पेनफुल की पेनलेस लस चांगली

Submitted by VB on 22 January, 2021 - 11:28

सध्या पेनफुल अन पेनलेस अश्या दोन्ही लसी बाळांसाठी उपलब्ध आहेत. गुगलून बघितले मित्रमंडलात विचारले तरी निर्णय होत नाही आहे की बाळासाठी कोणती लस चांगली.
घरचे सगळे पारंपरिक लसीकरण योग्य म्हणतात पण त्यात बाळाला त्रास खूप होतो, सूज येते, ताप येतो ते बघवणार नाही.
तरी यावर इकडे काही चर्चा झाली असेल तर लिंक द्या तसेच आपले अनुभव देखील लिहा

अजून एक म्हणजे बाळाला दीड महिन्याची लस दिल्यावर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी गावी न्यायचे आहे तो पंधरा तासांचा प्रवास त्याला झेपेल का? डॉक बोलले की त्रास नसेल तर हरकत नाही.

तर विचारायचे होते की इथे कुणाला असा अनुभव आहे का इतक्या लहान बाळाला घेऊन लस दिल्यावर प्रवास केल्याचा, असेल तर प्लिज सांगा

धन्यवाद

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरती बर्‍याच जणांनी पेनलेस का पेनफुल बाबत लिहिले आहेच.जे काही द्याल त्यावेळी घरी आल्यावर,ती जागा बर्फाने शेकायला विसरू नका.मी दुसर्‍या की तिसर्‍यावेळी विसरले होते.लेक नंतर कळवळून रडत होता.आताही हे लिहित असताना त्याचे रडणे आठवून शरमायला होतेय.
बाळाला दीड महिन्याची लस दिल्यावर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी गावी न्यायचे आहे तो पंधरा तासांचा प्रवास त्याला झेपेल का? >>>>> शक्य असेल तर नव्हे,पण प्रवास पुढे ढकला.मधेच हाय टेंपरेचर वगैरे त्रास झाला तर काय करणार आहात?

थँक्स सगळ्यांना

आम्ही गावी येऊन इकडे सरकारी दवाखान्यात लस दिली त्याला. घरी आल्यावर साधारण अर्धा एक तास खूप रडला, त्या दिवशी ताप पण होता थोडासा तर दोनदा क्रोसीन ड्रॉप्स दिले, दुसऱ्या दिवशी ठीक होता. घरच्यांच्या दबावामुळे सरकारी लसच द्यावी लागली, पण त्रास झाला नाही त्याला म्हणून बरे वाटले

काहीजण जे बाळांना फक्त सरकारी लस देतात त्यात न्यूमोनिया ची लस नसते, कारण माहीत नाही. ह्या खर्चिक असतात की अजून काही.
पण सध्या सगळीकडे जो कोरोनाचा कहर माजलाय तो बघता ही लस चुकवू नका असे डॉक्टर सांगतात.
यात दोन प्रकार आहेत दोन ते अडीच हजार मध्ये दहा बॅक्टेरिया तर चार ते साडे चार हजार मध्ये तेरा बॅक्टेरिया कव्हर होतात. जी परवडेल ती द्या पण द्या ही लस बाळाला.

हे मी धागा मुद्दाम वर काढून लिहितेय, कारण याच धाग्यात कोणीतरी लिहिले होते की गरजेच्या सगळ्या लसी सरकार देते पण असे नाहीये☺️

आम्ही रमाला सुरुवातीला सरकारी लसी दिल्या (ycm मध्ये, १०₹मध्ये काम झाले ), नंतर करोना मुळे दूर जाता आले नाही तर घराजवळ च्या पेडी कडे दिल्या, ते म्हणले सरकारी लस best असते Happy
न्यूमोनिया ची सरकारी मध्ये नसते ती खाजगी केंद्रात जाऊन घ्यावी

विबी, ती सरकारी दवाखान्यात द्या असा सल्ला मीच दिला, त्यात कुठेही असे म्हणलेले नाही की गरजेच्या सगळ्या लसी सरकार देतंय. माझे असे म्हणणे होते सरकारने आवश्यक केलेल्या आहेत त्यापेक्षा जास्त लसी घ्याव्या लागत नाहीत. जे मला त्यावेळी आणि काही प्रमाणात अजूनही महत्वाचे वाटते, तुम्हाला जी वाटेल ती तुम्ही खाजगी दवाखान्यात घेऊच शकता.

