प्रत्येक बापात एक आई लपली असते..
पण असे फोटोशॉप केल्याशिवाय ती कोणाला कळत नाही
------------------------
जोक्स द अपार्ट,
पण मला हे नेहमी वाटायचे की या पुरुषप्रधान संस्कृतीत वात्सल्य दाखवायची जबाबदारी देखील आईनेच घेतली आहे. पुरुषांच्या ममतेला नेहमीच दुय्यम स्थान मिळाले आहे. अगदी फादर्स डे च्या कविता आणि लेख पाडतानाही मुलांची प्रेमाची वात्सल्याची गरज आई पुरवते तर ईतर अर्थिक बाबी वा अडचणी कसे बाबा सोडवतात याचे गुणगाण गायले जातात. एक लेक सासरला जातानाचा हळवा कोपरा सोडला ईतर दैनंदिन आयुष्यात बापसुद्धा या पातळीवर आईचीच भुमिका निभावू शकतो याचा कुठे विचारच नसतो.
माझे म्हणाल तर मुलांना आंघोळी घाला, डायपर बदला, सूसू शीशी साफ करा, मग भले त्यासाठी अर्ध्या झोपेतून वा अर्ध्या जेवणावरून का ऊठावे लागेना, हे काम आमच्या घरात पुर्णतः माझेच आहे.
मला फारसे जेवण येत नसले तरी जिथे मुलांचा प्रश्न येतो तेव्हा त्यांना दूध, अंडी, ब्रेड, ऑमलेट, सॅण्डवीच, मिल्कशेक, मॅगी, पास्ता वगैरे काही ना बनवून देऊ शकतो. मग भले त्यांना रात्री ३ ला जाग येऊन का भूक लागेना. त्यांच्यासाठी झोपमोड करायचा पहिला हक्क माझाच आहे.
हेच त्यांच्यासोबत खेळण्याबाबतही झाले. नव्या सोसायटीत बरेच हाऊसवाईफ बायका असल्याने रोज संध्याकाळी पोरांसोबत त्या खाली गार्डनमध्ये असतात. अपवाद माझ्या पोरांचा जे रोजच बाबांसोबत असतात. दर वीकेंडला आणि सुट्टीच्या दिवशी देखील मग दोघांना घेऊन कुठेतरी बाहेर फिरायला जाणे कंपलसरी. अगदी सकाळी घराबाहेर पडून रात्री घरी येतानाही आम्हाला फक्त बाबा सोबत असणे पुरेसे असते. फिरायला जाताना त्यांनी काय कपडे घालायचे हे ठरवायलाही मीच सर्वात पुढे असतो.
जे खेळाबाबत तेच अभ्यासाबाबत, जिथे ईंग्लिशची गरज पडत नाही ते गणित, मराठी, हिंदी वगैरे माझ्या वाटणीला मी घेतले आहे.
कधी पोराला कपडे बदलायचे असतील, वा सूसू आली असेल तर तो स्वतःहून माझ्याकडेच येतो. झोप आली की मी ऊचलून त्यांना फिरावे लागते. कधी झोपेतून दचकून ऊठली की मला येऊन बिलगतात, कधी खेळताना पडली आणि घाबरली तर सर्वात पुढे मलाच पळत जाऊन त्यांना ऊचलावे लागते, कारण मी येऊन थोपटल्याशिवाय त्यांना आश्वासक वाटत नाही. दिवसभर हुंदडून जेव्हा रात्री पाय दुखतात तेव्हा ते चेपायचे हट्ट देखील माझ्याकडेच होतात..
कभी कभी तो ऐसा लगता है, तुझे सब है पता मेरी माँ या गाण्यातील माँ मीच आहे
अर्थात या सर्वात मुलांची आई देखील सोबत असतेच. आईची महती कायम आहे आणि तिचे अस्तित्व जगाच्या अंतापर्यंत शाश्वत आहे. कारण ती नाळ निसर्गानेच जोडलेली आहे.
पण आता जसे कुटुंबासाठी कमावणे ही पुरुषांची मक्तेदारी राहिली नाहीये तसे मुलांना प्रेम, माया, ममता, वात्सल्य पुरवणे हि सुद्धा आईची मक्तेदारी राहिली नाहीये. बाबासुद्धा आता यात मागे नाहीत. अश्याच बाबांमधील आईबद्दल लिहायला हा धागा, मायबोलीवरील तमाम बाबांसाठी.... या मदर्स डे च्या निमित्ताने बाबांमध्ये लपलेल्या आईचे अनुभव वाचायला आवडतील.
