झी मराठी वर नुकतीच येऊ कशी तशी मी नांदायला ही नवी मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ८ च्या टाईम स्लॉटवर सुरू झाली. मालिकेचं टायटल साँग सुद्धा बरंच बरं जमलंय कि बघताना मिसेस मुख्यमंत्रीच्या ठसकेदार टायटल साँगची आठवण आल्याशिवाय रहात नाही इतकं ते कॉपी झालंय..!
मालिकेतील लिड स्टारकास्ट अगदीच नवीन परंतु चॅलेंजिंग आहे. स्वीटु (अन्विता फलटणकर) आणि ओंकार (शाल्व किंजवडेकर) हे दोघे या मालिकेचे लिड आहेत तर त्यांना साथ द्यायला खंबीर आधारस्तंभ म्हणुन स्वीटुची आई नलू साळवी (दिप्ती केतकर), ओमची आई शकुंतला खानविलकर (शुभांगी गोखले), ओमची बहीण मालविका खानविलकर (आदिती सारंगधर) आहेत. त्याच सोबत स्विटुचे बाबा, काका, काकू, चुलत भाऊ चिन्या हे सर्व साळवी कुटुंबीय दहा बाय बाराच्या हॉल अन सहा बाय सहाच्या किचन या वन आरके मधे रहात आहेत(हेच घर झीमच्या बर्याच सिरियल मधे या आधिही पहायला मिळालेलं आहे..!)
तिकडे खानविलकरांच्या घरात ओमसोबत त्याचे आई-बाबा-बहीण, त्याची होऊ घातलेली इंडो-अमेरिकन बायको, बहिणीचा होऊ घातलेला नवरा (याला या आधी कुठे बघितला आहे हेच आठवत नाही.. ) अन बहिणीचा ऑफिस कम घरातील चमचा/नोकर असे कलाकार आहेत. खानविलकरांचा व्हिला जबरदस्त आहे. त्यांच्या घराची, अंतर्गत सजावटीची अन समस्त खानविलकर कुटुंबियांच्या ड्रेपरीची रंगसंगती ही फिकट रंगससंगतीत आहे ज्यातुन त्यांच्या रहाणीमानावर गडगंज संपत्तीचा अन हाय क्लास जीवनशैलीचा प्रभाव जाणवतो.
सो मिडलक्लास साळवी कुटुंबीय अंबरनाथ मधे रहात आहेत. कर्मदरिद्री स्वभावामुळे आठराविश्व दारिद्र्य हे त्यांच्या पाचवीला पुजलेले असते (कसे ते कालच्या भागात कळाले.. पुढे सांगतोच..!). या कर्मदरिद्री कुटुंबात सर्वांचे खायचे वांधे झालेले असतात पण दोन्ही साळवी जोड्यांची मुले - स्विटू अन चिन्या हे मात्र खात्या-पित्या घरातले ओव्हरवेट वाटावेत असे कसे हे मात्र न सुटलेलं कोडंच आहे. सगळे साळवी स्वभावाने चांगले असतात त्यामुळे त्यांना कशातच वाईटपणा दिसत नसतो. अगदी बिनकामाचे आयुष्य कंठण्यात देखील त्यांना काहीच वाईट वाटत नसतं. स्वीटूच्या बाबांची नोकरी अगदी पहिल्याच भागातच जाते अन ते हताश होऊन दुसर्या नोकरीसाठी कसलेही प्रयत्न न करता नुसते सुतकी चेहर्याने घरी बसुन असतात. त्यांना साथ देणारी नलू ही अंबरनाथमधे चपात्या बनवून विकत असते. स्विटु कुठेतरी थातूर-मातूर नोकरी करत असते अन या दोघींच्या पैशांवर हे सगळे साळवी आयते गिळत असतात. स्विटूचा काका हा एक नंबरचा आळशी अन फाल्तू कामं करणारा इसम असतो (जो कुठल्याही अँगलने अंबरनाथमधे रहणारा मराठी माणुस वाटत नाही - ठार गुज्जु वाटतो..!) ज्याची बायको दम्याचा रोग घेऊन उसउसत जगत असते अन जावेला (नलुला) पडेल ती मदत करण्याची कसरत करत असते. अशा या माठ काका-काकुचा मुलगा चिन्या हा महामाठ असतो अन गुंडांकडून २ लाख रुपये हारलेला असतो. घरात खरेतर हार्पिकची देखील गरज लागु नये अशी गांजलेली परिस्थिती असताना चिन्याच्या उद्योगाला वैतागून घरात सगळे चिंतेत असतात. हाता-तोंडाची गाठ पडण्याचे वांधे झालेल्या साळवींना खानविलकरांच्या कृपेने देव तारायला बघत असतो.
