कोविड लसीचा अनुभव

Submitted by च्रप्स on 19 March, 2021 - 22:23

मित्रांनो, तुम्ही कोविड लस घेतली का?
आमची पुढच्या आठवड्यात अपॉइंटमेंट आहे, moderna मिळेल आम्हाला.
तुमचे अनुभव कसे आहेत, साईड इफेक्ट्स जाणवतायत का काही?
इथे चर्चा करूया का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल माझ्या आईने दुसरा डोस घेतला. कोल्हापूर. ताईने खूप फॉलोअप घेतला तेव्हा कुठे जमलं हे. लससाठा संपला होता त्यामुळे सतत चौकशी, फोन करून मग जेव्हा लस उपलब्ध आहे हे समजलं तेव्हा तिने आईला नेऊन आणलं. सर्टिफिकेट ऑनलाईन मिळालं. सरकारी हॉस्पिटलमध्ये.

आमचं शनिवारी असंच होणार आहे. दोघांना दुसरा टोचा एकदम लागेल. लांब आहे म्हणुन एकदम घेतोय. पहिल्या वेळेस जास्त त्रास नाही झाला. यावेळी बघु. पण आज व उद्या बरंच जेवण बनवून ठेवू आणि शनिवारी कन्येला घेऊन जाऊ कारण आता ती गाडी चालवते. तिचे दोन्ही टोचे झालेत सुरुवातीलाच कारण ती स्वयंसेवक आहे एका दवाखान्यात.

Craps , तुम्ही जे म्हणत आहात ते मला पटतंय, मान्य आहेच पण एकदम अनेक वेळा अनेकांकडे पर्याय नसतो.

मला दुसऱ्या डोस चं बरंच टेंशन यायला लागलंय आता

जिथे लस घेतली ते इंश्युरंसला बिल पाठवतात. विमा नसेल तर सरकारला बिल पाठवतात. सामान्य नागरीकास पैसे द्यावे लागत नाहीत.

Citizens असो वा नसो, insurance असो वा नसो.. सगळ्यांना लस फ्री आहे

आज परत आई बाबांना दुसरा डोस मिळण्यास प्रयत्न केला.
एका रुग्णालयात आज सकाळी येऊन नंबर लावण्यास सांगितले होते तिथे सकाळी आठ वाजताच गेलो, आणि रांगेत उभा राहिलो. थोड्या वेळाने त्यांनी सांगितले आज येणार नाही लस, उद्या येईल.

मग दुसऱ्या एका रुग्णालयात गेलो. त्यांनी सांगितले नऊ वाजता टोकन देणे सुरू होईल, इकडे रांग लावा.
अर्ध्या तासाने सांगितले इकडे रांग लावा. माझा रांगेत पंधराच्या आसपास नंबर होता.
आणि मग शेवटी पावणे दहाच्या सुमार परत आधीच्या ठिकाणाहुन घोषणा केली या इकडे.
मग रांगेत न उभे राहिलेले तिकडे झेपावले आणि ही रांग तोडून सगळे तिकडे पळाले आणि नुसती झुंबंड उडाली. सोशल डिस्टनसींग नाही काही नाही.

मग मी निघून आलो.
जाऊ दे दुसरा डोस. जर महिन्याने सुरळीत लस मिळणे सुरू झाले तर तेव्हा बघेन.

लेकाला अमेरिकेत दुसरा डोस मिळाला (फायझर) दिड दिवस हात,खांदा दुखला बराच. रात्री हात दुखणं जरा कमी झालं पण ९९.७ असा थोडा ताप आलेला. उद्या टकाटक होईल असं वाटतय.

नवऱ्याला आज पुण्यात कोवॅक्सिन मिळाली( दुसरा डोस). गेला आठवडाभर मिळत नव्हती. पण आज संजिवनला काम झालं. व्यवस्थित सोय होती. छापील सर्टिफिकेटही लगेच मिळालं.

डायरेक्ट लसकेंद्रावर जाण्यापेक्षा तिकडच्या वॉर रूम मध्ये फोन करून पूर्ण माहिती मिळवायची. किंवा जर शहर असाल तर जवळपासच्या एखादया लहान गावच्या सरकारी केंद्रात जायचे. कमी गोंधळ अन गर्दी असते

मी_परी, हैद्राबादला.
व्हीबी आमच्याकडे वॉर रूम वगैरे काही नाही.
बराच अनागोंदी कारभार आहे इकडे, वरून लसींचा तुटवडा.
गावाची आयडिया चांगलीय पण दोन तास जायला दोन तास यायला लागतील. शेवटी तेच करण्याचा विचार आहे.

