नाव सुचवा- लहान मुलांच्या कपड्यांच्या ब्रँड चे संस्कृत/ मराठी नाव हवे आहे.

Submitted by गायू on 13 March, 2021 - 06:02

नमस्कार!
लहान मुलांच्या (मुलींच्या आणि मुलांच्या) सुती कपड्यांच्या ब्रँड साठी नाव हवे आहे . सुती म्हणजे कॉटन चे कपडे असणार आहेत त्यामुळे मऊ पण दणकट आणि सुरक्षित ह्या अर्थी शब्द हवा आहे. सॉफ्ट, सेफ अँड स्ट्रॉंग ह्या अर्थी. तलम नको कारण तो एक मुंबईत ब्रँड आहे. लहान मुले आणि कॉटन ह्यांचे समान वैशिष्ट्य असा धागा..
धन्यवाद!

Group content visibility: 
Use group defaults

टोपडं
वेष्टण
बाळू आणि कारट्यांच्या कपड्याचे दुकान Happy अशी ट्यागलाईन

अंगाई
दुलई
उबदार
सुखद
स्पर्श
बालवस्त्रम्
गालगुच्चा
अवघ्राण
साजिरा
गोजिरा
लडिवाळ
मुग्ध
अनिष्काची नावं आवडली.

अंगड टोपड
यात शेवटच्या अक्षरावर अनुस्वार कसा द्यायचा

गोंडस
सुतस्पर्श
कुंची
मुनिया
मोरस्पर्श
शेवरी
मोरपीस
शुभ्र
मनी-मऊ
निरागस

अंगड टोपड
यात शेवटच्या अक्षरावर अनुस्वार कसा द्यायचा >> अंगडं टोपडं असा. गुगल इंडिक कीबोर्ड नका वापरू. आपल्याला आळशी बनवतो आणि चुकीचे शब्दही टाइप करतो. आयट्रान्स किंवा तत्सम कीबोर्ड वापरा.

वासरू
पाडस
ससुल्या
कांगारू
पांडा
टेडी बेअर
छावा
पिल्लू

"लहान मुला मुलींसाठी सुरक्षित, दणकट आणि मुलायम सुती कपड्यांचे दुकान" अशी टॅग लाईन लिहिली की नाव काहीही दिलं तरी कन्फ्युजन नाही होणार Happy

आमच्या इथे आहे असं बाळाचे कपड़े नामक दुकान... ठाणे मध्ये...म्हणजे दुसरं काम असणारी लोक जात च नाहीत

धन्यवाद माबोकर! खूप छान नावं आहेत
@अनिश्का धन्स!
अंबरा मी पण वाचलं गूगल वर, मस्त आहे! पण अंबर म्हणजे आकाश म्हणतो तर कसं ना?

@हरचंद धन्स , Happy छान आहे.. थोडं मोठं वाटलं , पण लक्षात ठेवेन नक्की.

@धनवंती धन्स - मलई क्लीक झालं होतं आणि मुलींसाठी मलई बर्फी आणि मुलांसाठी मलई पेढा असे दोन सेक्शन्स माझ्या डोक्यात होते Happy पण मलई टिकत नाही जास्त सो जरा विचारात होते..

@अस्मिता धन्स, छानच आहेत, गालगुच्चा Happy सुखद पण छान

@आंबट गोड - धन्स- सुख स्पर्श आणि सौम्य छान!

@तेजो- धन्स.. सूतस्पर्श कमाल आहे!

@व्यत्यय - धन्स Happy तळटीप !!

@मानव - सूतसुटीत - खूप छान .. हे मोठं आहे पण लक्षवेधी आहे!

@अनिश्का अच्छा .. पितांबर ...

@ रानभूली धन्स .. नितळ मी पण शॉर्टलिस्ट केलं होतं Happy . गाणं आठवतं नितळ नितळ आरस्पानी ..

सूतकथा चा अर्थ नक्की काय होतो? रामायण महाभारताला सूतकथा का म्हणतात? हे नाव डोक्यात आलं होतं म्हणून विचारलं ...

मलई, लाडोबा/लाडूबाई... मिठाईचे दुकान वाटते.

निव्वळ मराठी नाव निवडून तुमचा कस्टमर बेस संकुचित करू नका. लहान मुले इतरांना पण होतात, त्यामुळे सर्वांना आवडेल असे सुटसुटीत नाव ठेवा, क्लिष्ट नाव नको. उदा. Soft & Silky, Softies वगैरे.

आगाऊ सल्ल्याबद्दल क्षमस्व. पटला तर विचार करा, नाही तर सोडून द्या ही विनंती.

@उपाशी बोका -१००% मान्य, म्ह्णून संस्कृत/हिंदी चाललं असतं .. सौम्य सारखं .. इंग्लिश शॉर्टलिस्टेड आहेत.. Happy

निव्वळ मराठी नाव निवडून तुमचा कस्टमर बेस संकुचित करू नका. लहान मुले इतरांना पण होतात, त्यामुळे सर्वांना आवडेल असे सुटसुटीत नाव ठेवा, क्लिष्ट नाव नको. +100

firstcry वाल्यान्नी जर का तुमच्या सारखी condition ठेवली असती तर लईच अवघड झालं असतं की ओ त्यांच...
मग महिंद्रा ने गुंतवणूक वगैरे करणे तर लांबच Proud

(Sorry फॉर अवांतर) पण इंग्रजी नावांचा देखील विचार करावा _/\_

निरागस - Clothes for young years

किंवा बबली - Clothes for young years

जर इंग्रजी टॅगलाईन सकट नाव दिलंत तर मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी असं कोणतंही दिलं तरी चालेल.

धन्यवाद माबोकर. Happy
रुई नाव खूप आवडलंय
बाकी इंग्रजी आहेतच..
नक्की ठरलं की कळवेनच.