सुहृद, हे तुमच्याबद्दल नाहीये. गावी अन इकडे सुद्धा काहींशी बोलताना लक्षात आले की लोकांना या लसीचे गांभीर्य नाहीये कारण सरकार देत नाही. सध्या कोव्हीड मुळे न्यूमोनियाचा त्रास होतोय खूप जणांना . मग लहान मुलांना काही होत नाही असे समजून गाफील राहून चालणार नाही हेच लोकांना समजत नाहीये.
मी हे इकडे लिहिले कारण झाला उपयोग तर झाला,

अन हो , मी ही माझ्या बाळाला सरकारी लसच दिल्या, अगदी फुकटात, फक्त प्रवास खर्च घर ते हॉस्पिटल. पण ही न्यूमोनियाची त्याच्या पेडिकडून 13 बॅक्टेरिया वाली .

आता कशी आहे बाळाची तब्येत. न्युमोनिया बद्दल तुमचा जागरूक दृष्टिकोण बरोबर आहे सध्याच्या काळात. अशी लस असते हे पण मला माहीत नव्हते.

सरकारी हॉस्पिटल मध्ये च दया आणि पेनफुल च दया ... सरकारी मध्ये फ्रेश स्टॉक असतो आणि।पैसे कमी
पेनफुल दिल्याने बाळाची रेझिस्टेन्स पावर वाढते

अमा, श्रीदत्त मस्त आहे आता. फक्त एक महिन्याचा होता तो जेव्हा कोव्हीड पॉझिटिव्ह झाला होता, म्हणून लस उशिरा द्याव्या लागल्या. त्यात गावी तर खाजगी लस द्यायला कोणी जातच नाहीत. मी पण कोरोनाचा विलगिकरण संपल्यावर गावी गेले होते म्हणून सरकारी लस दिली होती, आता साडे तीन महिन्याची लस पण सरकारी दिली. पण ह्या लसीबद्दल पेडिकडून कळल्यावर लगेच दिली, उगा रिस्क घ्यायची इच्छा नाही. कारण जेव्हा श्रीदत्तचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तेव्हा कळले की लहान मुलांवर काय उपचार करावे हेच माहीत नाही, फक्त लक्ष ठेवा एवढेच म्हणाले, म्हणून इकडे लिहिले, ओळखीच्या सगळ्यांना पण सांगतेय .

पेनफुल दिल्याने बाळाची रेझिस्टेन्स पावर वाढते
>>>
हे मला नाही वाटत खरं आहे. मी रिदीतच्या पेडीला सुद्धा विचारून घेतलंय. आपल्याकडे बऱ्याच चुकीच्या समजुती आहेत आणि त्यापैकी ही एक.

ज्यांच्या कंपनीच्या मेडी क्लेम मध्ये बाळांच्या लसी कव्हर होतात त्यांनी painless च द्या. उगाच त्या एवढ्याशा जीवाला त्रास कशाला द्यायचा. अगदीच निरुपाय असेल तर ठीक आहे.
या पेनलेस लसी फार महाग असतात

पेन लेस चा त्रास होतच नाही असे नाही, माझ्या मुलाला मी पहिली पेनलेसच दिली पण नंतर लोकडाऊन मुले सरकारी अगदी जवळ सहज शक्य आहे हे कळले मग तिथे दिली.
त्याला दोन्हींचाही काहीही त्रास झाला नाही.

