कुहु - नाव अधिक गोड का ती अधिक गोड असा संभ्रम पडावा अशीच होती कुहु. मनमिळाऊ असुनही मनस्वी बनण्याकरता लागणारा आग्रह होता तिच्या वागण्यात. पण मी अशी भूतकाळात का तिचा उल्लेख करते आहे प्रश्न पडला ना तुम्हाला. कळलेच ते. तशा मला बर्याच मैत्रिणी होत्या. काये ना नेटवर्क पाहीजेच. कोण कधी उपयोगी पडेल सांगता थोडीच येते! लोकसंग्रहाचा कसा फायदा करुन घ्यायचा ते कौशल्य शिकून थोडीच येते?
कुहु प्रथम doormat च वाटलेली मला. कोणालाही फायदा घेऊन देईल अशी बुळी. आम्ही ग्रोसरीचे सामान घेउन उभे होतो. बरीच रांग होती. आमच्या मागे एक ७० ची पण टुणटुणीत आणि खमकी वाटणारी म्हातारी बाई. तिच्या हातात एकच जिन्नस होते. कुहुने आपण होउन त्या बाईला तिची स्वत:ची जागा देउ केली. मी मनात म्हटलं “ हे अजुन एक पुस्तकी, आदर्शवादी यडं” पण काही का असेना आमची ओळख झाली. कुहुचा मला झालाच तर फायदाच होइल असे वाटुन मी मैत्रीचा हात पुढे केला.
कालांतराने एकमेकींच्या घरी जाण्यायेण्याइतकी आमची मैत्री वृध्दिंगत झाली. कुहुचे कुटुंब आटोपशीर होते. नवरा प्राध्यापक टिपीकल बुध्दीजीवी आणि हुषार. तर कुहु एका शाळेत काऊन्सिलर. सुमारे दिसणार्या, सुमार बुध्दीच्या कुहुत, विवेकने, अर्थात तिच्या नवर्याने काय पाहिले असेल? काही का असेना नाकापेक्षा मोती जड तर होताच पण पाणीदारही होता. मला जणू त्यांच्या सहजीवनाविषयी जाणून घ्यायचा ध्यासच जढला. दोघांच्या intellectual stamina मध्ये तसेच intellectual getups मध्ये नक्की फरक होता. जिथे माझ्यासारख्या आकर्षक आणि स्मार्ट मुलीला मॅरेज मार्केट maneuver करणे अवघड जात होते तिथे कुहुसारख्या plain vanilla मुलीने गब्दुल मासा कसा पकडावा ये बात कुछ हजम नही हो रही. थी.
विवेक आतल्या गाठीचा होता की he was playing hard मला कळत नव्हते. कुहु मधे त्याने काय पाहिले असावे? कदाचित तिच्या माहेरी श्रीमंती असेल. का वरवर साधी वाटणारी कुहु पुरुषांवर जादू घालण्यात निपुण होती? मला चैन पडत नव्हते. मी कुहुच्या लक्षात येणार नाही या बेताने संबंध काय जाळंच विणु लागले. विवेक तरी काय करणार होता मी कितीही आवडले तरी ही बया अडथळा होतीच. बिच्चारा सोन्याच्या पिंजर्यातला पोपट. माझ्या फायद्याकरता हा पिंजरा तोडणे आवश्यक होतं. मी मनावरच घेतलं. विवेकपाशी आडुनआडुन मी कुहुची निंदा करत होतेच पण आता खुलेआम मी तिचा अपमान करु धजत होते. मग ते तिच्या lack of ambition ला वेळोवेळी highlight करणे असो की तिच्या गबाळग्रंथी वेशभुषेवर टिप्पणी असो. Basically I was superior to her in every way.
एकदा आम्ही तिघे एकत्र जेवत असताना, न राहवून मी विवेकला विचारलंच की त्याने कुहुत असे काय पाहिले. त्यांवरचे त्याचे उत्तर मा झ्या डोळ्यात अंजन घालणारे ठरले. कुहुने सौम्य शब्दात माझी जा कानउघडणी केली ती turning point of my quest of my partner ठरली.
