भारतात कोविडच्या लसीला होणारी दिरंगाई.

Submitted by बाख on 28 April, 2021 - 08:38

जागतिक पातळीवर सर्वच लसींचे समान वाटप व्हावे व लसीकरणाचे प्रमाण वाढून आजारांचे उच्चाटन व्हावे म्हणून
GAVI (ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन अँड इम्युनायजेशन) ही शिखर संस्था जागतिक आरोग्य संघटनेशी संलग्न होऊन
कार्यरत असते. मागास राष्ट्रांनाही लस
मिळावी हा या संस्थेचा मुख्य व उदात्त हेतू आहे. यासाठी
" गावी " या संस्थेला बिल अँड मिलिंडा गेट्स
फाउंडेशनसारख्या अनेक बलाढ्य सेवाभावी संस्थांकडून
निधी मिळतो. नुकतेच १५ एप्रिल रोजी वॉशिंग्टन इथे " गावी" ने आयोजित केलेल्या " वन वर्ल्ड प्रोटेक्टेड" या इव्हेंटमध्ये बऱ्याच देशांनी मुक्तहस्ताने निधीचे वाटप केले.

तरीही श्रीमंत देशांनी निधी दिला आणि गरीब राष्ट्रांना लसी मिळाल्या एवढे सोपे हे काम होत नाहीं. " गावी" तसेच निधी पुरवठा करणाऱ्या संस्था जेव्हा एखाद्या देशाला लस
निर्मितीसाठी निधी देतात तेव्हा एखाद्या कंपनीच्या लसीला झुकते माप देणे, एखाद्या विशिष्ट कंपनीच्याच लसीची खरेदी
करण्यासाठी दबाव आणणे, आणि अविकसित, मागास देशातील लसीकरण कार्यक्रम ठरवताना तो श्रीमंत व विकसित राष्ट्रांना कसा फायदेशीर ठरेल हे पाहणे असे छुपे, न दिसणारे एजेंडा पुढे ढकलतात.

भारतातील सीरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसीच्या उत्पादनासाठी " गावी " ने आगाऊ खरेदीची हमी म्हणून ३०० अब्ज डॉलर्सचे अर्थसाहाय्य दिले आहे. त्याबदल्यात सीरमने
कमी उत्पन्नाच्या ९२ देशांना जूनपर्यंत १०০ दशलक्ष डोसेस देण्याचा कायदेशीर करार " गावी " आणि गेट्स फाउंडेशन यांच्याशी केला आहे. 'गावी' व्यतिरिक्त सीरम
इन्स्टिट्यूटला भारत सरकारकडून ३ हजार कोटींचे अर्थसाहाय्य मिळाले आहे. " गावी" च्या कराराअंतर्गत ७६ देशांना ६०.४ दशलक्ष डोसेस आजवर सीरमने दिले
आहेत. या लसी दिलेल्या देशांमध्ये सौदी अरेबियासारखे श्रीमंत आखाती देशही आहेत. आज सीरम इन्स्टिट्यूटचा एकच कारखाना पुण्यात कार्यरत आहे. काही दिवसापूर्वी नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारतीला आग लागली होती. शिवाय अमेरिकेने सीरमला कच्चा माल देण्यास नकार दिला होता. ( ही रोखलेली निर्यात आताच मागे घेण्यात आली आहे ). अशा स्थितीत सीरमला दिवस रात्र उत्पादन करावे लागत असून " गावी " बरोबर करार केल्यामुळे त्यांनाही सलाम ठोकावा लागत आहे. सीरमच्या कोविशिल्ड या लशीचा तुटवडा यामुळेच भासत आहे. आज सिरम अशा कात्रीत अडकली आहे की स्वतःच्या देश बांधवांना लशी पुरवाव्यात की ९२ देशांची मागणी पूर्ण करावी.

."सगळी श्रीमंत व गरीब राष्ट्रे मिळून एकत्रित लस खरेदी करू,"असे " गावी " म्हणत असताना अमेरिका व ब्रिटनने नोव्हेंबरमध्येच लस तयार करणाऱ्या - फायजर, मॉडर्ना व
जॉन्सन अँड जॉन्सन या तीन मुख्य कंपन्यांना अब्जावधी
डॉलर्स देऊन बहुतांश डोस "प्री बुक' केले. रशिया आणि चीनने स्वतःच्या बळावर देशी लसी बनविल्या. यामुळे आज
जगात १४ % लोकसंख्या असलेल्या देशांकडे जगातील
८५% लससाठा उपलब्ध आहे. अमेरिकेने ५०% व इंग्लंडने
६०% लोकसंख्येला पहिला डोस दिला आहे.

