धागा काढावा कि नको या संभ्रमात होते पण इतर सिमीलर धाग्यांवरचे प्रतिसाद पाहता इथेच थोडी मदत मिळेल असे वाटले..एक जण माझ्या ओळखीतला एका अडचणीतून जात आहे..
कृपया जाणकारांनी थोडे मार्गदर्शन करावे..
तो हुशार कैन्डिडेट ..पोस्ट ग्रैज्युएट..कैम्प्स थ्रु चांगल्या कंपनीत सिलेक्शन...चौदा वर्षे नोकरीत अनुभव.. आता एक्झ्क्युटिव लेवल ऑफिसर....
प्रॉब्लेम असा आहे कि उच्चपदस्थ लोकांसमोर प्रेझेन्टेशन देताना किंवा मिटींगमध्ये टेन्शन आले कि त्याला काहिही लिहिता येत नाही म्हणजे पेन,मार्कर पण पकडता येत नाही.हात प्रचंड थरथरतो, सहीसुध्दा करता येत नाही इतका.नॉर्मली काही प्रॉब्लेम येत नाही..टिममधे ,सबऑर्डिनेट्स बरोबर तो कम्फर्टेबल असतो... पण त्या प्रॉब्लेम मुळे त्याला आता न्युनगंड यायला लागलाय कि, उच्चपदस्थ लोकांबरोबरच डिल करावी लागली तर हे कसं जमणार, कधी नोकरी बदलावी लागली तर इंटरव्ह्यू तरी व्यवस्थित देऊ शकेल का??
"इतर सगळी कामं तो हाताने व्यवस्थित करू शकतो".
स्ट्रेस आला कि "फक्त लिहिताना" हात थरथरणे आणि काहीही लिहु न शकणे , हे कशामुळे होत असावे??"
यावर काही सोल्युशन्स कुणाला माहीत असेल तर कृपया शेअर करा..
ओह.. लवकर यातून बाहेर पडू देत
ओह.. लवकर यातून बाहेर पडू देत.
स्ट्रेस ने ट्रेमर हे
स्ट्रेस ने ट्रेमर हे पार्किन्सन्स चं मुख्य लक्षण आहे, तो नाहीये हे आधी तपासून घेतलं आहे का? पार्किन्सन्स नसेल तर काही व्यायामांनी, असेल तर डोपामाईन ड्रग्स ने हे ट्रेमर नियंत्रीत करता येते. (घाबरवत नाहीये.लेखातली केस ही साधी अँकझायटी असू शकते. )
https://www.healthline.com/health/anxiety-shaking#takeaway
https://www.apdaparkinson.org/article/stress-anxiety-parkinsons-disease/....
माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीला
माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीला प्राणायामाने फरक पडला आहे. जवळपास अशाच प्रकारचा त्रास होता त्याला. 3-4 महिने तरी करायला हवे मात्र.
मला नीट प्रॉब्लेम समजला नाही
मला नीट प्रॉब्लेम समजला नाही. हाताचे थरथरणे किंवा हातात पेन न पकडता येणे हा हाताच्या शिरांचा आजार असू शकेल. त्याचा टेण्शनशी संबंध असेल का ?
Writer's cramp किंवा Carpal tunnel syndrome असे काही निदान पूर्वी झाले आहे का ? दुसरे ज्या मशीन्स मधून व्हायब्रेशन्स निघतात त्या सतत हाताळल्याने अजून एक असाच आजार होतो. ते इथे लागू नसणार.
टेन्शन आल्यावरच असे होते का ? तसे असेल तर चांगला मानसोपचार तज्ञ गाठावा लागेल.
नात्यातील व्यक्तीला असे
नात्यातील व्यक्तीला असे व्हायचे. बाकी काही आजार नाही ना हे रुल आउट करायला स्कॅन वगैरे केले होते. अभ्यासाच्या ताणामुळे होत होते. शेवटी तणाव मॅनेज करायला शिकणे हाच उपाय असे सांगितले गेले. त्यासाठी थेरपी सेशन्स सुचवले होते.
उच्च पदस्थ व्यक्ती म्हणजे कुणी वेगळी नाही, आपल्यासारखेच किंवा काहीवेळा त्याही पेक्षा जास्त ओझे त्यांच्याही खांद्यावर आहे असे स्वतःलाच सांगायचे. शेवटी प्रत्येकजण कुणालातरी आन्सरेबल असतो.
आत्मविश्वास अभाव जणवतोय.
आत्मविश्वास अभाव जणवतोय.
डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आधी मेडिकल बाजूने चेक करावे
आधी मेडिकल बाजूने चेक करावे हे महत्त्वाचे. त्यातून काही निघाले नाही तर मग केवळ तणावाने होत असेल, तर पुन्हा पुन्हा करून सवयीने कमी व्हायला हवे. किंवा तशा मीटिंग ची प्रॅक्टिस एरव्ही घरी, किंवा ऑफिसमधे एखाद्या कॉन्फ रूम मधे एकतर एकट्याने किंवा कोणीतरी विश्वासू कलीगला बरोबर घेउन करावी. स्पेसिफिकली लिखाणाबद्द्लच होत असेल आणि लॅपटॉप वर टाइप करताना होत नसेल तर लॅपटॉप वर नोट्स काढाव्यात - उच्चपदस्थांबरोबरच्या मीटिंग मधे आजकाल बहुतांश क्षेत्रात लॅपटॉप वापरत असावेत.
अशा उच्चपदस्थांपैकी जर एखादा "मेण्टर" टाइप असेल (त्याचा बॉस किंवा चांगले संबंध असलेला दुसरा एखादा) तर त्याला कल्पना दिली, तर तो अशा मीटिंग्ज मधे कव्हर करू शकेल. पण तितका घट्ट विश्वास असलेला हवा.
बहुतेक अगोदरचे प्रसंग असतील.
बहुतेक अगोदरचे प्रसंग असतील. उच्चपदस्थांनी असहमती दाखवणे, झाडणे वगैरे.
प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद
प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना !
कृपया डॉक्टरांचा सल्ला घेणे..
कृपया डॉक्टरांचा सल्ला घेणे...
फारेण्ड +१. चेक अप करून काही
फारेण्ड +१. चेक अप करून काही निघाले नाही तर, एक/दोन वरिष्ठांना ही समस्या सांगुन त्यांच्या पुढे मॉक ड्रिल करावी.
माझ्या आधीच्या एका कंपनीत हे करायचे, ट्रेनिंग पिरियड नंतर मार्केटमध्ये पाठवण्यापूर्वी. ज्यांच्यात सभाधीटपणा नाही त्यांच्या मग वरिष्ठांच्या हजेरीत मॉक ड्रील्स व्हायच्या. तिथले दोन डायरेक्टर्स याबाबतीत सपोर्टिव्ह होते, अशा मॉक ड्रिल मध्ये आवर्जून सामील व्हायचे. याने खूप फायदा होतो.
ऐक्च्युअली, त्याचं म्हणनं असं
ऐक्च्युअली, त्याचं म्हणनं असं आहे कि आधीची काही वर्षे त्याचा फक्त इमिजीएट बॉस सोबतच संबंध येत असे...म्हणून कधी लक्षात आला नाही हा प्रॉब्लेम पण मागच्या एक वर्षापासून जाणवलं..आधीपासूनच स्टेज फियर पण आहे त्याला..
इकडच्या प्रतिक्रिया मी कळवेन त्याला..
धन्यवाद सर्वांचे !
त्यांना कंफर्टेबल करण्यासाठी
त्यांना कंफर्टेबल करण्यासाठी बॉसचा मोठा रोल आहे...... हात थरथरला तर त्याला सूद करणे हे बॉस कडून झाले तर खूप फायदा होईल... स्वानुभव
कॉन्फिडन्स नाही त्यामध्ये.
कॉन्फिडन्स नाही त्यामध्ये. वक्तृत्व कला अवगत करायला हवी. स्वतःहून छोट्या छोट्या गोष्टींत पुढाकार घेऊन जुनिअर्स ला ट्रैनिंग देणे. मित्रांसमोर कोणत्याही गोष्टींत लीड घेऊन काम करणे, बोलणे. immediate बॉस बरोबर चर्चा करणे यातून हळूहळू सहजपणे कॉन्फिडन्स वाढेल.
माझा स्वतःचा तसा अनुभव आहे.