प्रज्ञा९ कोल्हापुरा मध्ये कोणत्या सरकारी दवाखान्यात लस घेतली तुमच्या आईने? तिथला नंबर माहिती असेल तर सांगाल का?

काल मी आरोग्य सेतू वरून आईसाठी registration केलं. तिला आजची तारीख आणि दुपारचा स्लॉट मिळाला होता. आज दुपारी आई बाबा त्या लसीकरण केंद्रावर गेले तर तिथं कुणीच नव्हतं. फक्त लसीकरण केंद्र म्हणून लावलेलं बॅनर हवेत उडत होत म्हणे.
मग तिथून गावाच्या बाहेर एका लसीकरण केंद्रावर आई बाबा गेले तर तिथे already भांडण चालू होते. भयंकर गर्दी. सगळा अनागोंदी कारभार. ऑनलाईन registration वाल्यांना तर कुणी भाव पण देत नव्हतं म्हणे. शेवटी आई बाबांना सांगण्यात आले की तुम्ही सोमवारी या आजचा कोटा संपला. इतक्या उन्हात इतक्या दूर बाईक वर जाऊन लस न घेता आई बाबा परत आले. आई मला म्हणे असं कसं ग तू registration केलं..? कशावरून केलं? ते खर तरी आहे का म्हणे?
त्या आरोग्य सेतू चा तर इतका राग आलाय आता की विचारू नका..

आरोग्यसेतु काय किंवा कोविन साईट का दोन्हीचं काहीतरी गंडलय।
आपल्या आसपासच्या दवाखान्यांमधे फोन करून तिथली उपलब्धता विचारून मग जावे।
आम्हीही साईटवर बुक केलेलं तर ते कॅन्सल झाल्याचा मेसेज आला। मग २-३ दवाखान्यात फोनाफोनी करून संजिवनला मिळतय कळल्यावर तिथे गेलो। तिथे मात्र सोय व्यवस्थित होती
मागच्यावेळी असच झालं। तेव्हा बुक करून संजिवनला जाऊन मिळाली नव्हती पण फोन करून दिनानाथला मिळत असल्याचं कळलं अन तिथे गेल्यावर मिळाली
एकुणात तुम्ही ॲप्रोच व्हाल तेव्हा त्या दवाखान्याकडे कोणत्या अन किती लसी आल्या यावर ठरतय
त्यामुळे बुक केलं असलं तरी जाण्याआधी संबधित दवाखान्यात फोन करून चौकशी करणं उत्तम
आताच इतका अपुरा लसपुरवठा आहे तर १मे नंतर सर्वांसाठी एकदम खुलं केल्यावर काय होईल कोणजाणे
लसपुरवठा वाढावा हीच इच्छा!

आरोग्यसेतु काय किंवा कोविन साईट का दोन्हीचं काहीतरी गंडलय। >>> दोन्ही युजर इंटरफेस वेगळे असले तरी बॅक एन्ड ला एकच सिस्टम आहे.

आरोग्य सेतु ऍप वरुण अपॉइंटमेंट घेऊन काही होत नाही असा अनुभव साबाच्या वेळेस आला. मार्च २२ ला पहिला डोस झाला तेव्हा नवरा सकाळी ७:३० पासून लाइन मधे उभा राहिला. शेजारचा पण होता एकजन. साबांची अपॉइंटमेंट होती तरी लाइन मधे उभे रहव लागल. नंबर लॉन घेणार कुणी न्हवत. याच लोकांनी एक पानावर लिस्ट बनवली. जेव्हा लस आली ९:३०-१० च्या आसपास तेव्हा एकजन तिकडेच थांबून एकजन हे लोक घेऊन गेला. १०-११ नंबर होता. रजिस्टर केल्यामुळे आत गेल्यावर वेळ लागला नाही अगदी १५ मि मधे काम झाल. हे सरकारी हॉस्पिटल आहे.
सकाळी जाउन थांबला तर लवकर नंबर लागतो नाही तर दुपारी ३-४ होतात नंबर यायला असा अनुभव बाकि गेलेल्या लोकांचा होता.
दुसऱ्या डोसला पण अपॉइंटमेंट घेतली होती सेम हॉस्पिटलची पण मग असच सकाळी नंबर लावावा लागला असता आणि सोय एवढी चांगली वाटली न्हवती. म्हणून गैलेक्सी केयर हॉस्पिटल मधे कोवाक्सिनचा फ़क्त दूसरा डोस देतात आणि कूपन घेऊन जायच सकाळी ते लोका टाइम देतात तेव्हा यायच. कूपन घ्यायला गेलो तर ते मिळाल नाही पण तिकडचा माणूस म्हणाला की काही लोका covishield असताना पण घेउन जातात कूपन मग राहते लस बाकि तर कॉल करा असेल तर येऊन घेऊन जा .
मग तसा ११ ला कॉल केला तर त्याने सांगितला या म्हणून आणि मिळून गेली लस.
आमच्या सोबत पहिला डोस घेतला ते न्हवते अवेलेबल सकाळी. संध्याकाळी ४ ला सहज सेम सरकारी हॉस्पिटलला गेले तर लगेच झाल काम.. नंबर नाही काही नाही

