजुन काय अपमान करायचा राहिलाय का?" असं तिनं विचारल्यावर एखाद्याला ही बया अजुन किलोभर अपमान पदरी घ्यायला तयार आहे असंच वाटावं..!! मग तायडा तिच्या अगदी सोफेस्टिकेटेड व्हँपगिरिचे धडे गिरवत ओम्याच्या दिर्घायुष्यासाठी तिच्या घरी पुजा मांडली आहे अन मि. खानविलकर (शकू आई) घरी नसल्याने मोठं माणुन म्हणुन नलिने घरी यावं असं आर्जव करते. नली काही तायडाच्या बोलण्याला बधत नाही अन फोन ठेवते तेव्हा महामाठ काकू ओम्याच्या चांगुलपणाचे गुण गात नलीला खानविलकर व्हिल्यात जायला भाग पाडते. सोबत म्हणून नली दादा साळव्यांना अन माठ चिन्याला नेऊ शकली असती. पण नाही.. दळभद्रीपणा अंगी मुरला असल्याने ती दादा साळव्यांसोबत ष्वीटूला नेते
तिथं व्हिल्यात गेल्यावर मग तायडा पुढचं जाळं विणायला घेते अन नलीच्या पायावर डोकं ठेऊन माफी मागते. ओम्याला आजही सुका बोंबील उघडा बघण्याचा भयंकर प्रसंग येतो ( ओम्याचं कास्टिंग काऊच तर सुरू नाहीये ना अशी शंका येऊ लागली आहे सध्या...!!) अन आपली दलिंदर नलीच त्याला उघडा करण्याचं शिवधनुष्य हाती घेते हे बघून हसावं की रडावं तेच कळेनासं होतं.
आता आजच्या भागात तायडाने विणलेल्या जाळ्यात नली अडकणार अन तायडा साळव्यांना पुन्हा एकदा अपमानित करून हंबरणाथला पाठवणार असं वाटतंय... बघुया आज काय होतंय ते.
स्वर्ग दोन अंगुळे राहिलेली
स्वर्ग दोन अंगुळे राहिलेली नली, दादा साळावी, महामाठ काकू, महामाठ काका, माठ चिन्या अन चोरी पकडली गेली नाही म्हणुन गाल गुलाबी झालेली ष्वीटू असा सगळा आनंदी आनंद होतो. >>>>>>>>> हि सिरीयल जेव्हा सुरु झाली होती तेव्हा सुद्धा असेच कुठल्याश्या फुटकळ कारणाने सगळे दळभद्री साळवीज खुश होतात आणि चक्क गाणे गाऊन आपला आनंद साजरा करतात (सगळे नाचतात बरे का हातात हात घालून) पुढील गाणं गाऊन "पैशाचं झाड , झाडावरचे पैसे" https://www.zee5.com/tvshows/details/yeu-kashi-tashi-me-nandayla/0-6-312...
ते सगळं बघून मी सिरीयल बघू कि नये या संभ्रमात पडले होते।
आताही वाघिणीच्या जबड्यात
आताही वाघिणीच्या जबड्यात स्वतःहुन मान द्यायला दळिंदर नली तिच्या पती अन कन्यारत्नासहित तयार झाली >>>>>तिला वाघीण नका म्हणू सायको आहे ती .
ते सगळं बघून मी सिरीयल बघू कि
ते सगळं बघून मी सिरीयल बघू कि नये या संभ्रमात पडले होते।>> तरीपण शिरेल बघत आहातच ना अजनबी..? हे असंच झालं माझं पण... साळव्यांच्या दळभद्रीपणात देखिल एक प्रकारचा गोडवा आहे हो..
तिला वाघीण नका म्हणू सायको आहे ती .>>
हो ते तर आहेच, पण रोज बघायची
हो ते तर आहेच, पण रोज बघायची मी चूक करत नाही त्यासाठी तुमचे अपडेट्स वाचते किंवा चॅनेल चेंज करताना डोळ्यापुढे हे दिसले तर कळून चुकत कि काय चालले असेल ते (शेवटी रामायणाची पारायणेच चालली असतात त्यामुळे कुठूनही बघा सगळी लिंक लागते बघा ).
