'काय मिळतं रे वाचून?'
किंवा 'कसं काय वाचत बसतो रे एवढा वेळ?'
ह्या अर्थाचे प्रश्न विचारले जातात मला कधीकधी.. म्हणून म्हटलं, जरा शोधून बघू की काय कारणं असतील की
ज्यामुळे मला पुस्तकांशिवाय राहणं जमतच नाही...
म्हणजे 'मी का वाचतो ?' वगैरे
तर..
वाचन ही एकच गोष्ट अशी आहे की मी ज्यात इंटरेस्टेड आहे, म्हणून वाचतो.
पुस्तकांशिवाय मला फार पोरकं पोरकं वाटतं, म्हणून वाचतो.
मला सतत नवनवीन लेखक / लेखिकांच्या जबरदस्त प्रेमात पडायची खोड आहे म्हणून वाचतो.
एखाद्या गोष्टीबद्दल मला फारच थोडं माहिती आहे, असं मला स्वत:लाच आतून वाटावं म्हणून वाचतो.
चाकोरीबद्ध जगण्यातल्या कटकटींवर उतारा मिळावा म्हणून वाचतो.
माझी कुणी सहज दिशाभूल करू नये म्हणून वाचतो.
मी कधी दंगलखोर होऊ नये म्हणून वाचतो.
माझ्यात सदैव एक भावनिक ओल टिकून रहावी म्हणून वाचतो.
माझ्यात कधीही निर्बुद्ध आक्रस्ताळेपणा येऊ नये म्हणून वाचतो.
कधी स्वत:चं भान यावं म्हणून वाचतो.
कधी काळाचं भान हरवावं म्हणूनही वाचतो.
कधी स्वत:चा अपुरेपणा कळावा म्हणून वाचतो.
कधी माझ्यापासूनच सुटका करून घेण्यासाठीही वाचतो.
खरं तर मी आतल्या आत वठत जाऊ नये म्हणून वाचतो.
आणि वाचता वाचता कधीतरी एखाद्या वाक्यानं जगणं लख्ख उजळून निघतं म्हणूनही वाचतो...!
तुमचं कसं असतं? तुम्ही का वाचता?
खूप छान लिहिले आहे.
खूप छान लिहिले आहे.
या सर्व कारणांबरोबरच - माझे अतिशय चिमुकले विश्व आणि त्याहून चिमुकले ज्ञान थोडे तरी विस्तारले जावे म्हणून मी वाचते
क्या बात है!!! प्रत्येक ओळ
क्या बात है!!! प्रत्येक ओळ म्हणजे सुविचार आहे.
- अन्य काही नसो पण कविता मात्र मी समाधी लागावी - म्हणुन वाचते.
- अवघड कविता कळल्यावरती, एखादा गणिताचा सिद्धांत सोडवल्याचा आनंद व्हावा - म्हणुन मी वाचते.
मी तर वेड्यासारखी वाचते.
मी तर वेड्यासारखी वाचते..भेळेचा कागद सुद्धा सोडत नाही.
काय मिळतं??
नक्की माहिती नाही. कदाचित
१. सुटका .... तुम्ही वाचताना वेगळी व्यक्ती होता व तिचं आयुष्य जगता.
२. वेगळा दृष्टिकोन.. आपल्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या व्यक्तीच्या मनात जाता येते.
३. बौद्धिक खाद्य .....नाही तर उपासमार झाल्यासारखं वाटतं
४. आपल्याला वैचारिक स्पष्टता येते.
आता नॉनफिक्शनच बरं वाटायला लागले. कादंबऱ्या तितक्या नाही.
छान लिहिले आहे.
आदत से मजबूर ..
आदत से मजबूर ..
भेळेचा कागद सुद्धा सोडत नाही.>> माझं पण काही असाच आहे, लहान पणी किराणा सामानाच्या पुड्या बांधण्यासाठी वर्तमान पत्र किंवा मासिक यांचे कागद वापरले जायचे. घरी त्या पुड्या सोडून सामान डब्यात भरताना, आई तो कागद वाचल्या शिवाय फेकत नसे. काही उपयुक्त माहिती असेल तर आम्हाला वाचायला देत असे. तीच सवय लागली. पुढे गेल्यावर ती इतकाही वाढली की मित्राच्या रूम किंवा हॉस्टेल वर गेल्यावर मित्र पेपर मासिक लपवून ठेवत, कारण माझ्या हाती पडले तर मला आजूबाजूला काय चाललंय याच भान राहत नसे आणि मी चर्चेत भाग घेत नसे . सो संस्कार, कुतूहल आणि आदत.
बरं मला इ-रीडर चा मोह पडत नाही. कागदाचा स्पर्शच वेडावणारा असतो
बरं मला इ-रीडर चा मोह पडत
बरं मला इ-रीडर चा मोह पडत नाही. कागदाचा स्पर्शच वेडावणारा असतो..>>>>
याला शेकडो वेळा अनुमोदन.
मला वाटायचं माझेच असे आहे fine Tactile sense मुळे !
कागदाचा स्पर्श आवडतो,
कागदाचा स्पर्श आवडतो, पुस्तकांना वास असतो, आपण खूप 'सेन्सेस शी' रिलेट करतो वगैरे वाटायचे पण जेव्हा शांता शेळके यांची काही पुस्तके व ययाती इ-बुक वाचले व ययातीचा २ दिवसात फडशा पाडला त्यावरुन हे लक्षात आले की नवीन टेक्नॉलॉजी ला उगाचच आपला विरोध होता. नवीन काही शिकायचं म्हटलं की आपल्याला धडकी भरते. मग किती का बुजगावणे असो. हे माझ्या पुरते. अन्य कोणाबद्दलही नाही. कलोअ.
