
(या आधीच्या भागासाठी कृपया इथे टिचकी मारावी )
बाबू मंडल हे नित्यनेमाने न थांबणा-या ट्रेनबद्दल रिपोर्ट पाठवत होते. तार पाठवत होते. काही काही गाड्यातून सामान उतरवून घ्यायचे असायचे. ते ४६ किमी वर असलेल्या पुरूलिया वरच उतरवले जाई. बाबू मंडल यांनी पुरूलिया स्टेशन मास्तरकडे असे केल्याबद्दल तक्रार केली. ते म्हणाले पर्सनली बोलूयात. जणू काही पुरूलिया रेल्वे स्टेशनमास्तर आपण काहीच चुकीचे करत नाही अशाच अविर्भावात बोलत होते. त्यांनी तक्रार करण्याआधी जरा आजूबाजूला चौकशी करा. ड्रायव्हर ट्रेन का थांबवत नाहीत हे शोधून काढण्याचा प्रयत्न करा असा सल्लाआ दिला.
पण बाबू सातत्याने करत असलेल्या तक्रारींमुळे रेल्वे प्रशासनाला त्याची दखल घ्यावी लागली. पुरूलिया रेल्वे स्टेशनला एक पत्र गेले. त्यात दुसरा ठिकाणी उतरवण्याचा माल इथे न सांगता, परवानगीशिवाय उतरवून घेणे ते ही कोणत्याही सबळ कारणाशिवाय आणि संबंधित रेल्वे स्टेशनच्या सक्षम अधिका-यांच्या परवानगीशिवाय ही गोष्ट गंभीर असल्याचे म्हटले होते. रेल्वेला पण काळजी असेल. ज्याचा माल आहे त्याने जर आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल तक्रार केली आणि नुकसानभरपाईची मागणी केली तर खात्यांतर्गत चौकशी बसण्याची भीती होती.
रेल्वेने दोन चौकशा लावल्या. एक अधिकृत आणि दुसरी अनधिकृत.
पण ती नंतरची गोष्ट. त्या आधी ब-याच घडामोडी घडल्या.
रेल्वेच्या प्रशासनाने ट्रेन न थांबण्याच्या प्रकाराबद्दल संबंधित ड्रायव्हर्सना कारणे दाखवा नोटीसा काढल्या होत्या. त्यांच्यावर शिस्तभंगाचा, बेजबाबदारपणाचा आणि कामावर असताना कामात हयगय केल्याचा आरोप ठेवला गेला. ड्रायव्हर्स ने लेखी जबाब न देता रेल्वे युनियन तर्फे आपले म्हणणे मांडले.
आता तेल्वे युनियनकडे जेव्हां ते आपले म्हणणे मांडायला गेले तेव्हां युनियनचे पदाधिकारी पण आश्चर्यचकित झाले. त्यांना या ड्रायव्हर्सच्या कहाणीत खोटेपणा वाटला. आपली चूक लपवण्यासाठी हे सुरस आणि चमत्कारीक कथा रचत आहेत असे त्यांना वाटले. त्यांनीही आपल्या युनियनतर्फे पुरूलिया आणि संबंधित गावात कामावर असलेल्या युनियनच्या सदस्यांकडे चौकशीला सुरूवात केली. त्यातून त्यांना या ड्रायव्हर्सवर विश्वास ठेवावासा वाटू लागला. किमान ते काही रचून सांगत नाहीत ही खात्री पटली होती.
युनियनने मग मध्यस्थी करून कारावाई स्थगित करायला सांगितली आणि रेल्वेने या बाबत स्वत: चौकशी करावी असे सुचवले. त्यानुसार सूत्रे हलली. रेल्वेने मग सतत पत्रे पाठवणा-या बाबू मंडल यांना तुम्ही ट्रेन न थांबण्याची कारणे का शोधली नाहीत म्हणून उलटं खडसावले. खरे तर बाबू मंडल यांची काहीच चूक नव्हती.
ते जर म्हणत होते की त्यांना या प्रकाराची कल्पनाच नव्हती तर ते मुद्दामून तसे म्हणतात असा आरोप करण्यात अर्थ नव्हता. प्रश्न त्यांना खरेच काही माहीत नाही का हा होता. पण बाबू मंडल यांनी या सर्व प्रकाराचा रिपोर्ट पाठवावा असे आदेश त्यांना दिले गेले.
बाबू मंडल यांना आता काय करावे हे सुचत नव्हते.
संध्याकाळी इथे काय होते हे पहायचे तर स्वत: तिथे हजर असणे गरजेचे होते. त्यांनी मग चौकशीला सुरूवात केली. रेल्वेकडून सुद्धा माहिती घेतली.
सिग्नलमन, ड्रायव्हर यांच्या जबानीतून एक कहाणी तयार होत होती. आता ही या सरकारी कर्मचा-यांची काही कारस्थानी होती किंवा कसे हे बघणे गरजेचे होते. बाबू मंडल यांची वैयक्तिक मतं काय असायची ती असोत. ते सरकारी कर्मचारी होते. सरकारी कर्मचा-याला कायदे लागू असतात. त्यामुळे कोणत्याही अविज्ञानिक दाव्यांवर विसंबून तर रिपोर्ट बनवता येणार नव्हता.