नलूची बालमैत्रीण शकुंतला खानवीलकर ही मोठ्या हेल्थ केअर प्रॉडक्ट उद्योगाची मालकीण असते. हिने देखील नलूसारखाच संसार रेटत मार्गी लावलेला असतो. तिची मुलगी - मालविका ही हाय क्लास सोसायटीची प्रतिनिधी असते अन तिचे विचार शकुला (ती स्वतःच्या आईला ''आई'' असं न म्हणता मिसेस खानविलकर म्हणत असते यावरून त्यांच्या नात्याची कल्पना येऊ शकते..!) आजिबात पटत नसतात. मालविका अजुन अविवाहित असते पण तिचा होऊ घातलेला नवरा - रॉकी कायम तिच्या आगेमागेच असतो अन पडेल ती कामे करत असतो. त्याला जिमचे खूप वेड असते.
नलू-शकु ची मैत्री या दोन कुटुंबियांना जवळ आणते. शाळेत असताना नलूच्या घरची परिस्थिती उत्तम अन शकूच्या घरी खाण्याचे वांधे असतात. काळानुसार परिस्थिती बदलली परंतू दोघींच्या घट्ट मैत्रीत त्या बदललेल्या परिस्थितीचा लवलेशही नाही हे आईसोबत एकदा साळवींच्या घरी आलेला ओम बरोब्बर हेरतो. साळवींच्या दळभद्री आयुष्याची कणव येऊन चांगल्या मनाचा ओम त्यांना चकल्या-शेव-शंकरपाळ्या अस्ल्या ऑर्डरी मिळवून देऊन ४ सुखाचे घास खाऊ घालण्याचे पुण्य पदरात पाडून घेतो. त्याला नलू मावशी अन साळवींबद्दल नितांत आदर असतो.
असा हा ओम्या मनाने अन रुपानेही खरंच खूप चांगला असतो. त्याच्या चांगुलपणावर जाडी अन मनमिळावू स्वीटु भाळते. तिचा सर्वांची काळजी घेणारा, कामसू स्वभाव शकुलाही खूप आवडतो अन ती परिस्थितीने (खरेतर कर्मदरिद्रीपणामुळे) गांजलेल्या साळवींना अजून थोडी मदत व्हावी या हेतुने स्वीटुला 'खानविलकर हेल्थ प्रॉडक्ट्स'च्या बिझनेस युनिट मधे नोकरीला बोलावते. एवढेच नव्हे तर स्वतःच्याच बंगल्यात रहायला सांगते. शकुच्या मुलीला - मालविकेला मात्र हे आवडत नाही अन ती स्विटूला भयंकर पिडू लागते. मालविकेने भावासाठी एक माठ इंडो-अमेरिकन मुलगी (मोमो) शोधलेली असते जिचे पिताश्री एक वेलनोन बिझनेस टायकून अन ६०० करोड की कायशा संपत्तीचे मालक असतात. त्यावर डोळा ठेऊन मालविका ही मोमो-ओम्याची सोयरीक जुळवण्याच्या प्रयत्नात असते अन ती मोमोला सतत सोबत घेऊन तिला काय हवं काय नको याची काळजी घेत असते. तर अशा या इंग्रजाळलेल्या कम भंजाळलेल्या अतार्कीक मोमोची अटेंडंट म्हणुन स्विटूचे वर्णी लागते.
