कोव्हिड केंद्रात भरती होताना काय सामान न्यावे? खबरदारी घ्यावी?

Submitted by अश्विनीमामी on 2 April, 2021 - 06:54

माझ्या कोविड चाचणीचा निकाल आज सात परेन्त येइल. सध्या तरी मला फार त्रास नाही. पण वय व को मॉर्बिडीटीज मजबूत आहेत.
होम आयसोलेशन व रिकव्हरी मला सर्वात सोयीचे पडेल. व मानसिक ताण पण कमी बसेल. आता अश्या परिस्थितीत बीएम सी तल्या लोकांनी कोविड सेंटर मध्ये शिफ्टच व्हा असा आग्रह धरला तर काय करावे? त्यांच्या नियमा नुसार जावेच लागेल. माझी पॉलिसी सरकारी नियम कायदे फर्माने आदेश पाळण्याचीच आहे.

इथे घराजवळच कोविड स्पेशल केंद्र आहे. तर तिथे राहताना काय काय सामान बरोबर असावे?
१) टूथ पेस्ट ब्रश साबण टावेल.
२) दोन कपडे जोडी
३) रोजची औशधे.
४) एक लाइट पांघरूण.
५) पैसे खूप नाहीत पण थोडे बहुत. कार्ड?! आधार व पॅन कार्ड
६) फोन व चार्जर
७) लॅप टॉप नेता येइल का? चार्जर सहित. केंद्र मध्ये वायफाय सुविधा असते का?! सॉरी माझा आत्तापरेन्त फक्त हॉटेलात राहायचा अनुभव आहे.
का चोरी होईल?!
८) खाणे व पाणी तिथे मिळते का? आपण सोय करावी लागते? पाण्याची बाटली.

पाच नाहीतर सहा एप्रिल ला माझी एक दुसरी ट्रीटमेंट स्केज्युल होती त्यामुळे त्यानंतर व्हॅक्सिनचे काम करावे असा मानस होता म्हणून अजून घेतले नव्हते. ३१ मार्च परेन्त वर्स अखेर म्हणून कामाची घाई होती.

अजून काही विसरले असेल तर सांगा. इतर सूचनांचेही स्वागत आहे. मला मॅन पावर काही नाही. पण गरज पडल्यास हपिसातील अधिकारी( हेल्थ ऑफिसर आहेत) त्यांना संपर्क करता येइल .

फीलिन्ग नर्वस. ह्याचे बरोबर भाषांतर थोडी भीतीच वाटत आहे असे आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कंगवा

Asymptomatic केसेस ना घरीच पाठवताहेत कारण वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेड्स कमी पडू लागलेत असं वाचलं.

यस्स. कंगवा विसरलेला. बेड कमी म्हनून मला वेस्टर्न ला कुठे तरी पाठवू नये . आय विल बी टोटली लॉस्ट. दादर पलिकडे मला काहीच माहीत नाही. सामान जमवून ठेवते आहे. जब आयेगा हुकुम हजुरी पॅक करके जावेंगे.

अमा, तुमचे वय पाहता हॉस्पिटलमध्ये दाखल करतील बहुतेक. माझ्या मम्मी पप्पांना त्रास नव्हता पण तरीही भरती होऊन पाच दिवसांचा रेमेसिडीवर चा कोर्स करायला सांगितले पप्पा ज्ये ना तर मम्माला बिपी थायरॉईड चा त्रास आहे म्हणून कोविड चा इतका त्रास नसताना सुद्धा कोर्स करायला सांगितले होते.
अर्थात हे जानेवारीत झाले तेव्हा इतके रुग्ण नव्हते. आता कदाचित घरीच ठेवत असतील.
सरकारी quarantine सेन्टर अन इस्पितळाबाबतीत म्हणजे स्वच्छता वगैरे काही चांगले ऐकायला मिळत नाही. पण खाजगीवाले खूप लुटतायेत.

अमा, घरीच राहायची परवानगी मिळेल बहुतेक. रुग्ण संख्या वाढतेय त्यामुळे ज्यांना फार त्रास नाहीत, घरीच वेगळे राहू शकतात त्यांना घरी रहा म्हणतात. आणि घाबरू नका. सगळं ठीक होईल. तुम्हाला शुभेच्छा.

अमा, खूप शुभेच्छा, लवकर बऱ्या व्हा.
Quarantine सेंटरमध्ये चोरीच्या बातम्या ऐकल्या आहेत, सो, शक्यतो मौल्यवान वस्तू, लॅपटॉप घरीच ठेवा

अमा चाळीशीत असाव्यात. फार वय नाही की मग. नाही रहावं लागणार हॉस्पिटलमध्ये. अमा लवकर बर्‍या व्हा. स्वीटीला कुठे ठेवलेत? Sad
___________
ग्लुकोज बिस्कीटे, ड्रायफ्रुटस. तेवढाच अधुन मधुन पोटाला आधार.

