झी मराठी वर नुकतीच येऊ कशी तशी मी नांदायला ही नवी मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ८ च्या टाईम स्लॉटवर सुरू झाली. मालिकेचं टायटल साँग सुद्धा बरंच बरं जमलंय कि बघताना मिसेस मुख्यमंत्रीच्या ठसकेदार टायटल साँगची आठवण आल्याशिवाय रहात नाही इतकं ते कॉपी झालंय..!
मालिकेतील लिड स्टारकास्ट अगदीच नवीन परंतु चॅलेंजिंग आहे. स्वीटु (अन्विता फलटणकर) आणि ओंकार (शाल्व किंजवडेकर) हे दोघे या मालिकेचे लिड आहेत तर त्यांना साथ द्यायला खंबीर आधारस्तंभ म्हणुन स्वीटुची आई नलू साळवी (दिप्ती केतकर), ओमची आई शकुंतला खानविलकर (शुभांगी गोखले), ओमची बहीण मालविका खानविलकर (आदिती सारंगधर) आहेत. त्याच सोबत स्विटुचे बाबा, काका, काकू, चुलत भाऊ चिन्या हे सर्व साळवी कुटुंबीय दहा बाय बाराच्या हॉल अन सहा बाय सहाच्या किचन या वन आरके मधे रहात आहेत(हेच घर झीमच्या बर्याच सिरियल मधे या आधिही पहायला मिळालेलं आहे..!)
तिकडे खानविलकरांच्या घरात ओमसोबत त्याचे आई-बाबा-बहीण, त्याची होऊ घातलेली इंडो-अमेरिकन बायको, बहिणीचा होऊ घातलेला नवरा (याला या आधी कुठे बघितला आहे हेच आठवत नाही.. ) अन बहिणीचा ऑफिस कम घरातील चमचा/नोकर असे कलाकार आहेत. खानविलकरांचा व्हिला जबरदस्त आहे. त्यांच्या घराची, अंतर्गत सजावटीची अन समस्त खानविलकर कुटुंबियांच्या ड्रेपरीची रंगसंगती ही फिकट रंगससंगतीत आहे ज्यातुन त्यांच्या रहाणीमानावर गडगंज संपत्तीचा अन हाय क्लास जीवनशैलीचा प्रभाव जाणवतो.
सो मिडलक्लास साळवी कुटुंबीय अंबरनाथ मधे रहात आहेत. कर्मदरिद्री स्वभावामुळे आठराविश्व दारिद्र्य हे त्यांच्या पाचवीला पुजलेले असते (कसे ते कालच्या भागात कळाले.. पुढे सांगतोच..!). या कर्मदरिद्री कुटुंबात सर्वांचे खायचे वांधे झालेले असतात पण दोन्ही साळवी जोड्यांची मुले - स्विटू अन चिन्या हे मात्र खात्या-पित्या घरातले ओव्हरवेट वाटावेत असे कसे हे मात्र न सुटलेलं कोडंच आहे. सगळे साळवी स्वभावाने चांगले असतात त्यामुळे त्यांना कशातच वाईटपणा दिसत नसतो. अगदी बिनकामाचे आयुष्य कंठण्यात देखील त्यांना काहीच वाईट वाटत नसतं. स्वीटूच्या बाबांची नोकरी अगदी पहिल्याच भागातच जाते अन ते हताश होऊन दुसर्या नोकरीसाठी कसलेही प्रयत्न न करता नुसते सुतकी चेहर्याने घरी बसुन असतात. त्यांना साथ देणारी नलू ही अंबरनाथमधे चपात्या बनवून विकत असते. स्विटु कुठेतरी थातूर-मातूर नोकरी करत असते अन या दोघींच्या पैशांवर हे सगळे साळवी आयते गिळत असतात. स्विटूचा काका हा एक नंबरचा आळशी अन फाल्तू कामं करणारा इसम असतो (जो कुठल्याही अँगलने अंबरनाथमधे रहणारा मराठी माणुस वाटत नाही - ठार गुज्जु वाटतो..!) ज्याची बायको दम्याचा रोग घेऊन उसउसत जगत असते अन जावेला (नलुला) पडेल ती मदत करण्याची कसरत करत असते. अशा या माठ काका-काकुचा मुलगा चिन्या हा महामाठ असतो अन गुंडांकडून २ लाख रुपये हारलेला असतो. घरात खरेतर हार्पिकची देखील गरज लागु नये अशी गांजलेली परिस्थिती असताना चिन्याच्या उद्योगाला वैतागून घरात सगळे चिंतेत असतात. हाता-तोंडाची गाठ पडण्याचे वांधे झालेल्या साळवींना खानविलकरांच्या कृपेने देव तारायला बघत असतो.
