जागतिक पातळीवर सर्वच लसींचे समान वाटप व्हावे व लसीकरणाचे प्रमाण वाढून आजारांचे उच्चाटन व्हावे म्हणून
GAVI (ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन अँड इम्युनायजेशन) ही शिखर संस्था जागतिक आरोग्य संघटनेशी संलग्न होऊन
कार्यरत असते. मागास राष्ट्रांनाही लस
मिळावी हा या संस्थेचा मुख्य व उदात्त हेतू आहे. यासाठी
" गावी " या संस्थेला बिल अँड मिलिंडा गेट्स
फाउंडेशनसारख्या अनेक बलाढ्य सेवाभावी संस्थांकडून
निधी मिळतो. नुकतेच १५ एप्रिल रोजी वॉशिंग्टन इथे " गावी" ने आयोजित केलेल्या " वन वर्ल्ड प्रोटेक्टेड" या इव्हेंटमध्ये बऱ्याच देशांनी मुक्तहस्ताने निधीचे वाटप केले.
तरीही श्रीमंत देशांनी निधी दिला आणि गरीब राष्ट्रांना लसी मिळाल्या एवढे सोपे हे काम होत नाहीं. " गावी" तसेच निधी पुरवठा करणाऱ्या संस्था जेव्हा एखाद्या देशाला लस
निर्मितीसाठी निधी देतात तेव्हा एखाद्या कंपनीच्या लसीला झुकते माप देणे, एखाद्या विशिष्ट कंपनीच्याच लसीची खरेदी
करण्यासाठी दबाव आणणे, आणि अविकसित, मागास देशातील लसीकरण कार्यक्रम ठरवताना तो श्रीमंत व विकसित राष्ट्रांना कसा फायदेशीर ठरेल हे पाहणे असे छुपे, न दिसणारे एजेंडा पुढे ढकलतात.
भारतातील सीरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसीच्या उत्पादनासाठी " गावी " ने आगाऊ खरेदीची हमी म्हणून ३०० अब्ज डॉलर्सचे अर्थसाहाय्य दिले आहे. त्याबदल्यात सीरमने
कमी उत्पन्नाच्या ९२ देशांना जूनपर्यंत १०০ दशलक्ष डोसेस देण्याचा कायदेशीर करार " गावी " आणि गेट्स फाउंडेशन यांच्याशी केला आहे. 'गावी' व्यतिरिक्त सीरम
इन्स्टिट्यूटला भारत सरकारकडून ३ हजार कोटींचे अर्थसाहाय्य मिळाले आहे. " गावी" च्या कराराअंतर्गत ७६ देशांना ६०.४ दशलक्ष डोसेस आजवर सीरमने दिले
आहेत. या लसी दिलेल्या देशांमध्ये सौदी अरेबियासारखे श्रीमंत आखाती देशही आहेत. आज सीरम इन्स्टिट्यूटचा एकच कारखाना पुण्यात कार्यरत आहे. काही दिवसापूर्वी नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारतीला आग लागली होती. शिवाय अमेरिकेने सीरमला कच्चा माल देण्यास नकार दिला होता. ( ही रोखलेली निर्यात आताच मागे घेण्यात आली आहे ). अशा स्थितीत सीरमला दिवस रात्र उत्पादन करावे लागत असून " गावी " बरोबर करार केल्यामुळे त्यांनाही सलाम ठोकावा लागत आहे. सीरमच्या कोविशिल्ड या लशीचा तुटवडा यामुळेच भासत आहे. आज सिरम अशा कात्रीत अडकली आहे की स्वतःच्या देश बांधवांना लशी पुरवाव्यात की ९२ देशांची मागणी पूर्ण करावी.
."सगळी श्रीमंत व गरीब राष्ट्रे मिळून एकत्रित लस खरेदी करू,"असे " गावी " म्हणत असताना अमेरिका व ब्रिटनने नोव्हेंबरमध्येच लस तयार करणाऱ्या - फायजर, मॉडर्ना व
जॉन्सन अँड जॉन्सन या तीन मुख्य कंपन्यांना अब्जावधी
डॉलर्स देऊन बहुतांश डोस "प्री बुक' केले. रशिया आणि चीनने स्वतःच्या बळावर देशी लसी बनविल्या. यामुळे आज
जगात १४ % लोकसंख्या असलेल्या देशांकडे जगातील
८५% लससाठा उपलब्ध आहे. अमेरिकेने ५०% व इंग्लंडने
६०% लोकसंख्येला पहिला डोस दिला आहे.