शेवटी रामायणाची पारायणेच
शेवटी रामायणाची पारायणेच चालली असतात त्यामुळे कुठूनही बघा सगळी लिंक लागते बघा>> ++++++१११११११
(सगळे नाचतात बरे का हातात हात
(सगळे नाचतात बरे का हातात हात घालून) पुढील गाणं गाऊन "पैशाचं झाड , झाडावरचे पैसे" >> आत्ता पहिलं हे मी...भयंकर ह ह पु वा आहे... वेडे च वाटतात सगळे त्यात...
साळवी थोडे वेडेच आहेत म्हणा..
साळवी थोडे वेडेच आहेत म्हणा.. नाही असं नाही.. पण त्यांच्या वेडेपणात एकमेकांप्रती जे प्रेम, माया, आपुलकी आहे त्यामुळे त्यांचा वेडेपणा आणि दळभद्रीपणा खपून जातो असं मला वाटतं. तायडा आता साळव्यांच्या एकमेकांप्रती असणार्या याच प्रेम, माया अन आपुलकी नामक गंडस्थळावर अंकुश मारणार असं म्हणतेय... आता बघुया तायडा हे करू शकते का ते..!!!
शकुच्या जीभेला सिलेक्टिव गाठ
शकुच्या जीभेला सिलेक्टिव गाठ बसते बहुतेक. सायको बाई एवढी सतवतेय, धमकवतेय ते सरळ सांगायचं ना सगळ्यांना. ते नाही, "अहो आपल्याला उशीर होतोय, निघूया आपण" हे वाक्य ६-७ वेळा तरी बोलली. मठ्ठ.
बाकी स्विटू आणि ओमचं 'रोमॅन्स' टाइप्स जे काही आहे ते पचनीच पडत नाही. तो तिच्यापुढे अत्यंत बालीश वाटतो.
लठ्ठ हिरॉईन आणि हॅंडसम हन्क हिरो अशा सिरियल आधीपण होऊन गेल्यात की. सोनीवर लागायची 'माही वे', त्यात ती माही स्विटूपेक्षा जाड होती असेल आणि तिचे दोन्ही हिरो एकदम भारीवाले हँडसम होते. ते odd नव्हतं, हे आहे.
डीजे भारी अपडेट. ती उडी
डीजे भारी अपडेट. ती उडी पाहिली. केस पिंजारलेली नली हे फार ग्रेट.
@अमा - धन्स
@अमा - धन्स
---------------------------------
कालचा भाग नलीच्या दळभद्रीपणात अक्षरशः वाहून गेला. किती दळभद्रीपणा करावा त्यालाही काही मर्यादा असतात. मी चिन्मयी म्हणतात त्याप्रमाणे नलीच्या जिभेला सिलेक्टिव गाठ बसते . तरिही महामाठ काका अन महामाठ काकी नली, दादा साळवी अन ष्वीटू घरी नसताना बरे वागतात हे पुन्हा एकदा दिसलं. कदाचित नलीचे पिंजारलेले केस बघून या दोघांत आपोआप महामाठपणा शिरतो की काय अशी शंका येते.
कालच्या भागाची सुरुवात खानविलकर व्हिल्यात होते अन भडजी पुजा आटोपून घरी जातो. मग इन-मिन-सहा माणसांच्या तीर्थ-प्रसादाची धावपळ सूरू होते. नलीने मस्त शिरा बनवलेला असतो त्याच्या वासावरून रॉकीच्या तोंडाला पाणी सुटतं. ओम्या अन स्विटूचं अंगचट येणं पण सुरूच असतं. दादा साळवी असून नसल्यासारखे. मग काय..! आयत्या चालून आलेल्या संधीचा फायदा तायडा न उठवेल तर काय.. ती नलीला जिन्यात गाठते अन तिच्या स्विटूचं ओम्याशी सूत जमलंय हे ऐकवते तेव्हा नली दळभद्रीपणाचा आव आणत "छे..छे.. असं काही नाही... उलट ओमचं स्विटूचं एकतर्फी प्रेम आहे... स्विटुचं असं काहीही नाही.." वगैरे आपण त्या गावचंच नाही हे दाखवते. आतून भयंकर चिडलेली तायडा नलीला वर वर गोड पण अतिशय लागेलंसं बोलत जिन्यावरून खाली ढकलण्याचा अन त्याचवेळी सावरण्याचा भितीदायक प्रयत्न करते अन नलीच्या तोंडचं पाणी पळवते. नलीच्या डोळ्यात स्विटुविषयी आत्यंतीक काळजी, तिच्या भविष्याची भिती (म्हणजे स्विटू सून म्हणुन इथे व्हिल्यात आली तर जिन्यात ढकलली जाईल वगैरे..) अन तायडाच्या गोड आर्जवाने पुन्हा एकदा व्हिल्याची पायरी चढून केलेली घोडचूक या सर्वामुळे नलीचं नाक लाल-गुलाबी होतं अन ती तायडाच्या हातून सुटत दादा साळवी अन स्विटूला घेऊन हंबरणाथला जाण्यासाठी पळत खाली येते.