नलूची बालमैत्रीण शकुंतला खानवीलकर ही मोठ्या हेल्थ केअर प्रॉडक्ट उद्योगाची मालकीण असते. हिने देखील नलूसारखाच संसार रेटत मार्गी लावलेला असतो. तिची मुलगी - मालविका ही हाय क्लास सोसायटीची प्रतिनिधी असते अन तिचे विचार शकुला (ती स्वतःच्या आईला ''आई'' असं न म्हणता मिसेस खानविलकर म्हणत असते यावरून त्यांच्या नात्याची कल्पना येऊ शकते..!) आजिबात पटत नसतात. मालविका अजुन अविवाहित असते पण तिचा होऊ घातलेला नवरा - रॉकी कायम तिच्या आगेमागेच असतो अन पडेल ती कामे करत असतो. त्याला जिमचे खूप वेड असते.
नलू-शकु ची मैत्री या दोन कुटुंबियांना जवळ आणते. शाळेत असताना नलूच्या घरची परिस्थिती उत्तम अन शकूच्या घरी खाण्याचे वांधे असतात. काळानुसार परिस्थिती बदलली परंतू दोघींच्या घट्ट मैत्रीत त्या बदललेल्या परिस्थितीचा लवलेशही नाही हे आईसोबत एकदा साळवींच्या घरी आलेला ओम बरोब्बर हेरतो. साळवींच्या दळभद्री आयुष्याची कणव येऊन चांगल्या मनाचा ओम त्यांना चकल्या-शेव-शंकरपाळ्या अस्ल्या ऑर्डरी मिळवून देऊन ४ सुखाचे घास खाऊ घालण्याचे पुण्य पदरात पाडून घेतो. त्याला नलू मावशी अन साळवींबद्दल नितांत आदर असतो.
असा हा ओम्या मनाने अन रुपानेही खरंच खूप चांगला असतो. त्याच्या चांगुलपणावर जाडी अन मनमिळावू स्वीटु भाळते. तिचा सर्वांची काळजी घेणारा, कामसू स्वभाव शकुलाही खूप आवडतो अन ती परिस्थितीने (खरेतर कर्मदरिद्रीपणामुळे) गांजलेल्या साळवींना अजून थोडी मदत व्हावी या हेतुने स्वीटुला 'खानविलकर हेल्थ प्रॉडक्ट्स'च्या बिझनेस युनिट मधे नोकरीला बोलावते. एवढेच नव्हे तर स्वतःच्याच बंगल्यात रहायला सांगते. शकुच्या मुलीला - मालविकेला मात्र हे आवडत नाही अन ती स्विटूला भयंकर पिडू लागते. मालविकेने भावासाठी एक माठ इंडो-अमेरिकन मुलगी (मोमो) शोधलेली असते जिचे पिताश्री एक वेलनोन बिझनेस टायकून अन ६०० करोड की कायशा संपत्तीचे मालक असतात. त्यावर डोळा ठेऊन मालविका ही मोमो-ओम्याची सोयरीक जुळवण्याच्या प्रयत्नात असते अन ती मोमोला सतत सोबत घेऊन तिला काय हवं काय नको याची काळजी घेत असते. तर अशा या इंग्रजाळलेल्या कम भंजाळलेल्या अतार्कीक मोमोची अटेंडंट म्हणुन स्विटूचे वर्णी लागते.