———- आता हे उत्तर वाचकांनी द्यायचे आहे. Monologue, विचारमंथन किंवा कथेतील उत्तरार्ध स्वरुपात. आपापपले पूर्वग्रह तपासू यात. अनुभवाचे बोल बोलू यात. विषय जिव्हाळ्याचा आहेच 'जोडप्याचे सहजीवन'
एकत्र जेव ताना इतका जजमेंटल व
एकत्र जेव ताना इतका जजमेंटल व इंटिमेट प्रश्न विचारलेला ऐकून कुहूचे डोकेच फिरले. मैत्रीण असले म्हणून काय झाले तिला काही बाउंड्रीज नाहीत का. म्हणून तिने समोरील गरम पास्त्याची डिश नॅरेटर मुलीवर उपडी केली. व नवृयाला घेउन तिथून निघून गेली. बिल पास्ता डोक्यावर घेतलेल्या बाईने भरले व साफ सफाई पण केली. सर्व्ज हर राइट फॉर बीइन्ग सो सो जजमें टल.
जया बच्चन ने जे उत्तर रेखाला
जया बच्चन ने जे उत्तर रेखाला दिले तेच असावे.
कथेचा शेवट वाचून विक्रम वेताळ
कथेचा शेवट वाचून विक्रम वेताळ ची आठवण झाली. काहीतरी कथा सांगून वेताळ असाच प्रश्न विचारतो, की बा विक्रमा (वाचका) विवेकने असं काय उत्तर दिलं असेल, सांग बघू. तू जर योग्य उत्तर दिलं नाहीस तर तुझ्या मस्तकाची शकलं होतील!
आम्ही तिघे जेवत असताना विवेक
आम्ही तिघे जेवत असताना विवेक आणि कुहू एकमेकांना अतिशय प्रेमाने हे हवं का.. ते हवं का.. विचारत होते.. तसं ते दोघेही मला आग्रहाने खाऊ घालत होते , पण त्या दोघांचं जेवणाच्या टेबलावर उतू जाणारं प्रेम पाहून माझ्या अंगाचा तिळपापड़ झाला.. न राहवून मी विवेकला प्रश्न केला..
" विवेक, काय पाहिलंस तू कुहूमध्ये, की तुला आयुष्याची जोडीदार दिसली तिच्यात...?? ..
माझा प्रश्न ऐकून विवेक क्षणभर चकीत झाला. त्याला माझा प्रश्न अनपेक्षित वाटला असावा. त्याने कुहूकडे पाहिलं.. ती सुद्धा माझ्या प्रश्नाने विस्मयचकीत झाली..
" प्रथम तर तुला धन्यवाद की, तू हा प्रश्न कुहूसमोरच समोर मला विचारलास.. आज तिलाही कळू दे की, तिची प्रिय मैत्रिण तिच्याबद्दल काय विचार करतेयं ते..?
माझी कुहू तू म्हणतेस ना.. तशी येडीच आहे.. तिला माणसं बिल्कूल ओळखता येत नाही. जेव्हा तू माझ्याजवळ तिची निंदा- नालस्ती करत होते ना, तेव्हा तिला मी अस्पष्ट जाणीव करून दिली होती की, कुहू, माणसं पारखायला शिक.. पण खरंच ती मनाने खूप स्वच्छ आहे.. ती आपल्या परीने कुठलंही नातं निर्मळ मनाने निभावते..
सहजीवनात एकमेकांना फक्त दिसायला अनुरूप असणं नव्हे.. तर बऱ्याचश्या भावना एकमेकांना न सांगताही समजून घेता आल्या पाहीजेत.. माझी कूहू तिथे कमी पडत नाही. कदाचित मी कधी-कधी कमी पडत असेन.. पण कुहू नाही..!"
अजून एक सांगू तुला?? कूहूने आजपर्यंत माझ्याजवळ कधीच कुणाबद्दल, कुठल्याही नात्याबद्दल वाईट उद्देशाने निंदा नालस्ती केली नाहीये.. आणि हाच तिचा अंगभूत नैसर्गिक समजूतदारपणा मला तिची भुरळ पाडतो..!"एक दिर्घ श्वास घेत विवेक उद्गारला..
माझ्याकडे पाहत कुहू मंद स्मित करत म्हणाली, " तुझ्या प्रश्नांचं उत्तर मिळालंय ना तुला ?? ..