या पार्श्वभूमीवर भारतात एक डोस मिळालेल्यांचे प्रमाण ५.२ % व दोन्ही डोस मिळालेल्यांचे प्रमाण १ % एवढे कमी आहे. ज्या देशातून जी मिळेल ती लस खरेदी करणे आणि प्रत्येकाला शक्य तितक्या लवकर देणे आवश्यक असताना, भारतात लसीकरण केंद्रांवरून अनेक जण लसीअभावी
परतताना दिसत आहे. भारत बायोटेक या काही अंशी देशी संस्थेचा लस निर्मितीतील सहभाग आज केवळ १०% आहे. भारताने १० हजार कोटी रुपये हे अर्थसंकल्पात लसीसाठी निश्चित केले आहेत. पण यापैकी बहुतांश निधी हा खाजगी
कंपन्या व परदेशी लसी खरेदीसाठी खर्ची पडणार आहे.
हाफकिन इन्स्टिट्यूट - मुंबई, सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट - कसौली, पाश्चर इन्स्टिट्यूट, कुन्नूर, किंग इन्स्टिट्यूट - चेन्नई या भारत सरकारच्या लस तयार करणाऱ्या संस्थांचा उपयोग करुन घेतला पाहिजे. असे केले तरच सर्वांचे लसीकरण होऊ शकेल अन्यथा एकशे तीस कोटी जनतेचे लसीकरण कसे आणि केंव्हा होईल त्याची फक्त कल्पनाच आपण करू शकतो. त्यामुळेच १ मे २०२१ पासून १८ ते ४५ या वयोगटातील लोकांचे सरसकट लसीकरण करणे केवळ अशक्य आहे.
....
आम्ही सकाळी 7 ला बातमी
आम्ही सकाळी 7 ला बातमी आल्यापासून आरोग्य सेतू बघतोय
)
12 च्या सुमाराला आम्हाला ती 3 हॉस्पिटल पिनकोड ने सिलेक्ट करता आली.त्यात 1 मे ग्रे असल्याने तो ग्रे असला तरी निवडावा लागतो हे उशिरा कळलं.तोपर्यंत ही तिन्ही सेंटर बुक झाली.
मला असं वाटतं की ग्रे तारीख निवडणे, पिनकोड गुगल करून शोधणे असे पटापट कळले असते तर आम्ही या स्लॉटस मध्ये असतो.
ओपन नसेल तर ते हॉस्पिटल मिळतच नाही(अर्थात हॉस्पिटल मिळाले म्हणजे लस मिळेलच तिथे गेल्यावर असे काही नाही
45प्लस चे स्लॉट काही ठिकाणी दिसत आहेत.अर्थात सर्व भरल्याची सूचना शेवटच्या स्टेप ला येते त्यामुळे 45 वर पुढे जाऊन पाहिले नाही.
आम्ही सकाळी 7 ला बातमी
आम्ही सकाळी 7 ला बातमी आल्यापासून आरोग्य सेतू बघतोय>>कधी काल सकाळी सात?
https://theprint.in/india
https://theprint.in/india/india-needs-vaccines-now-but-this-govt-plant-i...
भारतात कोविद लसीला दिरंगाई का होत आहे याची मेख या लेखात आहे.
हे बघा. गलथान कारभार, दूरदृष्टीचा अभाव की खाजगी कंपन्यांना फायदा होण्यासाठी मुद्दाम एका शासकीय कारखान्याची लावलेली वाट. फेब्रु. २० मधे जरी योग्य भांडवल उपलब्ध केले असते तरी आतापर्यंत लस निर्मिती करण्यासाठी सिरमच्या क्षमते पेक्षाही मोठी व्यवस्था तयार होऊ शकली असती. किती रुपयात तर फक्त १५० कोटी. आता या भयंकर चुकीची किती किंमत मोजावी लागत आहे देशाला?. अमुल्य जीव जात आहेत ते वेगळेच. प्रेताच्या टाळूवरच लोणी खाणे म्हणजे अजून काय?.
स्पष्ट बोलणार्या तज्ञांचा अभाव असणे हा प्रश्न केंद्र सरकारने तातडीने सोडवायला पाहिजे. पण जाणीव असेल तर ना.