त्यानंतर एकेदिवशी शकू अन ओम्या साळव्यांना थोडा चेंज म्हणुन स्वतःच्या व्हिलात पाहुणचारासाठी बोलावतात. या भेटीत साळाव्यांच्या कर्मदरिद्रीपणाच्या कडक आवरणाखाली खळाळणार्या चांगुलपणाची झलक ओम्याला दिसते. आपल्या कुटुंबियांना शकु मावशीने अन ओम्याने चांगला पाहुणचार दिला हे बघून स्विटूही सुखावते. त्याचवेळी मालविकाला व्हिलाची धर्मशाळा झाल्याचा संताप अनावर होऊन ती साळव्यांना सळो की पळो करून सोडते. साळव्यांना त्यांची जागा दाखवायचा प्रयत्न करते परंतु साळवे इतके इतके नतद्रष्ट असतात की त्यांना त्यांची जागाच माहित नसते . त्यामुळे मालविकेकडून साळवी यथेच्छ सळो-की-पळो करून घेतात . शेवटी हायक्लास असलेल्या ३ मैत्रीणींना बोलावलेल्या जंगी(?) पार्टीत मालविका साळव्यांना अपमानीत करु लागते त्यावेळी लेकीचे प्रताप हताशपणे पहात उभ्या असलेल्या शकूला स्विटूची साथ मिळते अन मालविकेचा डाव तिच्यावरच उलटवत थोड्या विनोदी अंगाने तो कसनुसा प्रसंग अन साळव्यांचा खानविलकर व्हिला मधला स्टे एकदाचा संपतो अन आपणाला हुश्श वाटतं.
खरं सांगायचं तर पहिले काही भाग अतिशय बाळबोध वाटत होते परंतु त्यात पुढील भागांची बिजं खुबीने पेरण्यात दिग्दर्शकाला यश आलं. जाडी स्विटु अन शेलाटा ओम्या यांचं कसं काय बुवा जमणार. कैच्या कै सिरियल दिसते असं वाटत असतानाच स्विटू अन ओम्या आपल्याला आवडू लागतात यात दिग्दर्शन, संवादलेखन अन कॅमेर्याचाही हात आहे.
दिप्ती केतकर यांनी नलूच्या गेटअपवर खरेच खूप कष्ट घेतले आहेत. त्या अगदी नलूच वाटतात इतकं बेअरिंग त्यांनी पकडलं आहे त्याबद्दल त्यांचं विषेश कौतुक..! शुभांगी गोखलेंची शकू देखील अगदी सफाईदार आहे. मालविकेचं कॅरेक्टर लाऊड आहे पण आदिती सारंगधरने ते बरोब्बर साधलं आहे. अन्विता फलटणकर अन शाल्व किंजवडेकरचे स्विटू-ओम्या अगदी पर्फेक्ट आहेत असं जाणवतं याचा अर्थ त्यांची केमिस्ट्री चांगलीच जुळली आहे. झी मराठीवर असं जाडं-शेलाटं प्रकरण पहिल्यांदाच आल्यामुळं काहीतरी नवीन आहे या उत्सुकतेपोटी आपण त्यात गुंतू लागतो. आपल्याप्रमाणे शकूला पण स्विटूच ओम्यासाठी योग्य वाटू लागते जेणेकरून खानविलकरांच्या घराला घरपण देण्यासाठी (डि.एस.कें.च्या घरांना डावलून ) एक चांगली सून मिळेल हे त्यामागचं कारण असतं.
