![Cyber crime related to QR Code](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2021/02/09/qrcode.jpg)
अनिता बेंगलोर मध्ये राहणारी एक स्मार्ट सॉफ्टवेअर इंजिनियर. दिवाळीची खरेदी म्हणून तिने लेटेस्ट मॉडेल ची फ्रंट लोडिंग वॉशिंग मशीन खरेदी केली. जुनी टॉप लोडिंग वॉशिंग मशीन विकण्यासाठी म्हणून लोकल न्यूज पेपर मध्ये जाहिरात दिली. तीन-चार चौकशीचे फोन येऊन गेले. चौकशी करणाऱ्यांना तिने दहा हजार रुपये किंमत सांगितली. काहींना सेकंड हँड वॉशिंग मशीनची ती किंमत जास्त वाटली. बाकीच्यांना बहुतेक त्या वॉशिंग मशीनच्या खरेदीत इंटरेस्ट नसावा. उगाच चौकशी करायला त्यांनी फोन केला असावा, असं अनिताला वाटलं. मात्र त्या दिवशी ज्या व्यक्तीचा फोन आला, त्याला खरोखरीच वॉशिंग मशीन घेण्याची निकड असावी.
त्याने आपले नाव रामन असे सांगितले. तो सुद्धा टीसीएस मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, असे त्याने सांगितले. वॉशिंग मशीनची ब्रँड, मॉडेल, कॅपॅसिटी असे सगळे डिटेल्स त्याने नीट विचारले. किंमतही त्याला मान्य होती. स्वतःचा नाव, पत्ता सांगून वॉशिंग मशीन न्यायला एक ऍपेरिक्षा येईल असे तो म्हणाला. अनिताने त्याला, 'पेमेंट कसे करणार?' विचारल्यावर त्याने सांगितले, "मॅडम ! तुम्हाला व्हाट्सअप वर एक क्यू आर कोड येईल. तो स्कॅन करून तुमचा अकाउंट नंबर टाकला, की पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतील."
तिने त्याचे नाव, पत्ता पुन्हा विचारून ज्या नंबर वरून कॉल आला, तोच त्याचा व्हाट्सअप नंबर असल्याची खात्री केली. आतापर्यंत क्यूआर कोड वापरून, तिने बऱ्याचदा ट्रांजेक्शन केले असल्यामुळे, सगळी शहानिशा झाल्यावर, तिने क्यू आर कोड पाठवण्यास सहमती दर्शवली.
व्हाट्सअप वर त्याने पाठवलेला क्यू आर कोड तिने फोटो गॅलरीत ओपन केला आणि मोबाईल वरचे bixby vision हे क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी असलेले ॲप वापरून स्कॅन केला. पण हे काय? .....
तिचे अकाउंट डिटेल्स देण्याच्या तयारीत असलेली अनिता एका वेगळ्याच वेबसाईटवर री-डायरेक्ट झाली. वेबसाईटचे लँडिंग पेज बघत असतानाच तिच्या मोबाईलवर बँकेकडून 90 हजार रुपये डेबिट झाल्याचा एस एम एस आला. अनिताला घाम फुटला. परवाच तिचा पगार झाला होता. नक्कीच क्यूआर कोड पाठवणाऱ्या त्या रामनने काही तरी घोळ केला होता. तिने त्याला फोन लावण्याचा प्रयत्न केला. पण आता त्याचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. वेळ न घालवता तिने जवळच्या सायबर पोलिस स्टेशन वर जाऊन कम्प्लेंट दिली आणि एफ आय आर ची कॉपी पोलीस अधिकाऱ्याच्या सही, शिक्क्या सोबत तिच्या बँकेत जमा केली. या केसचा सायबर पोलिस तपास करत आहेत.
क्यूआर (Quick Response) कोड पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर काळ्या चौकोनी ठिपक्यांनी बनलेला चौकोनाकृती द्विमितीय बारकोड असतो. बारकोड रीडर, मोबाईल कॅमेरा किंवा अँप द्वारे तो स्कॅन करून वाचता येतो. कारखान्यात उत्पादित वस्तूंच्या किंवा इतर माहिती साठी, एखाद्या वेबसाइट वर लॉगिन करण्यासाठी, वेगवेगळ्या ऑफर्स व डिस्काउंट मिळवण्यासाठी आणि मुख्य म्हणजे आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी क्यूआर कोड वापरतात.
सध्या या कोरोना काळात स्पर्श विरहित आर्थिक व्यवहारांसाठी क्यूआर कोडचा वापर वाढला आहे. कुठल्याही दुकानाच्या काउंटरवर तुम्हाला क्यूआर कोड लावलेला दिसेल. मोठ्या शहरात भाजीवाले, फेरीवाले देखील याचा सर्रास वापर करताना दिसतात.
सध्याच्या डिजीटल युगात आपणा सर्वांना या गोष्टींचा वापर टाळता येणं शक्य नाही. पण क्यूआर कोड वापरताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
1.पेमेंट साठी क्यूआर कोड स्कॅन केल्यावर स्क्रीन वर आलेले डिटेल्स नीट वाचावे म्हणजे आपण नक्की कोणाला,किती पेमेंट करत आहोत याची खात्री करावी.
2.काहीही असाधारण आढळल्यास पेमेंट करणे टाळावे.
3.सार्वजनिक, अज्ञात ठिकाणावरील किंवा अज्ञात स्रोत असलेला क्यूआर कोड स्कॅन करू नाही.
4.काढता येण्याजोग्या (removable) स्टिकर वरील क्यूआर कोड कधीही स्कॅन करू नाही.
5.कुतूहल म्हणून उगाच कुठलाही क्यूआर कोड स्कॅन करू नाही.
6.कुठल्याही पोस्टरवर, इमारतीवर किंवा घराच्या भिंतीवर बोगस क्यूआर कोड आढळल्यास संबंधित व्यक्तीला त्याबद्दल माहिती द्यावी.
7.क्यूआर कोड स्कॅन केल्यावर वेबसाईट ओपन होऊन त्यावर तुमचे पर्सनल डिटेल्स विचारले जात असतील तर ते देणे टाळावे आणि लगेच तिथून बाहेर निघावे. कधीकधी डिटेल्स विचारले जात नाहीत पण वेबसाईट मात्र malicious असते त्यावरून तुमच्या मोबाईल मध्ये मालवेअर इन्स्टॉल करून मोबाईल हॅक केला जाऊ शकतो आणि तुमचे कार्ड डिटेल्स चोरले जाऊ शकतात. अनिताच्या केस मध्ये तसेच झालेले आहे.
8. मोबाईल कॅमेरा ने क्यूआर कोड स्कॅन करत असल्यास मोबाईल मध्ये चांगले अपडेटेड अँटिव्हायरस असल्याची खात्री करावी.
9. शेवटचे पण सर्वात महत्त्वाचे क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी सिक्युरिटी सिस्टम असलेले ॲप (जसे Kaspersky's QR Scanner, NeoReader ) वापरल्यास तुम्ही सुरक्षित रहाल. कारण सिक्युरिटी सिस्टम असलेले ॲप तुमच्या मोबाईल मध्ये क्यूआर कोड द्वारा कुठलेही मालवेअर इन्स्टॉल होऊ देणार नाही.
सावध आणि सुरक्षित राहून टेक्नॉलॉजीचा आनंद घ्या.
पुन्हा भेटूया एका नव्या सायबर क्राईम कथे सोबत....
आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत...
©कविता दातार
हा ही लेख आवडला
हा ही लेख आवडला
https://www.esakal.com/desh
https://www.esakal.com/desh/daughter-chief-minister-arvind-kejriwal-dupe...
हे बघा ताजं उदाहरण.
लेख आवडला
लेख आवडला
उपयुक्त लेख !
उपयुक्त लेख !
उपयुक्त लेख!
उपयुक्त लेख!
छान आणी उपयुक्त लेख.
छान आणी उपयुक्त लेख.
ऊपयुक्त माहिती.
ऊपयुक्त माहिती.
छान लेख. सविस्तर माहीती
छान लेख. सविस्तर माहीती मिळाली.
ऊपयुक्त माहिती.
ऊपयुक्त माहिती.
बापरे. खरंच हे सगळे माहीत
बापरे. खरंच हे सगळे माहीत नव्हते. तुमच्या या जागरूकता अभियानास शुभेच्छा. पुलेप्र.
उपयुक्त माहिती!
उपयुक्त माहिती!
उपयुक्त ..
उपयुक्त ..
धन्यवाद. उपयुक्त माहिती.
धन्यवाद. उपयुक्त माहिती.