त्यानंतर एकेदिवशी शकू अन ओम्या साळव्यांना थोडा चेंज म्हणुन स्वतःच्या व्हिलात पाहुणचारासाठी बोलावतात. या भेटीत साळाव्यांच्या कर्मदरिद्रीपणाच्या कडक आवरणाखाली खळाळणार्या चांगुलपणाची झलक ओम्याला दिसते. आपल्या कुटुंबियांना शकु मावशीने अन ओम्याने चांगला पाहुणचार दिला हे बघून स्विटूही सुखावते. त्याचवेळी मालविकाला व्हिलाची धर्मशाळा झाल्याचा संताप अनावर होऊन ती साळव्यांना सळो की पळो करून सोडते. साळव्यांना त्यांची जागा दाखवायचा प्रयत्न करते परंतु साळवे इतके इतके नतद्रष्ट असतात की त्यांना त्यांची जागाच माहित नसते . त्यामुळे मालविकेकडून साळवी यथेच्छ सळो-की-पळो करून घेतात . शेवटी हायक्लास असलेल्या ३ मैत्रीणींना बोलावलेल्या जंगी(?) पार्टीत मालविका साळव्यांना अपमानीत करु लागते त्यावेळी लेकीचे प्रताप हताशपणे पहात उभ्या असलेल्या शकूला स्विटूची साथ मिळते अन मालविकेचा डाव तिच्यावरच उलटवत थोड्या विनोदी अंगाने तो कसनुसा प्रसंग अन साळव्यांचा खानविलकर व्हिला मधला स्टे एकदाचा संपतो अन आपणाला हुश्श वाटतं.
खरं सांगायचं तर पहिले काही भाग अतिशय बाळबोध वाटत होते परंतु त्यात पुढील भागांची बिजं खुबीने पेरण्यात दिग्दर्शकाला यश आलं. जाडी स्विटु अन शेलाटा ओम्या यांचं कसं काय बुवा जमणार. कैच्या कै सिरियल दिसते असं वाटत असतानाच स्विटू अन ओम्या आपल्याला आवडू लागतात यात दिग्दर्शन, संवादलेखन अन कॅमेर्याचाही हात आहे.
दिप्ती केतकर यांनी नलूच्या गेटअपवर खरेच खूप कष्ट घेतले आहेत. त्या अगदी नलूच वाटतात इतकं बेअरिंग त्यांनी पकडलं आहे त्याबद्दल त्यांचं विषेश कौतुक..! शुभांगी गोखलेंची शकू देखील अगदी सफाईदार आहे. मालविकेचं कॅरेक्टर लाऊड आहे पण आदिती सारंगधरने ते बरोब्बर साधलं आहे. अन्विता फलटणकर अन शाल्व किंजवडेकरचे स्विटू-ओम्या अगदी पर्फेक्ट आहेत असं जाणवतं याचा अर्थ त्यांची केमिस्ट्री चांगलीच जुळली आहे. झी मराठीवर असं जाडं-शेलाटं प्रकरण पहिल्यांदाच आल्यामुळं काहीतरी नवीन आहे या उत्सुकतेपोटी आपण त्यात गुंतू लागतो. आपल्याप्रमाणे शकूला पण स्विटूच ओम्यासाठी योग्य वाटू लागते जेणेकरून खानविलकरांच्या घराला घरपण देण्यासाठी (डि.एस.कें.च्या घरांना डावलून ) एक चांगली सून मिळेल हे त्यामागचं कारण असतं.
