प्रत्येक बापात एक आई लपली असते..

Submitted by ऋन्मेऽऽष on 9 May, 2021 - 08:44

प्रत्येक बापात एक आई लपली असते..

पण असे फोटोशॉप केल्याशिवाय ती कोणाला कळत नाही Proud

1620550168619.jpg

------------------------

जोक्स द अपार्ट,
पण मला हे नेहमी वाटायचे की या पुरुषप्रधान संस्कृतीत वात्सल्य दाखवायची जबाबदारी देखील आईनेच घेतली आहे. पुरुषांच्या ममतेला नेहमीच दुय्यम स्थान मिळाले आहे. अगदी फादर्स डे च्या कविता आणि लेख पाडतानाही मुलांची प्रेमाची वात्सल्याची गरज आई पुरवते तर ईतर अर्थिक बाबी वा अडचणी कसे बाबा सोडवतात याचे गुणगाण गायले जातात. एक लेक सासरला जातानाचा हळवा कोपरा सोडला ईतर दैनंदिन आयुष्यात बापसुद्धा या पातळीवर आईचीच भुमिका निभावू शकतो याचा कुठे विचारच नसतो.

माझे म्हणाल तर मुलांना आंघोळी घाला, डायपर बदला, सूसू शीशी साफ करा, मग भले त्यासाठी अर्ध्या झोपेतून वा अर्ध्या जेवणावरून का ऊठावे लागेना, हे काम आमच्या घरात पुर्णतः माझेच आहे.
मला फारसे जेवण येत नसले तरी जिथे मुलांचा प्रश्न येतो तेव्हा त्यांना दूध, अंडी, ब्रेड, ऑमलेट, सॅण्डवीच, मिल्कशेक, मॅगी, पास्ता वगैरे काही ना बनवून देऊ शकतो. मग भले त्यांना रात्री ३ ला जाग येऊन का भूक लागेना. त्यांच्यासाठी झोपमोड करायचा पहिला हक्क माझाच आहे.
हेच त्यांच्यासोबत खेळण्याबाबतही झाले. नव्या सोसायटीत बरेच हाऊसवाईफ बायका असल्याने रोज संध्याकाळी पोरांसोबत त्या खाली गार्डनमध्ये असतात. अपवाद माझ्या पोरांचा जे रोजच बाबांसोबत असतात. दर वीकेंडला आणि सुट्टीच्या दिवशी देखील मग दोघांना घेऊन कुठेतरी बाहेर फिरायला जाणे कंपलसरी. अगदी सकाळी घराबाहेर पडून रात्री घरी येतानाही आम्हाला फक्त बाबा सोबत असणे पुरेसे असते. फिरायला जाताना त्यांनी काय कपडे घालायचे हे ठरवायलाही मीच सर्वात पुढे असतो.
जे खेळाबाबत तेच अभ्यासाबाबत, जिथे ईंग्लिशची गरज पडत नाही ते गणित, मराठी, हिंदी वगैरे माझ्या वाटणीला मी घेतले आहे.
कधी पोराला कपडे बदलायचे असतील, वा सूसू आली असेल तर तो स्वतःहून माझ्याकडेच येतो. झोप आली की मी ऊचलून त्यांना फिरावे लागते. कधी झोपेतून दचकून ऊठली की मला येऊन बिलगतात, कधी खेळताना पडली आणि घाबरली तर सर्वात पुढे मलाच पळत जाऊन त्यांना ऊचलावे लागते, कारण मी येऊन थोपटल्याशिवाय त्यांना आश्वासक वाटत नाही. दिवसभर हुंदडून जेव्हा रात्री पाय दुखतात तेव्हा ते चेपायचे हट्ट देखील माझ्याकडेच होतात..
कभी कभी तो ऐसा लगता है, तुझे सब है पता मेरी माँ या गाण्यातील माँ मीच आहे Happy

अर्थात या सर्वात मुलांची आई देखील सोबत असतेच. आईची महती कायम आहे आणि तिचे अस्तित्व जगाच्या अंतापर्यंत शाश्वत आहे. कारण ती नाळ निसर्गानेच जोडलेली आहे.
पण आता जसे कुटुंबासाठी कमावणे ही पुरुषांची मक्तेदारी राहिली नाहीये तसे मुलांना प्रेम, माया, ममता, वात्सल्य पुरवणे हि सुद्धा आईची मक्तेदारी राहिली नाहीये. बाबासुद्धा आता यात मागे नाहीत. अश्याच बाबांमधील आईबद्दल लिहायला हा धागा, मायबोलीवरील तमाम बाबांसाठी.... या मदर्स डे च्या निमित्ताने बाबांमध्ये लपलेल्या आईचे अनुभव वाचायला आवडतील.

- ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो बघून मुलांच्या आईला कॉम्प्लेक्स येईल Wink >>अगदी अगदी , फोटो बघताच हेच मनात आलं. क्युट आहेत फोटो.
छान लिहिलंय.

मागच्या पिढीतील असतं तर वेगळं वाटलं असत,हल्लीच्या पिढीत आहे तर त्यात काय वेगळं??
हल्ली बाबालोक मुलांमध्ये खूप रस घेतात, जुन्या पिढीसारखे बाबा हल्ली कमी झालेत ज्याचं प्रेम तर आहे पण मूल डोक्यावर बसेल किंवा लोक काय म्हणतील म्हणून मुद्द्याम प्रेम न दाखवणं,दरारा ठेवणं etc etc
आणि गम्मत म्हणजे आताच्या बाबा लोकांचं मुलांना वाढविण्यात बारीक लक्ष असणं आजोबा लोकांनीही पूर्ण स्वीकारले आहे

फोटो बघून मुलांच्या आईला कॉम्प्लेक्स येईल>> मुलांच्याच काय सगळ्यांच्याच आयांना कॅाम्प्लेक्स येईल.

ऋन्म्या, फोटोशॉप मस्त जमलंय. दाढी खास याच कारणा करता केलीस काय... Happy

बाय्दवे, इतर स्वैपाका बाबत जाउद्या, पण पीबीजे मी बेस्टेस्ट बनवतो, हे माझ्या मुलांचं लहानपणापासुनचं मत आहे... Wink

माबोकरांना मातृदिनाच्या हार्दीक शुभेच्छा!

Submitted by पारंबीचा आत्मा on 9 May, 2021 - 18:19
>>>>
आपण शेअर केलेला विडिओ पुर्ण पाहिला नाही. टिकटॉक दर्ज्याचे काही बघवत नाही.
मात्र कोण्या व्यक्तीला निसर्गानेच तसे बनवले असेल तर कृपया त्याला व्यंग समजून हसू नका. उद्या जर असे कोणी आपल्यापैकी कोणाच्या घरात जन्मले तर त्याला शाप समजून वाळीत कोणी टाकू नका _/\_

.

स्वतः चीच तुफान लाल
Submitted by बन्या on 9 May, 2021 - 19:18
>>>>>>
हो, हे खरे आहे. माझा स्वभाव आत्मकेंद्रीत आहे. याला स्वभावदोष म्हणू शकता.
जे माझ्यात दोष आहेत ते मी कबूल करून स्विकारतो. याला माझ्यातला गुणही म्हणू शकता.
ईथे सुद्धा माझ्या दुसर्‍या वाक्याला पहिल्या वाक्यातील आरोप लागू आहे Happy

जोक्स द अपार्ट माझ्या या स्वभावावर एक स्वतंत्र धागा काढता येईल, या स्वभावाचे फायदे तोटे, मला झेलावी लागणारी टिका, मिळणारा आनंद, एकूणच अनुभव.....
नोट करून ठेवतो !

Submitted by आदू on 9 May, 2021 - 20:23
>>>>
येस्स आदू, हल्ली अश्या बाबा लोकांचे प्रमाण वाढतेय. पण सारा समाज एकसारखाच नसतो. भारतात संस्कृती आणि समाजसुधारणेबाबत कमालीची विषमता / तफावत आहे. त्यामुळे अश्या विषयांवर चर्चा होऊन ती जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवी असे वाटते. विचारांची देवाणघेवाण व्हायला हवी.

त्रन्मेषची लस घेऊन झालीये वाटतं. Wink
Submitted by भाग्यश्री१२३ on 9 May, 2021 - 21:13
>>>>>
संदर्भ कळला नाही Sad फिरतोय मुलांसोबत म्हणून का?
बाकी आमच्याकडे माझ्या आईवडिलांनीही लस अजून घेतली नाही. वडिलांचा तर आपल्या प्रतिकारशक्तीवर विश्वास आहे. ते कोरोनाला बिलकुल घाबरत नाही. कदाचित मरणालाही नाही. लसीचा आधीच तुटवडा आहे तर जे घाबरलेत, वा ज्यांना गरज आहे त्यांना घेऊ दे असा त्यांचा स्टँड आहे. उद्या लस जास्त आणि मागणी कमी होईल तेव्हा आम्ही जाऊ सहकुटुंब रांगेत ऊभे राहायला Happy

आपण शेअर केलेला विडिओ पुर्ण पाहिला नाही. टिकटॉक दर्ज्याचे काही बघवत नाही. >>> टिकटॉक दर्जा ? आपला धागा सुद्धा त्याच दर्जाचा लोकांना वाटत असेल तर ?