खाजगी लस कारखाना हा सरकारी
खाजगी लस कारखाना हा सरकारी कारखान्याला मुद्दाम खपवून बनवला गेला आहे
चांगली लिंक विक्रमसिंह. आताच
चांगली लिंक विक्रमसिंह. आताच 4 वेगवेगळ्या ग्रुपवरून एकच पोस्ट आली की मोदींना सपोर्ट करा ह्या कठीण काळात नाही केलात तर तुमच्या सारखे देशद्रोही तुम्हीच. काय बोलायचं काम नाय
मुंबईला पण अशी एक संस्था होती
मुंबईला पण अशी एक संस्था होती अस ऐकले होते असे म्हणतात म्हणे. खरे खोटे देव जाणे.
त्याचे काय झाले ? आठवतंय का नाव ?
https://timesofindia
https://timesofindia.indiatimes.com/india/getting-aggressive-calls-from-...
व्हेक्सींन पुरवठ्याबाबत अदर पुनावाला यांना राजकारण्याकडून सतत फोन जात आहेत.
सत्य बोललो तर मुंडके उडवले जाईल म्हणे
ह्या बड्या हस्ती कोण बरे ?
कमळ , घड्याळ , पंजा की वाघ ?
लंडन : भारताची प्रमुख लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आता इतर देशांमध्ये लस उत्पादन घेण्याचा विचार करत आहे. लशीच्या पुरवठ्याबाबतच्या वेळेचं आश्वासन पाळण्यात अडचण येऊ लागल्यानं 'सीरम' हे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी दिली आहे. सध्या सीरम इस्टिट्यूटचे अदर पुनावाला लंडनला निघून गेले आहेत. मात्र, 'द टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की मला धमक्या मिळत आहेत, आणि सत्य बोललो तर माझे शीर कापले जाईल, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी या मुलाखतीत म्हटलंय की, आपल्या देशातील श्रीमंत आणि मोठ्या मोठ्या राजकीय हस्थींकडून त्यांना या धमक्या येत आहेत. आणि यामुळे ते कोरोना लशीचे उत्पादन लंडन मध्ये करण्याच्या तयारीत आहेत, असं म्हटलं जात आहे. 'The Times' ने याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे. या वृत्तात जगातील सर्वात मोठे लस उत्पादक अदर पुनावाला यांनी म्हटलंय की, फोन कॉल ही सर्वात वाईट गोष्ट आहे. निरंतर येणारे फोन कॉल्स अत्यंत त्रासदायक आहेत.
https://www.esakal.com/desh/adar-poonawala-interview-to-the-times-says-t...
(No subject)
Attention DIVERSION Tatties
Attention DIVERSION Tatties.
Pure and simple nautanki.
कुणातरी स्पिन डॉक्टरच्या सुपीक डोक्यातून निघालेली आयडिया . त्या Y सिक्युरिटीवरून खूप टीका झाली.
त्याला कौंटर.
मोदी सरकारी यंत्रणा विकत
मोदी सरकारी यंत्रणा विकत असताना खाजगीकरणाचे कौतुक करणारे भक्त कोविड लस मात्र सरकारी यंत्रणेने स्वस्तात / फुकट द्यावी असे म्हणत आहेत. खाजगीकरणाची हौस फिटली वाटतं.
कमला नेहरू पब्लिक हेल्थ सेंटर
कमला नेहरू पब्लिक हेल्थ सेंटर मंगळवार पेठ ही कशी जागा आहे?खुप गर्दी असते का?दुसऱ्याना एक्सपोज करू नये म्हणून मला एकटीला जायचे आहे उद्या.ते ही 18-44 बुकिंग मिळालंय, पण लस मिळेल का, की सॉफ्टवेअर बग मुळे बुकिंग मिळालंय माहिती नाही.
फोन करून जाणार आहे.
https://m.timesofindia.com
https://www.theweek.in/news/biz-tech/2021/05/01/adar-poonawalla-feared-t...
पुनावाला लंडनला गेला.
पुनावाला लंडनला गेला.
पुढचे लसीकरण लंडनला होणार की काय
पुनावाला लंडनला गेला.>>
पुनावाला लंडनला गेला.>>
एक आधार होता.. तो पण ह्या राजकारण्यांनी दमबाजी करून बाहेर घालवला.. बसा बोंबलत आता...