मोबाईल, लॅपी मध्ये नोंदी करता येतीलच
पण तरी एखादी डायरी/वही पेन
स्क्रीन time कमी करायचा असेल तर 2 हलकी/फुलकी पुस्तके
डास वगैरे साठी ओडोमास
दिस्पोजेबल ग्लास,चमचे,प्लेट
2 रदद्दी पेपर
टिशू पेपर
न धुतलेले कपडे वगैरे साठी प्लास्टिक पिशवी

दोन कपडे जोडी >>> कपडे धुण्याची काय सोय असेल माहीत नाही. जास्त ठेवा

आणि किमती समान नको लॅपटॉप वगैरे

पण तुम्हाला जावंच लागणार नाही. घरीच छान ठणठणीत बऱ्या व्हाल

अमा,
फेस वाईप्स,
जुनेच कपडे न्या वापरून टाकून द्यायचे
टिशूचा बाॅक्स
बॅटरी बॅन्क
सपाता
सुकामेवा - अधल्यामधल्या भुकेला आधार

तुम्हाला जावं लागू नयेच, पण लागलं तर
तेलाची बाटली,डियो,4 वाचनेबल पुस्तकं, बऱ्यापैकी सुका खाऊ, जॅम,जास्तीचे कपडे,कपडे धुवायला डेटॉल असं पण न्या, i know ही पिकनिक नाही पण जर राहायची वेळ आली तर किमान आठवडाभर राहाव लागेल

अमा, टेस्टचा निकाल निगेटिव्ह येऊ देत! जरी पॉझिटिव्ह आला तरी फारशी लक्षणं नसली तर मग घरीच रहा शक्यतो. जर घरी राहणार असाल तर Oxymeter मात्र असू द्या. केंद्रातही घेऊन जाता येईल. आयडी कार्ड्स, क्रेडिट कार्डाचे फोटो पुरेत मोबाईलमधे. शक्यतो ती नकाच नेऊ. पैसे आता online अनेक मार्गांनी पाठवता येतात.
हेडफोन्स नक्की घ्या.

Yes ok replying from phone. Noting down everything. This list will also help any new covid patients.

मी सकाळी हॉस्पिटलात ड्युटी केली

मग संध्याकाळी दुसरीकडे ड्युटी केली , दोन दिवस अशक्तपणा व अंगदुखी होती , तरी दुर्लक्ष केले होते , पण मग धाप लागू लागली

म्हणून घरी जाण्यापूर्वी परत पहिल्या हॉस्पिटलात आलो , कॅज्युलतीत एक्स रे काढला , कोविड दिसला , म्हणून तिथेच तसाच एडमिट झालो ( ते कोविड हॉस्पिटल होते तेंव्हा , आता जानेवारी 2021 ला पुन्हा जनरल झाले , गेल्या आठवड्यात मार्च 2021 ला पुन्हा कोविड झाले)

दुसऱ्या दिवशी घरच्यांनी थोडे सामान आणून दिले , आमच्या स्टाफने सफरचंदे दिली,

मे 2020 मधली गोष्ट

माझे सासरे आजच covid हॉस्पिटल मधून घरी येत आहेत. ते खासगी हॉस्पिटलात होते, पण त्यांच्याबरोबर दिलेल्या गोष्टींची इथे यादी देत आहे
१- त्यांची मेडिकल फाईल आणि औषध
२- मोबाईल आणि चार्जर
३- आदल्या मधल्या भुकेसाठी बिस्कीट आणि सुकामेवा
४- टूथपेस्ट ब्रश कंगवा कॉल्ड क्रीम चँप स्टिक वगैरे
५- कपड्यांचे सेट
६-लॅपटॉप आणि चार्जर
७-पावर बँक
८- इंटरनेट डोंगल

अमा लौकर बरे होण्यास शुभेच्छा!
वर सगळी यादी आली आहे.

ब्लॅककॅट तुम्ही गेल्या मे मधले सांगताय ना, ऍडमिट झाल्याचे? दुसरा संसर्ग नाही ना?

टॉयलेट सीट सॅनिटायझेशन स्प्रे (सहज आताच्या तब्येतीत फार खटाटोप न करता मिळाल्यास, नाहीतर साधा सॅनिटायझर पण चालेल.)
तुम्हाला फार लक्षणे त्रास नसतील तर बहुधा होम क्वारंटाईनच करु देतील.
लवकर बरे होण्यास शुभेच्छा.