- ऋन्मेष
लेख चांगला आहे, विचार आवडले..
लेख चांगला आहे, विचार आवडले...
फादर्स डे जून २० ला आहे.
फादर्स डे जून २० ला आहे. तेव्हा आईला पुन्हा लपवा.... नि प्रत्येक आईत एक बाप लपलेला असतो म्हणून इतिहासाच्या पुस्तकात सरोजिनी नायडूला जश्या मिश्या काढल्या असतील तश्या बायकोला काढाव्या लागतील. इतकं सव्य-अपसव्य करण्यापेक्षा, मी काय म्हणते फक्त एकच 'पालक दिन' करावा, कसं?
(बाकी दोन बाळंतपणांनंतर कुठल्या आईचे केस एवढे घनदाट राहिले आहेत? जरा या बरं कुणी ते सिक्रेट सांगायला!)
(बाकी दोन बाळंतपणांनंतर
(बाकी दोन बाळंतपणांनंतर कुठल्या आईचे केस एवढे घनदाट राहिले आहेत? जरा या बरं कुणी ते सिक्रेट सांगायला!)>> माझे आहेत. दोन बाळंतपण झाली की केसाची वाटच लागते हे कसं काय ठरवतात ब्वॉ?
बाकी ऋन्मेष तुझा धागा आला की
बाकी ऋन्मेष तुझा धागा आला की मिळणारी प्रसिद्धी बघुन लोकांचा झालेला जळफळाट बघुन मज्जा येतेय.
आता माझ्या मागे कसे लागतात ते बघुन अजून मज्जा येईल.
मी तर एकही प्रतिसाद देणार नाही पण वाचणार नक्की. चला तर मग शुरू हो जाओ......हा हा
मायबोली का दुल्हारा है ऋन्मेष
मायबोली का दुल्हारा है ऋन्मेष
निकालता है अनेक मस्त धागे,
उत्तरोत्तर अशीच प्रगती करा
कधीच वळून नका पाहू मागे .
माझे म्हणाल तर मुलांना आंघोळी
माझे म्हणाल तर मुलांना आंघोळी घाला, डायपर बदला, सूसू शीशी साफ करा, मग भले त्यासाठी अर्ध्या झोपेतून वा अर्ध्या जेवणावरून का ऊठावे लागेना, हे काम आमच्या घरात पुर्णतः माझेच आहे.
मला फारसे जेवण येत नसले तरी जिथे मुलांचा प्रश्न येतो तेव्हा त्यांना दूध, अंडी, ब्रेड, ऑमलेट, सॅण्डवीच, मिल्कशेक, मॅगी, पास्ता वगैरे काही ना बनवून देऊ शकतो. मग भले त्यांना रात्री ३ ला जाग येऊन का भूक लागेना. त्यांच्यासाठी झोपमोड करायचा पहिला हक्क माझाच आहे.
>><>>
तुमच्यामुळे ही अशी आणि तत्सम कामे 'आईची' असतात अशा बहुमोल ज्ञानात भर पडली..
असं नाय हां, आहेत केस तर
माझे आहेत. >>>>>>>>>
माझे आहेत. >>>>>>>>>

आम्हाला पण सांगा ना ताई , तुमच्या खुबसुरत केसांचे रहस्य.
संदर्भ कळला नाही Sad फिरतोय
संदर्भ कळला नाही Sad फिरतोय मुलांसोबत म्हणून का?>>>>> अरे म्हणजे तमाम जनता इथे स्लॉट मिळण्याकडे डोळे लावून बसलेली आणि तुझं आपलं वेगळंच काहीतरी सुरू असतं
तुझं जाऊदे पण आई बाबांसाठी तरी प्रयत्न करत असशील निदान व्हॅक्सीनला? एवढं लाईटली घेऊ नको.
हो, धन्यवाद भाग्यश्री.
हो, धन्यवाद भाग्यश्री. वॅक्सिन नाही घेतली अजून पण काळजी घेतो
तुमच्यामुळे ही अशी आणि तत्सम
तुमच्यामुळे ही अशी आणि तत्सम कामे 'आईची' असतात अशा बहुमोल ज्ञानात भर पडली..