त्यांच्यापुढे खात्यांतर्गत चौकशीची शिफारस करण्याचा एक पर्याय होता. पण त्यासाठी या कर्मचा-यांच्या दाव्याला सप्रमाण असत्य सिद्ध करावे लागणार होते.
बाबू आपल्या असिस्टंटला स्टेशनचा चार्ज देऊन गावात फेरफटका मारायला गेले. त्या वेळी त्यांनी या स्टेशनवर येऊन गेलेल्या काही प्रवाशांची एक यादी बनवली होती. सर्वच प्रवाशांचे नाव तर त्यांना ठाऊक नव्हते.
----------------------------------------------------- X-----------------------------------------
चंदन इथे थोडासा थांबला.
कारण आता वेगळीच चर्चा सुरू झाली. जातानाच पुरूलिया मधे थांबू. कामं करूयात. फिरूयात. मग सकाळी सकाळी बेगुनकोडोर च्या दिशेने जाऊ असं ऋतुपर्ण म्हणत होता. पुरूलियात कुणी एक बॅनर्जी होते त्यांचा बेसन पीठ बनवायचा कारखाना होता. त्या फॅक्ट्रीच्या गेस्टहाऊस मधे सर्वांची सोय होणार होती.
मला हे खूप गैरसोयीचं वाटत होतं. म्हणजे आज काहीच करायचं नाही.
आणि उद्या हे तिथं भोज्याला शिवल्याप्रमाणे शिवून परत निघणार. काहीच उपयोग होणार नाही. फक्त रेल्वेस्टेशन बघायचं आणि परत यायचं. त्यांना त्यात काही वावगं वाटत नव्हतं.
मी आधी गप्प बसून काय ठरतंय हे बघायचं ठरवलं. एक तर मी त्यांच्यावर अवलंबून. उगीच मेजॉरिटीला विरोध करण्यातही अर्थ नव्हता. दुसरे म्हणजे जर बोलायची पाळी आलीच तर आधी यांचं म्हणणं ऐकून घेतलं तर किमान शब्दात आपले म्हणणे न दुखावता कसे मांडता येईल या दृष्टीने जुळवाजुळव करायला वेळ मिळणार होता.
ड्रायव्हर चांगलाच सराईत होता. अशा रस्त्यावर पण ७० - ८० आणि संधी मिळेल तेव्हां १०० च्या पुढे काटा होता. या हिशेबाने सात आठ तासाचा रस्ता अजिबातच नव्हता. मधला वाया गेलेला वेळ धरूनही दुपारी १ च्या दरम्यान आम्ही बेगुनकोडोरला पोहोचत होतो. पुरूलिया अलिकडेच असल्याने अजून लवकर गेलो असतो.
मी फक्त इतकेच विचारले. त्याचा सकारात्मक परिणाम झाला. म्हणजे माझ्या बाजूने.
आता यांचे पुन्हा मत बदलले. आधी बेगुनकोडोरला जाऊ. हिला काय बघायचे ते बघू द्या. आपणही थोडा वेळ घालवू. मग संध्याकाळी पुरूलियात येऊ. फ्रेश होऊ. मार्केट मधे फिरू. मुक्काम करू आणि सकाळी पुन्हा परतीचा प्रवास करू असे ठरू लागले. हे ठीक होते.
एक नक्की की ही ट्रीप ओव्हरनाईट असणार होती.
घरी आपण नंतरच निवांत फोन करू असे ठरले. आता हे सगळे ठरल्याने पुन्हा त्या विषयावर चर्चेची गरज पडणार नव्हती. बॅनर्जी आणि ऋतुपर्ण यांची जी काय व्हायची ती फोनाफोनी पण झाली. संध्याकाळी गेस्ट हाऊस वर या असा निरोप पण मिळाला.
------------------------------------------------------X-------------------------------------------
बाबू मंडल गावात आले.
रेल्वे स्टेशन आणि स्टेशनमास्तरचा बंगला गावापासून थोडा बाजूला आहे. म्हटले तर चालत जायच्या अंतरावर. पण आपल्याला एव्हढ्या तेव्हढ्या अंतरासाठी पण गाडी लागते. त्यामुळं चालत जायचं अंतर हे आपल्याला नाही समजणार.
रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूला आगे मागे तुरळक घरं आहेत. एक दोन झाडं दोन्ही बाजूला.
मग मोकळी जागा.
साधारण अर्धा पाऊण तास चाललं की गाव लागतं.
बाजारपेठ अजून थोडी आत आहे.
बाबू निवांत फिरत होते. त्यांनी चावडीवर बसकण मारली. काही लोक तिथे होतेच. स्टेशनमास्तर गावात आल्याने लोकही कुतूहलाने बघत होते. मंडलसाहेबांनी मग काही लोकांना यादीतल्या लोकांच्या घरी जाऊन घेऊन जाण्याची विनंती केली. मंडल साहेब दिवसभर गावात फिरत राहीले.