स्विटू अन ओम्याच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन शकु अंबरनाथच्या चपातीवाल्या साळव्यांच्या घरी मिठाईचे बॉक्स अन भेटवस्तू घेऊन पोचते. किचन ओट्याशी थांबून अगदी आनंदात शकू-नलू या घट्ट मैत्रीणी स्विटूच्या लग्नाबद्दल सेम पिंच सेम पिंच करत बोलत असतात. नलू-शकूची मैत्री त्या दोघींच्या मुलांना बांधतेय असं वाटत असतानाच कर्मदरिद्री साळव्यांची नलू बावळटासारखी शकूसमोर स्वतःचा फोन धरत त्या फोन मधे कुणा स्थळाचा फोटो दाखवत हे स्थळ स्विटूसाठी किती योग्य आहे ते दाखवते अन ते बघून आपलीही अवस्था शकूसारखी (काय ही नली दलिंदर आहे बघा.. कुबेर शकुच्या रुपाने नलीच्या पदरात आपले धन टाकू पहात आहे अन ह्या कर्मदरिद्री नलीचा पदर फाटका रे बाबा..!!) होते. शकू आवंढा गिळत नलीच्या हो ला हो-हो (हे शुभांगी गोखलेंना नेहमी छानच जमतं ) करत रहाते अन आपण मात्र दळभद्री नलीला लाखोल्या वाहत उद्या पासून नकोच बाबा ही येऊ-कशी-तशी असा विचार करतो खरा पण 'आज काय होणार?' ही उत्सुकता पुन्हा उद्या रात्री ८ वाजता आपली बोटे रिमोटवरील १२०४ हा आकडा दाबून आपला मोर्चा झी मराठीकडेच वळवणार हे माहित असुनही उद्याचा प्रीकॅप बघून झाला की आजच्या पुरतं तरी आपण चॅनेल बदलतो.
अशा या नवीन सिरियल वर चर्चा करण्यासाठी हा धागा थोडा उशिराच उघडला असला तरी सिरियलची खरी सुरुवात तर आजच्या भागापासून होणार आहे
नली ला वेड लागलंय. आज खुद्द
नली ला वेड लागलंय. आज खुद्द सख्खी मैत्रीण मुलीचा हात मागते आहे स्वतः च्या मुलासाठी तरी नली ची ट्यूब पेटत नाहीये. मोहित च्या मागे पडली आहे.
शकू आणि ओम ला नकार देण्याचं नक्क्की काय कारण देते बघू उद्या. मालविका स्वीटू ला त्रास देईल असे वाटत असेल तर मोहित ची आई पण त्रास देणारच आहे ना एवढा साधा सिम्पल विचार नाही करू शकत का नली. याडपट पणा चा कळस. आता ओम आणि मोमो च्या साखरपुड्यात नाट्यमय पद्धतीने स्वीटू आणि ओम चं भांड फोडणार बहुतेक आणि त्या साठी महा एपिसोड होणार
नली ला वेड लागलंय. आज खुद्द
..
नली ला वेड लागलंय. >> अहो,
नली ला वेड लागलंय. >> अहो, असं म्हणून समस्त वेड्यांचा अपमान केल्या सारखं होतंय .
आज खुद्द सख्खी मैत्रीण मुलीचा हात मागते आहे स्वतः च्या मुलासाठी तरी नली ची ट्यूब पेटत नाहीये. मोहित च्या मागे पडली आहे.>> शुद्ध दळभद्रीपणा नलीकडून असा सतत पाझरत असतो. म्हणून आपला त्रास कमी होण्यासाठी ज्यावेळेस नली आपल्या डाव्या हाताची बोटं उगीच तोंडाला लावत असते त्याचक्षणी आपण दुसरं काहीतरी करायला जावं म्हणजे तिचा दळभद्रीपणा नजरेस पडत नाही
Proud Proud Proud Proud
ती दळभद्री नली डोक्यावर पडलीय
ती दळभद्री नली डोक्यावर पडलीय तिला नवऱ्याचेही ऐकायचे नाही आहे
(No subject)
सगळे लोक कुठे गेले इथले ?
सगळे लोक कुठे गेले इथले ?
पिसं काढायचा पण कंटाळा आला का काय
नवीन नवीन छान वाटली होती
नवीन नवीन छान वाटली होती सिरियल पण आता बघवत नाही. इतक्या लवकर इंटरेस्ट संपेल असं वाटलं नव्हतं. माझा होशील ना या शिरेलीला सर्वात जास्त झी गौरव मिळाले यात झी ची लायकी कळून चुकते.