>>>>
ऑफिसमधील बायकांसोबत जेवायला बसतो तेव्हा त्यांच्या ज्या गप्पा चालू असतात त्यात त्या असेच म्हणत असतात की ही कामे आम्हालाच करावे लागते. खरे खोटे त्यांनाच ठाऊक
@ सीमंतिनी
@ सीमंतिनी
)
(तुमचे नाव लिहिताना नेहमी र्व्हस्व दिर्घ वेलांटीचा गोंधळ उडतो. वर जाऊन पुन्हा बघावे लागते. यापुढे जेव्हा चुकीचे सापडेल तेव्हा समजून घेत जा
फादर्स डे ला आईतले बाबा दाखवायचे कामही आता आम्ही पुरुषांनीच करायचे का?
.
बाकी दोन बाळंतपणांनंतर कुठल्या आईचे केस एवढे घनदाट राहिले आहेत? जरा या बरं कुणी ते सिक्रेट सांगायला!
>>>>>>
बाळंतपणे ओर्जिनल आईनेच काढली आहेत हो, तिथेही वाटा घ्यायच्या अपेक्षा ठेऊ नका प्लीज _/\_
अन्यथा बाईने बाईशीच लग्न करावे असा सल्ला द्यावा लागेल
धन्यवाद, निलिमा, च्रप्स,
धन्यवाद, निलिमा, च्रप्स, प्रवीण
.
फोटो आणि शीर्षक पाहून वाटले “कमिन्ग आउट” धागा आहे की काय.
Submitted by टवणे सर on 10 May, 2021 - 04:03
>>>>
हे कळले नाही सर, कमिंग ऑट म्हणजे?
अरे वा ! ड्युआयडी पण उतरले का
अरे वा ! ड्युआयडी पण उतरले का मैदानात ?
भोचकभवानी, मी स्वतः एक ड्युआयडी आहे. या गौरवशाली परंपरेला बट्टा लागू नये अशी माझी इच्छा आहे. मर्त्य महिलांना बाळंतपणात हार्मोन्समुळे केस गळण्याचा त्रास होतो असे सायन्स आहे बघा. ड्युआयडीला हे लागू होत नसेल कदाचित, पण ड्युआयडीला ड्यु - बाळंतपणे तरी कुठे असतात ? असतील तर ड्यु डॉक्टर्स, ड्यु हॉस्पिटल्स सांगून ठेवा. मला एक मैत्रीण मिळाली आहे इथेच आमच्या जगातली. आमच्या एका बहीणीनेच ओळख करून दिली आहे. भूतलग्नानंतर गरज पडलीच तर जाऊ तिकडे.
ऋन्मेष टिकटॉकवर जळतो असे का म्हणालात हे समजले नाही. कृपया खुलासा करावा.
बाळंतपणात केस गळतात आणि
बाळंतपणात केस गळतात आणि प्रिनाटल सुरू ठेवले की घनदाट वाढतात...
तुमचे नाव लिहिताना नेहमी
तुमचे नाव लिहिताना नेहमी र्व्हस्व दिर्घ वेलांटीचा गोंधळ उडतो. वर जाऊन पुन्हा बघावे लागते. यापुढे जेव्हा चुकीचे सापडेल तेव्हा समजून घेत जा Happy >>
ओके. काही हरकत नाही, मलाही ते एस जमत नाहीत तुझ्या नावातले. गोंधळ टाळायला फॉर्म्यूला सोपा आहे - ति ची वेलांटी पहिली. ति तिजोरीतला. ("अकेली लडकी खुली तिजोरी की तरह होती है" मधली तिजोरी नाही, दिपक तिजोरी मधलं तिजोरी)... बाकी वेलांट्या दुसर्या.
प्रिनाटल सुरू ठेवले की घनदाट
प्रिनाटल सुरू ठेवले की घनदाट वाढतात...
>> म्हणजे काय? बाळंतपणातली औषधे का? फॉलिक ऍसिड वगैरे?
मलाही ते एस जमत नाहीत तुझ्या
मलाही ते एस जमत नाहीत तुझ्या नावातले
>>>>>
ते मलाही जमत नाहीत. मी आयुष्यात एकदाच ते कॉपीपेस्ट केलेले. मग कुठून ते विसरलोय
मग काय ठरलं शेवटी ?
मग काय ठरलं शेवटी ?
पियू - प्रेनेट्ल
पियू - प्रेनेट्ल मल्टीव्हिटॅमिन्स...
Pages