सरकारी केंद्र / इस्पितळात ॲडमीट होणार असे समजून पोस्ट लिहीत आहे
१) मेडीकल हिस्टरी असेल तर त्या फाईल्स आणि रोजची काही औषधे असतील तर ती सुद्धा दहा दिवसाला पुरतील इतकी
२) टूथपेस्ट ब्रश कंगवा ओडोमॉस. अंगाचा साबण नेण्यापेक्षा लिक्विड वॉश मला जास्त सोयीचा वाटतो. साबण नेला तर त्यासाठी प्लॅस्टिकचा छोटा डबा न्यावा लागतो. पेपर सोप
३) टॉवेल( तोंड पुसायचा आणि अंग पुसायचा)
४) कपडे जर पाच जोड घेतलेत आणि जर दोन दिवसाला एक जोड वापरलात तर तिथे कपडे न धुता घरी आल्यावर सगळे सवडीने करणे शक्य होईल. तसे नसेल जमणार तर कमी जोड नेऊन तिथे धुवावे लागतील आणि त्यासाठी साबण न्यावा लागेल. पांघरूण हलके एखादे.
५) सॅनिटायझर छोटी बाटली, टॉयलेट स्प्रे, डेटॉल छोटी बाटली, टिश्यु पेपर थोडे, डिस्पोजेबल मास्क, वाफ घ्यायचे यंत्र (काही ठिकाणी हे तिथे उपलब्ध नसते आपले न्यावे लागते हवे असल्यास)
६) आजकाल बिस्किटाचा पुडा,खजूर वगैरे न्यायची परवानगी आहे. पुर्वी नव्हती (नवरा ॲडमीट होता तेव्हा परवानगी नव्हती. आत्ता सासुबाई ॲडमीट आहेत तिथे परवानगी आहे)
७) काही ठिकाणचे जेवण जरा अवघड वाटू शकते. काही ठिकाणी घरुन / बाहेरुन डबा आणायला परवानगी देतात (पुर्वी नव्हती नवऱ्याच्या वेळेस. आत्ता परवानगी आहे साबांच्या वेळेस)
८) जुजबी पैसे, घराच्या किल्ल्या, आधार कार्ड, पेन, टॉर्च, फोन चार्जर पोर्टेबल चार्जर हेडफोन एखादे पुस्तक पेन ड्राईव्ह वर आवडते मुव्ही/ गाणी कॉपी करुन नेली तर तिथे फारवेळ मोबाईल नेट वापरावे लागत नाही. वायफाय माझ्या माहितीतल्या ठिकाणी तरी कुठे नव्हते
९) काही प्लॅस्टिक किंवा कपड्याच्या पिशव्या घडी करुन (येताना काही कपडे किंवा इतर काही रॅप करुन आणायला बरे पडते)
१०) एक छोटी डायरी. त्यात नाव पत्ता इमर्जन्सी कॉंटॅक्ट नंबर ब्लड गृप आणि हेल्थ रिलेटेड महत्वाचे तपशील थोडक्यात
११) सगळ्यात महत्त्वाचे पॉझिटिव्ह ॲटीट्यूड घेऊन जा सोबत.

धन्यवाद चांगली माहिती जमा झाली आहे. नक्की उपयोगात आणीन. अजून बी एम सीचा फोन आलेला नाही. व रिपोर्ट कलेक्षन साठी वाट बघत आहे.

अमा , रिपोर्ट निगेटिव्ह असेल तर बी एम सी वाले फोन करत नाहीत. पॉझिटिव्ह असेल तर त्यांना इन्फॉर्म केले जाते.

कोणत्या लॅबमधून टेस्ट केली? आमचे प्रायव्हेट लॅबवाले ईमेलने रिपोर्ट पाठवतात .

पर्योग शाळेतून सांपल रात्री दहाला गेले काल त्यामुळे त्यांनी आज दहाला फोन करायला सांगितले आहे. आता मी उद्याच चेक करेन.
आता एन सी पी ए तर्फे पंडित हरिप्रसा द चौरसियांचे अप्रतिम बासरी वादन चालू आहे. युटुय्ब वर ते ऐकत आहे.

भावनिक आधाराबद्दल व माहिती बद्दल धन्यवाद. शुभरात्री व उत्तम आयुरारोग्य सर्वांसी लाभो.

अमा स्लीपरचा जोड, वेट वाईप्स, ड्राय टिश्युज, टॉयलेट स्प्रे, छोट्याश्या बाटलीत हॅंड/फेस वॉश, वॉटर बॉटल, एखादा छोटासा स्टोल सोबत बाळगा.
ऑल द बेस्ट, फार त्रास न होता तुम्ही बर्या व्हाल.

Pages