काँग्रेसच्या काळात स्मॉल
काँग्रेसच्या काळात स्मॉल पोक्स, बीसीजी , ट्रिपल , टिटी , पोलिओ इतक्या लशींचे इतके डोस सर्वांना फुकट मिळाले. कधी कसली श्रेयबाजी नाही आणि किमतीवरून कम्पनी अन सरकारमध्ये वाद झाले नाहीत.
ह्यांच्या काळात एक रोग अन दोन डोस , तेही ह्यांना करणे जमले नाही.
पुनावालांनाच पळवून लावलं?
पुनावालांनाच पळवून लावलं? कठीण आहे.
खाजगीकरणाची हौस फिटली वाटतं>> +100
रामदेव कुठं गेले म्हणे आजकाल.
रामदेव कुठं गेले म्हणे आजकाल..?
नवीन व्हॅक्सिन वर रिसर्च करतायत की काय?
रिसर्चला वेळ लागत असेल तर.. सध्यापुरतं व्हॅक्सिन म्हणून कोरोनिलचंच देशभर वाटप सुरू करायला काय हरकत आहे...?
त्याची भुकटी करून पाण्यात मिसळायची आणि देवाचं नाव घेऊन पिऊन टाकायचं... पेशंट सात दिवसांत टुणटुणीत..!
कशाला लागतोय ऑक्सिजन न् फिक्सीजन..?
७ दिवस जेवणात गोमय खाल्ले आणि
७ दिवस जेवणात गोमय खाल्ले आणि गोमूत्र पिले तर कोरोना आसपास फिरकणार देखील नाही असं संशोधन सुरू आहे पतंजली लॅब्स मध्ये. थोड्याच दिवसात गायीचं शेण आणि मूत्र भयंकर महागणार आहे. आत्ताच साठा करून ठेवा.. स्पेशली भक्तांनी आणि कट्टर हिंदुत्त्व वाद्यांनी.
हल्ली भक्त आणि कट्टर हिंदुत्व वादे दिसत नाईत कुठे.... राम मंदिर बांधायला गेले की काय..
हल्ली भक्त आणि कट्टर हिंदुत्व
हल्ली भक्त आणि कट्टर हिंदुत्व वादे दिसत नाईत कुठे.... राम मंदिर बांधायला गेले की काय..>> खरं आहे. शाळाकॉलेजच्या व्हाटसएप गृपमधले भक्तगण थंडावलेत.
हे कार्टून सही आहे..
हे कार्टून सही आहे..
https://images.app.goo.gl/5sPSxfTB1zq6kmYD6
बाबरी तोडली
बाबरी तोडली
आता लवकरच ताजमहाल खोदु , असे म्हणणारा भक्त ऑक्सिजन न मिळाल्याने धारातीर्थी पडला
काँग्रेसच्या काळात स्मॉल
काँग्रेसच्या काळात स्मॉल पोक्स, बीसीजी , ट्रिपल , टिटी , पोलिओ इतक्या लशींचे इतके डोस सर्वांना फुकट मिळाले. कधी कसली श्रेयबाजी नाही आणि किमतीवरून कम्पनी अन सरकारमध्ये वाद झाले नाहीत>>>>> ब्लॅककॅट , अक्षरशः मनातलं लिहिलेत. कालच विचार करत होते की पोलिओनिर्मूलन सारखी मोहीम यशस्वीपणे राबवणारा माझा देश आता का कमी पडतोय ? किती सहजपणे गाजावाजा न करता ही मोहीम राबवली गेलेली.. तेव्हा तर नुकताच स्वतंत्र झालेला देश. सगळ्याच बाबतीत पाटी कोरी. आणि आज अत्याधुनिक साधन हाताशी असून देखील लोकं मरत आहेत ते केवळ बेजबाबदार नेतृत्वमुळे. त्या काळी हे असलं ध्यान असत तर भारतातील निम्मी जनता आज पोलिओग्रस्त असती वा मृत्युमुखी पडली असती. नशीब फुटक आहे या जनरेशनच की हे लोकं डोक्यावर बसलेत.