नली लगबगिने खाली हॉल मधे येते तर उघड्या ओम्याला कुर्ता नीट घालता घालता येत नसतो म्हणुन ष्वीटू त्याला कुर्ता घालण्यासाठी मदत करत असते हे तिला दिसतं अन कॅमेरा स्लो मोशन मधे ओम्याच्या खांद्याची हाडं, छातीच्या बरगड्या अन जन्मखुणा दाखवत त्याला कुर्ता घालणार्या स्विटूचा लाजेने सुजलेला चेहरा तसेच त्या पाठमोर्या दोघांकडे मागून लाल-गुलाबी नाकाने भयंकर काळजीने बघणारी नली दाखवत रहातो... तेवढ्यात दमदार पावलं टाकत तायडा येतेच अन नलीच्या कानामागे कुजबुजत लेकीचे प्रताप बघ असं सांगते तेंव्हा एकीकडे तायडाच्या चेहर्यावर प्रचंड कुत्सितपणा अन नलीच्या चेहर्यावर आभाळ कोसळल्याची भिती स्पष्ट दिसते. मग ओम स्विटूला काहीतरी दाखवण्यासाठी त्याच्या खोलीत घेऊन जातो अन मागून नली त्या दोघांना थांबवणार तेवढ्यात तायडा नलीच्या खांद्यावर बोटं रुतवत पुढील डोस देऊ लागते.
मग फॉर अ चेंज एडिटर आपणाला तिकडे हंबरणाथच्या घरी नेतो तर तिथं काळजीत पडलेला महामाठ काका अन महामाठ काकी घरातील आर्थिक स्थितीवर बोलत असतात. आपण दादा आणि वहिनिला मदत करायला हवी अस त्यांच्या बोलण्याचा सूर असतो. तेवढ्यात माठ चिन्या भूक-भूक करत तिथं पोचतो तेंव्हा काकी त्याला नुसतं खादीचं बघण्यापेक्षा जरा कामधंद्याचं बघ असं सुनावते ते बघून बरं वाटतं.. (नली, दादा साळवी अन स्वीटू घरी आले की यांचा अव्याहत माठपणा पुन्हा सुरुच होणार हेही आपल्याला कळलेलं असतंच..!)
मग असा थोडा चेंज मिळाल्यावर आपण रिलॅक्स होतो न होतो तोच एडिटर पुन्हा आपणाला व्हिल्यात आणुन सोडतो तर तिथं ओम्या स्विटूला बदामाचं पेंडंट असलेली चेन देत अंगचटी येत असतात. ते पेंडंट म्हणजे ओम्याचं हृदय आहे अन ते स्वीटूने काळजीने जपावं असं तो तिला सांगतो त्यावर स्वीटूपण ते हिर्यांनी कलाकुसर केलेलं सुवर्ण हृदय स्वतःच्या जिवापेक्षा जास्त जपेन असं सांगते (ते तर जपायलाच हवं... हरवलं-बिरवलं तर रहात्या घरासहीत सहाच्या-सहा साळवी विकले तरी किंमत वसूल होणार नाही..!!). मला वाटत होतं की नली तिथं टपकेल अन ओम्याच्या मिठित विसावलेल्या स्विटूला फरा-फरा ओढत घरी घेऊन जाईल पण तसं काही होत नाही.