येकतमीनां मधे फक्त तायडी, मोमो, रॉकी हेच बघणेबल आहेत... ओम्या केवळ गरीबांचा शारुख वाटतो त्यापलिकडे तो काहीही एक्ष्प्रेशन देऊ शकत नाही तर स्वीटूला बघणं नकोसं वाटतं.. तिचा अभिनय फुगलेल्या चेहर्यातून आपल्यासमोर येतच नाही की काय अशी शंका येते. नलीचा दळभद्रीपणा शिरेल संपेतो संपणार नाही शिवाय माठ चिन्या अन त्याचे महामाठ आई-वडील साळव्यांना येनकेन प्रकारेण पनौती लाऊन रडं काढणार हेही ठाऊक आहे. उरला प्रश्न मोहितचा. तो कशासाठी स्विटूशी लग्न करणार आहे हे काही केल्या कळत नाही.
<<. उरला प्रश्न मोहितचा. तो
<<. उरला प्रश्न मोहितचा. तो कशासाठी स्विटूशी लग्न करणार आहे हे काही केल्या कळत नाही.>>
तायडीला मोहितने ओम स्वीटूचा अफैर आहे असं सांगितलं न मागे, तेव्हा तायडीने चप्पल मारून घ्यायला सांगितली त्याला स्वतःच्या तोंडात.
त्याला हे प्रकरण सिद्ध करण्यासाठी स्वीटूचा नवरा होऊ घातला आहे स्वतःला. जेणेकरून ओम रडकुंडीला येऊन लग्न मोडेल किंवा कबूल करेल. आणि त्याचा अपमानाचा बदला पूर्ण होईल (असं चप्पल मारून घेताना बोलला होता मनात,)
तसं ही डिरेक्टरला स्वीटूच लग्न अचानक कसं लावून द्यायचं ओम्याशी असा प्रश् पडला असेल. ह्या सगळ्या नाट्यात तिचे लग्न ओममुळे मोडेल आणि ओमला लग्न करावा लागेल तिच्याशी.. जवळपास असं असं घडण्याची शक्यता आहे.
अरेच्चा... खरंछ की. मोहित
अरेच्चा... खरंच की. मोहित तायडीचा बदला घेईल. मला तर असं वाटु लागलंय की तो आता स्विटू अन ओम्याचं जुळवूनच देईल अन तायडीला सर्प्राईज देउन अपमानाचा व्याजासहित बदला घेईल. पण या नादात शिरेल संपेल त्याचं काय..?? मला वाटतंय त्यापुढे तायडी पदरी पडलं अन गोड झालं असं न मानता स्विटूला बारीक होण्यासाठी डेडलाईन देईल त्यामुळे शिरेल अजुन एक वर्षभर सहज चालेल... जाड्यांना बारीक करण्यात वर्ष वर्ष घालवण्याचा झी ला चांगलाच अनुभव आहे (जाडूबाई जोरात.. आठवली का..?)
हो हो.. माझा नवरा सिरीयल चालू
हो हो.. माझा नवरा सिरीयल चालू झाली तेव्हाचं म्हणाला होता हिला सिरीयल मध्ये बारीक करणार बघ
(No subject)
तायडा स्विटुला बारीक करून बदला घेणार....
पण ओम्याला जाड्या स्विटुला बारीक झालेली बघून तिच्यातील इंटरेस्ट संपणार.. मग त्याचं बाहेर लफडं... मग डिव्होर्स.. मग शेलाट्या स्विटुला पुन्हा मोहित मागणी घालणार... मग स्विटू ओम्याला धडा शिकवण्यासाठी मानबा सारखी दुसरं लग्न करणार. मानबाचीच क्रेएटिव टीम आहे.. गाडी त्याच रस्त्याने जाणार असं वाटतंय.