मात्र कोण्या व्यक्तीला निसर्गानेच तसे बनवले असेल तर कृपया त्याला व्यंग समजून हसू नका. >>> न बघताच व्यंग आहे हे कसं ठरवलंय ? असे फोटो शेअर करणे हे जसे व्यंग नाही तसेच मुलांनी गंमत म्हणून मुलींचा वेष घेणे हे सुद्धा व्यंग नाही. आणि त्यावर गंमत म्हणून युट्यूबवाल्यांनी कुरघोड्या करणे हे सुद्धा व्यंग नाही.

दादा, जसा धागा काढला आहे तशा प्रतिक्रिया येणार आहेत. झेपत नसेल तर असे धागे काढू नयेत हा प्रेमाचा सल्ला. यावर काथ्याकूट करण्याची गरज नाही.

उद्या जर असे कोणी आपल्यापैकी कोणाच्या घरात जन्मले तर त्याला शाप समजून वाळीत कोणी टाकू नका >>> व्हिडीओ न पाहताच स्वतःवर घेऊन मनाला लावून तीव्र प्रतिक्रिया देण्याचे काही सबळ कारण दिसत नाही. असे फोटो शेअर केले म्हणून कुणी वाळीत टाकते का ?

@ ऑल ईतर .. धन्यवाद Happy Happy

मुलांच्या आयांना खरेच कॉम्प्लेक्स आला Proud
आणि काही ईतर आयांचेही असेच मेसेज आले Proud
फक्त याला कॉम्प्लीमेंट म्हणावे की ..... ते माहीत नाही Wink

@ राज
पण पीबीजे मी बेस्टेस्ट बनवतो, हे माझ्या मुलांचं लहानपणापासुनचं मत आहे... Wink
>>>>>>>
पीबीजे म्हणजे पावभाजी का? की पाव बटर जाम.. पीनट ब्रेड जाम वगैरे? की याच नावाचा एखादा ईंग्लिश पदार्थ आहे?

टिकटॉक दर्जा ? आपला धागा सुद्धा त्याच दर्जाचा लोकांना वाटत असेल तर ?
>>>>>>
वाटू दे की? मी कुठे त्याला कमी दर्जाचे लेखले आहे... ईट्स नॉट माय टाईप ईतकेच Happy
जसे मी क्लासिकल चित्रपट सुद्धा बघत नाही. माझे धागेही कोणाला क्लासिकल वाटत असतील तर यावरही माझी हरकत नाही Happy

सर्वांच्या प्रतिक्रियांवर अशा टिप्पण्या करण्याचे कारण काय ?
असे फोटो पोस्ट करताना काय प्रतिक्रिया अपेक्षित होत्या ? काय येतील असा अंदाज होता ?
उत्सुकता म्हणून विचारले आहे. यावर पुन्हा टिप्पण्या अपेक्षित नाहीत. उत्तर अपेक्षित आहे.

टिकटॉक दर्जा ? आपला धागा सुद्धा त्याच दर्जाचा लोकांना वाटत असेल तर ?
>>>>>>
वाटू दे की? >>>> बरं मग ?
दर्जाची सुरूवात कुणी केली साहेब ? आणि ते बघवत नाही म्हणताना आपण काय ऑस्कर दर्जाचे धागे विणता कि काय ? की नोबेले दर्जाचे साहीत्य प्रसवता ? की अजून काही ?

ऋन्म्या, फोटोशॉप मस्त जमलंय. दाढी खास याच कारणा करता केलीस काय... Happy
>>>>>>
जमले वगैरे काही नाही. अ‍ॅप आहे ते. आपला फोटो टाकला की आपली चेहरेपट्टी आणि फीचर ऊचलून तिलाच बाईचे रूप देऊन हे असे बनून तयार Happy

Faceapp नावाचे अ‍ॅप आहे. ईतरांचेही असे फोटो बघण्यास ऊत्सुक Happy

ते बघवत नाही म्हणताना आपण काय ऑस्कर दर्जाचे धागे विणता कि काय ? की नोबेले दर्जाचे साहीत्य प्रसवता ? की अजून काही ?
>>>>>
नोबेल आणि ऑस्कर दर्जा उगाच ओवरहाईप आहे. माझे धागे त्या दर्जाचे नसणे हा मी माझा बहुमान समजतो Happy माझ्यासाठी सर्वात वरचा दर्जा शाहरूख खानचा..