या पार्श्वभूमीवर भारतात एक डोस मिळालेल्यांचे प्रमाण ५.२ % व दोन्ही डोस मिळालेल्यांचे प्रमाण १ % एवढे कमी आहे. ज्या देशातून जी मिळेल ती लस खरेदी करणे आणि प्रत्येकाला शक्य तितक्या लवकर देणे आवश्यक असताना, भारतात लसीकरण केंद्रांवरून अनेक जण लसीअभावी
परतताना दिसत आहे. भारत बायोटेक या काही अंशी देशी संस्थेचा लस निर्मितीतील सहभाग आज केवळ १०% आहे. भारताने १० हजार कोटी रुपये हे अर्थसंकल्पात लसीसाठी निश्चित केले आहेत. पण यापैकी बहुतांश निधी हा खाजगी
कंपन्या व परदेशी लसी खरेदीसाठी खर्ची पडणार आहे.
हाफकिन इन्स्टिट्यूट - मुंबई, सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट - कसौली, पाश्चर इन्स्टिट्यूट, कुन्नूर, किंग इन्स्टिट्यूट - चेन्नई या भारत सरकारच्या लस तयार करणाऱ्या संस्थांचा उपयोग करुन घेतला पाहिजे. असे केले तरच सर्वांचे लसीकरण होऊ शकेल अन्यथा एकशे तीस कोटी जनतेचे लसीकरण कसे आणि केंव्हा होईल त्याची फक्त कल्पनाच आपण करू शकतो. त्यामुळेच १ मे २०२१ पासून १८ ते ४५ या वयोगटातील लोकांचे सरसकट लसीकरण करणे केवळ अशक्य आहे.

....

Group content visibility: 
Use group defaults

एकंदरित सावळा गोंधळ आहे. मग आता १ मे पासून १८ ते ४५ वर्षं गटातील जनतेला कशासाठी लशी द्यायची घाई करता..? ४५ वर्षांवरील फक्त १% लोकांनी दोन डोसेस घेतलेले असताना १ मे नंतर एकही लस मिळू द्यायची नाही अशी योजना तर नाही ना..? किंवा काळ्या बाजारातून लशी चढ्या किमतीने विकत घेऊन समाजाने लसीकरण करवून घ्यावे (युपी, बिहार, गुजरात, दिल्लीतील पेशंटना स्वतः काल्या बाजारातून ऑक्सीजनची सोय करावी लागते तसे..!) अशी सरकारची इच्छा दिसते. रेमीडीसिव्हर प्रमाणॅ या लशींचाही घाऊक साठा करवून आपल्या बगलबच्च्यांकरवी १०० पट जास्त किमतीला विकण्याचा अनुभव असलेली बरीच अनुभवी धेंडे आहेत.

भारतात कसलेच नियोजन नाही.सर्व सावळा गोंधळ चालु आहे.फंड हा प्रश्न च नाही तो कधीच कमी पडला नसता
पण सरकार सक्षम नाही ,सत्तेवर असलेलं लोक बुध्दी नी सक्षम नाहीत.
आणि भारतीय मीडिया विषयी बोलायला शब्द तोकडे पडतील .
जगातील एक मेव बिनडोक दर्जाहीन मीडिया म्हणजे भारतीय मीडिया.