खूप छान लिहिले आहे.
खूप छान लिहिले आहे.
खूप छान लिहिलायं लेख..!
खूप छान लिहिलायं लेख..!
वाचून नक्की काय मिळतं माहीत नाही; पण मन आणि मेंदू नक्कीच ताजातवाना होतो आणि अजून प्रगल्भतेने विचार करायला उद्युक्त करतो.
मी तर वाचावं म्हणून वाचतो,
मी तर वाचावं म्हणून वाचतो, कारण वाचाल तर वाचाल असं कुणीसं म्हटलंय. वाचलं नाही तर वाचाच बंद होईल कारण मी वाचनमात्र अस्तित्वात आहे.
धन्यवाद धनवन्ती, सामो,
धन्यवाद धनवन्ती, सामो, अस्मिता
अहमदनगर एस टी स्थानकावर एक
अहमदनगर एस टी स्थानकावर एक बुक स्टॉल होता त्यावर एक बोर्ड लावलेला होता....
.
.
.
" जिसके पास पुस्तक है वह अकेला नही है "
खरंतर निर्भेळ आनंदासाठी..
खरंतर निर्भेळ आनंदासाठी..
आणि फिक्शन म्हटलं तर पुर्णतः अनोळखी आणि वेगळ्या पण हव्याहव्याशा नवीन जगाशी जोडले जाण्यासाठी..
नसलेलं समजण्यासाठी.
नसलेलं समजण्यासाठी.
जगातील अनेक अदभूत गोष्टी,
जगातील अनेक अदभूत गोष्टी, इतिहास, मनाला भावेल अशा सुंदर किंवा टोटली अनोळखी गोष्टी जाणून घेण्यासाठी, मुळात कधीच एकटं वाटू नये आपल्याला, कोणी सोबत असो वा नसो, आवडत्या पुस्तकातील आवडत्या ओळी, व्यक्तीरेखा , त्यांचे विचार सतत आपल्यासोबत असावेत यासाठी वाचते मी... वाचत राहीन !
वाचताना मस्त तंद्री लागते,
वाचताना मस्त तंद्री लागते,
वेगळ्या मेडिटेशनची गरजच भासत नाही,
अनेक नवनव्या गोष्टी समजतात,
नरेशनच्या विविध पद्धती कळतात,
प्रांतानुसार बदलणारी भाषा समजते,
शब्दलालित्यात गुंतून जायला आवडतं,
वाचताना डोळ्यांसमोर आपलं स्वत:चं चित्र उभं करण्याची मोकळीक असते,
कल्पनाशक्ती चौफेर उधळता येते,
जगात माहित करून घेण्याजोग्या असंख्य गोष्टी आहेत, त्यातली आणखी एक माहित करून घेण्याची संधी मिळते,
.
.
.
आणखी बरंच काय काय.....
म्हणून मी वाचते.
मस्त लेख आणि सगळे प्रतिसाद पण
मस्त लेख आणि सगळे प्रतिसाद पण...
मला कथा कादंबरी वाचताना वेगळ्या जगात फिरून आल्यासारखे वाटते,प्रत्येक पुस्तक एक खास ट्रिट वाटते,म्हणून वाचते.
मला माहित नसलेली बरीच नवीन माहिती मिळते,म्हणून वाचते.
एखाद्या गोष्टीकडे कितीतरी द्रुष्टीकोणातून पाहता येतं हे कळतं,म्हणून वाचते.
A reader lives a thousand
A reader lives a thousand lives before he dies. The man who never reads lives only one.
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
मी का वाचते? वाचायला आवडतं
मी का वाचते? वाचायला आवडतं म्हणून.
काय सांगणार....
काय सांगणार....
व्यसन लागलंय लहानपणापासून...
पण मुक्त नाही व्हायचंय...
खरं तर मुक्तीसाठी असलेलं हे व्यसन..
म्हणून इतरांनाही लावतो..
आता बायकोही व्यसनी..
आणि मुलंही व्यसनी..
मी का वाचते? वाचायला आवडतं
मी का वाचते? वाचायला आवडतं म्हणून. Happy ">>> मी पण. वाचताना वाचन साहित्य छान असलं की त्यात गुंतून जायला होत, मन आंनदी होतं.
वाचायला आवडतं, पण वाचलं नाही
वाचायला आवडतं, पण वाचलं नाही तरी फारसा फरक पडत नाही (माहिती आणि मनोरंजन दृष्ट्या) हे मत बनले आहे.
सारासार विचार करू शकतो.
सारासार विचार करू शकतो.
नवीन दॄष्टीकोन मिळतो.
... प्रत्येक ओळ म्हणजे
... प्रत्येक ओळ म्हणजे सुविचार आहे....
+१
का वाचता ?
मन गुंतावे, कंटाळा कमी व्हावा म्हणून.
>>>>>>खरं तर मी आतल्या आत वठत
>>>>>>खरं तर मी आतल्या आत वठत जाऊ नये म्हणून वाचतो.
होय आणि होय!!
जे पाहता येणार नाही ते
जे पाहता येणार नाही ते दुसऱ्याच्या डोळ्यांनी पाहतो. जे जाणता येणार नाही ते लेखकाकडून लिहिलेले वाचतो.
दोन धागे एकच विषयाचे झालेत.
दोन धागे एकच विषयाचे झालेत.
खूप सुंदर लिहीलयत.
खूप सुंदर लिहीलयत.
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
वाचायला आवडते म्हणून वाचायचे.वाचायला नसेल तर वेड्यासारखे व्हायचे.हल्ली वाचन शून्यावर आले आहे.
याचा अर्थ पूर्ण वेड लागले आहे
याचा अर्थ पूर्ण वेड लागले आहे, असा होऊ शकतो का?
Pages