बापरे डीजे, अहो कशाला एवढे
बापरे डीजे, अहो कशाला एवढे डेंजर आयडिया येतात सीरिअल वाल्याना
शीतल, मोहित स्वीटू च्या मागे लागलाय त्याचं तुम्ही दिलेलं कारण बरोबर वाटतंय.. मोहित स्वीटू च्या लग्नाचा सगळा सेटअप करतील आणि मग ऐन मांडवात मोहित माघार घेईल आणि मग , " आता माझ्या पोरीचं कसं होणार लग्न मोडलं तिचं" अशी रडा रड सळव्यांनी सुरू केली की ओम लगेच धावून येणार..मै थामुंगा उसका हाथ.... म्हणत...
>>> माझा होशील ना या शिरेलीला
>>> माझा होशील ना या शिरेलीला सर्वात जास्त झी गौरव मिळाले यात झी ची लायकी कळून चुकते.
झी वर दुसरी कुठली चांगली सिरीयल आहे का सध्या? ह्यात तरी दिग्दर्शक आणि कलाकार चांगली कामं करत आहेत.
मै थामुंगा उसका हाथ.... >>
मै थामुंगा उसका हाथ.... >>
झी वर दुसरी कुठली चांगली सिरीयल आहे का सध्या? ह्यात तरी दिग्दर्शक आणि कलाकार चांगली कामं करत आहेत.>> काय माहित... मला तर ही सिरियल म्हणजे ७ बायका अन एक पुरुष असलेल्या श्री च्या शिरेलीचीच रिप्लिका वाटते... मी कधीच नाही पाहिली. जेव्हा पहातो तेव्हा नाक गोळा करुन बसलेली हिरवीण अन तो बत्थड हिरो अन ते उघडे-नागडे ब्रम्हे मामा बघून व्याक होतं
काल कसला किरणोत्सव करायला
काल कसला किरणोत्सव करायला गेले तर ही मंडळी आणि भटजी सोडून कुत्रं पण नव्हतं. साळवींना नुसतं बघून पण पनवती लागेल असं वाटून इतर भक्तांनी स्वतः च 144 लावून घेतलं बहुतेक. भटजींनी पण किरणोत्सवाच्या नावाखाली मराठी स्प्लिटसविला साजरा केला. काय करतायत ते त्यांचं त्यांना ठाऊक.
बाकी शीतल यांचं मोहित आणि स्विटू प्रकरणाचं अनुमान पटण्यासारखं..
कालच्या एपीमध्ये स्वीटू
कालच्या एपीमध्ये स्वीटू नवंवारी साडी आणि केसात नांगर फिरवलेल्या हेअर स्टाईल मध्ये बनवा बनवी मधल्या स्त्री वेशातील सचिन सारखी दिसत होती
साळवींना नुसतं बघून पण पनवती
साळवींना नुसतं बघून पण पनवती लागेल असं वाटून इतर भक्तांनी स्वतः च 144 लावून घेतलं बहुतेक. >>
मोहित आणि ओम ला स्वीटु आणि
मोहित आणि ओम ला स्वीटु आणि मोमो च्या हातातला फरक कळु नये का ?
इथे आम्हाला बघुन सुद्धा कळतं.....इतका वेळ हात हातात घेउन बसलेत तरी आपण चुकीच्या गल्लीत आलोय हे कसं कळलं नाही म्हणे
आणि इतक्या प्रसिद्ध किरणोत्सवासाठी २च जोड्या कश काय बुवा ....
मोमो फ्रॉड आहे. तिचे वडील तेच
मोमो फ्रॉड आहे. तिचे वडील तेच असणार जे मंदिराबाहेर भीक मागत बसले होते. लवकर संपेल तर बरं होईल.
मोमो फ्रॉड असेल तर फार मज्जा
मोमो फ्रॉड असेल तर फार मज्जा येईल. साळव्यांपेक्षा खानविलकरच दळभद्री ठरतील
मोमो आता खानविलकरांना भिकेला
मोमो आता खानविलकरांना भिकेला लावणार. ती ऑफिस मधे जातेच आहे. काहितरी किडे करुन ती खानविलकरांची सगळी संपत्ती ढापणार.मग खानविलकर पण साळव्यांसारखे रस्त्यावर येणार. मग तायडी आणि समस्त खानविलकर मंडळी अंबरनाथ ला येतील राहयला सळव्याच्या आधाराने. मग स्वीटु आणि ओम चे लग्न होणार आणि मग स्वीटु शकु च्या मदतीने पुन्हा बिझनेस टॉप ला नेणार. अशा रितीनी ही सिरीअल पुढचे ४-५ वर्ष चालु शकते.