नली नेहमीप्रमाणे तोंडाला बोटं लावत ग्यानमुढ्यासारखी हॉलमधेच इकडे-तिकडे करत दादा साळव्यांच्या मागे घरी जायची भूणभूण लावत असते अन हे सर्व तायडा अगदी आसुरी आनंद घेत पहात असते. तेवढ्यात तिथं स्विटू अन ओम्या येतात अन नली जास्तच पिसाळल्यासारखी घरी जाउयाचा घोशा लावते. तरिही प्रसाद घेण्याच्या बहाण्याने तायडा नलीला सत्यनारायणाच्या पुजेवर पाया पडायला लावते. दादा साळावी ५ रुपये दक्षिणा वहातात तेव्हा तायडा नलीकडे "भिक्कारडी" असा कटाक्ष टाकते. नली अन दादा साळव्यांनंतर तायडा अन रॉकीचा जोड पुजेवर फुलं अन दक्षिणा ठेवतात. तब्बल ५०१ रुपयांची दक्षिणा वहात तायडा नलीकडे एक नजर टाकून लेव्हल दाखवून देते तेव्हा नली पुन्हा एकदा थिजून जाते अन दादा साळव्यांच्या मागे घरी जाण्याचा तगादा लावते परंतु मग स्वीटू अन ओम्या पुजेच्या पाया पडायला लागतात अन त्यांचे चाळे दिसू नयेत म्हणुन रॉकी त्यांच्या मागे उभा रहातो. शेवटी कशीबशी स्विटू पुजेच्या पाया पडून अन ओम्याशी जुगलबंदी करून उठते तेव्हा नली पुन्हा एकदा घरी जायचा धोशा लावते तेवढ्यात तायडाला ऑफिस मधून फोन येतो अन सर्वांना चरफडत तिचं फोन वरचं बोलणं संपण्याची वाट बघत बसावं लागतं. दादा साळवी तर थेट सोफ्यावर रेलून वाट बघत बसतात. मग तायडाचं फोन पुराण संपतं अन ऑफिसमधे अकाऊंट डिपार्टमेंट्ने घातलेला घोळ याबद्दल बोलु लागते. दादा साळावींना ३० वर्षांचा अकाऊंट विभागतला अनुभव आहे हे ऐकुन त्यांना ती लेजर दाखवते तर बसल्या बसल्या दादा साळवी खानविलकर ग्रुपला ६ लाखांचा नफा करुन देतात . लगेहाथ तायडा हुकमाचा पत्ता टाकून दादा साळवींना अकाऊंट डिपार्टमेंट मधे नोकरीची ऑफर देते अन नलीच्या चेहर्यावर भितीचे ढग दाटून येतात अन मग भेदरलेली नली पुन्हा घरी जाण्याची घाई करू लागते परंतू तायडा कावेबाजपणाने जेवणाचा आग्रह करून सर्वांना थांबवते अन स्विटूला स्वयंपाक घरात मदतीसाठी नेऊ लागते..
तायडा अन स्विटू स्वयंपाक घरात जाताना जिना चढून वर येतात (यांचं किचन दुसर्या मजल्यावर आहे..!) अन मागोमाग हादरलेली नली पण पळू लागते. जिन्याच्या टोकावर तायडा स्विटूला पुन्हा ऑफिसला जॉइन होण्याची गळ घालते त्याचवेळी पिंजारलेल्या केसांची नली भेदरलेल्या नजरेने आणि फेंदारलेल्या नाकाने तायडीकडे बघू लागते. तायडा एकीकडे नलीला घाबरवत अन दुसरीकडे स्विटूला ऑफिसला जॉइन व्हायची गळ घालत गदागदा हलवू लागते (यावेळी स्विटू पेक्षा तायडाच गदागदा हलतेय असं दिसून हसू आवरत नाही )
स्विटूला जॉब, दादा साळव्यांना जॉब, माठ चिन्या सहित महामाठ काका-काकीची जोडगोळी असे सगळेच कमवू लागल्यावर साळव्यांच्या घरात पैशांचा पूर येईल अन त्या पुरात साळव्यांच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा, आपलेपणा वाहून जाईल की काय अशी शंका येते...
Pages