भारतातल्या भाबड्या जनतेलाही विसरून चालणार नाही.
मला आठवतेय, १६ जानेवारीला पुण्यातील सिरम institute मधून लस घेऊन पहिला ट्रक एअरपोर्ट्कडे रवाना झाला त्याचे जे काही उदात्तीकरण मीडियाने चालवले होते आणि लोकही ह्या लस निर्मिती आणि वितरण व्यवस्थेने अतिशय भारावून गेले होते. नंतर भारत कसा इतर देशांना (ब्राझिल इत्यादी) लसरूपातील संजीवनी पुरवतो आहे ह्याचे अतिश भारावलेले whatsapp forward फिरले. आणि आता आपल्यालाच लशींसाठी अनेक राष्ट्रांकडे हात पसरायची वेळ आली आहे.
कोविड निर्मूलनासाठी लशीकरण हा खात्रीशीर उपाय आहे ह्या भ्रमाचा भोपळा आता खरतर फुटायला हवा. कोणताही राजकीय पक्ष किंवा नोकरशाही ह्या समस्येतून मार्ग काढू शकेल, उपाय आणि उपचारात सुसूत्रता आणू शकेल शकेल अशी भाबडी आशा ठेवणे लोकांनी थांबवावे.
तो कोविड्चा विषाणु स्वतःहूनच mutate होऊन निष्प्रभ झाला तर बरं. नाहीतर ह्या विषाणु सोबत जगण्याची सर्वांनी सवय करून घ्यावी हे उत्तम.
विषाणु सोबत जगण्याची सवय करणे म्हणजे वरचेवर लॉकडाउनला सामोरे जाणे हे नव्हे.
१) आपली immunity वाढवणे.
२) कोविड झालाच तर घाबरून न जाणे
३) उपचार घेताना तारतम्य बाळगणे
४) गरज नसताना hospitalization/ remidisvir टाळणे (ज्यांच्यावर कुटुंबातले इतर लोक अवलंबून नाहीत आणि ज्यांचे बर्‍यापैकी आयुष्य जगून झाले आहे, आयुष्यात आता फार काही करायची/ मिळवायची उमेद राहिली नाही अश्या लोकांनी स्वतःहून hospitalization ला विरोध करावा.)
५) अफवा न पसरवणे
६) आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी लोकप्रतिनिधींवर दबाव आणणे.
हीच साधने कोविडशी लढण्यासाठी येत्याकाळात वापरावी लागणार आहेत.

सोहा, फक्त पहिल्या परिच्छेदशी सहमत

ज्यांच्यावर कुटुंबातले इतर लोक अवलंबून नाहीत आणि ज्यांचे बर्‍यापैकी आयुष्य जगून झाले आहे, आयुष्यात आता फार काही करायची/ मिळवायची उमेद राहिली नाही अश्या लोकांनी स्वतःहून hospitalization ला विरोध करावा.>>>> Uhoh असं नसतं हो. स्वतःहून कोण बोलेल काय कि मला मरायला सोडून द्या आणि तुम्ही जगा. जो व्यक्ती आपल्या वयस्कर नातेवाईकाला घेऊन आलाय तो बोलेल का कि यांचं वय झालंय यांना रेमडीसीवीर देऊ नका जे तरुण आहेत त्यांना द्या.

स्वतःहून कोण बोलेल काय कि मला मरायला सोडून द्या आणि तुम्ही जगा.>> हो. असं बोलणारे आणि लेखी लिहून देणारे काही लोक माझ्या परिचयात आहेत. ते आजारी झाले तर त्यांनी व्यक्त केलेल्या ह्या इच्छेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांच्या नातेवाईकांवर असेल. अश्यावेळी त्यांनी वयस्कर नातेवाईकाला घेऊन उपचारांसाठी जाताना भान ठेवावे की वयस्कर व्यक्तीचा जीव वाचवायचा अट्टाहास करणे सोडून दिले तर ज्याला hospitalization/ remidisvir ची जास्त गरज आहे अश्या माणसाला ते मिळू शकेल.

सीरमच्या लशींसंबंधी त्यावेळी आलेल्या भाबड्या व्हाट्सप संदेशांवरून आता फार कीव करावीशी वाटते मंद माठ भक्तांची. ब्राझील च्या पंतप्रधानांनी म्हणे यांना ट्विट वरून हनुमान संजिवनी बुटी घेऊन जातानाचं चित्र पाठवलं होतं. अरे कोणत्या जगात वावरतात हे मंद महामाठ भाबडे मुर्ख लोक..?