ओम अंबरनाथ ला पाणी भरतोय .
ओम अंबरनाथ ला पाणी भरतोय .
स्वीटु अजूनही तसेच आपले लांबसडक केस सोदुन कीचन मध्ये काम करतेय
तायडी अजूनही कोणाच्या ना कोणाच्या कानफटात वाजवतेय
भारीच ट्रॅक बनवलाय स्मिता...
भारीच ट्रॅक बनवलाय स्मिता... क्रिएटिव्ह टीम ला हे कळलं तर तुम्हाला ते नक्कीच बोलावून घेतली एपिसोड लिहायला...
तायडी अजूनही कोणाच्या ना कोणाच्या कानफटात वाजवतेय>>
स्वीटू पोल खोल करणार मोमोची
स्वीटू पोल खोल करणार मोमोची असं मी कालच कुठंतरी वाचलं. खानविलकर असेही हंबरनाथला पडीक असतात तायडी सोडून. स्मिता यांनी सांगितलेला ट्रॅक मन बावरे मध्ये होता आणि अजूनही कुठे बघितलाय. मोमोला हुशार आणि तायडीला अक्कलशून्य बघून डोळ्याचं पारणं फिटेल.
तायडी अजूनही कोणाच्या ना
तायडी अजूनही कोणाच्या ना कोणाच्या कानफटात वाजवतेय >> हा हा हा
मोमोला हुशार आणि तायडीला अक्कलशून्य बघून डोळ्याचं पारणं फिटेल. > +१११
आता काहीतरी घडायला हवय...तेच तेच तेच गोल गोल चालु आहे...पुढच्या आठवड्यात काहातरी घडेल अशी आशा आहे..
पुढच्या आठवड्यात काहातरी घडेल
पुढच्या आठवड्यात काहातरी घडेल अशी आशा आहे..>> स्मितांना बरं सगळं माहित असतं... क्रिएटिव्ह टीम तर जॉइन नाही ना केली..?
आज फारच सेंटी मारली सगळ्यांनी
आज फारच सेंटी मारली सगळ्यांनी. स्वीटू तर ओमला सोडायलाच तयार नाही. तिला हेच वदवून घ्याचं होतं की त्याचं तिच्यावर प्रेम आहे आणि त्याला किती त्रास होतोय. तूझं लग्न झालं तरी मी आहे हे ऐकून तर मला धस्स्स झालं. एकीकडे वाटलं ही मोलकरीण म्हणून तिथेच राहणार की काय. तिकडे मालविका म्हणते ओमला तुला कपडे वगैरे घालायचेत की नाही, जसा काही तो नागडाच फिरतोय.
साखरपुड्याला स्वीटू आता अकलेचे तारे तोडणार आणि स्वतःचा नंबर लावणार. मोमोला माहिती नाही का की ही मुलगी तिला थ्रेट आहे की मोमो खरंच मूर्ख आहे.
यांचा कपडेपट कोण सांभाळतं ?
यांचा कपडेपट कोण सांभाळतं ?
ओमचा कोट कसला चटेरीपटेरी आहे .
मागे silver Jubilee च्या वेळी , पांढरा शर्ट काळा कोट दिलेला त्याला
किती बोअर चालु आहेत सगळे भाग.
किती बोअर चालु आहेत सगळे भाग...मुंगी च्या पावलानी पण नाही म्हणवत...ती पण फास्ट चालते..
त्या ओम ला काही कणा च नाहिये...स्वतः ची बहीण येता जाता आईचा पाणउतारा करते तरी खपवुन कसं काय घेतो ? त्याला काही स्टँड घेता येत नाही का बहिणीपुढे नीट ?
ओम चा कोट डेंजरच आहे बाकी. कसली ती काळ्या कोटावर नक्षी केलिये...
Pages