...लढतं राहणं सोडायचं नाही!

Submitted by Swati Karve on 8 February, 2021 - 03:45

...लढतं राहणं सोडायचं नाही!

काय सांगू तुम्हाला
मी आणि परिस्थिती
आमचं कधीच जमत नाही…
पण मी मात्र पक्क ठरवलंय
घेतला वसा टाकायचा नाही
काहीही झालं तरीही
लढत राहणं सोडायचं नाही.

कधी कर्तृत्व सिद्ध करायला
योग्य संधीच मिळत नाही
कधी अपार कष्ट करून ही
त्याचं चीझ होतं नाही
किती हि मोठे अडचणींचे
डोंगर दिसतं असले तरीही
मी मात्र महत्वाकांक्षेची
ज्योत विझू देत नाही
कारण मी पक्क ठरवलंय
घेतला वसा टाकायचा नाही
काहीही झालं तरीही
लढत राहणं सोडायचं नाही.

कोणत्या नात्यात किती
जवळीक किंवा अंतर असावं
ते बरेचदा उमगत नाही
अगदी जवळचे वाटणारे ही
अनेकदा काही केल्या
मनाने जोडले जात नाही
विश्वासघात, विसंवाद,
अवहेलना, काहीही
वाट्याला आलं तरीही
मी मात्र नात्यांवरचा
विश्वास ढळू देत नाही
कारण मी पक्क ठरवलंय
घेतला वसा टाकायचा नाही
काहीही झालं तरीही
लढत राहणं सोडायचं नाही.

कधी संकटांच्या वादळात
योग्य वाट सापडत नाही
कधी योग्य वाट सापडुन ही
हवं ते साध्य करता येत नाही
किती ही फसव्या वाटा
किती हि मृगजळे
वाट्याला आली तरीही
मी मात्र ध्येयासाठी प्रयत्नांची
पराकाष्ठा करणं सोडत नाही
कारण मी पक्क ठरवलंय
घेतला वसा टाकायचा नाही
काहीही झालं तरीही
लढत राहणं सोडायचं नाही.

मान्य आहे मला
हव ते, हवं तसं घडवणं
माझ्या हातात नाही
निमूटपणे परिस्थितीला
शरणं जाणं मला
मुळीच जमणार नाही...
परिस्थितीच्या दाहक
वेदना सोसल्यानंतरही
आशावाद जिवंत ठेवण्यात
मी कधीच कसूर करणार नाही
कारण मी पक्क ठरवलंय
घेतला वसा टाकायचा नाही
काहीही झालं तरीही
लढत राहणं सोडायचं नाही.

- स्वाती

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान !!
सकारात्मक कविता...!

>> विश्वासघात, विसंवाद,
>> अवहेलना, काहीही
>> वाट्याला आलं तरीही
>>
>> किती ही फसव्या वाटा
>> किती हि मृगजळे
>> वाट्याला आली तरीही
>> मी मात्र ध्येयासाठी प्रयत्नांची
>> पराकाष्ठा करणं सोडत नाही

अगदी अगदी ! Happy
Perseverance... perseverance... perseverance... !!!

छान कविता. भावली.