अगं, हा तुझा प्रश्न कुणालाहि राग येण्यासारखाचं आहे गं.. पण एका दृष्टीने बरंच झालं की, तु हा प्रश्न विचारून माझ्याबद्दल, आमच्या नात्याबद्दल काय विचार करतेस हयाचं चित्र स्पष्ट झालं. मला वाटतं अजून यावर तुला जास्त सांगण्यात काही अर्थ नाही. समझनेवालों को इशारा काफी होता है.. बरं, आमचं आवरलंय जेवण.. आम्ही निघतो आता ... मनात काही किंतु नसेल तर पुन्हा संपर्कं करशीलचं... चल येतो आम्ही!!"
दोघेही आपलं आवरून जोडीने निघाले... दोघांनीही माझ्या डोळ्यात आज अंजन घातलं होतं. मला लाज वाटली .. माझी आणि माझ्या विचारांची सुद्धा..!!
मी दोघांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत मनात काहीतरी ठरवत राहिले... उद्या दोघांचीही माफी मागायला हवीचं.. मनात कुठलाही किंतू न बाळगता..!!
विवेक बोलला जा कुहू सारखी
विवेक बोलला जा कुहू सारखी सरकारी नोकरी मिळव आणि मग अप्सरा चाळे कर.
मस्त आहेत उत्तरं.
मस्त आहेत उत्तरं.
सुंदर उत्तरे.
सुंदर उत्तरे.
अमा काल हे उत्तर वाचून हहपुवा. बाउंड्रीज हा मुद्दा लक्षात आला नाही, माझ्या येतच नाही :(. पण खरे आहे प्रत्येक नात्याच्या मर्यादांचा आदर केला नाही तर लवकरच त्या नात्याला घरघर लागते.
रुपाली मला इतकं उत्तम मांडताच आलं नसतं. खरच पण असच काहीसं वाटलं मला. मी काही वेळाने माझे उत्तर लिहीनच. सियोना, बोकलत हरचंद पालव
पण सगळ्यांचे धन्यवाद.
-----------------------------------
अजुन एक, कौंन्सिलर आहे आणि कुहूची apparant सुमार बुद्धी याचा काहीही ताळमेळ नाही. हे एक तर नॅरेटर स्त्रीच्या मनाचे खेळ आहेत आणि कदाचित ती स्वतः एककल्ली, एकांगी, ऑब्सेसिव्ह आणि सुमार आहे.
दोन व्यक्तींच्या रिलेशन
दोन व्यक्तींच्या रिलेशन शिप वर टिप्पणी करण्याचा तिसर्याला काहीच अधिकार नाही. बुद्धी कमी असेल तरी शी मे हॅव अदर गिफ्ट्स. ऑर बी अ नायसर पर्सन ओव्हर ऑल. इक्यू चांगला असेल.
नॅरेटर मुलीच्या पात्राचे नाव काय आहे?
अमा नाव नाही ना आले चुकून.
अमा नाव नाही ना आले चुकून.
>>>>>तिसर्याला काहीच अधिकार नाही. शी मे हॅव अदर गिफ्ट्स. ऑर बी अ नायसर पर्सन ओव्हर ऑल. इक्यू चांगला असेल.
+१००
माय टेक ऑन धिस -
माय टेक ऑन धिस -
एकतर विवाहात इक्वल फुटंगवरती सुरु झालेले नाते कधीकधी कोमेजू शकते. उदाहरणार्थ एकच जोडीदार पुढे निघून जातो महत्वाकांक्षेत म्हणा, बौद्धिक प्रगल्भतेत म्हणा, मागे पडलेल्या जोडीदाराला न्यूनगंड येउ शकतो. प्रत्येकाच्या बुद्धी, क्षमता यांच्या कधीकधी मर्यादा असतात. अशा वेळी नाते तोडण्याचा पर्याय जरी असला, तरी तसे होताना दिसत नाही. कारणे बरीच असतात - एकमेकांची झालेली सवय, एकंदर भावनिक आणि आर्थिक पायात पाय झालेला असतो, मुले असतात, मुले नसली तरी प्रेम असते, आतडे अडकलेले असते. हा झाला व्यावहारीक अँगल.
पण अध्यात्मिक दॄ ष्टीकोनातून पहाता -
नात्यावर ताण येउनही, तरीही, लगेच नेस्ट पोचर्समुळे नाते तुटत नाही कारण मूळ म्हणजे आपल्या आयुष्याचा इतका मोठा कालखंड एका व्यक्तीबरोबर घालविणे यामागे काहीतरी कार्मिक कारणे असतात. आपल्या मर्यादित अहंकाराला न कळणारे स्पिरिचुअल फोर्चेस आर अॅट प्ले.