स्विटू अन ओम्याच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन शकु अंबरनाथच्या चपातीवाल्या साळव्यांच्या घरी मिठाईचे बॉक्स अन भेटवस्तू घेऊन पोचते. किचन ओट्याशी थांबून अगदी आनंदात शकू-नलू या घट्ट मैत्रीणी स्विटूच्या लग्नाबद्दल सेम पिंच सेम पिंच करत बोलत असतात. नलू-शकूची मैत्री त्या दोघींच्या मुलांना बांधतेय असं वाटत असतानाच कर्मदरिद्री साळव्यांची नलू बावळटासारखी शकूसमोर स्वतःचा फोन धरत त्या फोन मधे कुणा स्थळाचा फोटो दाखवत हे स्थळ स्विटूसाठी किती योग्य आहे ते दाखवते अन ते बघून आपलीही अवस्था शकूसारखी (काय ही नली दलिंदर आहे बघा.. कुबेर शकुच्या रुपाने नलीच्या पदरात आपले धन टाकू पहात आहे अन ह्या कर्मदरिद्री नलीचा पदर फाटका रे बाबा..!!) होते. शकू आवंढा गिळत नलीच्या हो ला हो-हो (हे शुभांगी गोखलेंना नेहमी छानच जमतं ) करत रहाते अन आपण मात्र दळभद्री नलीला लाखोल्या वाहत उद्या पासून नकोच बाबा ही येऊ-कशी-तशी असा विचार करतो खरा पण 'आज काय होणार?' ही उत्सुकता पुन्हा उद्या रात्री ८ वाजता आपली बोटे रिमोटवरील १२०४ हा आकडा दाबून आपला मोर्चा झी मराठीकडेच वळवणार हे माहित असुनही उद्याचा प्रीकॅप बघून झाला की आजच्या पुरतं तरी आपण चॅनेल बदलतो.
अशा या नवीन सिरियल वर चर्चा करण्यासाठी हा धागा थोडा उशिराच उघडला असला तरी सिरियलची खरी सुरुवात तर आजच्या भागापासून होणार आहे
स्विटुने लुटुलुटु मान हलवलेली
स्विटुने लुटुलुटु मान हलवलेली आवडली असेल ओम्याला
खानविलकर विलात पुरुषांनी काही
खानविलकर विलात पुरुषांनी काही काम करण्याची परंपरा नाही आणि ती ओम्या चालवणार. पुरणपोळ्या खाऊन तो वडिलांसारखा सुस्त होणार आणि स्वीटू घर आणि व्यवसाय दोन्ही सांभाळणार. मोहितला खरोखर लग्न करायचं आहे का स्वीटूशी. दोघे शोभतात एकमेकांना. मोमोने होळी छान एन्जॉय केली.
मला एक प्रश्न आहे, मालविका
मला एक प्रश्न आहे, मालविका आणि रॉकीचं लग्न झालेलं दाखवलं आहे का ?
नाही.... ते लिव्ह इन् रिलेशन
नाही.... ते लिव्ह इन् रिलेशन मध्ये आहेत. त्यांचं लग्न नकोच व्हायला. मोमो सोबत रॉकी च लग्न झालं तर सगळे प्रश्न मिटतील असं मला वाटतं
ओह तरीच साळवी त्याला जावईबापु
ओह तरीच साळवी त्याला जावईबापु म्हणतात
बकवास , बकवास , बकवास
बकवास , बकवास , बकवास
ती स्वीटु चक्कर येउन जंगलात पडते , जादू आणि ओम्या शोधत येणार , (ओम्या ला कसं कळलं की ती जंगलात हरवली आहे , ते बघायला पाहिजे )
तिच्याकडे मोबाईल फोन नव्हता??
कैच्याकै चालू आहे एकंदरीत
ईतकी बावळट मुलगी ओम ला का आवडली ?
रच्याकने , मेड ईन हेवन बघत होते परत , शाल्व त्यात करणचा बॉफ्रे दाखवला आहे , नवाब . शाळा-कॉलेजमध्ये असताना.