यावर कळस म्हणजे सीरम च्या आजुबाजुला रहाणार्‍या, हडपसर मधे रहाणार्‍या काही येडपटांनी तर "आम्हाला तर काय लगेच लस मिळेल.. इथेच तर आहे आम्च्या घराशेजारी.." असे अकलेचे तारे तोडलेलंही आठवतंय. Biggrin

मला तर कोरोना पासून स्वतःचे रक्षण करायचे असेल तर खालील बाबी पाळाव्या असे प्रकर्षाने वाटते -
१. काही झालं तरी घरातून बाहेर पडु नये अन घरातील इतरांनाही बाहेर पडु देऊ नये.
२. जीवनावश्यक वस्तू घरपोच मागवाव्यात अन शक्य नसेल तर सकाळि ६.५० लाच त्या दुकानांसमोर जाऊन उभे रहावे अन ७ वाजता दुकान उघडले की माल भरून आणावा.
३. कोणाच्याहे घरी जाऊ नये अन घरातील इतरांनाही जाऊ देऊ नये.
४. बाहेरील कोणालाही कोणत्याही कारणास्तव स्वतःच्या घरी बोलावू नये.
५. लसीकरणासाठी गर्दीत जाण्याची कसलीही घाई न करता दुसरी लाट ओसरेपर्यंत घरीच वाट बघावी अन गर्दी ओसरल्यावर, बाधितांचे आकडे कमी झाल्यावर लस घ्यावी.
६. दुसरी लाट ओसरल्यावर आता कोरोना गेला असं समजून सगळीकडे उंडारत न फिरता पटकन लसीकरण करून घ्यावे... युरोप मधे तिसरी लाट आलेली आहे याची बातम्या बघून खात्री करावी... ती आपल्याकडेही येणार हे मनात पक्के ठसवून ठेवावे.

हो. असं बोलणारे आणि लेखी लिहून देणारे काही लोक माझ्या परिचयात आहेत.>>>> ते त्या व्यक्तीची परीक्षा घेत असतात की खरोखरच या व्यक्तीला आपण डोईजड झालो आहोत का.

हो. असं बोलणारे आणि लेखी लिहून देणारे काही लोक माझ्या परिचयात आहेत.>>>> ते त्या व्यक्तीची परीक्षा घेत असतात की खरोखरच या व्यक्तीला आपण डोईजड झालो आहोत का.>> Biggrin Biggrin Biggrin

ते त्या व्यक्तीची परीक्षा घेत असतात की खरोखरच या व्यक्तीला आपण डोईजड झालो आहोत का. >> माणसाची परिक्षा घेणे हे देवाचे काम आहे. आणि देवाला कसली कोरोनाची भिती? Proud

ज्यांच्यावर कुटुंबातले इतर लोक अवलंबून नाहीत आणि ज्यांचे बर्‍यापैकी आयुष्य जगून झाले आहे, आयुष्यात आता फार काही करायची/ मिळवायची उमेद राहिली नाही अश्या लोकांनी स्वतःहून hospitalization ला विरोध करावा.>>>. सॉरी सोहा, मी या मताशी सहमत नाही. बाकी पटले. लाईट गेल्याने रि देऊ शकले नाही.

२) कोविड झालाच तर घाबरून न जाणे>>>>> हा मुद्दा मेन आहे.

RSS च्या एका 85 वर्षीय कार्यकर्त्याने असे केले आहे, त्याला मिळणारा बेड त्याने एका चाळीस वर्षीय व्यक्ती ला दिला आणि त्या 85 वर्षीय आदरणीय मानवाचे 3 दिवसानंतर निधन झाले

काही झालं तरी घरातून बाहेर पडु नये अन घरातील इतरांनाही बाहेर पडु देऊ नये.>> जीवनावश्यक वस्तू बनवणारे, त्यासाठी लागणारा कच्चा माल पुरवणारे, त्याचे वितरण करणारे ह्यांनी काय करावे? जीवनावश्यक वस्तू माझ्या घराजवळ मिळत नसतील आणि मला वाहन चालवता येत नसेल तर मला दुकानापर्यंत पोचवण्याची व्यवस्था कोण करणार?
दुसरी लाट ओसरल्यावर आता कोरोना गेला असं समजून सगळीकडे उंडारत न फिरता पटकन लसीकरण करून घ्यावे >> सर्वांचे लसीकरण पटकन करणे किती कठीण आहे हे वरील लेख वाचूनही लक्षात आले नाही काय?
युरोप मधे तिसरी लाट आलेली आहे याची बातम्या बघून खात्री करावी.>> युरोपात तिसरी लाट आली तरच आपल्याकडे येणार का?
तिसरी काय?चौथी, पाचवी, बारावी अश्या अनेक लाटा येतील. त्यामुळे पुढची पाच दहा वर्षे लोकांनी स्वतःला घरात कोंडून घ्यावे हेच बरे. नाही का?