परी, हो सरकारी हॉस्पिटलमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन न करता लगेच होते काम हे मी पण लिहिलंय आधी.
पहिल्या डोस च्या वेळी पप्पा एकटे गेले होते सकाळी त्यांनीच मम्मीचा नंबर पण लावला होता. पहिल्या लॉटमध्ये त्यांचे काम झाले होते, यावेळी दुसरा डोस असल्याने टोकनची गरज नाही सांगितले होते तसे दोघे दुपारी बारा ला गेले अन एक वाजता परत आले, रांग मोठी होती पण पटापट उरकले सगळे. फक्त ते सर्टिफिकेट अडकलय अजुम दुसऱ्या डोस चे.

मंडळी, मी 13 एप्रिल ला कोविशिल्ड चा पहिला डोस घेतला, त्यानंतर ताप हात दुखणे वगैरे सगळं पार पडल्यानंतर विश्रांती घेऊन मी कामाला परत सुरुवात केली. 19 तारखेला मला विकनेस आणि अंगदुखी इ जाणवल्यामुळे dr च्या सल्ल्यानुसार टेस्ट केली ती पॉसिटीव्ह आली. त्यामुळे मग घरातल्या सगळ्यांची टेस्ट केली तेव्हा आई आणि mr. पण पॉसिटीव्ह आले पैकी आईने पण गेल्या महिन्यात लसीचा पहिला डोस घेतला होता. आता आम्ही तिघेही dr च्या मेडिकेशन मध्ये घरीच उपचार घेतो आहोत. पण मग लसीने आपल्याला संरक्षण कसे मिळते? असा अनुभव अजून कोणास आला आहे काय? की लस घेऊनही कोरोना झाला?

सान्वी, माझ्या एका बहिणीने २ एप्रिलला लसीचा पहिला डोस घेतला आणि तिला ११ एप्रिलला ताप, कोरडा खोकला, अंग दुखी ही लक्षणे दिसायला लागली. तिची कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आली.
यात आम्हाला आश्चर्य वाटले नाही. एक तर लस घेतल्यावर प्रतिकारशक्ती निर्माण व्हायला १५ दिवस लागतात असे वाचले. आणि पहिल्या डोसची एफिकसी ५०% च्या आसपास आहे. म्हणजे १५ दिवस उलटून गेले तरी ५०%.
माझ्या बहिणीला सौम्य लक्षणेच होती आणि टेस्टचा निकाल येई पर्यन्त ती बरीच कमी झालेली होती. या बाबतीत (तीव्रता कमी असणे, लक्षणांमध्ये लौकर सुधारणा) कदाचित लसीने मदत केली असेल.

लसीमुळे संसर्ग टळणार नाही, पण आजार तीव्र होणार नाही, हॉस्पिटलाइझ होण्याची शक्यता खूप कमी होते आणि मृत्यूची शक्यता नगण्य असे बऱ्याच ठिकाणी वाचले.
पण नवीन स्ट्रेन मुळे हे सुद्धा बदलेल, परत नवीन बदल केलेली लसही घ्यावी लागेल.

सध्या लस हवी असल्यास मुंबईत राजावाडी आणि चिंचवड मध्ये कामत हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आहेत. मागच्या दोन दिवसात घरच्या आणि जवळच्या नातेवाईकानी ह्या ठिकाणी जाउन घेतली. गर्दी पण कमी होती . तासाभरात काम झाले.

मम्मी पप्पांचे फायनल सर्टिफिकेट मिळाले. काल मी सहज परत एकदा वॉर रूमला फोन केला त्यांना सांगितले की हॉस्पिटलमध्ये जाणे शक्य नाही घरी ज्ये ना आणि लहान बाळ आहे तर त्यांनी एक व्हाट्सएप नंबर दिला. त्यांना मम्मी पप्पांचे नाव आणि लस घेतलेली तारीख कालच व्हाट्सएप वर दिली अन आज दुपारी त्यांनी दोन्ही सर्टिफिकेट पाठवले. खूप मदत झाली वॉर रूम स्टाफची नाहीतर पप्पांना जावे लागले असते परत .

दोन दिवसांपासून Bmc त्यांच्या कुठल्या केंद्रांवर लस उपलब्ध आहे , हे त्यांच्या ट्विटर हॅंडलवर जाहीर करत आहे.

Pages