मेड इन हेवन बघायला पाहिजे
मेड इन हेवन बघायला पाहिजे तेवढा भाग. मोहित तिला त्याला काय वाटते ते सांगत असतो, तीही त्याच्याशी नीट बोलू शकली असती, निदान तेव्हड्यापुरते तरी, तो कसा सटक आहे हे लक्षात घेऊन.तो तिला सोडून गेला हे चूकच पण तिच्याकडे रिक्षा, टॅक्सी काहीच पर्याय नसतो का. तिची पर्स बहुतेक गाडीतच राहते.
मी बघत नाही ही मालिका पण
मी बघत नाही ही मालिका पण इथल्या कंमेंट्स खूप मस्त आहेत. फुल्ल धमाल खासकरून डीजेंच्या !
धन्यवाद आ_रती
धन्यवाद आ_रती
कुठल्याही मुलाला भेटायला गेली
कुठल्याही मुलाला भेटायला गेली तरी ओमबरोबरच परत येते स्वीटू कुंभकरणासारखी झोपली होती, एव्हडी कसली चक्कर म्हणायची मोहितला काय माहिती की स्वीटू अजून तिथेच असेल, तिला लिफ्ट मिळून ती घरी पण जाऊ शकते, की त्याला खात्री आहे तिच्या मूर्खपणाची. जादूने बिचाऱ्याने तिला शोधून काढली. गाडी कुठे गेली ओमची तो तिला सायकल वर घेऊन गेला ते, पण मग जादू कुठे गेला.
बहुतेक जादू गाडी घेऊन गेला
बहुतेक जादू गाडी घेऊन गेला असावा असा लेखकांचा समज झाला असावा
हो उगाच कबाब मे हड्डी कशाला
हो उगाच कबाब मे हड्डी कशाला म्हणून जादू समजूतदारपणा दाखवून गाडी चालवत गेला असेल घरी
गाडी कुठे गेली ओमची तो तिला
गाडी कुठे गेली ओमची तो तिला सायकल वर घेऊन गेला ते, पण मग जादू कुठे गेला. ....--- हे सगळं कुठे आणि कधी दाखवलं .. ओम्या आणि स्वीटू अजून जीव दंगला रंगला च करत बसलेत.. आणि इतकं सगळं होऊन ओम्या एका शब्दानेही स्वीटू ला बिचारत नाही की तू इथे जंगलात कशी आलीस... नक्की काय घडलं ई ई.. आणि स्वीटू पण त्याला मोहित बद्दल काही च कसं काय सांगत नाही..
शुद्धीवर आल्यावर डायरेक्ट रोमान्स सुरू..
सायकल प्रोमो मध्ये दाखवली
सायकल प्रोमो मध्ये दाखवली होती, आजच्या भागात दाखवतील. जादू पायी आणि हे दोघे सायकलवर आहेत. मोहितला गाडी पण दिसू नये म्हणजे कमाल आहे. स्वीटू आधी रोमान्स करून घेते आणि मग म्हणते उशीर झालाय. मागेही त्याच्याबरोबर यार्डात गाणी ऐकत बसली होती. रोमान्स करायची एक संधी सोडत नाही. ओम बरोबर एकांत मिळालेला असताना ती मोहितबद्दल बोलून रंगाचा बेरंग कशाला करेल उलट तिने मोहितचे मनात आभार मानले असतील.
स्वीटू थोडा मेकप केल्यावर चांगली दिसते. दोघे डान्स करताना दाखवलेत तेव्हा छान दिसते.
मोहित बसलाय तिच्या घरी. आता तरी बोलते की नाही कुणास ठाऊक नाहीतर बसेल सर सर करत. स्वीटू भोळी वाटत नाही. खाली मुंडी पाताळ धुंडी वाटते. मोहित बरोबर फिरताना तर ती मोहितला वेडा समजते असे वाटते, तो फक्त श्रीमंतीची स्वप्न बघतो, तिने त्याकडे कधीच कूच केलंय.
