मरणोत्तरी जळावे

Submitted by अनुया on 17 June, 2017 - 15:56

मरणोत्तरी जळावे इतुकेच ज्ञात होते
जळणे जितेपणीचे मी ऐकलेच नव्हते

जगलो अतावरी मी स्वच्छंद मुक्त जीणे
कैदेत मुक्त असणे कधी काल्पिलेच नव्हते

ज्योतीवरी करीतो जोहार हा पतंग
प्रीतीस्तवे जळावे मज वाटलेच नव्हते

घनगच्च मेघ काळे, नभ झांकळोनी आले
नयनात अश्रू माझ्या कधी दाटलेच नव्हते

हे का असे घडावे, ही वेदना कशाला
गंगेतले पवित्र जल आटलेच नव्हते

डोळे तिचे शराबी, मी मद्यपी जहालो
होईल रिक्त सुरई कधी वाटलेच नव्हते

Group content visibility: 
Use group defaults

छान..

छान

कविता छान आहेत..
पण गुलमोहर मधे कवितांसाठी वेगळा समूह आहे. कृपया तिथे पोस्ट करा. हा केवळ गझल समूह आहे

छान!
किमयागार, ही गझल नाही काय?

मतल्यात होते व नव्हते आल्यामुळे अलामत बिघडत आहे. त्यामुळे ही गझल ठरू शकत नाही.

शेरातील खयाल वाचले नाहीत कारण मतल्यातच तांत्रिक दोष आढळला.

शुभेच्छा

अच्छा. मला वाटतं नवीन लिहिणाऱ्यांना नाउमेद करू नये. गझल बद्दल नियम वाचावेत असे मी सुचवेन, परंतु छान लिहिलं आहे. चांगला प्रयत्न.