Submitted by मामी on 20 February, 2011 - 04:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
दुधीभोपळा,
लिंबू,
केशर,
गूळ किंवा साखर,
मीठ,
वेलची
क्रमवार पाककृती:
दुधी सोलून फोडी करून कुकरमधून चांगला उकडून घ्यावा. भांड्यात थोडे पाणी घातले तरी चालेल. मध्यम आचेवर कुकर ठेऊन साधारण ४/५ शिट्या घ्याव्यात.
गार झाल्यावर, मिक्सरमध्ये उकडलेला दुधी, साखर, जसे हवे तसे पाणी (लगेच सर्व्ह करायचे असेल तर बर्फ) घालून अगदी बारीक होईपर्यंत घुसळावे. मग त्यात लिंबू पिळावे. कैरीची आंबट चव लिंबामुळे येणार आहे त्यामुळे जरा जास्त लागेल. यात मग मीठ, वेलची पावडर, केशर वगैरे मिसळून थंडगार सर्व्ह करावे.
वाढणी/प्रमाण:
प्रमाण असं काही नाही. आवडीनुसार आणि चवीनुसार.
अधिक टिपा:
- दुधी उकडून ठेवता येतो. फ्रीजमध्ये २ दिवस राहू शकतो. नंतर त्याची ताजेपणाची चव जाऊ शकते.
- पन्हं म्हणून द्यायचे नसल्यास किंवा तसेही पुदिनाही घालू शकता.
माहितीचा स्रोत:
माझी मैत्रिण. तिने हे पन्हं देऊन कशाचं बनवलय हे ओळखायला सांगितले होते. कोणालाही ओळखता आले नाही.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त वाटतंय, वेगळंच.
मस्त वाटतंय, वेगळंच.
वेगळिच क्रुती आहे, ट्राय
वेगळिच क्रुती आहे, ट्राय करणेत येइल
अॅपलसॉसच पन्ह कस करायच?
कैरीच्या पन्हा्याची चव व
कैरीच्या पन्हा्याची चव व गुणधर्म दुधीच्या पन्ह्याला येणे शक्य नाही
हायला वेगळंच प्रकरण तंतोतंत
हायला वेगळंच प्रकरण तंतोतंत असं करून पाहायला हवं.
कच्च्या दुधीला त्याचा वेगळा गंध येइल आणि तो मास्क करायला दुसरा काही इसेंस इ. वापरायला लागेल. उकडलेल्या दुध्याचं तसलं काही नसेल.
कच्च्या दुधीचा रस घेऊ नका.
कच्च्या दुधीचा रस घेऊ नका. दुधी उकडून घ्या.
इतका रस कच्च्या दुधीचा घेतला तर चालेल का की तब्येतीला अपायकारक ठरेल माहीत नाही.
कैरीऐवजी इतर गोष्टी घालून
कैरीऐवजी इतर गोष्टी घालून केलेल्या पन्ह्याला बहुतांशी कैरीच्या पन्ह्याची चव येत नाही. ज्यांना तशी लागते त्यांनी आजवर चांगलं कैरीचं पन्ह प्यायलं नसेल असे वाटते. इथे apple sauce घालून पन्ह करतात ते तर तसे लागत नाहीच ( जवळपास असते) पण चांगल्या कैऱ्या नसल्याने कैरीचे पन्हे पण चांगले होईलच असे नाही. आमचूर किंवा आंबोशीची पावडर घालून चव वाढवता येते
Pages