चंपा +++
चंपा +++
मला देखील काल वाटलं की स्वीटूला मोहीत चे आभार मानावेसे वाटत असतील. तिला ना घरी कळवायची चिंता, ना मोहितच्या वागण्याचा राग, ना आपलाच पाय काही वेळापूर्वी दुखावल्याची जाणीव ना आईला दिलेल्या सो कॉल्ड वचनाची आठवण! मिळाला चान्स, कर रोमान्स!
मोहित आणि तिच्या वागण्यात काही फरक नाही. फक्त तो व्हीलन दाखवला आहे आणि ही हिरविण. ही पण पैशासाठी तर एवढा लोचटपणा करत असावी, कोणी गरीब माणूस असा स्वाभिमान विकून खात नाही
स्वीटू थोडा मेकप केल्यावर
स्वीटू थोडा मेकप केल्यावर चांगली दिसते. दोघे डान्स करताना दाखवलेत तेव्हा छान दिसते. >>> किती मोठी दिसते ती तेव्हा. ओम खूप बारीक आणि लहान दिसतो तिच्यापुढे. मोहितच शोभतो स्वीटूला.
स्वीटू - ओम पेक्षा अभ्या - लती जोडी छान दिसते.
मोहित ला घरी बघून सुद्धा
मोहित ला घरी बघून सुद्धा अपेक्षेप्रमाणे स्वीटू "आई आई .." करत बसली. तोंड उघडून घडाघडा बोलायला काय झालं यांना कळत नाही. आणि तो ओम्या मठ्ठ... ही पोरगी बेशुद्ध पडली होती तर तिला स्वतः घरी पोचवून तिच्या घरच्यांना कल्पना द्यायची ना... तिला परस्पर सोडून गायब.. आणि स्वीटू ची पर्स तिच्याजवळ कशी परत आली कोण जाणे.. मोहितच्या गाडीत होती ना पर्स आणि मोबाईल ?
मला तर मोमो, रॉकी आणि जादू
मला तर मोमो, रॉकी आणि जादू आवडतात. थोडावेळ दिसतात पण प्रसन्न करून जातात. मोमोचा मेकप आणि कपडे अफलातून असतात. तिचा रंगपंचमीचा मेकपही छान purple होता. निऑन रंग शोभतात तिच्यावर.
मोहित वेगळी गाडी घेऊन गेला होता स्वीटूबरोबर. पर्सचं गौडबंगाल त्यांनाच माहित. मोठया आणि महत्वाच्या गोष्टी बोलत नाहीत तर पर्स तर फार छोटी चीज आहे तशा तर स्वीटू पाय घसरून पडली तेव्हा तिच्या चपलाही पायातून निसटल्या होत्या, जिथे एव्हडी अक्खी स्वीटू सापडत नव्हती अंधारात तिथे तिच्या चपला कशा सापडल्या असतील, पण ओम भेटतो तेव्हा तिच्या पायात चपला असतात.
मला एक कळलं नाही की,
मला एक कळलं नाही की, मुंबईत कुठल्या जंगलात येते ती?
की अंबरनाथच्या जंगलात?
मुंबईत कुठल्या जंगलात येते ती
मुंबईत कुठल्या जंगलात येते ती?>>>>>>>>
ते फिल्मसिटी गोरेगाव चे जंगल होते आणि स्वीटू जिथे नेमकी हरवली तो एरिया हेलीप्याड आहे
रॉकी विचारतो पण स्वीटू
रॉकी विचारतो पण स्वीटू बेशुद्ध पडली कशी तर ओम म्हणतो,तिला काहीच आठवत नाहीये..!