१. काही झालं तरी घरातून बाहेर पडु नये अन घरातील इतरांनाही बाहेर पडु देऊ नये.>>>>> मला एक विचारायचे आहे की ज्यांच्या घरातील व्यक्ती करोनाबाधित असून दरवाजावर होम क्वारंटाईनचा स्टीकर लवलेला आहे.अशा घरातील व्यक्ती लगेच दुसर्‍या दिवशी गाडी सॅनिटाइज करायला घराबाहेर पडू शकते का? काल आम्हां सर्व शेजार्‍यांना सांगण्यात आले की या घरातील माणसांना घराबाहेर पडू देऊ नका.
तसेच घरातील कचरा किंवा बॉक्सेस हे लोक स्वःतच्या दाराबाहेर न ठेवता जिन्यावर जाऊन ठेवतात.हे कितपत योग्य आहे? कारण त्यांच्या समोर एक वयस्कर जोडपे रहाते.

अवघड आहे एकंदर.

२८ एप्रिल रोजीची भारतातील कोविड परिस्थिती अशी :
१. बाधित - ३,७९,२५० (एका दिवसातील कोरोना लागण)
२. कोरोना मृत्यु - ३,६५० (एका दिवसातील कोरोना मृत्यु)

आता हे आकडे बघुन ज्याने त्याने ठरवावे की आपण काय अन कशी काळजी घ्यावी.

एकूण म्हातारे मेले तरी काही हरकत नाही. अस करुयात का कि साठ वर्षावरील सर्व लोकाना मारून टाकूया. खायला काळ आणि भूमीला भार. भाकड गाईंना नाही कसायाकडे विकत तसेच अगदी. साल्यांना अजून जगायची इच्छा आहे काय ? म्हातारे जाउद्या मरणालागुनी जाळून किंवा पुरून टाका!
हे असले सडेल तत्वज्ञान ऐकण्याची पाळी आपल्यावर का आली ह्याचा विचार करा.

कोविड झालाच तर घाबरून न जाणे>>>>> हा मुद्दा मेन आहे. >> कोविड बाधितांच्या संपर्कात आलेले 85% लोक हे asymptomatic रहातात हे लक्षात ठेवावे. उरलेल्या १५% लोकांननी वर सुचवलेल्या #३, ४ आणि ६ ह्या सुचनांचा विचार करावा.
लॉकडाऊन आणि social distancing चे अति स्तोम माजवणे, त्यावरून आपले शेजारी, मित्रपरीवार, नातेवाईक ह्यांना जज करणे थांबवावे. ह्यामुळे समाजातील भितीचे वातावरण कमी होण्यास मदत होईल.

आताच्या लाटेत म्हातारी माणसं कमी बळी पडत आहेत तरुण च जास्त मृत्यू मुखी पडत आहेत.
गेल्या वर्षी च्या लाटेत म्हातारी माणसं मरत होती तरुण नव्हते जास्त मरत.
हा विषाणू टोकण पद्धतीने नंबर लावून काम करतोय असे वाटत.
कोणत्याच वयातील लोकांवर अन्याय नको.

<< २. कोरोना मृत्यु - ३,६५० (एका दिवसातील कोरोना मृत्यु) >>

------ मृत्युचे प्रमाण जास्त आहे. multiplying factor १५ अथवा २०

एका गावांत सरकारी आकडा ९ सांगतात, आणि त्या गावांतल्या स्मशानांत ४० प्रेते जळत आहेत, ५० रांगेत आहेत. उ प्र आणि गुजराथ आकडे लपवण्यात आघाडीवर आहे. काहीही झाले तरी चालेल, पण " नेत्याचा आत्मसंन्मान " महत्वाचा.