पुढेमागे कोव्हिडची पण पेनलेस लस निघेल. सध्याच्या लसीने हात खुप सुजतो आणि दुखतो असं ऐकते आहे.
मग कोणीतरी असाच धागा काढेल की पेनफुल की पेनलेस कोणती लस घ्यावी.;)

पेनलेस मध्ये त्रास होतो च की... मी रेहा ला एकदा देऊन पाहिली पेनलेस पण ताप आणिचिड़चिड तेवधिच होते असं दिसल्यावर जास्तीचे पैसे खर्च करावे का यावर ही मला दुमत झाले. .
आणि माझ्या dr ने दिलेली माहिती मी इथे सांगितली...
काशवरुन आपल्या च कड़े चुकीच्या समजती आहेत... पैसे घ्यायला तिथले dr ही सांगू शकत असतील च की तसे...
काही लोक म्हणतात सरकारी मध्ये देउ नका आणि प्रायवेट हॉस्पिटल मध्ये दया... पण खरे तर असे आहे की सरकारी दवाखान्यात स्टॉक नेहमी फ्रेश मिळतो कारण पैसे कमी असल्याने तिथे नविन नवीन स्टॉक आणला जातो.
प्रायवेट मध्ये 1600 रु ची लस 3000 ला मिलते... हा फरक असतो....

पेनफुल दिल्याने बाळाची रेझिस्टेन्स पावर वाढते - हे माझ्या पेड़ी ने सांगितले आणि मला हे पटले , प्रत्यय आला म्हणून इथे लिहील
... घ्यायचे तर घ्या....
ताप आला की व्यवस्थित औषध वगैरे देत राहुन पालकानी चिड़चिड़ न करता बाळा कड़े लक्ष देणे गरजेचे असते.
सुदैवाने पेन वाली लस देऊन ही रेहा ला जास्त त्रास वहायचा नाही. फ़क़त ताप यायचा.
बाकी पाय बर्फ़ानी शेकवणे वगेरे केल्यामुळे तिला दुखले नाही नन्तर केव्हा... आणि खेळायची मस्त ति

मला पेनफुल लसीचा अनुभव नाही.

अनु, अमेरिकेत लस आणि पैसे याचा संबंध असेल असं मला वाटत नाही. इथे इन्शुरन्स मधे खर्च कव्हर होत असल्याने फसवणूक थोडी कमी असते.

पेनलेस बद्दल मी जे लिहिलंय तर मला अमेरिकेतले डॉक्टर आणि भारतातले डॉक्टर दोघांनीही सांगितलं आहे.

मी वरती लिहिलंय तेच परत लिहिते की पैसे हा मुद्दा नसेल तर पेनलेस दिलेली बरी. कंपन्या तुमचा खर्च करत असतील तर केवळ 'पेनफुल दिल्याने प्रतिकारशक्ती वाढते' एक समजुतीखाली पेनफुल लस सिलेक्ट केली जाऊ नये इतर फॅक्टर असतील तर ठीक आहे. आणि पेनफुल दिली म्हणजे लोकांनी मुलावर किती अत्याचार केलेत वगैरे सुद्धा वाटून घेऊ नये.

नात्यात बऱ्याच बाळांना पेनफुल लसच दिलेली माहिती आहे तेंव्हा बाळाचा पाय धरून बसणं, धक्का लागू न देणं वगैरे करणारे पालक पाहिलेत (ते अति करत असतील कदाचित , मला माहीत नाही) दिवसेंदिवस रडणारी बाळं, बर्फाचे शेक वगैरे सोपस्कार हे सगळं पाहिलं आहे. राघवच्या बाबतीत हे काही दिसलं नाही. एकदा टायलेनॉल दिलं की तो मस्त खेळायचा, झोपायचा... केवळ समजुतीमुळे बाळांना त्रास होऊ नये एवढंच माझं म्हणणं आहे.

मीरा, आजच डोस झाला माझा कोविड लसीचा. 3 पेन किलर घेऊन पण हात दुखतोय म्हणून बोंबलत बसलेय, झोप येईना तेंव्हा पेनलेस मिळाली असती तर नक्की घेतली असती मी.

पेनलेस लस असा काही प्रकार असतो हेच माहित न्हवते मला. हा नवा शोध आहे का? (प्रामाणिक प्रश्न आहे).