सर्वांनी जी गोष्ट सांगितली ती साधारणपणे एकच होती.
आता मात्र मंडल यांना स्वत:लाच खात्री करून घ्याविशी वाटू लागली. परत निघताना त्यांनी मुखियाला बोलावून गावासमक्ष मिटींग घेतली. त्यात वृत्तांत लिहीला. सर्वांच्या सह्या घेतल्या. कार्बन घालून तीन प्रती बनवल्या होत्या. एक प्रत त्यांनी मुखियाकडे दिली. त्यांचे इथले काम झाले होते. पण उत्सुकता त्यांनाही निर्माण झाली होती.
कुणाच्याच कहाणीत फारसा फरक नव्हता.
----------------------------------------------------------------X--------------------------------------------------------------
बाबू मंडल परत आले. रेल्वे स्टेशनवर थोडा वेळ घालवला.
मग शिपायाला ऑफीसचा टाईपरायटर घरी घेऊन चलण्याची ऑर्डर दिली.
नाही तरी आता संध्याकाळी ट्रेनही थांबत नव्हती आणि कर्मचारीही संध्याकाळी थांबायला का कू करत होते.
दिवसभर फिरल्याने त्यांचं अंग आंबलं होतं. घरी येऊन ते फ्रेश झाले. बायकोला चहा टाकायला सांगितला.
आणि ते कागद टाईपरायटरवर चढवत बसले.
एका कागदावर सुवाच्च अक्षरात त्यांनी मुद्दे काढले होते.
गावच्या मिटींगचा वृत्तांत , सह्या आणि त्याला अनुसरून त्यांचा स्वत:चा रिपोर्ट असं दस्त तयार होत होतं. एक कहाणी त्यांच्या बोटातून उतरू लागली.
क्रमश:
( छोट्या भागांसाठी क्षमस्व ! पण सेव्ह करायची सोय नसल्याने नाईलाज आहे. )
(या पुढील भागासाठी कृपया इथे टिचकी मारावी )
बाबू मंडल यांच्या
बाबू मंडल यांच्या कर्तव्यदक्षतेला मानलं खरंच. एवढि चिकाटी!
उत्कंठावर्धक !!
उत्कंठावर्धक !!
छान वर्णनात्मक लिहितीएस !! पुभाप्र !!!
जणू काही पुलवामा रेल्वे
जणू काही पुलवामा रेल्वे स्टेशनमास्तर आपण काहीच चुकीचे करत नाही अशाच अविर्भावात बोलत होते.
हे जरा बदलुन पुरुलिया करता आलं तर बघा.
हरचंद पालव , मृणाली तुमच्या
हरचंद पालव , मृणाली तुमच्या प्रोत्साहनामुळे लिहीण्याचा उत्साह टिकून आहे.
जेम्स बॉण्ड - चूक लक्षात आणून दिल्याबद्दल खूप आभार. हे कसं काय राहून गेलं कळलंच नाही.
खूप व्यवस्थित लिहिते आहेस.
खूप व्यवस्थित लिहिते आहेस. भाग लहान असला तरी चालेल.
छान लिहित आहात.
छान लिहित आहात.
बापरे
बापरे
मी सगळे भाग आल्यावरच वाचायला हवं
हे म्हणजे कडकडीत भूक खवळली आणि एका वेळी 2 चमचे पदार्थ ताटात आला असे होतेय
खूप छान आणि interesting आहे
खूप छान आणि interesting आहेत सर्व च भाग. पुढचे भाग पटापट टाका प्लीज!
छान!
छान!
छान!
छान!
सगळे भाग एकदम वाचून काढले.
सगळे भाग एकदम वाचून काढले. खूपच छान लिहलंय.पुढील भागाच्या प्रतिक्षेत...
वाह मस्त!!! उत्कंठा छान ठेवली
वाह मस्त!!! उत्कंठा छान ठेवली आहे.
मस्त उत्कंठा वाढतेय
मस्त उत्कंठा वाढतेय
दर भागाच्या सुरुवातीला आधीच्या भागाची आणि शेवटी पुढच्या भागाची लिंक द्या. मग बाकी कितीही भाग बनवा.
>>>दर भागाच्या सुरुवातीला
>>>दर भागाच्या सुरुवातीला आधीच्या भागाची आणि शेवटी पुढच्या भागाची लिंक द्या. मग बाकी कितीही भाग बनवा.>>> अस्सेच!
हरचंद पालव >> बाप्रे,
हरचंद पालव >> बाप्रे, तुमच्या लिखाण विभागात पाहीले. इतका मोठा लेखक प्रोत्साहन देतोय म्हटल्यावर बळ आलं लिहायला. खूप खूप आभार. अगदी मनापासून.
मृणाली, धनवन्ती, वीरू, मी अनु, प्राजक्ता, देवकी, डॉ. कुमार१ सर ,
रानी१, सामो सर्वांनी या ही भागातही प्रोत्साहन दिले. खूप आभार.
ऋन्मेष - खरंच चांगली सूचना. हे डोक्यातच नाही आले. करते हे.