नोटबंदी नंतर बँकांच्या / ATM बाहेर मोठ्या रांगा.... आणि आता प्रेतांना पण अंतिम संस्कारासाठी शिस्तीमधे रांगेत थांबावे लागत आहे. Sad

नोटबंदी नंतर बँकांच्या / ATM बाहेर मोठ्या रांगा.... आणि आता प्रेतांना पण अंतिम संस्कारासाठी शिस्तीमधे रांगेत थांबावे लागत आहे.>>>++++१११११११११ Uhoh

एकूण म्हातारे मेले तरी काही हरकत नाही. >> बरं वाचवू या म्हातार्‍यांना पण करोनापासून. पण मग Cancer, Heart attack, Diabetes, Liver failure, road accidents अश्या आणि इतर आजारांपासून पण का नाही वाचवायचं? खरं म्हणजे मरणापासूनच वाचवायला हवं. म्हातार्‍यांनाच नाही जगातल्या सगळ्यांनाच. हे तत्वज्ञान कसं वाटत? अमर व्हायचा उपाय सापडला की आपण ह्या तत्वज्ञानानुसार जगूया नक्की.
आणि अमर व्हायचा उपाय आपल्याला घरात बसून, शाळेत्/कॉलेजात न जाता, कोणत्याही research institute मधे काम न करता नक्कीच सापडेल.

<< भारतातील सीरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसीच्या उत्पादनासाठी " गावी " ने आगाऊ खरेदीची हमी म्हणून ३०० अब्ज डॉलर्सचे अर्थसाहाय्य दिले आहे. त्याबदल्यात सीरमने
कमी उत्पन्नाच्या ९२ देशांना जूनपर्यंत १०০ दशलक्ष डोसेस देण्याचा कायदेशीर करार " गावी " आणि गेट्स फाउंडेशन यांच्याशी केला आहे. 'गावी' व्यतिरिक्त सीरम
इन्स्टिट्यूटला भारत सरकारकडून ३ हजार कोटींचे अर्थसाहाय्य मिळाले आहे. " गावी" च्या कराराअंतर्गत ७६ देशांना ६०.४ दशलक्ष डोसेस आजवर सीरमने दिले
आहेत. >>

----- भारत सरकारने सिरमशी करार कधी केला ? जानेवारी / फेब्रुवारी २०२१ ?
पुनावाला यांनी स्वत: चे आणि मग बिल गेटस यांनी सर्वात आधी आर्थिक मदत केली. इतर देश करार करत होते तेव्हाच भारत सरकारने का नाही करार केला?

<<आज सिरम अशा कात्रीत अडकली आहे की स्वतःच्या देश बांधवांना लशी पुरवाव्यात की ९२ देशांची मागणी पूर्ण करावी. >>
------ ४०० रुपये राज्य सरकार, १५० केंद्र सरकार, प्रायव्हेटना वेगळा रेट... असे वेगवेगळे दर आहेत. चक्क व्यावसाय आहे, आणि चांगला व्यावसाय आहे.

नव्या माहितीनुसार केंद्र तसेच राज्य सरकारांना सरसकट ४०० रुपये दर रहाणार आहे. हे आधी पण करता आले असते.

<< "सगळी श्रीमंत व गरीब राष्ट्रे मिळून एकत्रित लस खरेदी करू,"असे " गावी " म्हणत असताना अमेरिका व ब्रिटनने नोव्हेंबरमध्येच लस तयार करणाऱ्या - फायजर, मॉडर्ना व
जॉन्सन अँड जॉन्सन या तीन मुख्य कंपन्यांना अब्जावधी
डॉलर्स देऊन बहुतांश डोस "प्री बुक' केले. रशिया आणि चीनने स्वतःच्या बळावर देशी लसी बनविल्या. >>

------ हे महत्वाचे आहे.
प्रत्येक देशाच्या नेत्याला सर्वात आधी स्वत:च्या देशाची काळजी असते.... असे प्री बुकींग भारताने का नाही केले ? किंवा लस विकसीत करण्यासाठी (सुरवातीच्या काळांत) का नाही प्रोत्साहन दिले?