बाकी माझ्या धाग्यांचा दर्जा मी कसा ठरवू? ते तुम्ही वाचक म्हणून ठरवा. ते तुम्ही वाचता या दर्ज्याचे तरी किमान आहेत हे एक समजले Happy
अजून जाणून घेण्यास उत्सुक, तुर्तास शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज !!

टिकटॉकचा दर्जा ठरवला तसाच हो. ज्या दर्जाचा धागा त्याच दर्जाचा व्हिडीओ असं समजून लोड घेऊ नये जास्त. शांतीने झोपावे. रात्र झाली फार.
(आपला दर्जा नोबेलचा असेल तर टिकटॉकचा ही तोच समजावा).

ते तुम्ही वाचता या दर्ज्याचे तरी किमान आहेत हे एक समजले >> मी स्वतःहून कुणाचा दर्जा काढत नाही. काढलेला नाही. तसेच ऋन्मेष दर्जाचे धागे वाचवत नाही असे काही विधान केलेले नाही. नाईलाजास्तव किंवा आवडीनुसार समोर येईल त्या सर्वांचा फडशा पाडत असतो. किमान अशा धाग्यामुळे आयडी उडण्यास मदत होते तो वेगळा फायदा असतो. चांगल्या धाग्यावर उगीच कशाला हा विचार. Proud

मी हा धागा उघडला कारण ऋन्मेष छाप दर्जा असा काही ब्लॉक माझ्याकडे नाही. इतका मी स्वतःला ग्रेट वगैरे समजत नाही.

मदर्स डे च्या निमित्त एक वेगळा विचार वाचायला मिळेल. बाबामधल्या आईने आता जैविक आईला मदत करायला सुरूवात केली आहे, आपल्याला जे शक्य ते तिच्यासाठी करायला सुरूवात केली आहे का असं काही असेल असं वाटलेलं. हे न वाचताच कसं समजणार ? किंवा आपल्याला न समजलेली आई ( आपल्या मुलांची, आपली) तिची घुसमट , बाबा आता आईची कामे करतान समजून घेत असेल असा विषय डोळ्यासमोर आलेला होता.
आणि धाग्यावर क्लिक केलं मात्रं भलतंच चित्र समोर आलं. त्याला अनुसरूनच पहिला प्रतिसाद आहे. त्याने ऑफेण्ड होण्यासारखे काहीही नाही. या धाग्यावर अजून काय लिहीणार ? मार्गदर्शन करावे.

नोबेल आणि ऑस्कर दर्जा उगाच ओवरहाईप आहे. माझे धागे त्या दर्जाचे नसणे हा मी माझा बहुमान समजतो Happy माझ्यासाठी सर्वात वरचा दर्जा शाहरूख खानचा.. >>> कोण हा ? नाव नाही ऐकले कधी. एक गाडी पुसणारा होता माझ्याकडे. त्याच्याबद्दल आहे का ?

फोटो छान.

माझ्या बाबांनी आमच्यासाठी जे केलं किंवा माझा नवरा माझ्या मुलासाठी जे करतो त्यावरून नक्कीच रीलेट करू शकते.

फोटो बघून मुलांच्या आईला कॉम्प्लेक्स येईल>> मुलांच्याच काय सगळ्यांच्याच आयांना कॅाम्प्लेक्स येईल.>>+१
छान लेख.

मस्त फोटो बनवले आहेत. पहिल्यांदा तर मी ओळखलंच नाही...खरंच आज काल आई च्या बरोबरीने बाबा पण वेळ देतात मुलांना. मी घरी असलो की माझा लहान मुलगा माझ्याच कडे असतो. अर्थात आता लाॅकडाउन मध्ये घरीच आहे तर त्यामुळे पुर्ण वेळ त्याचा. ऑफिस च्या कामात व्यस्त असलं तरी त्याच्या साठी वेळ काढावा लागतोच.

@पारंबिचा आत्मा टोटल सहमत, चिप पब्लिसिटि साठी कोण कुठल्या थराला जाईल यु नेवर नो, इथले महिला मंडळ आहेच वाहवा करायला

Pages

Back to top