ह्यांच्या काळात एक रोग अन दोन डोस , तेही ह्यांना करणे जमले नाही.>>>> प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट केल्याशिवाय जेवण पचत नाही त्यांना . प्रधानमंत्रीपेक्षा इव्हेंटमंत्री म्हणून शोभतील !!! वाट लावून टाकली सगळी
लस घेतल्यानंतर मिळणाऱ्या
लस घेतल्यानंतर मिळणाऱ्या सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो आहे म्हणे.
https://www.telegraphindia.com/india/coronavirus-outbreak-retired-professors-refuse-to-take-vaccine-with-modis-picture-on-the-certificate/cid/1814227
रोज गोमूत्र पिल्यास कोरोना
रोज गोमूत्र पिल्यास कोरोना होणार नाही - भाजप नेत्यांची मुक्ताफळे
https://www.loksatta.com/desh-videsh-news/bjp-mla-devendra-singh-lodhi-s...
I don't think this (Modi
I don't think this (Modi photo) is true....
काँग्रेसच्या काळात स्मॉल
काँग्रेसच्या काळात स्मॉल पोक्स, बीसीजी , ट्रिपल , टिटी , पोलिओ इतक्या लशींचे इतके डोस सर्वांना फुकट मिळाले. कधी कसली श्रेयबाजी नाही आणि किमतीवरून कम्पनी अन सरकारमध्ये वाद झाले नाहीत.... ब्लॅक kat.. अगदी २००% पटलं...
माझा 18-44 चा पहिला डोस
माझा 18-44 चा पहिला डोस मंगळवार पेठेत कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये आताच झाला.आता बाहेर बसले आहे.
कोव्हीशिल्ड असल्याने उद्या रजा घेण्याचा विचार आहे.
शुक्रवारी काम करत 5 पर्यन्त(स्वेच्छेने) जागल्याने शुक्रवारी रजा घेऊन झोप काढली.
5 व्या मजल्यावर केंद्र होते आणि लिफ्ट बंद होती.2 मास्क घातल्याने 4था मजला येईपर्यंत लोकांना मला दमा असण्याची शंका येईल इतक्या जोरात धापा टाकत होते.पुढे जिना चढणाऱ्या एक दोन लोकांनी 1 मास्क काढा म्हटले.आतला मास्क 4 लेयर होजियरी चा आहे.शेवटी आडोश्याला कोणी जवळ नाही बघून आतला मास्क काढला.वर आल्यावर श्वास पूर्ववत झाल्यावर परत घातला.(हे अतिशय वेडेपणाचे आहे.एन 95 मागवलेला आला होता.पण पार्सल अगदी निघताना आले त्यामुळे तो घातला नाही.
इंजेक्शन व्यवस्थित दिले.अजिबात दुखले नाही.
रांग आणि कारभार फक्त रजिस्ट्रेशन वाल्यांचा व्यवस्थित चालू आहे.आत गेल्यावर 10 मिनिटात नंबर लागला.टोकं नंबर 20 होता.
नायट्रोजनपासुन ऑक्सीजन-https:
नायट्रोजनपासुन ऑक्सीजन-
https://www.loksatta.com/trending-news/explore-possibility-of-o2-product...
ते नायट्रोजन पासून ऑक्सिजन
ते नायट्रोजन पासून ऑक्सिजन असे नसून नायट्रोजन प्लान्ट ऑक्सिजन निर्मिती साठी वापरणे असे आहे. त्यात नायट्रोजन प्लान्ट मध्ये थोडे बदल करावे लागतात असे प्रयोग आयआयटी मुंबईने केल्याचे दोन दिवसांपूर्वी वाचनात आले.
ही बातमी ऐकून त्यांनी तसे म्हटले असावे.
https://www.thehindu.com/news/cities/mumbai/iit-bombay-pilots-innovative...
ते नायट्रोजन पासून ऑक्सिजन
ते नायट्रोजन पासून ऑक्सिजन असे नसून नायट्रोजन प्लान्ट ऑक्सिजन निर्मिती साठी वापरणे असे आहे. त्यात नायट्रोजन प्लान्ट मध्ये थोडे बदल करावे लागतात असे प्रयोग आयआयटी मुंबईने केल्याचे दोन दिवसांपूर्वी वाचनात आले.
ही बातमी ऐकून त्यांनी तसे म्हटले असावे.>> तसं असेल तर चांगलंच आहे. तो प्रयोग यशस्वी व्हावा आणि रुग्णांचे प्राण वाचावेत.
Pages