Submitted by सुप्रिया जाधव. on 6 August, 2020 - 02:52
तुझ्या निवाड्यावरीच अवघी मदार आहे
कबूलनामा लिहून माझा तयार आहे
मनात माझ्या कुठून त्याचा विचार शिरतो ?
अभेद्य किल्ल्यामधे कदाचित भुयार आहे
बदाम राजा, बदाम राणी, गुलाम हाती
तरी अडवणे बदाम अठ्ठी, जुगार आहे
बघेल तेव्हा उगाच कुलटा तिला ठरवणे
सुशील मित्रा, असाध्यसा हा विकार आहे
मला विसरणे तुला कदापी अशक्य नाही
कधीतरी ओघळेल अश्रू, चुकार आहे !
विचार त्याचा मनात येतो, सुरेख दिसते
कबूल करते दिसायला मी सुमार आहे
कधीतरी पाय घाल तूही बुटात माझ्या
कळेल तेव्हा खरा कसा हा प्रकार आहे
सुप्रिया मिलिंद जाधव
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह..
वाह..
खूप छान
खूप छान
धन्यवाद
धन्यवाद
खुप छान !
खुप छान !
कदक
कदक
खूप मस्त
खूप मस्त
खूप सुंदर... मजा आली...
खूप सुंदर... मजा आली...
हे कोणी विस्कटून सांगेल का...
बदाम राजा, बदाम राणी, गुलाम हाती
तरी अडवणे बदाम अठ्ठी, जुगार आहे
खूप सुंदर शब्दांची रचना
खूप सुंदर शब्दांची रचना सुप्रियाजी.. लेखणीत जादू आहे तुमच्या..
Chan lihilay
Chan lihilay
छान
छान
आभारी आहे सगळ्यांची
आभारी आहे सगळ्यांची
छान !
छान !
एकदम छान वेगळीच!
एकदम छान वेगळीच!
खूप सुंदर
खूप सुंदर
मस्त. विशेषतः 'सत्तीलावणी' चा
मस्त. विशेषतः 'सत्तीलावणी' चा रेफरंस खूप मस्त.
च्रप्स , तुम्हाला पत्त्यांचा बदाम सात खेळता येतो का?
त्यामधे, पत्ते अडविता येतात. पण आधी सुटेल तो जिंकला....त्यामुळे आपल्या कडेच राणी, राजा अशी भारी पानं असताना अठ्ठी अडवून ठेवणं म्हणजे स्वतःच्याच पाया वर कुर्हाड मारण्या सारखे आहे...
कधीतरी पाय घाल तूही बुटात
कधीतरी पाय घाल तूही बुटात माझ्या >> टू बी इन समबडीज शूज चं शब्दशः भाषांतर असलं तरी इथे एकदम आवडल्या गेलं आहे
खूप खूप आभारी आहे आंबट गोड
खूप खूप आभारी आहे आंबट गोड
प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार!