कोव्हिद लस देण्यासाठी प्राधान्यक्रम काय असावा?.

Submitted by विक्रमसिंह on 21 November, 2020 - 08:05

करोना वायरस मुळे होणार्‍या आजार होऊ नये म्हणून प्रतिबंधक लस लवकरच उपलब्ध होईल अश्या बातम्या येत आहेत.
जवळपास १२ कंपन्या याबाबदच्या चाचण्या घेत आहेत यात भारत बायोटेक ही हैदराबाद येथील कंपनी पण आहे. लस कुणीही शोधली तरी भारताची उत्पादनाची क्षमता पहाता एकूण उत्पादनापैकी कमित्कमी ५० % उत्पादन भारतात होइल असे दिसते.

एकदा लस उपलब्ध झाल्यावर ती कुणाला प्राधान्यक्रमाने द्यावी याबाबत विचार आणि माहिती गोळा करण्याचे काम चालू झाले आहे. मला खालीलप्रमाणे प्राधान्यक्रम अअसावा असे वाटते.

१. वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्ति. डॉक्टर्स, नर्सेस, आणि रुग्णालयातील कर्मचारी;
२. अत्यावश्यक क्षेत्रातील विविध आस्थापनातील कर्मचारी. सैन्य, पोलिसदले, फायर ब्रिगेड, स्वच्छता विभाग, पाणिपुरवठा, शेतकरी, सार्वजनीक रस्ते वाहतूक (सरकारी व खाजगी ;
३. जीवनावश्यक वस्तुपुरवठा साखळी - दुकानदार, किरकोळ भाजी, दूध विक्रेते अशी व इतर सर्व सुपर स्प्रेडर प्रकारातील मंडळी;
४. वैद्यकिय उत्पादन ( फार्मा) आस्थापनातील कर्मचारी, आधीचे गंभीर आजार असणार्‍या व्यक्ति:
५. इतर आस्थापनातील प्रत्यक्ष उत्पादनाचे काम करणारे कर्मचारी, रेलवे, विमान वाहतूक, न्यायव्यवस्था कर्मचारी;
६. शिक्षक, मुले व शिक्षणक्षेत्रातील कर्मचारी वर्ग;
७. इतर आस्थापनातील इतर सर्व कर्मचारी;
८. उर्वरीत सामान्य जन

यात मी जेष्ठ नागरीक असा भेदभाव केलेला नाही. ते जर काम करत नसतील तर त्यांनी शांतपणे घरात बसावे. मुलांनीही शाळा सुरू होईपर्यंत घरी बसावे.

यात अजून एक सध्याच्या कोविद प्रादुर्भावानुसार अति, मध्यम व कमी अशी शहरी/ग्रामीण क्रमवारी करून मग वरचा क्रम लावता येइल. तरी १,२,३ साठी सर्वत्र लस पुरवल्यावर मग इतर क्रमांकावर जाता येइल.

तुमच्यावर जर प्राधान्यक्रम ठरवण्याची जबाबदारी असेल तर तुम्ही काय सुचवाल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pfizer चे माजी अध्यक्ष तर म्हणत आहेत लसी च गरज च नाही covid ची साथ आता अस्तित्वात च नाही.
बघा कशी बातमी पेरून वातावरण निर्मिती केली जात आहे.
लस येणारच नाही सरकार खर्च करण्यास तयार होत नसतील..

UK मधील एका भारतीय cardiologists नी दावा केला आहे त्यांच्या वडिलांचा मृत्यू mrna
Tech वर आधारित लशी मुळे झाला आहे.
ह्या प्रकारच्या लसी मुळे heart शी संबंधित समस्या निर्माण होत आहेत.
भारतात पण तरुण वयातील अनेक लोकांना heart attack yet आहे.
त्या मुळे भीती वाटते

आणि हया विषयावर सर्व गप्प आहेत.लसीकरण साठी सर्व यंत्रणा पेटून उठली होती.

Heart attack चे प्रमाण ते पण निरोगी आणि तरुण लोकात covid नंतर वाढले आहे.
हे खरेच आहे
Heart विषयी समस्या पण वाढल्या आहेत.
पण
सर्व संस्था गप्प आहेत

mRNA tech जे पहिल्याच वेळी वापरले त्याचा प्रयोग लिमिटेड लोकांवर च करायला हवा होता ते पण त्यांच्या समंती नी.
जागतिक पॉवर असणाऱ्या लोकांनी सर्रास सर्व लोकांवर केला.
पारंपरिक लस च वापरणे गरजेचे होते.आता परिणाम जे होत आहेत त्याची उत्तर कोण denar आणि जबाबदारी कोण घेणार

महितीतील तिघे पन्नशितले अचानक हृदय विकाराने गेले त्या तिघांनाही कोविड होऊन गेला होता. त्यातील दोघांना हृदय विकाराचे निदान केल्या गेले नव्हते तिसऱ्या बद्दल माहीत नाही. (निदान केले गेले नव्हते म्हणजे नव्हताच असे म्हणता येणार नाही. पण तशी कुठली ठोस लक्षणे नव्हती म्हणून रूटीन चाचणी व्यतिरिक्त चाचण्या केलेल्या नसाव्यात.)
तिघांचा कोविड लसीचा पहिला डोस झाला होता.

आईला तीन स्टेंट्स लावले आहेत, बाबांना स्टेंट्स नाहीत पण झटका येऊन गेला आहे, ब्लॉकेज असावे असे अडीच वर्षांपूर्वी 2D echo काढला तेव्हा सांगितले.
त्यामुळे दोघांचीही काळजी होती कोविड झाला तर हृदय विकार आधीच आहे. पण दोघांचीही ट्रीटमेंट सुरू आहे, statins आणि antiplatelets. त्याचा फायदा झाला असावा. दोघांचे कोविड लसीकरणाचे दोन्ही डोसेस वेळेवर झाले.

आम्हाला कोविड झाल्यावर काही ठराविक दिवसांनी D-dimer ही चाचणी दोनदा करायला माझ्या कोविड ट्रीटमेंट देणाऱ्या doctor मित्राने सांगितली होती आणि त्यावरून गरज वाटल्यास त्याची औषधे घ्यायची की नाही हे ठरणार होते. पण तशी गरज पडली नाही.

तर

हृदय विकाराची समस्या कोविड झाल्या मुळे उद्भवते की लशीमुळे हे सिद्ध झालेले आहे का?

लसीचा फायदा कितपत होतोय याबद्दल साशंक आहे. आम्ही तिसरा बूस्टर डोस घेतला नाही, तो या साठी आणि दुसरे म्हणजे पूर्णपणे सिद्ध न झालेल्या लसीचे असे सारखे डोस घेणे यामुळे त्या विषाणू पासुन बचाव होण्या ऐवजी त्या विषाणू चा शरीरात खरेच शिरकाव होईल तेव्हा इम्यून सिस्टीम त्याचा इफेक्टीव्हली प्रतिकार न करण्याची शक्यता आहे असे काही तज्ज्ञांचे मत पडले. हृदय विकार किंवा इतर काही अपाय होऊ शकतो असे तेव्हा कुणी म्हणाले नव्हते.

पारंपरिक लसी चा मोठा इतिहास आहे आणि अभ्यास पण आहे आणि खूप मोठा deta पण आहे..
पारंपरिक म्हणजे अर्धमेला विषाणू पासून बनवलेली लस.(covaxin)
पण mRNa tech नवीन आहे तिचे दीर्घ कालीन परिणाम एक वर्षात समजणे अशक्य आहे
तरी तिचं लस दिली गेली कमी अभ्यास आणि टेस्ट करून. .
आणि खरेच heart problem होत आहेत कोणी विनाकारण दोष देत नाही .

Heart attack तरूण वयात आणि निरोगी व्यक्ती मध्ये का येत आहेत
Covid नंतर..लसी मुळे की covid मुळे ह्याचे उत्तर कोणी देणार नाही
Who काही बोलत नाही.
बाकी पण कोणी ती जबाबदारी घेणार नाहीत
Arthvat माहिती वर लस घ्या सांगणारे लाखो होते

लसीकरण चे नियोजन महाराष्ट्रात तरी उत्तम झाले.
बाधित लोकांना घरापासून कविद सेंटर पर्यंत सरकार नी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिली होती.आणि उत्तम नियोजन होते .
Covid सेंटर मध्ये सर्व सुविधा उत्तम होत्या.
त्या वेळच्या महाराष्ट्र सरकार नी उत्तम रित्या ह्या संकटात काम केले.
सरकारी यंत्रणा नीट काम करत नाहीत हा समज चुकीचा ठरवला

Pages