सरकारी दवाखान्यात स्टॉक नेहमी फ्रेश मिळतो >> हे बरेचदा वाचलं.
ह्या लशी म्हणजे काय मटार आणि काकड्या आहेत का? की एकदम फ्रेश पाहिजेत? एक्सपायरी झालेली नसली की पुरेसं नाही का?

नवा शोध आहे का? (प्रामाणिक प्रश्न आहे).>>>
पेनलेस लस ही पेनलेस नसून पारंपरिक लसीच्या तुलनेत कमी पेन देणारी म्हणजे लेसपेन लस आहे हे या धाग्यावरील प्रतिसाद वाचता लक्षात येईल.

प्रत्येक पारंपरीक लसीचा असा लेसपेन लसीचा पर्याय असलेच असे नाही.

माझा वैद्यकीय क्षेत्राशी सुतराम संबंध नाही, परंतु अलीकडे (गेल्या काही महिन्यात) पेन झाला म्हणजे लस जास्त प्रभावी, कमी पेन म्हणजे कमी प्रभावी वगैरे मिथके आहेत, सगळ्या लसी तेवढ्याच प्रभावशाली ठेवुन त्यातून कमीत कमी पेन देणाऱ्या लसी उपलब्ध करण्यात येत आहेत असे वाचनात आले.

पूर्वीच्या तुलनेत हल्ली बारीक सुया वापरतात आणि त्यामुळे इंजेक्शन टोचताना त्रास होत नाही किंवा कमी त्रास होतो, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. यालाच पेनलेस (लेसपेन) म्हणतात का?
त्रास कमी व्हावा म्हणून संपूर्ण नवीन प्रकारची लस बनवण्याचा आटापिटा कुठलीही कंपनी करेल असे मलातरी वाटत नाही आणि अश्या २ प्रकारच्या लशी असल्या तरी मुद्दाम जास्त त्रास असणारी लस ठेवणार नाहीत, असे मला वाटते. त्यामुळे पेनलेस लस हा भ्रम (किंवा मार्केटिंग गिमिक) आहे का? अशी मला शंका आहे.

शोधले तेव्हा ही लिंक सापडली.

त्यानुसार:
As a parent, you might want to spare your child from the after-effects of the painful vaccination, but its benefits over the painless vaccine are much greater. It is all right to give your child the painless vaccine for the booster shots, but for their immunity, painful vaccines should be given.

हा धागा काढल्यावर थोडे गुगल केले होते तेव्हा हे लक्षात आले की काही ठराविक लसी आहेत ज्या खूप त्रास देतात म्हणून किमान त्या लसी तरी कितीही महाग असल्या तरी पेनलेस वाल्याच देणार आहे. दोन्ही कडचे आई बाबा पेनलेस लसी विरोधात आहेत

IMG-20211008-WA0000.jpg
हा ओम च्या कार्डवरचा लसीकरण तक्ता. (Image zoom करून पहा )
सरकारी हॉस्पिटल चा आहे.
आता न्यूमोनिया ची लस इथेच देत आहेत, खाजगी मध्ये वेगळी जाऊन घेण्याची गरज नाही.

<<< आता न्यूमोनिया ची लस इथेच देत आहेत, >> हो, कोरोनामुळे हा निर्णय सरकारने घेतलेला दाखवले होते टिव्हिवर.

पण ते फक्त १० वेरीयंटसाठी देतात , सध्या कोरोनामुळे १३ वेरीयंटवाली लस घेतलेली चांगली असे मला वाटते जी खाजगी मध्ये मिळते

तसेच खाजगी मधल्या ईतर लसी जसे फ्लु , टायफाईड सुद्धा घ्याव्या असे माझे मत झाले आहे त्याने मुले कमी आजारी पडतात. सद्यस्थितीमध्ये तेच बरे आहे.

माझ्या श्रीदत्तच्या ९ महिन्याची लस झाली पण त्यात जे व्हिटामिन अ चे ड्रॉप्स असतात ते कुठेच मिळत नाहीयेत. ना सरकारी दवाखान्यात न खाजगी.

Pages