संजीवनीचे उदाहरण तसेही समर्पकच होते

संजीवनी राजकुमारासाठी होती , सामान्य लोक तर दोन्ही बाजूनी युद्धात मरतच होते , त्यांना कुणी काही आणले नव्हते

मोदिजिनी लस आधी श्रीमंत राष्ट्रांना देऊन टाकली

एक सामान्य कुटुंब 10000 रु ची प्रतिमाह खरेदी करते , त्यावर सरासरी 10 टक्के जीएसटी पकडला तरी 1000 रु महिन्याचे व 12 हजार वर्षाचे होतात , 6000 केंद्र व 6000 राज्य सरकारला जातात

मग कधीतरी 100 वर्षातून लस फुकट द्यायला काय प्रॉब्लेम आहे ?

प्रत्येक देशाच्या नेत्याला सर्वात आधी स्वत:च्या देशाची काळजी असते.... असे प्री बुकींग भारताने का नाही केले ? किंवा लस विकसीत करण्यासाठी (सुरवातीच्या काळांत) का नाही प्रोत्साहन दिले?>> त्यावेळी फेकू बंगालच्या निवडणुकी साठी वेषभुषा, केशभुषा ठरवण्यात अन ती आमलात आणण्यात, गृहमंत्री महाकुंभच्या आयोजनात अन आरोग्यमंत्री विश्रांती घेण्यात मश्गुल होते. त्याचाच तर परिणाम आहे हा...!!

देवकी,
इथे सांगितलेल्या केस चे माहीत नाही, पण आमच्या ओळखीतल्या बऱ्याच जणांना स्वतः कोव्हिड असूनही घरातल्या ज्ये ना किंवा बायको मूल यांच्या टेस्टस साठी, औषधे घ्यायला बरेच वेळा बाहेर पडावेच लागले आहे.
कचरा जिन्यावर ठेवणे मात्र चांगले नाही.(शक्यतो जमल्यास घरातच जाळता आला तर बरे.तसे करायचे नसल्यास सोडियम हायपोक्लोरेट फवारून अगदी बंद डब्यात बाहेर ठेवावा.कचरा नेणाऱ्या लोकांकडे चांगले मास्क नसतात.सॅनिटायझरही दिले असेल का माहीत नाही.त्यांना एक्सपोज केल्यासारखे होईल.

बरं वाचवू या म्हातार्‍यांना पण करोनापासून. पण मग Cancer, Heart attack, Diabetes, Liver failure, road accidents अश्या आणि इतर आजारांपासून पण का नाही वाचवायचं?
देवाचे आभार माना कि शास्त्रज्ञ तुमचा हा बहुमोल सल्ला ऐकण्या साठी थांबले नाहीत.

ज्यांच्यावर कुटुंबातले इतर लोक अवलंबून नाहीत आणि ज्यांचे बर्‍यापैकी आयुष्य जगून झाले आहे, आयुष्यात आता फार काही करायची/ मिळवायची उमेद राहिली नाही अश्या लोकांनी स्वतःहून hospitalization ला विरोध करावा. >>>
आयुष्य बर्‍यापैकी जगुन झालेले आहे हे कोण ठरवणार पण ? अनेक खेडोपाडी अजुनही ७५,८०,८५ वय असलेली जेष्ठ मंडळी तरुणांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावुन शेती आणि घरतली इतर कामं करत असतात. माझ्या परीचयातली अशी अनेक कुटूंबे आहेत जिथल्या ८८-९० च्या घरातल्या आजीबाई अजुनही सुना नातसुनांच्या बरोबरीने गरज पडेल तशी घरातली कामं सांभाळत आहेत. या लोकांचा अनुभव आणि आधार असतो घराला. आपलं माणुस आपल्याला हवच असतं हो. मग असे निर्णय जर पुढे मागे लोक घ्यायला लागले तर या जेष्ठ मंडळींना गृहीत धरले जाइल आणि यांच्यावर उपचार कशाला करयचे असे चित्र तयार व्हायला वेळ नाही लागणार समाजात.कृपया असे चुकीचे विचार नका पसरवु.

आणि तुम्ही आम्ही असे निर्णय घेणारे कोण म्हणा ? कालपासुन किमान ४-५ बातम्या पाहिल्या आहेत की अनेक इतर आजार असुनही आजी अजोबांनी कोरोना वर मात केली आहे. अगदी एचआरसीटी २५/२५ स्कोर असलेल्या आजी बर्‍या झालेले आजच वाचले. देव तारी त्याला कोण मारी हे सगळीकडे लागु आहेच की.

Pages