बिच्चारी स्वीटू
सोयीस्कर स्मृतिभ्रंश झालाय
सोयीस्कर स्मृतिभ्रंश झालाय स्वीटूला, आणि तिची आई दुसरा तिसरा काही विचार न करता मोहित खूप चांगला आहे , त्याला हो म्हण यापलीकडे काहीच बोलत नाही. मोहित, मोमो, ओम्या, स्विटू इत्यादी लग्नाळू मंडळी सोडून ही कायम भांबावलेली नलूच गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेली वाटतेय.
स्विटूने जर जास्त वेळ लावला तर नलूच मुंडावळ्या बांधून उभी राहील आता !
(No subject)
त्या स्वीटूने परीराणीचा झगा
त्या स्वीटूने परीराणीचा झगा का घातलाय बरं???
स्वीटू मध्ये नलू कडून
स्वीटू मध्ये नलू कडून दळभद्रीपणाचा वारसा आला आहे बहुतेक. तो ओम्या बिचारा इतक्या रोमॅंटिक पद्धतीने प्रपोज करतोय आज तर ही बाई मृगजळ न काय काय बोलून परत आली. आणि मोहित नक्क्की का मागे लागला आहे स्वीटू च्या ते कळत नाहीये. मालविका ला धडा शिकवायचा काहीतरी प्लॅन होता ना त्याचा, मग स्वीटू शी लग्न करून उलट मालविका च्या मार्गातील काटा जाईल .. मग कसा शिकवणार धडा.. ?
आता उद्या शकू बाई नलू कडे स्वीटू ची मागणी करणार आहेत..आतातरी नलू ला अक्कल येउदेत..
स्मिता, नलीला अक्कल आली तर
स्मिता, नलीला अक्कल आली तर साळव्यांच्या घराण्याला कलंक लागेल. इतकी वर्षं दळभद्रीपणाच्या जोरावर हांबरणाथ मध्ये त्यांनी मोठ्ठं नाव कमावले. साळवी जितकी वर्षं दळभद्री पणा करतील तितकी वर्षं शिरेल चालेल
त्या नलू ने हे वाचलं तर
त्या नलू ने हे वाचलं तर सीरियल सोडून पळून जाईल
पण तिचा चेहरा इन जनरल ही
पण तिचा चेहरा इन जनरल ही कन्फ्यूज असल्यासरखा च दिसतो
मी या सीरियल चा एक च एपी पहिला त्यात मेन हीरोइन च्या मानेची जी वळी आहे त्यात घाम आलेला , नाही म्हणजे घाम येऊ च शकतो पण मला ते बघायला यक वाटलं....
इथे कमेंट वाचायला मजा येते
मान की गळा अनिष्का. आज
मान की गळा अनिष्का. आज मोहितने मालविकाचे नाव घेऊन त्या जोतिष बघणाऱ्याला धमाकावलं जणू काही मालविका कोणी मोठी डॉन आहे. मोहित का लग्न करतोय ते मलाही समजले नाही. ओम प्रपोज करतो ती कसली पार्टी असते, तो पार्टीत नाही हे मालविकाला माहिती नाही का. यांच्या पार्टीमध्ये हे लोक लहान मुलांसारखे कपडे का घालतात. आज स्वीटूच्या हातात एक चंदेरी छडी दिली असती तर ती अंबरनाथची परीच वाटली असती. तो ड्रेस तिने कुठून आणला. हात पाय धून येते म्हणाली पण नलिने तिला हात पाय धुच दिले नाहीत. बाहेरून आल्यावर हात पाय न धुणे ही झिची परंपरा आहे. आता आधी नलीला पटवा मग ती स्वीटूला म्हणेल जा जिले अपनी जिंदगी. पण स्वीटू काही कमी नाही. अशी तोंड पाडून बसेल की नलूला हे बोलावंच लागेल. आजच तिचा चेहरा फाशी दिल्यासारखा होता जो सगळ्यांनी नोटीस केला.
गळा च चंपा
गळा च चंपा
Pages